आपले संपूर्ण घर पूर्णपणे एका जागेवरून दुसरीकडे हलवता येते. अर्थात हे घर म्हणजे पोर्टा केबिन ची घरे. भारतात टेलिफोन चा बूथ नेहमी बघण्यात येतात, ऑफिस मध्ये पण पोर्टा केबिन दिसून येतात. परंतु अशी घरे असतात हे ऐकून माहिती होते. प्रत्यक्षात कधी जवळून बघणे किंवा त्यात राहणे असा योग जुळून आलेला नव्हता.
मस्कत मध्ये आल्यावर ट्रक वरून जाणारे हे घरासारखे काय आहे? ह्याची उत्सुकता वाढली. धनंजय नोकरीकरता काही काळ साईट वर होते तेंव्हा अशाच केबिन मध्ये राहत होते. ज्या ठिकाणी ते राहत होते त्या ठिकाणी जाण्याचा योग आला तर हजारो व्यक्ती बरेच महिने वास्तव्य करून राहत होत्या ह्याचा मागसुम नव्हता. कारण आख्खे शहर दुसऱ्या ठिकाणी हलवले गेले होते. जमीन पुन्हा पहिल्या सारखी होती कुठलीही हानी न पोहचता. अशा वसाहती म्हणजे एक परिपूर्ण शहर होते. सुख सुविधा ज्याच्या त्याच्या कामाच्या ग्रेड प्रमाणे त्यांच्या घरात उपलब्ध होत्या. अशी घरे पाहण्याची संधी इथे सहज मिळते.
कालच बातमी पहिली कि. पुण्यात अशा घराचे प्रदर्शन सुरु आहे. तेंव्हा पहिले तर हि तर पोर्टा केबिन ची घरे पण दोन कोन्क्रीट च्या स्ल्याब मध्ये इन्शुलीन म्हणून हार्ड असे थर्माकोल ठेवून ते पूर्णपणे संरक्षित केले होते. अशी घरे वादळात पडत नाहीत कि पुरात डूबत नाहीत.
इथे असेच काहीसे तंत्राद्यान वापरून आग, पाणी,प्रखर उन ह्या पासून पूर्णपणे असे संरक्षित अशी घरे नव्हे तर आख्खे एक शहर उभे असते. मस्कत मध्ये अशा प्रकारच्या वसाहती ज्या ठिकाणी काम सुरु असेल तिथे असतात. दुकाने, दवाखाने, क्लब हाउस, अगदी बाग सुद्धा इथे उभारली जाते. जवळ जाई पर्यंत खरेच वाटत नाही हि घरे कधीही हलवली जाऊ शकतात. सुरेख अशी बांधणी, आकर्षक अशी रंगसंगती आणि अशा घरात आपण दिनदर्शिका सुद्धा भिंतीवर खिळे ठोकून अडकवू शकतो. छोट्या छोट्या सोयीनी ह्या घराला त्याच्या भिंतीना हानी पोहचवू शकत नाही. अगदी छान अशा कोन्क्रीट च्या रस्त्यासकट.. सर्व सोई असतात.
जेंव्हा तिथला प्रोजेक्ट संपतो तेंव्हा हे शहर उचलून दुसरीकडे नेतात. जागा मोकळी होते. कुठलेही नुकसान नाही, खर्च नाही आणि किती आरामदायी घरे असतात. ह्या घरांचा खर्च हि आपल्या साध्या घर पेक्षा निश्चित कमी असतो. कायम स्वरूपी सुद्धा राहण्यासाठी अशी घरे परदेशात नव्हे तर भारतात सुद्धा उपलब्ध आहे. पिढ्यान पिढ्या टिकणारे हे घर असते.
सध्या फार्म हाउस बरीच दिसतात. कधीतरी विकांताला राहणे होते. प्रचंड खर्च करावा लागतो, त्यापेक्षा अशी टुमदार घरे आणली तर जागेवर कुठल्याही ठिकाणी हे घर सहज हलवता येते. जमिनीवर पण कायम स्वरूपी बंदिस्त करता येते. जमिपासून उंच अशा जागी पण ठेवता येते. पर्याय आहेत पर्यावरणाचे, पण अमलात आणण्यास हवेत. बिल्डर लोकांनी ह्या घरांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. अगदी आशियाई वातावरणाला सुद्धा पूरक अशी घरे आहेत.
हि घरे प्लास्टिक चा अनुभव देत नाहीत. अत्तिशय सुंदर रंगात, उत्कृष्ट अशा फरशीच्या रंगसंगतीत हि घरे म्हणजे कोकण च्या कौलारू घरा इतकी छान वाटतात. दरवर्षीचा विकांताच्या घराचा देखभालीचा खर्च खूप प्रमाणात कमी होऊ शकतो. शिवाय हे घर पाहिजे तिथे सहज सोप्प्या पद्धतीने हलवू शकतो. आशियाई वातावरणाच्या बदलांपुढे हि पोर्टा केबिन ची घरे किती टिकाव धरू शकतील हि शंका प्रदर्शनात व्यक्त केली गेली. परंतु पर्यावरणाचा विचार केला तर असे प्रयोग निश्चितच उपयोगी पडतील. अजूनही भारतात अशी घरे सहज दिसत नाहीत. बरेच जण एखादे तरी शेतातले घर असावे ह्या साठी प्रयत्नशील असतो, बरेचसे बिल्डर अशी घरे उपलब्ध करून देत असतात. पुण्यात ह्या प्रदर्शनाला प्रतिसाद तरी भरघोस मिळाला पण एखाद्या बिल्डर ने जरी अशी संकल्पना प्रत्यक्षात आणली तर पर्यावरणाचा ह्रास कमी होईल असे स्वप्न बघायला हरकत नाही.
अशा घरांना वाळवी ते अन्य प्रकारच्या हानिकारक कीटकापासून सहज वाचवता येते. कौलारू छत पण देखभालीच्या प्रचंड काळजी ची काळजी न करता बसवता येते. टुमदार घर हे स्वप्न खूप कमी खर्चात आणि पिढ्यानपिढ्या जपून ठेवणे शक्य आहे हवाय फक्त असा बदल स्वीकारण्यासाठी मानसिकता आणि अशा घरांची सहज उपलब्धता. परिपूर्ण माहिती देणारी अशी उत्पादने आपला आणि धरतीचा ताण कमी करू शकतात.
मी जर कधी फार्म घेतले तर, सहज, सोपे, भक्कम, पूर्ण संरक्षित असेच पोर्टा केबिनचे टुमदार घर ठेवणार…. असा विचार करण्यासाठी अशा घराची हि छोटीशी पोस्ट
नोव्हेंबर 20, 2010 @ 13:37:11
वा! छान आहे की कल्पना. आपल्या भारतात तर राबवायलाच हवी. पर्यावरणाचं रक्षण शिवाय पैशाची बचत.
नोव्हेंबर 20, 2010 @ 14:36:10
भारतात पावसासाठी घराच्या बांधणीत काहीसे बदल करावे लागतील, इकडे खुपसे प्लायवूड वापरतात. पुण्याच्या प्रदर्शनात मात्र असे बदल केलेले आढळले. कधी अशी घरे सहज उपलब्ध होतील कोण जाणे. असो तोपर्यंत शेत तरी हुडकायला पाहिजे……. कांचन बऱ्याच दिवसांनी आपली भेट होतीय. तुझे म्हणणे अगदी पटले.
नोव्हेंबर 20, 2010 @ 17:29:21
पोर्टा केबिनचे टुमदार घर खरच मस्त आहे कल्पना 🙂
नोव्हेंबर 20, 2010 @ 17:44:08
प्रसाद,
आपले स्वागत ह्या घराच्या निमित्ताने आपण दिलेल्या अभिप्राय करता धन्यवाद!!! मुलांचे कसे डॉल हाऊस असते तसेच खरे खरे आपलेपण….म्हणून मला हि घरे पाहिल्यानंतर आवडली.
नोव्हेंबर 21, 2010 @ 00:17:45
अशा प्रकारची ऑफिसेस काही कोरियन कन्स्ट्रक्शन कंपन्या वापरतात. पण ही घरांची आयडिया तर बेस्टच आहे…
नोव्हेंबर 21, 2010 @ 07:34:06
धन्यवाद विद्याधर…. मलापण ऑफिसेस असतात इथपर्यंत माहित होते परंतु इथे आल्यावर अशी घरे पहिली आणि पुण्यात पण ह्या घरांचे प्रदर्शन होते……म्हणून पोस्ट टाकली. प्रत्यक्षात अशी घरे लवकर यायला हवी.
नोव्हेंबर 23, 2010 @ 22:21:27
आपण खूप छान माहिती दिली आहे. अशीच घरे तयार करणे आता ग्लोबल वार्मिंग च्या जमान्यात आवश्यक आहे. धन्यवाद!
नोव्हेंबर 27, 2010 @ 08:36:29
रविन्द्रजी,
उत्तर देण्यास विलंब झाला दिलगिरी व्यक्त करते. ऑफिस च्या कामात पूर्ण दिवस व्यस्त असते आणि घराचे नेट मध्यंतरी स्लो झाले होते. आपण म्हणता ते अगदी पटले. पर्यावरण साठी अशी घरे बांधकाम व्यवसायात आणायला हवीत…येतील हि म्हणा हळू हळू वाट पहावी लागेल कारण सहसा नवीन काही स्वीकारण्यासाठी वेळ लागतोच. आपण आवर्जून भेट दिलीत खूप खूप आवडले. धन्यवाद!!
नोव्हेंबर 25, 2010 @ 20:41:57
कल्पना झक्कास ! मला का नाही सांगीतलेस मी ही आलो असतो प्रदर्शन बघायला. परत होईल तेव्हा लक्ष ठेवतो व सांग मला ! मात्र घरफोडी ह्याबाबत अश्या घरांना कितपत सुरक्षा?
नोव्हेंबर 27, 2010 @ 08:27:04
काका,
मी सहज जात होते तेंव्हा पहिले, पुढच्या सुट्टीत आपण दोघेही जात जाऊ… घरफोडी बद्धल म्हणत असाल तर माझ्या लक्षात आले नाही आयोजकांना असे विचारावे परंतु दोन हार्ड अशा शीट मध्ये कोन्क्रीट च्या स्ल्याब मी पुण्यात पहिल्या कदाचित सुरक्षा व्यवस्था लक्षात घेऊन आणि हवामान लक्षात घेऊन असे बदल केले असावेत. पुण्याच्या मराठी उद्योजकाने हि टेक्नोलोजी प्रथम विकसित केलेली आहे, स्टार माझा च्या बातमीत पण ह्याचा उल्लेख होता…इथे मात्र हार्ड बोर्ड किंव्हा प्लायवूड चे माध्यम अधिक वापरतात .
नोव्हेंबर 26, 2010 @ 23:57:44
खरच छान कल्पना आहे हि घराची…आपल्या इथेही सुरु व्हायला हवी ही लवकर…
नोव्हेंबर 27, 2010 @ 08:14:11
देवेंद्र,
मी पण अशा घरांची आतुरतेने वाट बघतीय. प्रत्यक्षात कधी येतील तेंव्हा भारतीय हवामान नुसार काही बदल करावे लागतील असे वाटते.
नोव्हेंबर 28, 2010 @ 10:12:06
कल्पना चांगली आहे.
पण आपल्या इकडच्या ऊन आणि पावसाला ही घरे पूर्णपणे तोंड देऊ शकतील का ही शंका वाटते.
नोव्हेंबर 28, 2010 @ 10:36:48
देवदत्त,
मी पण अशा घरांची आतुरतेने वाट बघतीय. प्रत्यक्षात कधी येतील तेंव्हा भारतीय हवामान नुसार काही बदल करावे लागतील असे वाटते.