अरब देशांमध्ये मधाचा वापर स्वयंपाक ते आरोग्य यासाठी अधिक केला जातो. ओमान चा मध हा अत्यंत पारंपारिक पद्धतीने बनवलेला असतो. निसर्गात जे उपलब्ध आहे त्याचा वापर प्रामुख्याने असतो. मधुमक्षिका पालन येथे वेगळ्या पद्धतीने केले जाते. येथे प्रामुख्याने खजुराची झाडे प्रंचंड प्रमाणत लावली जातात. खजुराच्या झाडाचे आयुष्य संपल्यानंतर त्याचा बुंध्याचा वापर मधुमक्षिका पालनासाठी केला जातो. बुंधा आतून पोकळ केला जातो. त्यात मधुमक्षिका पालन करतात. नारळ , पपया, पाम, आणि अनेक सुवासिक झाडांचे बुंधे वापरून मधाचे उत्पन्न घेतात. वेगवेगळ्या झाडानुसार सुवासाचा आणि चवीचा मध येथे उपलब्ध आहे. मध प्रक्रियेत मधाला त्या विशिष्ट झाडाचा सुवास लाभतो. असा फ्लेवर्ड मध इथे खूप लोकप्रिय आहे.
Apis millifera and Apis florea. ह्या दोन जातीच्या मक्षिका येथे पालनासाठी उत्तम मानल्या जातात. परदेशी जातीच्या माशा पाळणे इथे कायद्याने बंदी आहे. ह्या जातीच्या माशा इथल्या जातीय आहेत. माऊंटन बी म्हणून ह्या इथल्या हवामानास पोषक मानल्या जातात. ह्या जातीच्या माशा आकाराने छोट्या परंतु खूप कामसू असतात आणि उच्च प्रतीचा मध गोळा करून आणतात. रुस्ताक आणि सलाला ह्या भागात अनेक फळ झाडे आणि फुल झाडे , शेती हि विस्तृत प्रमाणात आहे. ह्या ठिकाणी अशा मधुमक्षिका कॉलोनी खूप आढळतात. तसेच अति डोंगराळ भागात रानटी झुडुपे फुलांची दिसतात. अशा अति उन्हाळी भागात ह्याच माशा अनुकूल आहेत. ह्या जातीच्या मधू मक्षिका राष्ट्रीय संरक्षण प्राप्त आहेत. ओमानला ह्या जातीच्या माक्षिकांचा अभिमान आहे. संपूर्ण आखाती देश ओमान मध्ये येवून मध घेऊन जातात.
खजुराचा बुंधा पोकळ केला जातो त्यास ‘tubl’ असे संबोधतात. अशा टूबल एकमेकावर रचून मक्षिका पालनाच्या विस्तृत अशा मधू मक्षिका कॉलनी येथे आहेत. मध काढून घेण्यासाठी हा बुंधा मागच्या बाजूने उघडत्तात. मधुमक्षिका पालनासाठी सरकार कडून खास मदत दिली जाते. मक्षिका करता येथे डॉक्टर पण आहेत. स्वतःचा व्यवसाय असला तरी हा खूप सन्मानीय येथे मानला जातो. सरकारकडून मटेरिअल, सर्विस उत्पादनाकरीता दिली जाते.
मध पालनाची परंपरा कुराण काळा पासून प्रचलित आहे. पूर्वीच्या इथल्या राजमहालात मध असलेली खजुराची झाडे ठेवण्यासाठी खास खोल्या होत्या. ह्या खोल्या मधून एकेका खळगीत एकेक झाड ठेवून, ते नंतर प्रेस करत त्यातील मध पन्हाळी मार्फत गोळा केला जात असे. अशा खोल्या आजही किल्ले, महाल यांना भेट दिली कि उत्तम स्थितीत बघण्यास मिळतात.
ओमान मध्ये एकंदरीत ३५००० मधुमक्षिका कॉलनी आहेत. जून ते नोव्हेंबर काळात उत्पन्न घेतले जाते. २००८ मध्ये ९६,०२६ किलो मधाचे उत्तपन शेती खात्यात जमा झाले. संपूर्ण आखाती देशात ओमान चा मध निर्यात केला जातो. उच्च प्रतीचा मध तेही सुवासाचा हे मधाचे वैशिट्य…
मधू मक्षिका पालनाची अशी पद्धत वेगळी असल्याने लिहिली.
मार्च 13, 2011 @ 19:37:51
छान आहे हा लेख, मुख्यत्वे सगळे फ़ोटो भारी आहेत, खजुराच्या बुंध्याचा छान उपयोग केलेला वाटला, आपल्याकडच्या शेतकरी बंधुंना कामी येईल असे मनापासुन वाटले
मार्च 13, 2011 @ 20:28:23
नमस्कार..श्री. गुरुनाथ.
आपले स्वागत!!!! आभारी आहे.
मार्च 14, 2011 @ 07:50:44
आपल्याकडे सरकारकडून अशी मदत बिदत मिळणे दुरापास्तच. म्हणजे मंजूर करून घेतली जाईल पण त्या व्यावसायिकाकडे ती पोचणंच शक्य नाही.
मार्च 14, 2011 @ 21:20:59
श्रेया, अगदी मनातल बोललीस!!! असे शल्य आहेच, पण त्यातूनही आशा आहे कि खाजगी स्वरूपावर कोणी मदत बिदत करत असेल तर त्यांना माझी हि अलप्शी सेवा क्षेत्रांची कल्पना…..आणि मुख्य म्हणजे मी इथल्या गोष्टी बघून हटके असतील तर सगळ्यांना सांगण्याचा आनंद मिळवते….. बघुया होप फॉर बेस्ट….तुला भेटून आनंद झाला.
मार्च 14, 2011 @ 09:24:58
छान माहिती. ओमानमधलं मधमाशीपालन, गुलाबपाणी, मोर, सलाला … अनुजा, ‘ओमानच्या गोष्टी’ म्हणून एक इ-पुस्तक बनव आता.
मार्च 14, 2011 @ 21:12:51
गौरी,
अग् मला हि माहिती काहीशी हटके वाटते म्हणून पोस्ट करत असते. त्यातूनच अशा पोस्ट होत गेल्या. ई पुसतक ओमानचे छान सुचवलेस..||श्रीराम|| इन्शाल्ला!!!!!
मार्च 21, 2011 @ 18:08:46
खुपच सुंदर!
मार्च 21, 2011 @ 21:43:02
धन्यवाद….हेमंत.
मार्च 28, 2011 @ 23:08:25
वाह..मस्त माहिती.
एप्रिल 05, 2011 @ 20:31:14
छान लेख अनुजाताई ….
>>>>>ओमानमधलं मधमाशीपालन, गुलाबपाणी, मोर, सलाला … अनुजा, ‘ओमानच्या गोष्टी’ म्हणून एक इ-पुस्तक बनव आता…. +१
एप्रिल 05, 2011 @ 22:08:08
श्रीराम!!!!नक्की विचार करते..कोणी असे पुस्तक बनवण्यास मदत करेल तर आवडेल…असो इंशाल्ला !!!!
जानेवारी 31, 2012 @ 11:34:35
details are very useful thanks a lot
फेब्रुवारी 06, 2012 @ 16:52:52
Thanx!!!
फेब्रुवारी 24, 2013 @ 14:24:59
chaan lekh aahe……
ऑक्टोबर 15, 2016 @ 17:17:08
Thanks for visiting blog.
ऑक्टोबर 14, 2016 @ 22:33:23
Very nice information
for organic farming
Ambadnya
ऑक्टोबर 15, 2016 @ 17:17:44
Ambadnya Subhashsinh for visiting blog.
फेब्रुवारी 11, 2017 @ 21:18:16
Ambadnya for your feedback.