एरिअल फोटोग्राफी हि संकल्पना नवीन नाही. प्रत्येक वर्षी जून महिन्याच्या सुट्टी ची आवर्जून वाट पाहत असतो कारण भारतात यायचे असते. विमानाची खिडकी मागणे हे तर माझ्या मुलाचेच म्हणणे नसते तर मला हि खिडकी ची जागा हवी असते. खर तर तीन सीट ची रचना विमानात असते. तरी पण खिडकीजवळच्या दोन जागा मागून घेतो. काही वेळानंतर अस्पष्ट दृश होते , नंतर ढगातून विमान वर वर उंची गाठू लागते आणि अवकाशात तरंगू लागतो. असे असताना खिडकीचा आग्रह कशाला? तीच तर ओढ आहे…..
मुंबई जशी जशी जवळ येऊ लागते तस तशी नजर जमिनीचा खिडकीतून वेध घेऊ लागते. एव्हढासा जमिनीचा तुकडा दिसला तरी नजर आणि मन भरून येते. आतापर्यंत कधी फोटो काढले नव्हते, हे हि फोटो मोबाईल वरून काही सेकंदात काढले आहेत.
मुंबईचा हा भाग कुठला आहे हे समजले नाही परंतु हीच माझी मुंबई……. अजिंक्य ने मोबाईल वरून टिपून घेतली…..
हात जोडून मातृभूमी ला वंदन करतो आणि सुजलाम सुफलाम……. आठवून डोळे भरून येतात.
पुन्हा पुढच्या सुट्टीची वाट पाहतो………
सप्टेंबर 20, 2010 @ 15:09:49
मस्त हैत फोटो!
नेहमीच मुंबई बघून अंगावर रोमांच उठतात!
सप्टेंबर 20, 2010 @ 15:17:42
अगदी मनातल बोललास!!!! म्हणूनच जास्त शब्द लिहिले नाहीत. फोटो अगदी साध्या मोबाईल ने काढले आहेत एव्हढे स्पष्ट आले नाहीत पण कसे हि असले तरी ते पहिले कि पुन्हा सुट्टीची वाट बघणे सुरु होते नै……..
सप्टेंबर 20, 2010 @ 15:17:59
सही आहे…
विमानात बसण्याच्या प्रतिक्षेत… एक बालहट्ट…
सप्टेंबर 20, 2010 @ 15:33:44
आका,
माझ्या भरपूर शुभेच्छा……लवकरच तुझा हट्ट पूर्ण होईल.
सप्टेंबर 20, 2010 @ 15:41:08
मुंबई तर माझी लाडकी आहे. कश्शी पण असू देत! गुगल अर्थमधे दिसतं तसंच वाटतंय. फोटोंची अरेंजमेंट ब्लॉगमधे छान वाटतेय.
😦 मला पण विमानात बसून अस्सेच फोटो काढायचेत..
सप्टेंबर 20, 2010 @ 16:43:07
कांचन,
अग, अजिंक्यने मोबाईल मधून काढलेले फोटो आहेत…… एरिअल फोटो खूप बघायला मिळतात पण आपला साधासा फोटो असला तरी मन भरून येते आणि त्यातून मुंबईचे अंतर कमी कमी होत आहे हे स्क्रीन वर बघत कधी एकदा भारतात पाय टेकतात असे होऊन जाते…. धीर संपतो.. तुझे फोटो तर अप्रतिमच असणार…. मुंबई छानच आहे!!!!
जो मुंबईत राहतो त्याचे जगात कुठेच अडत नाही… असे मला वाटते.
सप्टेंबर 20, 2010 @ 16:47:07
मी मुंबईला बसने आल्यामुळे जमिनीशी कनेक्टेडच राहीलो :).
फोटो मस्त आले आहेत आणि मुंबई मनोहारी दिसतेय…
सप्टेंबर 20, 2010 @ 16:55:20
माझा पहिला विमान प्रवास मुंबई…….हैद्राबाद होता….. लवकरच असा योग तुझाही येऊ दे. फोटो ह्या जून मध्ये काढले आहेत. पोस्टणार नव्हते पण लेकाने एव्हढे कौतुकाने काढले आहेत कि…..
आपलीच पोस्ट पहिली कि मुंबई दूर नाही हे समाधान मानता येते……. पुढच्या सुट्टी पर्यंत.
सप्टेंबर 20, 2010 @ 21:57:56
छान आहेत फोटो. पण तो शेवटचा फोटो कोणी काढला?
सप्टेंबर 21, 2010 @ 07:49:14
फोटो अजिंक्य ने काढले आहेत. आपणाला माहिती आहेच कि उड्डाण होताना आणि उतरताना उपकरणे बंद ठेवावी लागतात. म्हणून त्या आधी पटकन अजिंक्यने मोबाईल ने पटापट फोटो काढले आणि मला पोस्ट सुचली….
सप्टेंबर 21, 2010 @ 07:35:00
गेल्या वर्षी अगदि सहकुटुंब नोर्थइस्ट टुर ला गेलो होतो आम्ही तेव्हा जाताना आणि येताना हा अनुभव घेतला आयुष्यात पहिल्यांदाच……मी पण काही फ़ोटो काढले आहेत पण इतके क्लीअर नाही आलेत…
मुंबईचा हा भाग कुठला आहे हे समजले नाही परंतु हीच माझी मुंबई……. हे आवडल… 🙂
सप्टेंबर 21, 2010 @ 08:54:10
मुंबई जवळ आली कि, कधी एकदा खाली येतो असे होते, जे कोणी मुंबई सोडून इतरत्र राहतात त्यांना भारत दिसल्याचा आनंद होतो पण मी मुंबईची असल्याने मला मात्र हीच माझी मुंबई असे ओरडून सांगावेसे दर वेळेला वाटते. मुंबई श्वास आहे रे……जीवन आहे…… सगळ काही मुंबईच आहे….
गेले पाच वर्ष येत आहोत पण फोटो काढण्याचे सुचले नव्हते, मी जून मध्ये येते त्यामुळे खूप स्पष्ट विजन मिळतेच अस नाही. ह्या वेळेला माझ्या सामसंग च्या डबल सीम च्या मोबाईल ने अजिंक्य ने फोटो काढले, चक्क बऱ्यापैकी स्पष्ट आलेत कारण सामसंग वर नोकिया पेक्षा कमी भक्ती घरच्यांची आहे त्यामुळे माझ्या सामसंग ने काम फत्ते केले….
सप्टेंबर 21, 2010 @ 10:42:19
ताई मस्त आलेत फोटो….
बाकी मला बी इमानात बसायचं आहे
सप्टेंबर 21, 2010 @ 12:17:12
मनासारखं नक्की होईल. आमच्या पेक्षा तुमच्या जनरेशन चे करिअर अधिक उत्तम आहे, खूप वाव आहे. संधी तयार असतात, आमच्या पिढीला शोधाव्या लागत होत्या. कळवशील लवकरच असे हि तुझे अनुभव………
फोटो चा निरोप अजिंक्य ला पोहचवते. माझे काही श्रेय नाही फोटोचे….. त्याचा छंद, आणि त्यात तो बऱ्यापैकी शाळेच्या फोटोग्राफी क्लब मध्ये ओळखला जातो…. मला माझ्या सामसंग मोबाईल चे मात्र खरच कौतुक वाटते… घेतला तेंव्हा कोणीच त्यावर विश्वास ठेवत नव्हते… असो. खास कमेंटायला आलास म्हणून बरे वाटले….
सप्टेंबर 21, 2010 @ 15:55:45
वाह, छान आले आहेत फोटो…
अजिंक्यचा फोटोग्राफिक सेन्स मस्तच दिसतोय.. 🙂
सप्टेंबर 21, 2010 @ 17:45:30
हो सुहास अजिंक्य फोटो चांगले काढतो. मी पोस्ट म्हणून हे फोटो टाकावेत असा विचार करत नव्हते पण फोटो पाहिल्यावर पुन्हा मुंबई आठवली……..अजिंक्य ला नक्की तुझा निरोप देते.
सप्टेंबर 30, 2010 @ 11:10:45
विमानात मोबाईल वापरण्याची परवानगी नाहीये ना??
सप्टेंबर 30, 2010 @ 15:03:23
प्रसिक,
अनुक्षरे मध्ये आपले स्वागत!!! विमान उड्डाण आणि उतरण्याच्या वेळी मोबईल पूर्णपणे बंद ठेवावा लागतो. हि सूचना मिळण्याच्या आधी मिनिट हे फोटो काढले आहेत. विमानातले आतले फोटो काढण्याची अनुमती घ्यावी लागत असावी…. चौकशी कधी केली नाही. तुम्हाला जर विमानात नेट दिले असेल तर ते पेड म्हणून वापरता येते. फोन चे अवकाश संबंध समाप्त होतात.
जर इमर्जन्सी फोन करायचा असेल, विमानात बरेच पैसे आणि तसेच कारण पण असावे लागते. खूप तासांच्या प्रवासात अशा सुविधा उपलब्ध काही विमान कंपनी देत असव्यात.