पुन्हा आठवला एक चांगला माणूस……….

आपला रोजचा प्रवास हा रिक्षाने केल्याशिवाय दिवस पार पडत नाही. रिक्षा कधी खडखड आवाज करणारी असते, तर कधी उंच अशा सीट च्या पाठीमुळे अवघडून बसावयास भाग पाडते. वळणावर तर आपण अलगद पणे डाव्या हाताला असलेल्या कॅटरीना च्या फोटोला धडकतो तर उजवीकडचा ऐश्वर्या ला खेटून बसतो. मीटर कडे लक्ष ठेवत एव्हढी आपटाआपटी व्हायचीच. असले कोण बघते. खरय पण ह्याच रिक्षाचा अनुभव जर आपण वाहतुकीच्या कोंडीत सापडलो तर वैतागवाणा होतो. वेळ कसा जाणार? बाहेर तरी किती डोकावून बघणार. त्यातून पाऊस असेल तर वैताग येतो. आपला कान बरा व आपले कानाला लावून ऐकण्याचे गाणे बरे असे म्हणावेसे वाटते.

पण अशी एखादी रिक्षा मिळाली की जी तुम्हाला प्रवास अगदी मीटर च्या भाड्यासाहित, सुखद करवून आणेल. आवडेल न ही कल्पना! मी काही रिक्षाचे नवीन मॉडेल येणार आहे का ते नाही सांगत तर मला असा सुखद अनुभव मिळाला आहे. जो मला आज पुन्हा आठवला.

मला एक विरोप आला त्या मुळे मला पुन्हा मी केलेल्या प्रवासाची आठवण झाली. मुंबईत तर रिक्षा ने केलेला प्रवास हा काही फारसा उत्तम नसतो. मी काही कामा निमित्ताने बांद्र्याला जाण्यासाठी रिक्षाला हात दाखवीत होते. रिक्षात बसल्यावर लक्षात आले ही अनोखी रिक्षा आहे. सर्व अत्याधुनिक सोई आहेत. खर पाहिलं तर बिन दाराचे हे वाहन जोखमीच्या सोईनी पाहून आश्चर्य वाटले होते.

प्रवाश्यांसाठी वृतपत्रे होती, विमानात मासिक व वृतपत्र ह्या करिता जसा पाऊच असतो त्याच पद्धतीची खास सोय वाचन साहित्य ठेवण्यासाठी केलेली आहे. दूरदर्शन दाखविणारा टीव्ही पण होता. हसणे म्हणजे सर्व ताणांचे निरसन होय. मग हेच हसणे ‘पैसे’ म्हणजे मीटर चे भाडे देताना व घेताना असले तर…… सामंजस्य व मैत्री आणि प्रकृती ह्यांचा विचार कल्पकतेने लिहिलेला होता.

आपली गाडी वेगवेगळ्या अत्याधुनिक सोयीने सजावट करून अभिमानाने फिरवणे हे काही अप्रूप राहिले नाही. परंतु आपण किती जण आपल्या गाडीत आठवणीने प्रथोमपचार ठेवतो? प्रश्न केल्यास बऱ्याच जणांकडून अरे! हो आम्ही विसरलोच! असे उत्तर सहज मिळते. हा तर रिक्षावाला, ह्याने आवर्जून प्रथमोपचार रिक्षात खास सोय करून ठेवला आहे. औषधे ठेवली होती कापूस, डेटोल व काही. ह्या वरूनच कळत होते की, सुशीक्षितपणा हा शिकलो म्हणून नसतो तर तो मुळातच अंगी असावा लागतो. ही एक खास रिक्षा आहे हे ओळखायला वेळ लागणार नाही.

दिनदर्शिका होती. सर्व धर्मीय करिता त्या त्या धर्मातील त्यांची शुभ चिन्हे होती. इस्लाम, बुद्ध, शीख, हिंदू असे सर्व धर्म चिन्हांनी सामंजस्याने राहत होते. सर्व धर्मा करिता त्याचा आदर व्यक्त होत होता. काही फोटो पण आपली वंदना स्वीकारत आपल्याला त्यांनी देशाकरिता केलेल्या बलिदानाची आठवण करून देत होते. २६/ ११ चे कामटे, साळसकर, उन्नीकृष्णन ह्यांचे फोटो आहेत. ह्या सर्वांचे फोटो त्यांनी आपण त्यांना खेटून बसावे असे लावले नसून रिक्षाच्या काचेवर प्रथम दर्शनी दिसतील असे आहेत. आदर कसा असावा ह्याचे भान जाणवते. त्यावरून नुसती रिक्षाच खास नाही तर रिक्षावाला पण विशेष खास होता. आगीपासून बचाव करणारे उपकरण होतेच, रेडीओ, घड्याळ पण होते.

प्लॅस्टिक कंपनीत हा रिक्षावाला नोकरीला होता. कंपनी बंद पडल्यावर गेल्या आठ ते नऊ वर्षापासून हा रिक्षाचा व्यवसाय सुरु केला होता. घरी बसून टीव्ही पाहून काय मिळणार त्या पेक्षा रिक्षा चालवूया असे त्याने ठरविले. शाळेत जाणारी दोन मुले आहेत. दोन पैसे मिळाले तर भाविष्याकरिता उपयोगी पडतील हा विचार पक्का करून रिक्षा सुरु केली. सकाळी आठ ते रात्री दहा पर्यंत हा रिक्षा चालवतो. ह्यात काय विशेष आहे? हे तर सर्वसाधारण पणे हमखास असणारे दाहक सत्य आहे. जर तो आजारी पडलाच तरच रिक्षाचा खाडा होतो. त्याला ह्या दिवसभरच्या रिक्षा मुळे फारसा वेळ मिळत नसावा म्हणून त्यांनी ह्या सोई करून घेतल्या असतील. ह्या सर्व सोई प्रवासी मजेत असावेत म्हणून केल्या आहेत. हे त्याचे छोटेसे घर आहे व येणारा प्रवासी हा त्याचा अतिथी आहे

अजून काही व्यवसाय आहे का? वेळ फारसा मिळत नाही पण एक गोष्ट मात्र आवर्जून करतो. अंधेरीच्या एका महिला वृद्धाश्रमात हा जातो. तिथे रोजच्या गरजेच्या वस्तू म्हणजे टूथब्रश. टूथपेस्ट, साबण, केसाचे तेल वैगरे गोष्टी तेथील महिला वृद्धाना देतो. प्रत्येक आठवड्याला हा वस्तू देतो कारण त्याच्या कडे त्याच्या गरजेपेक्षा जास्त पैसे जमा झालेले असतात. एव्हढेच नव्हे तर मीटर च्या आकारणीत २५% सवलत अपंगाना त्याने देऊ केली आहे तसे मीटर च्या खाली व्यवस्थित लिहून ठेवले आहे. अंध व्यक्तींना रुपये ५० पर्यंत मोफत प्रवास देऊ केला आहे.

हा असा रिक्षावाला आहे की जो मुंबईचे प्रतिनिधित्व जपतो. मुंबई ची जिद्द, चिकाटी, संकटे आली तरी न डगमगता मुंबई पुन्हा जोमाने कामाला सुरवात करते. अडचणींना कवटाळून बसत नाही. संकटात सर्वाना मदत करते. कामाचा उत्साह, चैतन्य व सामाजिक जाणीव अशीच मुंबईत अनुभवयास मिळते. हा रिक्षावाला निस्वा:र्थी मदत करीत आहे. स्वता:च्या गरजा ओळखून जास्तीचे पैसे दुसऱ्यांना मदत करण्यासाठी वापरतो. हा स्वता:शी, समाजाशी प्रामाणिक आहे. असे कितीसे उत्पन्न मिळत असेल पण त्यात पण हा दान धर्म हा माणुसकी करिता करतो. आपल्यालाही आराम देतो, अपंगाना ही पैशात दिलासा देतो. ह्या रिक्षातून प्रवास केला तर नकळतपणे आपणही त्याचा आदर करून सलाम कराल.

मला ह्याच रिक्षावाल्याचा विरोप मिळाला. विरोपात टायटन कंपनीचे ‘सुवेंदू रॉय’ ह्यांनी ह्या अनोख्या रिक्षातून प्रवास केला. रिक्षावाल्याची अनोखी कहाणी त्यांनी विरोपातून सगळ्यांना पाठवली असावी. मला विरोप आमच्या ‘बापू परिवारातून’ पाठविला आहे. हाच रिक्षावाला आज मला त्याच्या रिक्षातून मी पण प्रवास केला होता त्याची आठवण करून देता झाला.

श्री. संदीप बच्छे ( Mr sandeep bachhe ) असे नाव रिक्षावाल्याचे आहे. रिक्षाचा नंबर MH -02 -Z -8508 असा आहे.

मला आता नीटसे आठवत नाही कारण मलाही ह्या रिक्षाने प्रवास केलेल्याला जवळजवळ तीन वर्ष झालीत. पण ह्या रिक्षात प्रवाश्यांसाठी पाण्याची बाटली असावी तसेच त्या रिक्षात असलेल्या खाकी रंगाच्या बॅगेत पण नक्कीच काहीतरी प्रवाश्यांच्या करिता उपयुक्त असावे असे वाटते. आपण जर ह्याच रिक्षातून प्रवास केलात तर मला जरूर कळवा. जमला तर त्याचा मोबाईल नंबर मला पाठवा. मी भारतात जाईन तेंव्हा पुन्हा एकदा आवर्जून त्याच्या ह्या छोट्याशा घरात अतिथी प्रवासी म्हणून प्रवास करेन.

आपणाला जर संदीप बच्छे रिक्षावाले मिळाले तर माझाही पुन्हा एकदा नमस्कार कळवा. आपला प्रवास निश्चित छान होईल याची खात्री आहे. तसेच आपणही आपल्याला जमेल तसे नव्हे तर आवर्जून जेव्हढी मदत करता येईल तेव्हढी निश्चित करण्याचे ठरवूया. सलाम माझा अशा चांगल्या माणुसकीला. येथे मी श्री. सुवेंदू रॉय तसेच माझ्या परिवाराचे आभार मानते.

कारण मला पुन्हा चांगल्या माणसाची आठवण करून दिली.

29 प्रतिक्रिया (+add yours?)

 1. महेंद्र
  जानेवारी 31, 2010 @ 14:38:25

  मी पण वाचलंय याच्या बद्दल. पेपरला बातमी होती. आता तर कोल्हापुरला सुंदर रिक्शा कॉंपिटीशन पण होत असते. त्यामुळे सगळे रिक्षावाले रिक्षा छान सजवुन ठेवतात..

  उत्तर

  • anukshre
   जानेवारी 31, 2010 @ 14:47:25

   महेंद्रजी,
   कोल्हापूरला अशी रिक्षावाल्यांची स्पर्धा असते हे माहित नव्हते. मला भावले ते अपंग व आंधळ्या व्यक्तींकरिता असलेली सवलत. तसेच त्याचे अंधेरीला वृद्धाश्रमात मदत करणे.

   उत्तर

 2. Nilima
  जानेवारी 31, 2010 @ 14:53:08

  hmmm riksawale dekhil sudhrlet. nahi tar baryach veles tar riksha thambavlya nater daru chya vaas aadhi yeto.

  उत्तर

  • anukshre
   जानेवारी 31, 2010 @ 14:56:21

   असे चांगले रिक्षावाले भेटले की खरच छान प्रवास होतो. नुसती सुंदर रिक्षा नाही तर माणुसकी दिसते म्हणून मला ही रिक्षा पुन्हा आठवली.

   उत्तर

 3. आनंद पत्रे
  जानेवारी 31, 2010 @ 19:00:00

  अनोखा रिक्शावाला आहे…सामाजिक भान असणारा सुद्धा..
  चांगल्या माहितीसाठी धन्यवाद!

  उत्तर

 4. sureshpethe
  जानेवारी 31, 2010 @ 19:28:39

  कधी मुंबईत गेलॊ व ह्या रिक्षेत बसायचा योग आलाच तर किती बरे हॊईल…होईल का असे ? …मनात तीव्रतेने एखादा विचार असला तर तसे घडते म्हणतात !बघुया !

  उत्तर

  • anukshre
   फेब्रुवारी 01, 2010 @ 08:50:08

   काका,
   मला जर त्याचा ठावठिकाणा कळला तर जरूर कळवीन. मला सुद्धा पुन्हा त्या रिक्षाने प्रवास करायचा आहे. अशी चांगली माणसे भेटली की खरच माणुसकी वरचा विश्वास बळावतो हेच खरे!

   उत्तर

 5. सुहास
  जानेवारी 31, 2010 @ 21:35:05

  हो, मला आलेला याच्या बद्दल एकदा मेल मध्ये…दुनिया मैं दिलवलो की कमी नही त्यातलाच हा एक भला माणूस..

  उत्तर

  • anukshre
   फेब्रुवारी 01, 2010 @ 09:05:04

   सुहास,
   खरय आपले म्हणणे. अशी भली माणसे अजूनही माणुसकी व सामाजिक जाणीव करता काम करतात म्हणून चांगल्यावर विश्वास कायम टिकतो.

   उत्तर

 6. savadhan
  फेब्रुवारी 01, 2010 @ 07:07:30

  पुण्यातही काही रिक्शा वाले खुप चांगले आहेत. असा अनूभव अनेकदा येतो.आता गेल्याच आठवड्यात मला तसा अनुबव आला. मी रिक्शातुन उतरलो की त्याला हार्दिक शु भेच्चा! देतो. त्याचा चेहरा आनंदाने ऊजळ्तो. आप्ल्याला हि आनंद होतो. म्हण्तात ना जर स्वतास आनंदी व्हायचे असेल तर दुसर्याना आनंदी कार.
  धन्यव्वद!

  उत्तर

  • anukshre
   फेब्रुवारी 01, 2010 @ 08:59:39

   सावधान आपले स्वागत!!
   आपण अतिशय चांगला विचार सांगितलात. खरच हार्दिक शुभेच्छा ह्या आनंद देणाऱ्या ठरतात. आपण दुसऱ्यांना आनंद दिला की आपल्याही दुप्पट आनंद मिळतो. छान विचाराची प्रतिक्रिया आहे. आपली आभारी आहे. असेच भेटत राहूया आपणाला माझ्या कडून हार्दिक शुभेच्छा!

   उत्तर

 7. sahajach
  फेब्रुवारी 01, 2010 @ 08:51:34

  खरच चांगला /भला माणूस आहे गं हा रिक्षावाला……
  जगात चांगली माणसं आहेत हे पुन्हा पुन्हा पटत रहातं बघ असं!!!!!!!!!!!!

  उत्तर

  • anukshre
   फेब्रुवारी 01, 2010 @ 09:08:35

   भली, चांगली मैत्रीण पुन्हा दिसू लागली खूप आनंद झाला. ह्नं! तू म्हणतेस तेच खरे आहे म्हणूनच आपण माणुसकी मध्येच देव पाहतो.

   उत्तर

 8. हेमंत आठल्ये
  फेब्रुवारी 02, 2010 @ 14:25:20

  खूपच छान. 🙂

  उत्तर

  • anukshre
   फेब्रुवारी 02, 2010 @ 21:17:00

   हेमंत आठल्ये,
   सामाजिक जाणिवेचे भान असणारा हा रिक्षा वाला असल्याने माझ्याकडून पण उत्साहाने ही पोस्ट लिहिली गेली. पूर्वी मी ह्या रिक्षातून केलेला प्रवास पण आठवला गेला.

   उत्तर

 9. akhiljoshi
  फेब्रुवारी 04, 2010 @ 15:12:50

  तुमचा ब्लोग म्हणजे खजिना विहीर आहे..
  खजिना विहीर गणपती आहे पुण्यातला त्यावरून मला आठवला..
  माहितीचा इतका खजिना तुमच्यापाशी आहे.. निरीक्षणातून,अनुभवातून आलेला..

  अस वाटत ललित लिहीन अपने बस कि बात नही.
  कविता कधी सुचली तरच लिहावी…

  माहिती अप्रतिम……. माणसाची नियत त्याची नियती ठरवीत असते …नाही का?

  उत्तर

  • anukshre
   फेब्रुवारी 05, 2010 @ 10:35:14

   अखिल,
   ललित पण लिही तू छानच लिहितोस. संवेदनक्षम मनाला फक्त कवितेची मर्यादा का घालतोस? कविता तर मनाला भावतात पण तुझे लेखही तितकेच आवडलतील असा विश्वास तुझ्या लिखाणाकरिता
   माझा तरी आहे. ताई चे ऐक व लवकरच तुझे ललित पण वाचावयास पाठव. वाट पाहत आहे. आणि हो पुन्हा अप्रतिम प्रतिक्रियेसाठी मन:पूर्वक धन्यवाद.

   उत्तर

 10. ajay
  फेब्रुवारी 08, 2010 @ 18:01:14

  Anushree,

  ushira commentataoy mafi asavi. ya rikshabaddal ( ki to dusra kon ? ) mi kuthtarr newspaper madhye vachala hota,

  mast lihilay pan anubhav.

  -ajay

  उत्तर

  • anukshre
   फेब्रुवारी 09, 2010 @ 10:48:53

   अजय,
   महेंद्रजीनी सागितले आहे की ह्याची माहिती वर्तमानपत्रात आलेली होती. तो हाच रिक्षावाला असावा. मला आवडली म्हणून पोस्ट केली झाले. उशीर झाला म्हणून सोर्री वैगरे काहीही नसते बघ
   कधीही वाचले तरी तेव्हढाच आनंद मिळतो. येत रहा वेळ मिळाला की………

   उत्तर

 11. bhaanasa
  फेब्रुवारी 09, 2010 @ 08:18:30

  सहीच गं. एकदम अनौखाच आहे हा रिक्षावाला. माणुसकी जपणारा आणि संवेदनाक्षम.
  पोस्ट छानच.

  उत्तर

  • anukshre
   फेब्रुवारी 09, 2010 @ 10:44:08

   भानस,
   बऱ्याच दिवसांनी आलीस, छान वाटले. भारतातून मेल आल्या की अशी काहीतरी हटके माहिती कळते की लगेच सर्वाना कळवावी वाटते. म्हणून हा पोस्ट प्रपंच!!!!!!

   उत्तर

 12. gouri
  फेब्रुवारी 11, 2010 @ 21:07:43

  छानच माहिती मिळाली … आणि मलाही कधीतरी भेटलेल्या काही छान रिक्षावाल्यांची पण तू आठवण करून दिलीस 🙂

  उत्तर

 13. rajashri
  फेब्रुवारी 12, 2010 @ 10:14:43

  anuja
  kharch aajchya jagat pan ashi manse aahet he vachun far bare vatle.
  mala ek auto vala aatvla, mi shopping karun ghari jat hote, rastyat eka auto valyala thamble. tyala vicharle east varun west la jayla kiti ghyenar? tyane sangitle madam tumhala kiti dayche te dya. mala aata 200 rs jamakrun hospital jayche aahe mazi mulgi far aajari aahe. ticha medicine sati paise nahi aahet.mala far daya aali tyachi mi ghari n jata madyech utrli, aani tyala 200rs dile sangitle tumhi pahilyan medicines ghyeun ja hospital la, mi dusri auto karun ghari gele.

  aani kahi mahinyani mi part tyach auto madye basle, tya autovala mala visrun gela pan mi tyacha chehra nahi visru shakli. mi baslya baslya parat tyane tech bolyla survat keli. mazi mulgi far aajri aahe. mag mala tyacha khupch rag aala. mi tyala ghari jaiparynt kahich bole nahi tyachya bolnyavar ha ha kart hote. auto madhun utrun tyala mi ase sunvle. to mhane madam mi to navech. pan mi kashi visru shakte tyala.

  kharch tuja anubhav aani maza anubhv madye kiti fark aahe bagh.
  mhanunmala khup aachary vatle tuja ha lekh vachun. naki tyanch contact no. milala tar mala pan patv.

  उत्तर

  • anukshre
   फेब्रुवारी 12, 2010 @ 10:38:19

   राजश्री,
   नक्कीच मला कळले तर पत्ता जरूर देईन. हं!! सध्या तरी असेच अनुभव खूप येण्याची शक्यता असते. पण हा निराळा अनुभव असल्याने मलाही आनंद पुन्हा आठवला व पोस्ट केला.

   उत्तर

 14. savadhan
  फेब्रुवारी 12, 2010 @ 17:05:40

  राजश्री महोदया,
  तुम्ही एव्हढा विश्वास ठेवायला नको होता असे वाटते. अर्थात हे आता असे सांगणे बरॊबर आहे असे ही मला वाटत नाही तुम्ही रिक्षा दवाखान्याकडे घे अस म्हणाला असतात तर कदाचित त्याचं बिंग फुटले असते. किंवा दुरच्या दवाखान्याचा पत्ता सांगितला असता..आपण नेहमी माणसाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवतॊ.जे बेरकी असतात ते आपला पुरेपुर फायदा उठवतात.पण हल्ली मी रिक्षातून उतरलो की त्याला शुभेच्छा देतो.सुटे नसतील तर त्यासठी वाद घालण्याचे टाळतो.
  नितीमत्ता संपत नव्हे संपली आहे असं म्हटलं त्तर चूक ठरू नये.

  उत्तर

 15. salilchaudhary
  मार्च 09, 2010 @ 11:10:28

  Tai Kasha ahat?
  Likhan ekdum mast hotay tumche. Mala khup avadla ha lekh.
  Magazine sathi ghetoy. (hakkane sangtoy :-))

  उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: