ओबामाच्या ओठांची जखम…..आणि पौगंड संवाद.

पौगंडावस्था हे नाव पण कस जीभ वळवून म्हणावे लागते. कुठलीही गोष्ट हि ह्या वयात खूप कळत असते असा अविर्भाव असतो. मोठ्या माणसा सारखे वागायचे असते पण वयाचा अल्प अनुभव भन्नाट विचारांची मंथने घडवत असतो. विचारांना योग्य दिशा हि नाही मिळाली तर भरकटण्याची शक्यता असते. ह्या वयाची मुले/मुली जास्तीतजास्त वेळ समवयस्क मंडळी बरोबर असतात त्यामुळे पालकांशी संवाद करण्याच्या वेळा कमी होतात. परदेशात मात्र हि मुले पालकांसमवेत जास्तीत जास्त असतात. त्यामुळे पालकांची जवाबदारी खूप वाढते. पालकांना पण खूप स्पष्ट आणि मैत्री पूर्ण राहावे लागते. अशाच वयातील हे काही संवाद….

—आई आणि तो
— अरे जरा मी बातम्या पाहते बर का? आज न ओबामाच्या ओठाला जखम झाली आणि बारा टाके पडले.
तो—- अग, आता ओबामा पप्पी कशी घेणार?
—-उडालेच!!!!
तो—–अमेरिकेच्या विमानतळवर पोहोचल्या बरोबर त्यांनी मिशेल ची पप्पी घेतली होती न.
—-हं!! ठीक आहे. लहान आहेस का पप्पी म्हणायला? पप्पी आई ची असते.
तो—–तेच म्हणतोय न, पप्पी कशी एक मिनिटात संपते, तशी होती.
—–अरे त्यांच्या कडे आनंद असाच व्यक्त करतात.
तो—–लांबलचक घेतात त्याला किसिंग म्हणतात. मी काय बोलयला चुकलो? उगाच बोलतेस हल्ली.
—-ठीक आहे. आज प्रोजेक्ट कुठला दिला तो करत बस.
तो——आज एड्स वर प्रोजेक्ट दिला. आता वांदे झालेत. —–नेट वर माहिती असते, त्यातील घे.
तो—– आई, ते न होण्याचे उपाय पण लिहायचे आहेत. नेट वरच्या साईट पाहत बसलो तर तू चीडशील. तूच सांग कसा पूर्ण करू?
—–बर बर मी बघते आधी, मग तुला सांगते,
तो—–मी काही उपाय आता सुट्टीत पुण्यात रस्त्यावर पडलेले पाहिलेत. तसंच लिहायचे का?
—–एव्हढे काही लिहायची गरज नाही. मुलांना ह्या आजाराबद्धल माहिती असावी बस.
तो—आई, फ्यामिली प्लानिंग करता पण ह्याच कॉमन अक्सेसरीज आहेत.
——ह्याचा काय संबंध?
तो—-अग. प्रोजेक्ट चार पाने हवा म्हणून पॉईन्ट वाढवतोय.
तो—- आई आम्ही आज वर्गात खूप हसलो, टीचर पण हसल्या.
—– काय झाले एव्हढे!!
तो— टीचर पर्स मध्ये आमचे पेपर ठेवायला विसरली, खूप वेळ शोधत होती, आणि म्हणाली—-मी रात्री प्रीकोशन घायला हवी होती. सॉलिड न मग काय वर्गात एकच हसाहसी झाली. आम्हाला वाटल प्रोजेक्ट तसा विचित्र आहे पण टीचर नि खूप हसवले.
—–झाल असेल विसरल्या असतील खरच. आपण प्रोजेक्ट बद्धल बोलूया का? काय काय मुद्दे तुम्हाला लिहायचे ते शाळेत सांगितले नाहीत का?
तो —उद्या सांगणार आहेत. तो पर्यंत आम्हीच विचार करायचा आहे.
—–ठीक आहे. आपण चांगल्या शब्दात लिहूया. मी माझ्या शाळेत पण हा विषय विद्यार्थ्यान बरोबर चर्चा करत असे. मी सांगते तुलाही समजावून मग लिही.
तो —-आज फेस बुक वर धम्माल येणार, आमचा प्रोजेक्ट.आणि ओबामा, सॉलिड वांदे झालेत त्याचे.
सगळे कसे सुटतील बघ.
आई, डोन्ट वरी मी बघतो. तुमच्या सारखे आता राहिले नाही. बाबा गावावरून आले कि, तू त्यांची दारात दृष्ट काढतेस. मी म्हणत नाही कि मी ओबमा सारखे करीन पण जरा तरी बदल न ग.
——-चल रे टोणग्या पळ आता.
विषय खरच सामाजिक जाणीवेचा होता पण ह्या वयातील मुलांना कळणे हि गरजेचे असते. सध्या टीव्ही माध्यमाने मोठे आणि छोटे वय ह्यांच्यातील अंतर फार कमी केले आहे.

दुसरा संवाद—

तो आणि बाबा. निवांत गप्पा करत होते.

तो—-बाबा, तू होस्टेल ला शिकलास न. तेंव्हा तु मुलीला प्रपोज केले होते कारे?
——आमचे होस्टेल फक्त मुलांचे होते आणि इंजिनिअर शिकायला कमी मुली असायच्या त्या सुद्धा अभ्यासू.
तो——तुला कोणीच भेटले नाही???
( लेकाच्या चेहऱ्यावर भला मोठा प्रश्न, आणि बाबांचे डोळे आईकडे रोखले होते.)
—–तसं काही नाही होत्या तशा दोन चार बऱ्या पण अरे अभ्यास एव्हढा होता कि वेळच मिळत नसे.( बाबांची सारवासारव)
तो—-मग काय बाकी काही विचारायला नकोच.
——अरे विचार दुसरे काही. मी पण आई सारखे सगळ छान सांगू शकतो.
तो——तसं नाही रे. पहिला प्यार, तो पहिलाच असतो. तूला काय प्यार चा काहीच अनुभव नाही.
——-प्यार काय लग्न ठरल्या नंतर पण होते. मला तुझी आई आवडली म्हणूनच मी तिच्याशी लग्न केले न.
तो—–तुझ काय अरेंज लग्न होत. मी पाहतो न, तू खूप वेळेला नेट वर असतोस ऑफिस चे काम करत, आणि आई शेजारी बसून पुस्तक वाचत असते. लाईफ असे बोअरिंग करू नका रे.
——बच्चमजी, म्हणत बाबांनी लेकाचे गाल ओढले आणि म्हणाले.—–लाईफ नुसतेच प्यार प्यार नसते… काम पण करावे लागते.

तिसरा संवाद—

तो आणि त्याचा मित्र.

तो—– अरे यार बातम्या बघतोय. आपण इथे परदेशात पण तिकडे भारतात अजून कसाब ला फाशी नाही. वाटत जाव आणि धाडधाड गोळ्या घाल्याव्यात.
——-मला तर ह्या सगळ्या पॉलीटीशन न घरी पाठवावेसे वाटते. इतके वर्ष नुसते पोलिटीक्स शिकतो पण हे बदलत नाही.
तो—–मनसे चा राज काय भारी दिसतो रे! मला तर आवडतो. तुला कोण आवडत?
——- तोच बरा आहे रे, स्मार्ट आहे. कुठे काही जमवलाय का रे त्यांनी? माहिती आहे का तुला?
तो—–कल्पना नाही पण सीधासाधा वाटतो. अजून त्यांनी त्यांच्या पार्टीत सॉलिड हिरोईन घेतली नाही मग बघ कसा बकरा होतो.

असेच भरभरून बोलतात. प्रेम विषय असो नाहीतर राजकारण, घरातील नाते संबंध ह्यावर पण त्यांची मते तयार होत असतात. हेरी पोटर पासून ते प्रत्येक विषयात ते समरस होतात. जागरूक राहण्याची सवय पालकांना करून घेण्यास हवी. ओबमा ते गांधीगिरी हे विषय पण समान पातळीवर बोलले जातात कारण अपरिपक्व मनाची बांधणी होत असते. कधी मजेशीर तर कधी अंतर्मुख करण्यास हि मुले पालकांना भाग पाडतात. समाजाभिमुख एकटे जाण्यासाठी भक्कम आधार तर, कधी मित्रत्वाचा हात आणि सगळ्यात महत्वाचे पालकांचा मायेचा स्पर्श आपली पुढील पिढी हि जागरूक, समजदार करेल

छोट्याशा पोस्ट मधून पौगंडावस्था उलगडून सांगणे अवघड आहे. हा छोटासा प्रयत्न पण सुजाण पालकांना निश्चित आवडेल.

12 प्रतिक्रिया (+add yours?)

  1. Anonymous
    नोव्हेंबर 30, 2010 @ 21:16:33

    उत्तम, खुसखुशीत किस्सेदास्ताँ (kiss-e-daastaa.N).

    उत्तर

  2. रविंद्र
    डिसेंबर 01, 2010 @ 04:41:49

    अहो काय प्रतिक्रिया द्यावी तेच सुचत नाही. हल्ली हे असेच आहे घरोघरी. सर्व टी.व्ही.चा माध्यमांचा परिणाम और क्या.

    उत्तर

  3. प्रमोद देव
    डिसेंबर 02, 2010 @ 08:26:04

    आहे खरा हा प्रश्न गंभीर…पण जग जसजसे जवळ येते आहे त्याप्रमाणात हे प्रश्न आपल्याकडेही असेच वाढत जाणार…काही नाही..आता आपल्यालाच थोडं खुलं व्हायला हवंय मुलांशी बोलताना.

    अनुजा, पोंगड असा शब्द नाहीये…मूळ शब्द आहे… पौगंड…आणि त्यापासून पौगंडावस्था…..तो जिथे जिथे आहे तिथे योग्य तो बदल कर.

    उत्तर

    • Anukshre
      डिसेंबर 02, 2010 @ 13:26:08

      काका.
      प्रथम आपली प्रतिक्रिया मिळाली म्हणून खूप खूप धन्यवाद!! आपण ब्लॉग एकदाचा वाचलात म्हुणुन खूप छान वाटले, अजूनही मला बराहा जमत नाही आणि गुगल ला हा शब्द येत नाही त्यामुळे खरच मी हा बदल आपला शब्द पेस्ट नक्कीच करते. मलाही खटकत होतेच पण बराहा ची सवय व्हायला वेळ लागेल. पण बराहाचा प्रयत्न सोडणार नाही. हो, खरच आपण मुलांबरोबर मोकळे व्हायला हवे. सगळीकडे हेच चालते पण त्यात आपली मुले बहकणार नाहीत, म्हणून जेव्हढे जमेल तसे करावे असेच वाटते.

      @बदल केला…..

      उत्तर

  4. Anonymous
    डिसेंबर 03, 2010 @ 10:22:30

    खूप खुसखुशीत पोस्ट आहे. वाचायला एकदम मजेशीर.

    उत्तर

  5. आल्हाद alias Alhad
    डिसेंबर 06, 2010 @ 08:08:06

    ” टीचर पर्स मध्ये आमचे पेपर ठेवायला विसरली, खूप वेळ शोधत होती, आणि म्हणाली—-मी रात्री प्रीकोशन घायला हवी होती. ”
    great! ROFL!!

    उत्तर

  6. shrikrishnasamant
    मार्च 09, 2011 @ 08:52:40

    नमस्कार,
    आपला ब्लॉग मला आवडला.तसंच आपला ढगावरचा पोस्टपण खूपच आवडला.खूप माहिती मिळाली.
    श्रीकृष्ण सामंत.

    उत्तर

Leave a reply to Anonymous उत्तर रद्द करा.