शंखातले हे सचिन तेंडूलकर चे सुंदर घर इमेल ने मला मिळाले…मला खूप आवडले. तुम्हा सर्वांसाठी पाठवीत आहे. हे खरेच आहे का?
शंखातले घर..
11 डिसेंबर 2009 17 प्रतिक्रिया
in माहितीविषयक
अनुक्षरे…..माझे विश्व………..
11 डिसेंबर 2009 17 प्रतिक्रिया
in माहितीविषयक
शंखातले हे सचिन तेंडूलकर चे सुंदर घर इमेल ने मला मिळाले…मला खूप आवडले. तुम्हा सर्वांसाठी पाठवीत आहे. हे खरेच आहे का?
डिसेंबर 11, 2009 @ 15:23:37
काय सांगता – हे घर सचिन तेंडुलकरचे आहे? कुठे आहे.. म्हणजे कोणत्या गावी?
डिसेंबर 11, 2009 @ 15:30:31
मला आलेल्या इमेल वर बांद्रा मुंबई अस लिहिलेलं आहे. तुम्हाला काही कळलं तर कळवा.शंखातल्या घराची कल्पना मस्त आहे न पण. बाकी काही माहिती नाही.
डिसेंबर 11, 2009 @ 15:36:20
मला तरी सचिनची टेस्ट इतकी चीप असेल असं वाटत नाही. नक्किच हॉक्स इ मेल असावा हा..
डिसेंबर 11, 2009 @ 15:43:33
मला सचिन च्या टेस्ट म्हणजे आवडी बद्धल काहीही म्हणायचे नाही. मला माहिती नाही कि कुठे आहे का किंवा नाही. माहिती खरी असेल तर कळवा.
डिसेंबर 11, 2009 @ 15:36:23
नाहीये… गुगलबाबानि सांगितले
http://www.indianviral.com/sachin-tendulkars-new-house-shell-house-at-bandra/
डिसेंबर 11, 2009 @ 15:37:08
http://www.trendir.com/house-design/whimsical-house-nautilus-house-in-mexico-city.html
actual link
डिसेंबर 11, 2009 @ 15:45:52
आनंद पत्रे,
मी पण नक्की बघेन. मला माहिती नव्हते. कल्पना आवडली, फोटो आवडले म्हणून पाठविले.
डिसेंबर 11, 2009 @ 22:05:18
नाही, ते सचिनचं घर नाही आहे. तो फ़सवा email आहे. मला एक महिन्यापुर्वी आला होत. नंतर अंजली तेंडुलकरनी तो स्वतः नाकारलय. बघा.
http://timesofindia.indiatimes.com/sports/cricket/interviews/I-dont-even-move-when-Sachin-is-batting-Anjali/articleshow/5228341.cms
डिसेंबर 11, 2009 @ 22:30:01
अक्षयजी,
आपले स्वागत! प्रतिक्रिये बद्धल धन्यवाद.
डिसेंबर 12, 2009 @ 12:55:44
हो मला खुप वेळा आलाय हा मेल, आणि मी तसाच डीलिट पण केला. सचिन ने बान्द्रा मध्ये एक मोठा प्लॉट घेतला आहे ते खर, पण तिथे एक जुने घर आहे ते डिमॉलिश करूनच नवीन बांधकाम सुरू होईल (मे बी सुरू झाल असेल ही), पण शेल हाउस ही कल्पना ज्याची आहे त्याला तरी नक्कीच दाद द्यायला हवी. मग ते मुंबईत असो किंवा मेक्सीको मध्ये 🙂
डिसेंबर 13, 2009 @ 10:07:26
नमस्कार सुहास,
सचिन चे नसले म्हणून काय झाले? आपण घराला जी दाद दिलीत त्याबद्धल आपल्याला मानले.
जानेवारी 06, 2010 @ 12:13:39
हे घर सचिनचे नाही आहे … कोण्या मुर्खाने ते सचिनच्या नावावर एका मेल मध्ये खापवले आहे… हे बांधकाम ‘मेक्सिको’मधील आहे … ‘बांद्रा’ सोडा पण भारतात देखील नाही… मेल मध्ये येणारी माहिती शहानिशा केल्याशिवाय पुढे सरकवू नये ही विनंती … !
खरे सांगायचे तर मला अजिबात आवड्लेले नाही हे घर … !
जानेवारी 06, 2010 @ 12:24:45
रोहन, मी पण हे खरे आहे का? असेच विचारले आहे ना. कोणाला तरी विचारल्या शिवाय शहानिशा कशी होणार? उलट मी ही मेल पब्लिश करून ज्यांना मेल मिळाली नाही किंवा जे हे खरे आहे हे मानत असतील त्यांच्या करिता खुलासा झाला. मला ही खात्री नव्हती म्हणून आपल्या मित्रांना
विचारले. तुझी चिडचिड होणे स्वाभाविक आहे पण कोणीतरी परदा फार्श केलाच पाहिजे ना.
फेब्रुवारी 28, 2010 @ 22:07:26
आपण फोटोत दाखविलेले घर हे सचिनचे असल्याबाबत मलाही ई-मेल आला होता परंतु ते घर सचिनचे नाही. त्याचे नांव नॉटीलस हाऊस असे असुन ते ‘मेक्सिको’मधील आहे. अधिक माहिती साठी चालु महिन्याच्या लोकप्रभा अंकाचे अवलोकन करावे. सोबत या लिंकला भेट दया. http://dvice.com/archives/2008/02/fantastic_nauti.php किंवा (Nautilus House) या नावाने शोधा.
मार्च 01, 2010 @ 12:22:41
राजेंद्रजी,
आपले स्वागत.प्रतिक्रिये बद्धल धन्यवाद.
ऑगस्ट 07, 2010 @ 15:10:12
This house is in Mexico ..This is not Sachin’s house… Sachin Tendulkar has purchased a new house for 35 Cr in Bandra.
ऑगस्ट 07, 2010 @ 18:06:06
आपले स्वागत,
आपल्या अभिप्राय करता आभारी आहे. आपण लवकरच माझ्या अजूनही पोस्ट वाचून अभिप्राय देत राहा.