नवाबी चित्रपटात, मुघल गोष्टीत नेहमी हुक्का किंवा शिशा डोकावायचा. तंबाखू च्या व्यसनाचा हा पण एक घातक प्रकार आहे. मस्कत मध्ये आल्यावर शिशा दिसू लागला. जगात सिगारेट सगळीकडे मुबलक आहे. इथे सिगारेट चे प्रमाण भर रस्त्यावर त्या प्रमाणात कमी आहे. कदाचित काही नियम असतील बहुतेक… किंवा मॉल मध्ये तर जाहीर धुम्रपान करण्याची सवय मी पहिली नाही. नक्कीच कायदा असणार.
ओमान मध्ये किंवा हल्ली बऱ्याच आखाती देशात सरकारने हुक्का संदर्भात कायदे केले आहेत. लोकांमध्ये व्यसनाची भयानकता जाणवून देण्याचे काम सरकार आणि अनेक अन्जिओ संस्था करत आहेत. ह्या घातक हुक्का किंवा शिशा ओढण्याकडे बंधने घातली जात आहेत.
वाळवंटातील रात्र अनुभवणे हि इथली परंपरा आहे. तंबू, बार्बेक्यू , कॉफी, नृत्य, संगीत अशा वातावरणात इथल्या सुट्टीच्या रात्री चा आनंद त्यात असणारा हा शिशा…. साध्या हॉटेल पासून ते पंचतारंकित पर्यंत, वाळवंटापासून ते समुद्र किनाऱ्यावर कुठेही विशेषतः रात्री हा शिशा घेऊन बसलेले काही ओमानी, लेबनीज , इस्रायली , युरोपिअन अशी लोक प्रामुख्याने दिसतात. ओमान मध्ये ओमानी स्त्रिया धुम्रपान किंवा शिशा ओढताना बाहेर दिसत नाहीत. इतर देशीय स्त्रिया दिसून येतात.
शिशा ओढणे हि परंपरा पूर्ण बंद करणे शक्य नाही परंतु जागरूकता आणण्याचे काम सरकार करत असते. शिशा च्या तळातील भागात पाणी घातले जाते, त्यावर भांडे ठेवून त्यात तंबाखू ठेवला जातो आणि वरती जळणारा कोळसा असतो. तंबाखू एकदम जळून खाक न होता धुराच्या रुपात नळीतून ओढला जातो. हा धूर सुद्धा आरोग्य नष्ट करतो.
भारतात पण जिथे मुघल जीवन शैलीचा अंमल अजूनही आहे त्या ठिकाणी कदाचित असेलही पण माझा अशा राज्यांशी फारसा संबंध आलेला नाही. चित्रपटात पाहिलेला, गोष्टीत वाचलेला हा शिशा नजरेस पडला. एक घातक पण फार पूर्वीची परंपरा म्हणून लिहिले.
जरूर लक्षात ठेवा——- तंबाखू हा आरोग्यास घातक आहे.
सप्टेंबर 21, 2010 @ 21:11:24
आयुष्यात अजुन तरी कधीच धुम्रपान केलेल नाही पण तो पहिला फ़ोटो आवडला…माहिती छानच…आपल्या इथेही नेहमीच तो वैधानिक इशारा दिलेला असतानाही लोक कसे काय हयाला ऍडिक्ट होतात कोण जाणे…..
सप्टेंबर 22, 2010 @ 07:55:41
देवेंद्र,
स्वतःचे स्वतःच्या मनावर नियंत्रण असले म्हणजे घातक सवयी जडत नाहीत. मरमरून पैसे कमवायचे त्याच पैशाचा धूर काढायचा आणि त्या धुरात आयुष्य कमी करून घ्यायचे……पण???.
सप्टेंबर 22, 2010 @ 11:29:48
बरोबर आहे. इकडे सिगारेट आणि तिकडे हुक्का. इकडेही जनजागृती आणि कायदा करून फरक पडत नाही. आणि तिकडेही तसेच.. माझे काही मित्र सिगारेटचे व्यसनी आहेत. पण त्यांना कळत नाही अस नाही अस नाही. पण हौस.
सप्टेंबर 22, 2010 @ 13:17:30
ह्नं, हेमंत आहे अस ………साऱ्या जगात काहीना काही स्वरुपात आरोग्याची घातक व्यसने आहेतच.. मला गुडगुडी किंवा छर्रा अस काहीशी नावे आठवतात, म्हणजेच बहुतेक हुक्काच असावा असे वाटते……. नावे वेगवेगळी पण प्रकार एकच……
सप्टेंबर 22, 2010 @ 15:39:58
धूम्रपान..
उच्चाटन अशक्य आहे ह्याचं! लोक समजून सवरून करतात ना!
सप्टेंबर 22, 2010 @ 15:54:40
उच्चाटन अशक्यच आहे……इकडे हुक्का दिसू लागला आणि एक मुघल परंपरा आठवली म्हणून पोस्ट लिहिली. मुंबईत अस काही सहज दिसत नाही.
सप्टेंबर 23, 2010 @ 10:52:27
कैरोमध्ये असताना मी शीशा ट्राय केला होता. . . पण तो तंबाखु विरहीत होता….आपल्याकडे नाश्त्याला जस उपीट,पोहे तस त्यांच्या कडे शीशा असतो…मी तिकडुन शो पीस साठी हुक्का आणला आहे….मी पण आता पोस्टवतो त्यावर.. 🙂
सप्टेंबर 23, 2010 @ 11:08:10
योगेश,
इथे पण तंबाखू विरहीत मिळतो. कलिंगडाचा जो फोटो आहे तो तंबाखू विरहित चा आहे. इथे आल्यावर शिशा छान आकर्षक अशा रुपात दिसू लागला म्हणून पटकन फोटो घेतले आणि पोस्ट लिहिली.
इथे पण कैरो सारखीच परंपरा आहे. तू पण लिही जरूर वाचेन.