ओमान मध्ये चहा व कॉफी ही वेगवेगळ्या पद्धतीने मिळते. ह्यांना ‘कावा’ असे संबोधतात. ईद, रमादान ह्या सणांना किंवा पाहुणे म्हणून गेल्यास स्वागत ह्या पेयाने केले जाते. जपानी पद्धतीचे छोटे छोटे बिन कानाचे कप असतात. इथल्या काही राउंड अबाउट म्हणजे रस्त्याच्या नाक्यावर इथल्या वैशिष्ट्य पूर्ण चहाच्या सुरया व छोटे कप ह्यांची सिमेंट मध्ये प्रतिकृती तयार करून ठेवल्या आहेत . चहा व कॉफी जणू काही आपल्याला देऊन स्वागत करीत आहेत. अशा रीतीने ह्या चहाच्या पेल्यांची परंपरा जपली आहे.
आपण त्यांच्या घरी गेल्यास मुस्लीम प्रथेप्रमाणे स्त्री व पुरुष यांची बसण्याची सोय वेगळी असते. ह्या पाहुणचाराच्या खोलीला ‘मजलिस’ असे म्हणतात. जपानी पद्धती प्रमाणे खाली बसून चहा घेण्याची रीत आहे.
प्रथम तुमचे स्वागत हे धुपाच्या सुगंधाने केले जाते. जमिनीवर बुटका परंतु रुंद असा टीपॉय असतो. जमिनीवर गालिच्यांचा गुबगुबीत असा सरंजाम असतो. शाही असे सोफा सेट असतात. त्यापासून जरा अंतरावर ही चहा घेण्याची सोय केली असते. सुगंधित धूप, ओमानी हलवा व चहा असा बेत शांत वातावरणात पाहुणचारासाठी असतो. गडबडीत पटकन चहा घेऊन जा असा पटापट मामला येथे नाही.
ओमान मध्ये चहा किंवा कॉफी च्या बागा नाहीत. भारत, श्रीलंका आदी देशातून आयात केला जातो. परंतु चहा बनवण्याची पद्धत वेगळी आहे. इथे त्यांच्या परंपरेमध्ये चहात किवा कॉफी त दुध घातले जात नाही. सौम्य प्रमाणात उकळवलेला असतो. पाणी गरम करून सुरईत ओतले जाते व बाकीचा मसाला घातला जातो. काही वेळाने हा मसाला खाली बसतो व अलगद पाणी कपात म्हणजे छोट्या भातुकली सारख्या बाउल मध्ये घालून दिले जाते. ह्या समवेत खजूर, ओमानी हलवा हा असतोच. नाशत्याला बरेच पदार्थ असतात पण हा सरंजाम फक्त थोड्या काळासाठी आलेल्या पाहुण्यासाठी असतो.
कावा बनवण्यासाठी दालचिनीची पावडर, काश्मिरी ग्रीन चहा ची पाने चुरून घ्यायची , हिरवी वेलची कुटून ,बदाम किसून व साखर. पाणी गरम करून त्यात मसाला घालून लगेच किटलीत ओतून पाच मिनिटांनी कपात पिण्यास द्यायचे. हा चहा गाळत नाहीत. इथे कावा खूप लोकप्रिय आहे. ईद, रमादान काळात तर रस्त्यावर सुद्द्धा खजूर, कावा व ओमानी हलवा कोणालाही मुफ्त दिला जातो.
जास्वंदी फुलापासून बनवलेला चहा पण येथील लोकांना आवडतो. सुकलेली फुले, दोन ते तीन लवंगा, किसलेले आले, जेव्हढी फुले असतील त्याच भांड्याच्या मापाने बरोबरीने साखर,एक मोठा चमचा लिंबाचा रस ह्या करता जर सात कप पाणी घेतले असेल तर ते तीन कप होईपर्यंत उकाळावयाचे त्यात पुन्हा चार कप पाणी घालून थंड होऊन द्यायचे. पाणी गाळून बर्फावर घालून हा चहा दिला जातो. ह्याच्यात त्यांना पुदिन्याची खूप आवड असल्याने तो ही घातला जातो.
ओमानी लिंबांचा चहा ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे ही लिंबे मिठाच्या पाण्यात उकळवून नंतर सुकवली जातात. त्यांना इथे झातर( zaatar )असे म्हणतात किंवा अरब देशात ओमानी लूमी असे म्हणतात. चहा व कॉफी त तर झातर असतेच पण ओमानी किंवा अरेबिक देशात ह्याचे पदार्थात, सूप मध्ये खूप महत्व आहे. इथे प्रत्येक ओमानी माणसाच्या घरांच्या अंगणात लिंबू चे झाड असतेच. झातर ची पावडर पण मिळते. सध्या लिंबापेक्षा ह्याची चव खूप वेगळी असते. अशा लिंबाच्या चहा ला चार कप पाणी घेतले तर पाच ते सहा झातर ची साले(वाळलेली लिंबे फोडून साल वेगळे काढता येते), मोठे दोन चमचे मध व थोडी साखर घालून पाच मिनिटापर्यंत उकळवून गाळून गरम गरम चहा दिला जातो.
लाल रंगाचा साधी चहा पावडर टाकून तीन प्रकारे चहा केला जातो. पुदिन्याची पाने घालून किंवा रोजमेरी / सागे ची सुकलेली पाने, झातर ची / लेमन thym ची सुकलेली पाने घालून चहा बनविला जातो. त्याला रेड टी म्हणतात. भारताशी जवळचा व्यापारी व संस्कृतीशी ह्या देशाचा संबंध असल्याने आपल्यासारखा दुध घातलेला चहा हवा आहे का असे सौजन्याने विचारले जाते. पण त्यांच्या घरी मात्र ते आवर्जून त्यांच्या प्रथेप्रमाणेच चहा घेतात.
कॉफी तर फारच वेगळ्या पद्धतीने बनविली जाते. ह्या प्रथेचा त्यांना खूप अभिमान आहे. कॉफी च्या बिया येमेन किंवा ब्राझील मधून आयात केल्या जातात. हिरव्या बिया घेऊन त्या ओव्हन मध्ये भाजतात. त्याची ब्राऊन रंगाची पावडर नेहमी ताजी घरीच बनविली जाते. चार कप पाण्यात १/३ कप कॉफी पावडर घालून त्यात चार हिरव्या वेलच्या कुटून घालायच्या. पाणी उकळत ठेवायचे. पाच मिनिटांनी थंड झाल्यावर त्यात चार लवंगा आख्ख्या घालतात. हे पाणी थर्मास मध्ये घालून त्यात गुलाब जल व केशराच्या काड्या घालून न हलवता अलगद कपात ओतायचे म्हणजे लवंगा खाली बसून कपात येणार नाहीत.
चहा नको असेल तर लबान म्हणजे ताकाचा तरी आग्रह नक्कीच होतो. सकाळच्या न्याहारीपासून ते रात्री जेवणापर्यंत ताक घेतले जाते. हे ताक पातळ असते. त्यामध्ये थंड पाणी, मीठ, जिरे पूड,रेड पिपर पावडर, ओरेगनो, किंवा झातरपूड, व ताज्या लिंबाचा अर्धा चमचा रस घालून दिले जाते. आणि येमेन हा देश अगदी जवळ असून त्याप्रमाणे हे मिश्रण मिक्सर मध्ये घालून त्यात टॊमॅटॊपण घातला जातो. cilantro पण ताजेच घालून दिले जाते. असे हे अनोख्या चवीचे ताक ओमानी पद्धतीचे असते. ह्या समवेत खजूर व ओमानी हलवा देण्याची पद्धत आहे. डेटस व नट्स कुकीज पण इथे चहा बरोबर दिल्या जातात. ओमानी हलवा व गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. ओमानी जेवणात वैविध्य आहे. असा पाहुणचार व आदरातिथ्य पाहुण्याचे केले जाते.
मार्च 18, 2010 @ 13:37:39
sahi aahe ga …….tu ghetala aahes ka Omani pahunchar …aata ch jewale aahe aani zop yet aahe …chaha hawa 🙂
मार्च 18, 2010 @ 14:27:34
पुण्याहून वाचक पहिले आणि तूच असणार याची खात्री होती. हो, अश्विनी मी घेतला आहे अशा प्रकारचा चहा.
मार्च 18, 2010 @ 15:03:22
कावा पिण्याची खुप इच्छा आहे…पण इतक्या प्रकारे चहा बनतो हे नविनच!
परत एकदा सुंदर माहिती…
मार्च 20, 2010 @ 17:07:56
आनंद,
मी लिहिल्या प्रमाणे करून पहा जमेल. हल्ली सगळीकडे मिळतो नाहीतर खवय्ये दोस्तांची मदत घेऊन असा चहा मिळण्याचा पत्ता नक्कीच मिळेल. महेंद्र्जी, रोहन, पंकज आहेत अशी काही मंडळी…. कळवा मला चव आवडली का??
मार्च 18, 2010 @ 17:47:31
छान माहिती आहे. असाच काहवा नावाने काश्मिरला पण हिवाळ्यात मिळ्तो. त्यामधे फक्त सुंठ पण घातलेली असते. बाकी चव एकदम मस्त वाटते थंडी मधे. जस्मिन टी हा चायनाहुन एका मित्राने आणून दिला होता. पण जुईच्या फुलांचा चहा काही फारसा आवडला नाही.
मार्च 20, 2010 @ 17:02:13
महेंद्रजी,
मी चव घेते, मला आवडतात पण आपला चहा झिंदाबाद!! सर नाही हो त्याला. टपरी असली तर अजून बेस्ट…. मला तर बिन दुधाचा चहा नेहमी साठी नकोच.
मार्च 22, 2010 @ 07:42:55
कहावा मधे बारिक किसलेला बदाम वगैरे असतो मस्त लागतो टेस्ट.
साखरेऐवजी मध वापरायची पण पध्दत आहे. पण त्यामुळे काळसर रंग येतो चहाला. चव बाकी छान लागते काळ्याचहाची/
मार्च 18, 2010 @ 17:48:51
्ताकामधे लिंबू पिळून ?? कसं लागत असेल? ती लहानपणीची कविता आठवली.. गोविंद गोपाळ हे दोघे बंधू, जेवित होते दही भात लिंबू…… 🙂 पुढची लिहित नाही इथे 🙂
मार्च 20, 2010 @ 16:58:19
महेंद्र्जी,
अकरावी शाळेत होती त्या वेळेला होती का ही कविता? कारण माझे दहावी बोर्ड होते माझ्या विस्मृतीत गेली काय ही कविता??? आठवली तर मेल करा. ताकात लिंबू कारण आंबटपणा ताकाला अजिबात नसतो. मलाही खूप आश्चर्य वाटले म्हणून करून पहिले तर आवडले. मस्कत च्या खूप गोष्टी साठून राहिल्या आहेत म्हणून आता ह्या पोस्ट टाकायचा सपाटा लावला आहे. कालच
एक मस्त वादी बघून आले. लिहीन लवकर…
मार्च 22, 2010 @ 07:41:09
ही कविता पुस्तकात नव्हती तर मी अगदी लहान असतांना एका वात्रट मुलाने शिकवली होती शाळेत. पाचवित असतांना
“गोविंद गोपाळ हे दोघे बंधू
जेवित होते दहिभात लिबू
जेवता जेवता उंदीर आला
त्यांच्या पानात सु सु करुनी गेला.”
शाळेत मधल्या सुटीत ड्बाखाण्यापुर्वी श्लोक म्हणण्याऐवजी ही कविता रोज कोरस मधे गायचे मुलं.
मार्च 19, 2010 @ 18:07:02
कावा,झातर आम्हाला चाखायला कस मिळणार… 🙂 .बाकी माहिती छान आहे…
मार्च 20, 2010 @ 16:51:02
देवेंद्र,
साधारण पणे कसा करायचा ह्याची कृती पण दिलेली आहे. सर्व गोष्टी भारतातल्या आहेत. नाहीतर मुंबईत कुठे मिळतो ह्या करता महेंद्रजी, बरोबर पत्ता सांगतील. करून तर बघ आवडेल व कळव.
मार्च 21, 2010 @ 10:19:18
वाह उस्ताद..एक चाय हो जाए. पण ताकात लिंबू आणि टोमॅटो?? ट्राइ केला आहेस का तू लबान? सॉरी मला लेट झाला प्रतिक्रिया द्यायला पण सध्या ऑफीसमध्ये वर्कलोड तुफान वाढलाय ग…
मार्च 22, 2010 @ 20:24:44
लय भारी! ओमानी लोकांबद्दल व त्यांच्या संस्कृतीबद्दल तू ही जी सर्व माहिती देत आहेस ना, खुप आवडली! आधीचे बरेच लेख वाचायचे राहिलेत, वेळ काढून वाचावे लागतील.. असो.
तू मार्च एण्डला भारतात येणार होतीस ना? मी तूला मेल टाकलिय!
मार्च 23, 2010 @ 10:30:35
chaan mahiti dilis ekdam. ekhadya omani ghari pahuni mhanun jaaychi iccha hotey aata. 🙂
मार्च 23, 2010 @ 21:08:10
सॉरी बऱ्याच दिवसांनी पोस्ट वाचायला घेतली व तिही चहाची ! मी काही असल्या कुठल्याच चहांच्या चवी घेतल्या नाहीत मला आपला मी केलेला व ताजे दूधाचा चहाच आवडतॊ ! वर्णनांवरून आवडॆल असेही वाटत नाही.
मे 06, 2010 @ 00:39:42
छान माहिती आहे . .
मे 08, 2010 @ 16:03:56
धन्यवाद स्वप्नील कोल्हे.