ओमान मधील आंतरराष्ट्रीय आतिषबाजी…….


चाळीसाव्या राष्ट्रीय दिनानिमित्त सहा डिसेंबर ते सतरा डिसेंबर पर्यंत वीस मिनिटे आंतर राष्ट्रीय फायर वर्क्स ठेवण्यात आली होती. अमेरिका, इटली, युके, ऑस्ट्रेलिया, फ्रेंच, होंगकॉग अशा सहा देशांनी सहभाग घेतला होता. प्रत्येकाला आपली तारीख दिली होती. रात्री आठ वाजता हि आतिषबाजीची कोट्यवधी रुपयांची स्पर्धा वीस मिनिटे ठेवण्यात आलेली होती. इथे हा एक मोठा सोहळा होता. रोझ गार्डन च्या मागच्या बाजूस डोळ्यांचे पारणे फिडणारी हि नयनरम्य फटाक्यांची आतिषबाजी पाहण्यासाठी देव लोकांतून ३३ कोटी देव पण डोकावून पाहत असावे इतकी सुंदर!!! आणि विलक्षण अनुभव देणारी अशीच होती.


एका क्षणात आपणाला रिमझिम अशा पावसाचा अनुभव तर दुसऱ्या मिनिटाला कोसळणाऱ्या धारा दिसाव्यात असे आकाश, कधी प्रेमाचा अविर्भाव तर कधी जंगलाचा भास अशा विविध कल्पना साकारत डोळे फक्त आकाशाकडे विस्मयतेने पाहत, बोलण्याचे पण सुचत नाही.

लाखो जनसमुदायाच्या साक्षीने रिमोट वर फटाके नव्हे तर स्वर्गीय कल्पना प्रत्यक्षात जमिनीवरून आकाशाकडे झेप कधी घेत होत्या हे कळत पण नव्हते. प्रत्येक देशाकरता लोकांना वोटिंग करण्यास सांगितले होते. ह्या स्पर्धेत फ्रेंच देशाने प्रथम क्रमांक मिळवला.

ह्या स्पर्धे करता वातावरणाचे प्रदूषण किती होते ह्या वर पण मीटर बसवले होते. कमीत कमी प्रदूषण करणारे पण विलक्षण नयन सुख आणि विविध थीम सुयोग्य पद्धतीने आकाशात मांडणारे म्हणून फ्रेंच अग्रसेर ठरले. स्पर्धा खूपच अटीतटीची होती, प्रत्येक देशाने त्यांच्या कंपनीने सर्व कौशल्य पणास लावले होते. यु ट्यूब वर व्हीडीओ आहेत त्याची हि लिंक

अहाहा!!!! अप्रतिम!!!!! विलक्षण सुंदर…….असे काही अनुभव फोटोच्या रुपात ह्या पोस्ट साठी.

Advertisements

5 प्रतिक्रिया (+add yours?)

 1. देवेंद्र चुरी
  Dec 20, 2010 @ 11:19:28

  फोटो पाहून खरच तोंडात बोट घालावीशी वाटतात ,खूप मजा आली असेल ना हे प्रत्यक्ष बघायला ….

  पण इतका कोट्यावधी पैसा असा उधळण मला पटल नाही,याउलट ह्याच पैश्यातून गरीब प्रदेशांचा विकास करावयाची स्पर्धा ठेवली असती तर ते जास्त उचित ठरले असते नाही कां…

  प्रत्युत्तर

  • Anukshre
   Dec 20, 2010 @ 15:38:59

   ह्या देशात पैसा….तेलाचा, ह्यांच्या गरीब भागाकरता हे देश खूप काही करतात. आपण पण एव्हढे फटाके दीपावलीत उडवतो त्या ऐवजी अशी एकाच ठिकाणी प्रत्येक शहरी अतिशबाजी ठेवली तर सर्वच आनंद घेवू शकतील.

   प्रत्युत्तर

 2. dtawde
  Dec 20, 2010 @ 12:47:48

  ओह यार!!
  अप्रतिम!!!!! विलक्षण सुंदर!!!

  प्रत्युत्तर

 3. सुहास
  Dec 21, 2010 @ 20:55:47

  वाह एकदम सही…मानला पाहिजे ह्या कौशल्यवान प्रतिभेला…

  प्रत्युत्तर

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: