ओमान चे प्रसिद्ध गुलाबपाणी …….

ओमान मध्ये जबल अख्तर म्हणून बारा महिने सदा हरित अशी डोंगर रांग आहे. येथेच डिसेंबर महिन्यात बर्फ वृष्टी होते. गुलाबी रंगांची विलक्षण मधुर सुवासाची ओमानी गुलाब शेती येथे प्रसिद्ध आहे. साधारणपणे किंबहुना त्यापेक्षा अधिकच पण ७००० ते ९००० एवढी गुलाबाची झाडे आहेत, ते सुद्धा तेव्हढ्याच समुद्र सपाटी उंचीवर…..मार्च मध्यापासून ते मे अखेरी पर्यंत पूर्ण परिसर हा गुलाबी आसमंताचा होतो. गुलाबाच्या पाकळ्यांचा अर्क काढणे म्हणजे गुलाब पाणी हि प्रक्रिया असली तरी ती येथे सहज पाहण्यास मिळाली म्हणून जरा वेगळी वाटली. असे गुलाब पाणी म्हणजे ऊर्ध्व पतन प्रक्रिया करून मिळवलेला गुलाबाचा अर्क असतो पण इथल्या पारंपारिक पद्धतीत बघण्यास अनेक पर्यटक मुद्दामहून येतात.

गुलाबाच्या झाडापासून ह्या मोसमात १५ ते २० किलो पाकळ्या मिळतात. दोन किलो पाकळ्या पासून ७५० मिलीलीटर अर्क मिळतो. गुलाबाची फुले भल्या पहाटे तोडली जातात आणि ती स्वच्छ असा पांढरा रंग वस्त्राचा घेऊन त्यात फुले ठेवली जातात. अल दुहाजान म्हणून मातीची बनवलेली चूल असते, त्यावर अल बुरमः म्हणून मातीची सुरई सदृश भांडे असते त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या रचल्या जातात. ह्या पाकळ्यांवर तांब्याचे खास बनवलेले भांडे ठेवून, चुलीवर मातीचे भांडे ठेवून त्यामध्ये थंडगार पाणी भरले जाते पाणी भरलेले मातीचे भांडे मातीने सील ( मातीचे लिंपण करून हवाबंद करणे ) केले जाते. जवळ जवळ चार तास मंद चुलीवर फुले ऊर्ध्व पतन केली जातात. नंतर अल करास म्हणून मातीच्या मोठ्या उभट भांड्यात तीस दिवस झाकून ठेवतात. मग ते पाणी गुलाब पाणी म्हणून तयार होते.

जशी मातीची चूल गरम होऊ लागते तसे अल बुरमः गरम होण्यास सुरवात होऊन आतील तांब्याचे भांडे गरम होते आणि तांब्याच्या भांड्यात पाकळ्यांचा अर्क गोळा होऊ लागतो. एका गुलाबाच्या झाडापासून मोसमात पंधरा ते वीस किलो पाकळ्या मिळतात. दोन किलो पाकळ्या पासून सातशे मि. ली. अर्क मिळतो. जवळ जवळ सर्व अरबी पदार्थात गुलाब जल हे प्रामुख्याने असतेच.

इथे गुलाब जल बनवण्याची प्रक्रिया जबल अक्थर येथे सहज बघण्यास मिळते. ह्या व्हीडीओ मध्ये गुलाब पाण्याची प्रक्रिया दाखवली आहे……..

2 प्रतिक्रिया (+add yours?)

  1. hemant pokharankar
    जानेवारी 23, 2011 @ 20:58:24

    मस्त माहितीपूर्ण लेख. गुलाबाची जात कुठली? किती प्रकारच्या जाती वापरल्या जातात? …बाकीचेही लेख वाचायला घेतलेत. भरपुर मेजवानी दिसतेय… थँक्स!

    उत्तर

    • Anukshre
      जानेवारी 24, 2011 @ 11:45:26

      धन्यवाद श्री. हेमंत पोखरणकर,
      ह्या गुलाब फुलांना डेझ्रट रोझ असे संबोधतात. ह्यांचे शास्त्रीय वर्गीकरण काय असेल ह्याची कल्पना नाही. आपणाला लिखाण आवडले म्हणून खूप आभारी आहे.इथे तरी हीच गुलाबी फुले वापरली जातात. गुलाब जल प्रसिद्ध आहे पण गुलकंद मात्र मिळत नाही, शोध घेण्याचे माझे अजून बाकी आहे. खर तर इतका सुगंध आहे , गुलकंद होवू शकतो , मी हि फुले आणून घरगुती स्वरुपात करून बघेन…. जसे पाहत असते, तशी लिहित असते.

      उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: