ओमान मध्ये जबल अख्तर म्हणजे हिरवा पर्वत…..ओमान मध्ये निझवा भागात हा पर्यटकांचा अतिशय लाडका पर्वत आहे. बारा महिने हिरवीगार राहणारी हि डोंगर रांग आहे.
समुद्र सपाटीपासून साधारणपणे दहा हजार फुट उंच आहे. सध्याच्या दिवसात ओमान मध्ये पाऊस पडतो. राजधानी मस्कत मध्ये १४ पर्यंत तापमान खाली गेले आहे तर ह्या पर्वत भागात तापमान उणे दोन झाले आणि बर्फवृष्टी होते. दरवर्षी हा अनुभव येतो. पन्नास पर्यंत तापमान अनुभवयास मिळते तसेच बर्फवृष्टी चा पण आनंद घेण्यास मिळतो.
हाच बर्फ काही फोटो च्या माध्यमातून पोस्ट साठी…….
ओमान मध्ये वाळवंट असूनही इतर आखाती देश पेक्षा हेच ओमान चे आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे कि इथे अप्रतिम निसर्ग, डिसेंबर आणि जानेवारीत जबल अख्तर आणि मस्कत मध्ये भरपूर पाऊस, तसेच एकही झुडूप नसलेला अगणित डोंगर प्रदेश,सलाला सारखा भाग तर प्रती आशिया आहे. ओमान मधील प्रत्येक भाग हा स्वतःचे स्वतंत्र भौगोलिक वैशिष्ट्ये असणारा आहे.
बर्फवृष्टी हि दरवर्षी होतेच हि येथील निसर्गाची किमया आहे. वैविध्यपूर्ण भौगोलिक रचना, अप्रतिम निसर्ग सौंदर्य अशी एकता येथे आहे. आखाती देशातून, युरोप मधून पर्यटक ओमान बघण्यासाठी खास येतात.
जबल अख्तर हा भाग अतिशय समृद्ध आहे. येथे वर्षभर पूर्णपणे थंड हवामान असते. हा भाग येथील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. येथे डोंगर रांगातून पायऱ्याची शेती केली जाते. येथील प्रमुख आकर्षण म्हणजे हिरवेगार डोंगर, वर्ष भर कोसळणारे धबधबे, गुलाब पाणी आणि अत्तरासाठी येथे खास गुलाबी रंगाच्या गावठी जातीच्या पण अत्यंत सुवासिक अशा गुलाबाची शेती अक्खा परिसर सुगंधित करते, तसेच येथील डाळिंबे पण जगात अव्वल आहेत. असंख्य फळझाडे, फुले, शेती आणि उंच डोंगर रांगा ह्यामुळे वर्षभरपर्यटक येत असतात.
येथील दरवर्षी होणारी बर्फ वृष्टी पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी खास पर्यटक निवास उपलब्ध आहेत. येथे फक्त मोठी गाडीच घेऊन जाता येते असा शासकीय नियम आहे कारण वळणाच्या, उंच कडे कपारीचा हा प्रदेश आहे. येथील बर्फ वृष्टी हि साधारणपणे महिनाभर टिकते इतका घट्ट थर बर्फाचा जमलेला असतो.
ह्या वर्षीचा पहिला बर्फ कालच पडण्यास सुरवात झाली. तापमान उणे दोन असे होते. आत्ता हळूहळू बर्फाचे थर वाढत जातील आणि महिनाभर तरी हा बर्फ वृष्टीचा आनंद घेता येतो. उन्हाळ्यात ५० अंश पर्यंत उन्ही पारा वाढतो आणि थंडीत बर्फही ओमान मध्ये नवीन वर्षाच्या स्वागता करता हजर होतो. अशी तापमानातील, वातावरणातील विविधता अनुभवण्यासाठी आखाती देशामधील एकमेव ओमान.
डिसेंबर 29, 2010 @ 12:43:29
मस्त आलेत फ़ोटु… 🙂 🙂
डिसेंबर 29, 2010 @ 23:09:40
योगेश, ओमान मधील बर्फ वृष्टी हे एक प्रमुख आकर्षण आहे म्हणून हि पोस्ट.
डिसेंबर 29, 2010 @ 19:01:38
फार वेगळ वाटत हो हे वाचून. तिकडचा प्रदेश वाळवंट आहे असेच आता पर्यंत ऐकत वाचत आलो आहोत. तिकडे बर्फ वृष्टी! हा ग्लोबल वार्मिंग चा परिणाम नाही न? का दर वर्षी होते?
डिसेंबर 29, 2010 @ 23:13:40
रविन्द्र्जी
दरवर्षी हि बर्फवृष्टी होते. ओमान मध्ये निसर्गात विविधता आहे. खरच हे विश्वास ठेवण्यासारखे नाही पण आम्ही अनुभवतो.
डिसेंबर 30, 2010 @ 04:10:27
मला पहिला फ़ोटो खूपच आवडला. ’ममी रिटर्न्स’ मध्ये अहेम शेरच्या वाळवंटातलं ओऍसिस दिसतं तसाच दिसतोय तुझा जबल अख्तर.
’पायरयांची शेती’ म्हणजे आपल्याकडे ताली बांधतात तसं ना? की कसं?
फ़क्त ओमानमध्येच नाही, तुझ्या ब्लॉगवर स्नो-फ़ॉल होतोय हे बघून गंमत वाटली.
डिसेंबर 30, 2010 @ 10:41:06
श्रद्धा,
हो, आपल्याकडे ताली बांधतात तसंच, मी पुढची पोस्ट ओमान च्या स्पेशल गुलाब पाणी बनवण्याच्या पद्धतीबद्धल लिहित आहे त्यात बहुतेक ह्या शेतीचा फोटो असेल. हि माहिती पण खूपच माहितीपर आहे मला तर इथे आल्यावरच कळली. ब्लॉग वरची बर्फवृष्टी वर्ड प्रेस करत आहे.
तुझे मनापासून स्वागत! तुझा पहिलाच अभिप्राय धन्यवाद. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
फेब्रुवारी 05, 2011 @ 14:02:58
फोटो छान आहेत… दुसऱ्या फोटोचा angle मस्त आहे.
फेब्रुवारी 05, 2011 @ 15:48:08
धन्यवाद हर्षल….
एप्रिल 05, 2011 @ 20:34:03
तिथे बर्फवृष्टी होते हे माहीतच नव्हत मला …भारी आहे जबल अख्तर ….!!!
एप्रिल 05, 2011 @ 22:06:06
वाळवंट ते बर्फ असा भारत…… आशियाई भौगोलिक परिस्थिती इथेही आहे… वेगनार म्हणून शास्त्रज्ञ होते, त्यांनी खंड वहन सिद्धांत मांडला..ते पटते कारण कदाचित ओमान हा भूभाग आशियाई खंडांचा सलग भाग असावा नंतर खंड वाहत गेले आणि स्वतंत्र देश झाले. इथे आपल्या सारखा मौसमी पाऊस..वाळवंट…बर्फ..लाल माती ते वाळू असे सर्व काही विविध भागात आढळते.