……….खेळ मांडला….मांडला……मांडला…!!!!!!!!

एक महिनाभर अजिंक्य पुण्याला बहिणीकडे गेला होता. आज परत येतोय. काल रात्री त्याचा फोन आला. आई इथे बातमी आलीय की, सातवी च्या मुलाने सूसाईड केले. तो स्टडी मध्ये वीक होता. आजीने काय सांगितले लक्षात आहे ना? अजिंक्य, ला रागवत जाऊ नकोस म्हणून. मम्मी, तुला छान वागता येते ना? अरे, अभ्यास वेळेवर केला की, टेन्शन रहात नाही. तू कशाला एवढी काळजी करतोस. असे माझे विचारणे सुरु झाले.

अग, इंडियात एक मराठी मुव्ही आलाय त्यात दाखवले आहे की, पेरेंट्स नीट वागत नाहीत. क्रिकेट मध्ये त्याला करिअर करून देत नाहीत. एजुकेशन सिस्टीम चेंज करायला पाहिजे. कशाला मी ह्याला भारतात पाठवले असे मला झाले. तो इकडे मराठी बातम्या फारशा पाहत नाही. ह्या आत्महत्येच्या बातम्या म्हणून दूरच राहतात. पण पळणार तरी कुठे? व किती काळ? कधीतरी ह्या सर्वाना त्याला सामोरे जावेच लागेल. आठवीच्या अर्धवट वयाचा हा माझी रात्रभर झोप उडवून गेला. आणि म्हणतो कसा सहावी पर्यंत पेरेंट्स शांत असतात पण नंतर ते टेन्शन मुलांना देतात. मम्मी तू आता चेंज होणार नाहीस ना? आजी समोर माझ्या स्वभावाची कबुली चाललेली होती.

ह्या वयाच्या मुलांना गळफासाची गाठ कशी जमते? साधी बुटाची लेस धड बांधता येत नाही. हा स्काउट व गाईड मध्ये शिकलेल्या गाठींचा दुष:परिणाम तर नसावा???? तसेच फास टांगण्यासाठी हात एवढ्या उंचीवर पोहचतात कसे? नाडीची घट्ट गाठ ह्यांना सोडवता येत नाही मग हे ट्रेनिंग मिळते कुठून???? सिनेमात देह लटकलेले दाखवतात. गाठी कशा बांधतात हे अजून तरी पाहण्यात आले नाही. माझ आतापर्यंत एवढूस असलेलं बाळ कसले प्रश्न विचारू लागलं आहे.

मला पेरेंट्स कौन्सलिंग नवीन नाही. पण माझ्या शिक्षणाच्या मागे व अनुभवाच्या पुढे माझ्यातली आई, आज हादरली आहे. सामंजस्याने, लेकाशी गप्पा करून सुसंवाद मी करणार आहेच. पण किती स्फोटक व टोकाचे विचार ह्या पिढीत आहेत. मुलांच्या स्वातंत्र्याच्या सीमारेषा, आई वडीलांचे स्पर्धात्मक जीवन जगण्यासाठी चाललेली धडपड हे एक कारण आहे.

तमाशा डान्स फॉर्म वर पण एक मुव्ही आहे. तो हिरो पण खूप स्ट्रगल करतो. आई, मग इथल्या नेहा सावंत ला डान्स मध्ये करिअर करायचे होते तर पेरेंट्स ने रिफ्युज का केले? तिने पण सूसाईड केले. तुम्हा मोठ्या माणसाना असे मुव्ही आवडतात ना, मग चिल्ड्रन ना परमिशन का देत नाहीत? अरे तिची परीक्षा जवळ आलेली असेल, किंवा अजून दुसरे कारण असेल म्हणून तिला रिफ्युज केले असेल.

आपल्याला पूर्ण माहिती आहे का? माझे समजावून सांगणे चालू होते. बाळा, अभ्यास महत्वाचा असतो रे!! रिफ्युज केले नाही तर फक्त स्टडी कडे लक्ष दे असे पेरेंट्स ने सांगितले. आधी अभ्यास महत्वाचा, साईड बाय साईड हॉबी पूर्ण करता येते. बेसिक एजुकेशन कॅम्पलीट पाहिजे. काय करणार पालक?? आपल्या पाल्यांना ह्या चकमकत्या दूनिया पासून कसे दूर ठेवणार?

तू कशाला विचार करतोस? मम्मा, आमच्या जनरेशन चा क़्वेशचन आहे. बर तू उद्या येतोस ना मग आपण बोलू या. मी विषय टाळण्याचा प्रयत्न करीत होते. एक महिना अजिंक्य शिवाय राहणे मला कर्म कठीण होते. उद्या येणार म्हणून कसली खुश होते तर हे महाशय प्रश्न विचारून झोपून गेले. मी मात्र हैराण झाले. ही बातमी कालच्या पेपर मध्ये होती. माझ्या हाती कालचा पेपर आज मिळाला. बातमी पूर्ण वाचल्याशिवाय मला ही सुचत नव्हते.

पुन्हा दहा मिनिटांनी अजिंक्यचा फोन आला, मम्मी अजून एक सॅड न्यूज आहे. मेडिकल च्या एका गर्ल ने पण सुसाईड केले. ती हुशार होती पण टू सब्जेक्ट मध्ये फेल झाली. मम्मा, मग मी कशात करिअर करू? ह्या वयात करिअर चा विचार स्पष्ट झालेला नसतो. मुलांच्या मनात खूप गोंधळ असतो. असे काही कळले की त्यांना त्या विषयात इनसीक्यूअर्ड वाटायला लागते. त्याच्या मनातला गोंधळ तो आताच माझ्याशी शेअर करीत होता. माझ्याशी बोल्याशिवाय चैन पडले नसते. तू इकडे आल्यावर आपण बोलू असे समजावत वेळ तात्पुरती निभावून नेत होते. पण हा विषय त्याच्या डोक्यातून जाणार नाही जो पर्यंत समाधान त्याला माझ्या कडून मिळणार नाही याची पूर्ण जाणीव मला आहे.

मम्मा आत्ता एक चांगली न्यूज देतो. पुण्यात थंडी खूप होती म्हणून मी पण चहा प्यायला लागलो. आता तिकडे आल्यावर तू मला रोज चहा करून दे. मुलांनी दुध प्यावे बुद्धीवर्धक असते. हा माझ्या वर ठाम पणे झालेला संस्कार आहे. दहावी नंतर ठीक पण आताच योग्य नाही. बरेच जण चहा लहानपणापासून घेतात. मोठे झाल्यावर चहा ढोसणे असतेच.

हे वय ग्लास भरून दुध घेण्याचे आहे. बाहेरचे कोणी कधी ही घेऊ देत. मला पटत नाही व पटवून घेण्याची गरज पण नाही. आई,त्याला समजावून सांगत होती. मला फोन वर तिचा आवाज ऐकू येत होता. थंडी होती म्हणून दिला. तिकडे एसी असतो ना मग नाही घ्यायचा. आजी चहा छान करते तिच्या कडून रेसिपी शिकून घे. हा सल्ला ही द्यायला विसरला नाही. मी चहा घेते पण कुठल्याच गोष्टी करिता टोकाची आवड, त्या करिता ऍडीक्ट होणे माझ्या स्वभावात नाही. माझा बोलण्याच्या आवाजाचा अंदाज घेऊन मग म्हणाला, कधी तरी देशील का? बर ठीक आहे. मी पुन्हा विषय क्लोज करण्याचा प्रयत्न करू लागले.

माझ्या घरात चहा सकाळी एकदाच होतो. ह्यांना ऑफिस मध्ये बऱ्याच वेळेला घ्यावा लागतो. हे पण बिन दुधाचा, बिन साखरेचा ‘सुलेमानी’ चहा घेतात. घरी आल्यावर कधी ही चहा घेत नाहीत. मला चहा आयुष्यभर घेतला नाही तरी चालेल. माझा सकाळचा चहा मी उद्या पासून बंद केला. अगदी कायमचा हे ठरवून टाकले आहे. त्याला मोह कसा टाळावा हे शिकवण्याचे आताचे वय योग्य आहे. एकेक गोष्टींचा विचार करत रात्र उलटून पहाट झाली हे कळेलच नाही.

लहान होता तेंव्हा माझ्या हाताला घट्ट पकडून चालायचा. आता माझ्या बाळाचा हात माझ्या हातापेक्षा मोठा झालाय. कसे समजावून सांगू? प्रत्येक गोष्टीचे स्पष्टीकरण हवे असते. मी ही समजावून सांगत असते पण आई जगापेक्षा लहान आहे. त्यालाच अनुभव घ्यावा लागणार आहे. मी कुठ पर्यंत पोहोचणार?

जीवन म्हणजे खेळ नाही. जिंकणे व हरणे हे आयुष्य करिता नसते. जीवनाला सामोरे जायचे असते. खेळ म्हणून आयुष्य मानले नाही तर हार कुठली? व जीत कसली राहणार?. सर्व आयुष्य हे एक रोज वेगळा अनुभव देणारे ठरेल. त्या आयुष्यात निराशा नसेल, यश मिळावे म्हणून जीवघेणी स्पर्धा नसेल. तसेच यशाची धुंदी ही नसेल.

जीवनाकडे स्पर्धा म्हणून आपल्या पाल्याला बघायला शिकवू नका. आयुष्य म्हणजे रिअलिटी शो नाहीत. स्वप्न पाहायला मुलांना जरूर शिकवा पण सत्य पण कानी घाला. हार किंवा जीत ह्या करिता जन्म नाही. अवास्तव अपेक्षांना वेळीच नियंत्रण करणे हे पालकांच्या कौशल्याचे काम आहे. मुलांच्या मनात चाललेले विचार त्यांच्याशी बोलून समजून घेणे गरजेचे आहे. आयुष्य हे खेळ आहे. असे समजल्यामुळे आशा, निराशा पदरी येते. जीवनाकडे एक अनुभव म्हणून पहिले तर बरेच पालक चिंता मुक्त होतील.

माझ्या लिखाणाद्वारे मी प्रयत्न केला, मुलांच्या मनातील खेळ मी मांडला…. मांडला…

27 प्रतिक्रिया (+add yours?)

 1. mugdha
  जानेवारी 06, 2010 @ 15:04:18

  Chaan aavadla lekh!

  उत्तर

 2. sahajach
  जानेवारी 06, 2010 @ 15:14:08

  सगळे मुद्दे व्यवस्थित मांडले आहेस गं…..खरच कठीण आहेत हे प्रश्न…बरं दर ३/४ वर्षात पिढी बदलतेय म्हणजे एका मुलाला लावलेले निकष दुसऱ्यासाठी लागू पडतील की नाही शंका….
  झपाट्याने बदलणाऱ्या या जगात हे सगळे प्रश्न सोडवावे तर लागणार आहेतच नाहीतर या वादळ वाऱ्यात आपली पिल्लं तोंड देत ठाम उभी तरी कशी रहाणार!!!!!!!!

  उत्तर

 3. gouri
  जानेवारी 06, 2010 @ 16:09:08

  khoopach avaghad valan ahe he. aai- vadil tari kiti pure padanaar baherachya jagapudhe? pan tujhaa chaan samvaad aahe leka barobar. tyaalaa milateel patanyaasaarakhi uttare 🙂

  उत्तर

 4. Asha Joglekar
  जानेवारी 06, 2010 @ 17:53:19

  कठिण झालंय खरं आज काल च्या मुलांचं जीवन . केव्हढाले ताण तणाव बिचा-यांना. जीवना कडे तू सांगते तसं एक अनुभव म्हणूनच पाह्यला पाहिजे.

  उत्तर

 5. देवेंद्र चुरी
  जानेवारी 06, 2010 @ 18:13:20

  तुमचा अजिंक्या तुमच्याशी हया सगळ्या गोष्टी बोलतो तरी नाहितर आजची बरीचशी मुले आपल्या भावना कोणासमोरही मांडत नाहीत आतल्या आत धुसमुसत राहतात.त्याचाच परिणाम मग अश्या प्रकारच्या घटना घडतात.नुसत्या आपल्या इच्छा पाल्यावर न लादता त्यांच्याशी सुसंवाद साधुन त्यांच्या मनात काय आहे हे प्रत्येक पालकाने जाणून घ्यायला हवे.

  उत्तर

 6. Ajay
  जानेवारी 06, 2010 @ 18:53:37

  आज पुन्हा एकदा नाशिकमधल्या इंजीनिअरींग च्या मुलीने आत्महत्या केली. कधी थांबणार हे सारं ?

  लेख मुद्देसुद, मस्त !

  -अजय

  उत्तर

  • anukshre
   जानेवारी 06, 2010 @ 20:33:12

   @मुग्धा, @तन्वी @गौरी @आशा ताई, @देवेंद्र, @अजय
   सर्वांचे आभार. आपल्या प्रतिक्रिया अतिशय वैचारिक आहेत. पोस्ट चा उर्वरित भाग पूर्ण करणाऱ्या आहेत. प्रत्येक प्रतिक्रिया एकेक पोस्ट होईल.मला अतिशय आवडल्या. एकत्रित आभार मानले हा आपलेपणा मानावा.

   उत्तर

 7. catch
  जानेवारी 06, 2010 @ 19:02:34

  “रिफ्युज केले नाही तर फक्त स्टडी कडे लक्ष दे असे पेरेंट्स ने सांगितले?”- असलं तुटकं फुटकं मराठी कशाला वापरता? खुशाल इंग्रजीत बोला की त्या पेक्षा.

  उत्तर

  • anukshre
   जानेवारी 06, 2010 @ 20:19:40

   नमस्कार कॅच,
   आपले स्वागत! इंग्रजाळलेली मराठी हल्लीची पिढी बोलते. तसा फील यावा म्हणून हा खटाटोप भाषेचा केला. ज्या पिढीचे निदर्शक आहे त्यांची भाषा पोस्टमध्ये घेतली. असो आपला शुद्ध मराठीचा आग्रह सन्माननीय!!! ‘कॅच’ मराठीत आपल्याला ‘पकडा’ असे म्हणणे बरोबर नाही वाटत. सोपे मराठी नाव घेतले तर मलाही आवडेल.

   उत्तर

 8. सुहास
  जानेवारी 06, 2010 @ 22:15:21

  हो..हे स्पर्धायुग जीवघेणा होत चाललय. हे थांबायला हवा बाकी एकदम मुद्देसुत पोस्ट आहे विषयाला catch सॉरी धरून.. 🙂

  उत्तर

 9. हेरंब
  जानेवारी 06, 2010 @ 22:18:33

  खुपच छान झालं लेख. एकेक मुद्दे विचार करायला लावणारे आहेत. सध्याची पिढी एवढी शार्प आणि advanced आहे की त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देताना आपल्यालाच गंगाराल्यासारख होतं. चांगली गोष्ट ही कि तुम्ही शक्यतो त्याच्या सगळ्या प्रश्नांना न टाळता न कंटाळता उत्तरं देताय.

  उत्तर

  • anukshre
   जानेवारी 07, 2010 @ 13:58:59

   @ सुहास,@ हेरंब

   हे वय अपरिपक्व असते, तसेच खूप संवेदनशील मन ह्या वयात असते. मित्रत्वाचे नाते जपून आपले म्हणणे पण पटवून द्यावे लागते. कुठे ही
   दबाव खपवून घेतला जात नाही.तरच निकोप व्यक्ती म्हणून विकास होतो. लहान मुलां पुढे आईने किंवा वडिलांनी एखाद्या पदार्थाला पाहून आवडत नाही म्हणून चेहरा जरी वाकडा केला तरी मुल त्या पदार्थ कडे पाहून नकार द्यायला शिकते. मी जवळ जवळ गेली २० वर्ष समुपदेशक म्हणून कार्यरत आहे. आई वडील होणे हा निसर्गाने दिलेली भेट आहे. पण सुजाण पालक होणे हे आपल्या हाती आहे. “मी चहा सोडला”, असे जेंव्हा म्हंटले तेंव्हा त्या गोष्टी शिवाय अडत नाही असे पटवून द्यायचे होते. अजिंक्य स्वतः म्हणाला, आई मला आठवड्यातून एकदा देशील का? जरूर देईन पण रोज दुध पिण्याने क्याल्शियम मिळते. हे पटले. आता आम्ही दोघे मिळून फक्त एकदा चहा घेणार. हे डोक्यातून अपोआप निघून जाईल. दर वेळी वेगळे विषय असतात. मी त्याला अजिबात सांगितले नाही, तुझ्या करिता मी चहा सोडणार, मला मुलांवर आम्ही तुमच्या करिता काही त्याग करीत आहोत ही भावना चुकीची वाटते. तू आणि मी मिळून एकत्र ठरवू हे जास्त सयुंक्तिक होते. असो हा विषय माझ्या खूप आवडीचा आहे. फार मोठे उत्तर होतेय, थांबते.

   उत्तर

 10. खोचक
  जानेवारी 07, 2010 @ 00:32:15

  तुमच्या सल्ल्यनुसार नवीन नामाभिधान धारण केले आहे.”खोचक”
  आजकालची पिढी बोलते तुटकं फुटकं मराठी असं म्हणून आपण चालवून घेतो. तुम्ही अर्थात अनिवासी भारतीय असल्यामुळे तुम्हाला हा मुद्दा जास्त लागु पडत नाही. तरीही माझ्या परिचयाचे पुणेकरांपेक्षा शुद्ध मराठी बोलणारे अनिवासी भारतीय आहेत. बाकी ज्याचा त्याचा प्रश्न.

  उत्तर

  • anukshre
   जानेवारी 07, 2010 @ 12:18:48

   नमस्कार खोचक, हे कस मस्त नाव आहे. नावातच चिकित्सक पणा आहे. धन्यवाद आपण माझ्याकरिता आपले नाव बदलले. असेच येत रहा, आपल्या प्रतिक्रिया आवडलतील.आम्हीही घरी शुद्ध मराठी बोलतो. प्रश्न अजिंक्यचे होते. पण तोही मराठी शुद्ध बोलतो. फक्त मराठी वाचण्याची गती जरा कमी आहे. मराठी कोणीही शुद्ध बोलावी

   उत्तर

 11. Aparna
  जानेवारी 07, 2010 @ 05:31:53

  अनुजाताई, तुम्ही चांगले मांडलेत आणि आहेत प्रश्न आजच्या पिढीचे…फ़क्त काही काही ठिकाणी जरा जास्त शिस्त वाटते मला तुमची…अर्थात हे म्हणायला माझं एक पालक म्हणून वय फ़क्त दिड वर्षच आहे त्यामुळे अधिकार नाही पण जे वाटलं ते……असो….अनिकेतच्या ब्लॉगवर पण हीच चर्चा सुरू आहे…त्यामुळे नवीन काही सुचत नाहीये मला…

  उत्तर

  • anukshre
   जानेवारी 07, 2010 @ 12:48:19

   अपर्णा,
   अनिकेत च्या ब्लॉग वर जाऊन येते. अग तुझ पिल्लू इतक छोट आहे की त्याच्या बरोबर छोट्याशा जगात मस्त रहा. अजिंक्य आला व त्याने छान मुद्देसूद विचार त्याचे सांगितले. रात्री आम्ही चर्चा केली व मग त्याला समाधान मिळाले. असो ह्या समुपदेशनाच्या गोष्टी प्रत्यक्ष समोर बसून बोलण्याच्या असतात. त्यामुळे जास्त इथे लिहित नाही

   उत्तर

 12. महेंद्र
  जानेवारी 07, 2010 @ 13:18:18

  माझं मत आहे,की आई ही मुला/मुलींची पहिली मैत्रीण असायला हवी … आणि या बाबतित काही कॉम्प्रोमाइझ नाही. बरेचदा वडिलांचा मुलांच्या बरोबर संवादाचा विसंवाद होतो, पणं आई सगळं सांभाळुन घेउ शकते. मग ते अगदी लहानसं कारण, मिनि स्कर्ट वापरायचं असो की स्लिव्ह लेस वापरायचे असो,
  छान लेख,

  उत्तर

 13. anukshre
  जानेवारी 07, 2010 @ 14:14:42

  आपण सर्वाना धन्यवाद!!!!
  २२ ऑक्टोबर ला पहिली पोस्ट होती. एकूण ३२ पोस्ट झाल्या. आज ५००० भेटी पूर्ण झाल्या.

  उत्तर

 14. आनंद पत्रे
  जानेवारी 08, 2010 @ 00:04:11

  अभिनंदन!

  उत्तर

 15. Ashwini
  जानेवारी 11, 2010 @ 08:50:32

  Chan lihile aahe ekdam …………………..

  उत्तर

 16. akhiljoshi
  जानेवारी 13, 2010 @ 20:57:29

  खर तर आताची पिढी शार्प आहे.. हुशार आहे…
  पण माझ्या मते काही गोष्टी लादल्या जात असतील, कुठे संस्काराची उणीव असेल काय माहित

  पालकांनी आपल्या मुलांच्या समाधान आणि संयम हे दोन गुणांचे संवर्धन केले त्याकडे जास्त लक्ष दिले
  तर मला वाटत कुठल्याही परिस्थितीत येणाऱ्या प्रत्येक पिढीतील मुले तग धरू शकतील…
  लहान तोंडी मोठा घास असेल कदाचित
  कारण मी पालक नाही….
  पण माझ्याकडे ते दोन गुण आहेत… जे माझ्याकडून, घरच्यांकडून संवर्धित झाले आहेत…

  आणि तुम्ही कशा आहात?

  उत्तर

 17. bhaanasa
  जानेवारी 15, 2010 @ 08:21:00

  अनुजा अग या आत्महत्येच्या तेही इतक्या लहान वयातल्या मुलांनी केलेल्या आत्महत्या पाहून माझे तर डोकेच चालत नाही. अगदी खरे आहे गं…. साध्या साध्या गोष्टीतही यांना आई लागते आणि ही इतकी भयंकर गोष्ट ते कशी काय करत असतील? अनेक विचार डोक्यात सारखे घोंघावत आहेत. असो. छान मांडलेस गं.
  आणि हो अभिनंदन!

  उत्तर

  • anukshre
   जानेवारी 15, 2010 @ 11:38:47

   भानस,
   माझ्या मनातले सांगितलेस. खूप दिवसांनी आलीस. कधी आणि काय सुचेल ह्या पोरांना काही सांगता येत नाही. आपल्या दोघींची अर्धवट वयाची मुले आहेत म्हणून काळजी वाटते. तुझ्यातली आईची काळजी मनाला स्पर्श करून गेली.

   उत्तर

 18. akhiljoshi
  जानेवारी 15, 2010 @ 09:15:36

  ajunahi uttar nahi?

  उत्तर

  • anukshre
   जानेवारी 15, 2010 @ 11:34:58

   अखिल,
   तुला उत्तर द्यायला वेळ लागला. मी काही कामात खूप व्यस्त होते त्यामुळे नुसत्या आलेल्या प्रतिक्रिया पब्लिश करीत होते. उत्तर म्हणून उशिरा द्यावे लागत होते. तू वाट पाहत होतास खूप बरे वाटले.माफी मागते. असो माझी कविता मिळाली का? मेल केली होती. कळव मेल वर. सध्या वर्ड प्रेस कमी आहे. तू मुलांच्या बाबतीत जे विचार मांडलेस ते खूपच भावले. आताची पिढी जवाबदार पालक म्हणून नक्कीच विचार करते. ह्याचे हे द्योतक आहे. अजून तू तर बोहल्यावर गेला नाहीस तरीही इतके समग्र विचार आहेत हे वाचून समाधान मिळाले. पुणे ब्लॉगर मीट ला जाणार आहेस का? मेल वर भेटून बोलू . प्रतिक्रिया आवडली.

   उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: