
श्रावण मासी, हिरवळ दाटे चोहीकडे..
27 जुलै 2017 यावर आपले मत नोंदवा
in ललित

भारत माझ्या दरवाज्यात……
18 जुलै 2017 3 प्रतिक्रिया
in ललित
भारत माझ्या दरवाज्यात……
काल बेल वाजली, दुपारचा वेळ होता, दरवाजा उघडून पहिले तर एक परदेशी स्त्री दारात उभी होती. मला म्हणाली मी तुमची शेजारी, आय एम एलिझाबेथ फ्रॉम ऑस्ट्रिया. मी या, या, घरी या म्हणत, तिला आत घेऊन आले. मला म्हणाली, मला इंडियन शेजारी हवेच होते. आय लाईक इंडिया. भरकन माझा चेहरा जणु माझी मावशी आल्याचा आनंद घेत खुश झाला.
एलिझाबेथ म्हणाली, मला तुमचे स्पायसेस खूप आवडतात. दोनच दिवसापूर्वी लखः घासलेला आपलाच मिसळणाचा डब्बा कौतुकाने दाखविला. तिने डब्यातल्या वाट्या मोजल्या आणि मला म्हणाली, सो मच लेस स्पायसेस.. भारत मसाल्यांचा व्यापार करीत असे हे इतिहासात घोकलेले वाक्य आठवले. लगेच मी म्हणाले,छे छे, आमचा भारत खूप मोठ्ठा आहे. प्रत्येक राज्यानुसार, राज्यातील भागानुसार मसाले पण खूप वेगळे आहेत. माझ्यातील शिक्षिका उफाळून आली. तेंव्हा कुठे तिच्या चेहऱ्यावर मी खरंच भारतीय असल्याचा विश्वास उमटला. अचानक ती म्हणाली, शो मी ऑल…
माझ्या डोळ्यासमोर संपुर्ण भारत माझ्या दरवाज्यात दिसला. कुठे असतो हा मसाल्यांचा व्यापार, दक्षिणेकडे का उत्तरेकडे….नव्हे माझ्या फ्रिज च्या दारात.
साधारणपणे निरीक्षण केल्यास प्रत्येकाच्या घरचे फ्रिजचे दार मसाल्यांच्या पुड्क्यानी ठासून भरलेले असते. माझे हि असतेच. काय करणार काळाची गरज झाली आहे. ह्या शिवाय वेगवेगळे मसाला कीपर ओट्यावर ठाण मांडून असतातच. मी जशी नेट वर खाद्य प्रकार शोधत असते तसेच घरचे पण नेट वर असतातच कि, त्यांच्या हि नेट वरच्या फर्माईशी असतात त्या नुसार अनेक खाद्य संस्कृतीची ताळमेळ घालताना माझा फ्रिज चा दरवाजा भरून जातो.
महाराष्ट्र म्हंटले तरि केवढे मसाले असतात. कोल्हापुरी पदार्थाला तोच मसाला लागतो, कोकणी पदार्थांना त्यांचाच मसाला लागतो, सी के पी, मालवणी, साताऱ्याकडचा, नागपुरी अशा सर्व महाराष्ट्राची चव पावलो पावली निराळीच असते. त्या पुढे मग दक्षिणेकडचे, पंजाबचे, आसामचे, बंगालचे कित्ती आणि काय काय असतात. एवढे सगळे थोडक्यात कसे सांगु मी माझ्या शेजारणीला असे झाले. पुन्हा म्हणाली शो मी , आय लाईक टू सी.
मसाले वाढतात तसा फ्रिज हि लहान पडू लागतो, मोठ्ठा दाराच्या कप्यांचा फ्रिज असावाच लागतो. छोले करायचे झाले तर आपल्या काळ्या वाटाण्याचा मसाला कसा बर चालेल? काय सांगु मी? माझ्या विचारातच मी गुरफुटून गेले. तेव्हढ्यात माझा मुलगा आला, त्याला म्हंटले कि, ह्यांना जरा इंटरनेट वर आपले मसाले दाखव तो पर्यंत मी फ्रिज चा दरवाजा नीट करते. एलिझाबेथ नेट वरचा भारत बघू लागली. मी पटकन माझ्या हिमालायची आठवण यावी अशा उत्तुंग फ्रिजपाशी गेले.
गच्च भरलेला माझा फ्रिज, संपुर्ण आसेतु हिमाचल त्याच्या पोटात सामावून घेत होता. बर, ह्या मसाल्यांच्या पुड्क्यांच्या जागा हि नेहमी साधारण पणे ठरलेल्या असतात. पंजाबी, सांबार, चहाचा असे एका ठिकाणी, कधीतरी लागणारा रस्सम मसाला हा जरा मागे, खूप काही जागा अशी दरवाज्यात नसतेच. दोन दोन ओळीच बसतात त्या मोजक्या दोन ओळीच्या अनेक डब्यात माझ्यातील अन्नपूर्णा चे रहस्य दडलेले असते. कितीही व्यवस्थित ठेवले तरि, भारतीय संस्कृती कधी एकमेकांशी मिळून मिसळून जातात आपल्यालाही पत्ता लगत नाही. व्हेज, नॉन व्हेज मसाले हा हि सवतासुभा एकत्र नांदत असतो. त्यात भार म्हणजे चायनीज, रशियन आणि कुठल्या कुठल्या सलाड ड्रेसिंग, मसाल्यांच्या बाटल्या ह्याच दारात ठेव्याव्या लागतात. एकंदरीत काय विविधतेत पण सुजलाम सुफलाम असतेच.
बाहेरून मुलाचा आवाज आला, आई नेट वरती फ्रिज चे कप्पे छान दाखवलेत. भरभर इकडे तिकडे दाटुन भरलेले सामान म्हणजे वेगवेगळी लोणची आणि चटण्या आवरत बसले. इतकं सार भारतीय पोटाकरता लागतं, हे पटवून सांगायचय मला हा प्रश्न उभा ठाकला. नेट वरती घरच खा, आपलंच जेवण करा, न्याहारी करा कशाला परदेशी बाबी अनुकरण करता अश्या सल्यांने माझे परिवर्तन होताच असते. म्हणजे ओघाने थालीपीठ, घावन, डोसे, अशी सगळी पीठे फ्रिज मधेच असतात. काय काय सांगु, आणि कुठे काय आवरू…
मी शाळेत शिक्षिका आहे त्या मुळे साहजिकच आठवडी सुट्टीला नेट जास्त पाहणे होते त्या मुळे आठवड्याचा बेत , त्याची तयारी ठेवायला फ्रिज आहेच. अनेक विचारातून, सहज लीलया हाताने आवरत होते. कशाला एवढे मसाले लागतात, एक बेसिक मसाला करायचा बस्स झालं. असे मत पण सर्वांच्या प्रभावाने होतेच. बेसिक तरि का करा, साधा डाळ भात आणि भाकरी, भाजीने आत्तापर्यंत तब्येत उत्तम ठेवलीच आहे कि, पुन्हा माझे लक्ष मिसळणाच्या डब्याकडे गेलंच.
एव्हाना मुलाने बाहेरून आरोळी ठोकली, त्या किचन मधे येत आहेत ग…… माझा फ्रिज बघून म्हणाली, टू मच बिग, उघडून म्हणाली, आहा! फुल्ली लोडेड…. मी येस म्हंटल, वुई लाईक इट ऑल. एलिझाबेथ येस, येस म्हणाली… मग मला म्हणाली, तिची होणारी सुन इंडिया ची आहे. ते दोघे तिकडेच आहेत. ते हि मोठा फ्रिज शोधत आहेत. तरिच हि सासुबाई चौकशा करण्यास आली. घेऊ देत, घेऊ देत, भरल्या फ्रिज चा तोंड भरून आशीर्वाद दिला. तिचाही संसार असाच भरून राहु देत.
आपला आल्याचा, दुधाचा चहा घेऊन ती निघाली. पुढच्या आठवड्यात ती आणि तिचा नवरा त्यांची जागा सोडून दुसऱ्या देशात जाणार आहेत. तो पर्यंत भारत मसाल्यांचा व्यापार करीत असे हा इतिहासातला प्रश्न मी फ्रिज च्या मदतीने सोडवत राहणार हे निश्चित्त आहेच. आपला वैभवशाली इतिहास असाच सर्व दुर पसरो अशी प्रार्थना करत अन्नपूर्णे पाशी सांजवात लावली आणि साध्या दही भाताचा बेत रात्री करता ठरवून टाकला..
ती होतीच अशी ,
18 जुलै 2017 यावर आपले मत नोंदवा
in ललित
ती होतीच अशी ,
अजूनही कुशीतली तिच्या ,
आठवण ठेवते जागी ..
औक्षण करताना पाही मला,
असे इकडे तिकडे माझा डोळा,
उब त्या ताम्हणाची असे माझ्या करता….
वाट पाहे दारी माझ्या येण्याची,
उपाशी असुनही दिसे समाधानी,
भरल्या पोटी मी येई परतुनी….
दृष्ट माझी काळजीने काढी नेहमी,
मी हि हसत असे जुन्या अंधश्रद्धा नी ,
हात जोडे माझ्यासाठी देवापाशी….
येताच मी दारी हास्य तिच्या अंतरी,
माझे सामान मी माहेरी शोधत राही,
गरम घास माझ्या मुखी ती घालत राही…
निघताना माहेरहुनी मी झडकरी,
डोळे तिच्या दाटे प्रेम पाणी,
भरुनी जाई माझी ओटी तिच्या नजरेनी…
माझ्या श्वासासाठी उच्छ्वास झाली ती,
हसणे होते माझे कारण ती होती,
आई होती म्हणुनी मी सानुलीच राहिली ..
आठवण न आली दिस सरेना कधीही,
कळले सारे ती दुर गेल्यावरती,
देवा बाप्पा च्या घरातुनी पाहते मलाच ती…..
काव्य रचना…
अनुजा पडसलगीकर.
ह्या सम हाच….
12 जुलै 2017 2 प्रतिक्रिया
in ललित
कित्ती येतील आणि जातील..पण वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या जपला जाणारा, आपुलकीचा, भरल्या संसाराचा तो हाच.. स्टील चा गोल आकाराचा मसाल्यांचा डब्बा. कोणी ह्याला मिसळणांचा डबा म्हणत, तर कोणी तिखटा मिठाचा डबा म्हणत. काहीही म्हणा पण प्रत्येक घरात असणारा हा स्वयंपाक घराचा अविभाज्य डबा आहे. हा डबा जर माहेरून रुखवतात आला असेल तर त्याची बडदास्त असतेच. आईने मसाल्यांची ओळख करून दिलेले काही भावपूर्ण क्षण ह्यात गुंतलेले असतात.
स्वयंपाक सुरवात करण्यापूर्वी, आईने हा डबा कसा हळुवार पणे हाती घ्यावा ह्याचे धडे गिरवून घेतलेले असतात. डब्याची हाताळणी हि अगदी काळजीपूर्वक करावी लागते. डबा कपाटात हाती सहज असावा. शक्यतो उजव्या बाजूस जवळच्या कप्यात तो असतोच. तेल गरम होताना, सराईत पणे अलगद आडवाच धरून बाहेर काढूणे आणि मसाले एकमेकात मिसळणार नाहीत ह्याची खबरदारी हि गृहीतच असते. जर काही गडबड झाली तर आईचे वैतागणे ,कसा संसार करशील? किती तो धांदरटपणा? अशी गोंधळात भर टाकणारी हमखास काळजी व्यक्त होतेच. प्रत्येक मुलीने ह्याचा अनुभव एकदातरी घेतेलेला असतोच.
ह्याच डब्यात नियम तरि किती, जणु काही सासरी काटेकोरपणे राहावे म्हणून असलेला सराव असावा. हळदीचा चमचा, तिखटात घालयचा नसतो. मोहरीचे स्थान केंद्र स्थानीच हवे. जिरे मग तिखट, हळद ह्यांच्या मध्ये गोडा मसाला असणे क्रमप्राप्तच असते. हळदी नंतर धणेजीरे पुड, नंतर मेथ्याचे दाणे, कोणी मीठ मध्यभागी ठेवतात. नंतर इतर मसाले जे नेहमी लागतात.
गृहिणींचे वैतागणे हे धुसमुसत ह्या डब्यांच्या झाकणावर निघते. झाकण हे सासर आणि डबा म्हणजे जणु काही माहेर असे एकंदरीत सात वाट्यांचा हा सरंजाम सात पिढ्यांचे नाते जपत असतो. सात जन्मांचे नाते उलगडून देत असतो. अलगद, हळुवार पणे संसाराच्या स्वयंपाकात रंगीबेरंगी, सर्व चवींची लज्जत जपणे ह्याचे समर्पक उदाहरण म्हणजे हा मसाल्यांचा गोल डबा होय.
हाच डबा त्या गृहिणीचे, पण उत्तम राखतो. जिरे ,मोहरी सारखा छोटा पदार्थ सहज पणे निदान आठवड्यात एकदा तरि चिमुटभर तोंडात टाकला तरि नकळत पणे मोठ्या व्याधींना प्रतिबंध करतो. तसेच त्या घराचे आरोग्य सुद्धा योग्य प्रमाणात मसाले असल्याने उत्तम राखतो.
पत्नी माहेरी जाताना आठवणीने सांगते, मसाल्याच्या डब्यात सर्व काही भरून ठेवले आहे,त्या चमच्याच्या प्रमाणात मसाले वापरा. आणि हो डबा नीट उघडा आणि नीट ठेवा.
हा डबा हाताच्या स्पर्शाने कधीतरी खराब होतो लगेच त्याच्या वाट्या रिकाम्या करून स्वच्छ केला जातो. बरबटलेला डबा आणि त्याचे झाकण लक्ख म्हणजे नीटनेटका संसार असे ओळखण्याचा एक अबोल पुरावा असतो. डबा कसा नेहमी भरल्या संसारा सारखा असावा. फ्रिज मध्ये दरवाजा भरून मसाल्यांची भारंभार पुडकी असली तरि, पहिला हाच डबा उघडला जातो.
काळाची आधुनिकता म्हणून, निरनिराळ्या आकाराचे, निरनिराळ्या धातूचे मोहक असे मसाला डबे आले तरि, गोल आकाराचा स्टील चा डबा हा अबाधित अस्तित्व राखून राहणार. आईच्या स्पर्शाचा, तिच्या आठवणींचा हा डबा लेकीच्या संसारात सदैव रंगत आणतच राहणार. ह्या सम हाच…
WAQBAH ओमान
10 जुलै 2017 यावर आपले मत नोंदवा
in माहितीविषयक
वाळवंटी देश म्हंटला कि, डोळ्यासमोर येते विस्तीर्ण पसरलेली वाळु आणि रुक्ष वातावरण. ओमान देश ह्या बाबत खरच खूप सुदैवी आहे. ओमान ला जसे वाळवंट आहे तशीच निसर्गाची उत्तम साथ देखील आहे. इथल्या डोंगर रांगांमध्ये सौंदर्य आहे, दऱ्यांमध्ये वाहते पाणी आहे आहे ओमानी मेहनत करून ह्या उपलब्धतेचा फायदा घेत , निसर्गाची काळजी घेत उत्तम रित्या शेती करत आहेत ती सुद्धा संपुर्ण सेंद्रिय. वक़्बह हा ओमान मधील भाग अत्यंत हिरवागार, सुंदर आणि शेतीने समृद्ध असा आहे. इथे वाळु सोबत माती देखील आहे. थोडी माती आणि वाळु ह्यांच्यात सर्व प्रकारची फळे, पिके, भाज्या असे विविध सकस उत्पादने घेतली जातात. कुठेही रासायनिक पद्धत अवलंबली जात नाही.
Al Waqbah is characterised by tourist sites and many natural sites, such as high peaks, caves, natural valleys, farms and pure water sources. It is also famous for its “Aflaj” or ancient irrigation system or water channels and waterways that rely on rainwater.
Many agricultural crops are grown in this town during the summer and winter, where all types of date palm trees and vegetables, such as carrots, onions, garlic, squash, eggplant, tomatoes, radishes, lettuce, cabbage, cucumber, parsley, pepper, pumpkin, wheat and barley are grown, along with lemon, bananas, mangoes, oranges, olives, pomegranates and figs.
Recently, strawberry, cherry and hibiscus have also been planted as the favourable weather in the region aids the growth of these fruits.
One of the most important agricultural crops planted in the town is grapes of different varieties that are spread across farms and homes. Villagers are keen on growing grapes from the beginning of the season.” As soon as summer begins, farmers begin harvesting grapes, citrus and fruits, but, vineyards with their varieties have the greatest interest among farmers in the town.
There are several other varieties of grapes, such as Al Tai’fi, the white and the imported, which are successfully grown in the town. As the month of June begins, farmers start to prepare for the harvest. They gather at homes where they give to relatives, friends and neighbours. Farmers take care of the trees, trim them, and use organic fertilisers to get the best harvest of the delicious grapes.
अशी आहे सुंदर वक़्बह ची ओळख…