डॉ. मंजिरी नानिवडेकर. माझी सख्खी नणंद. माझे लग्न झाले तेंव्हा काहीशी अबोल मला वाटत होती कदाचित मी जास्तच बडबडी असल्याने असेल हि…. पण हळू हळू सहवास वाढत गेला. अबोल वाटणारी मंजिरी प्रसन्न हसली कि तिच्या हसण्यानेच बोलण्याचे काम कमी केले असायचे. अभ्यासू असणारी मंजिरी कुठल्याही विषयवार अत्यंत समग्र पणे मत प्रदर्शित करत असे.
१६ ऑगस्ट ला भारतातून रात्री १२ वाजता दिराचा फोन आला. फोन घेण्याची हिम्मत होत नव्हती. माझी सख्खी नणंद व माझी सर्वात जवळची मैत्रीण म्हणजे कराड च्या डॉ. मंजिरी नानिवडेकर हिचा संध्याकाळी पाठीमागून स्कोर्पिओ ने धडक मारल्यामुळे मृत्यू झाला आहे. तिच्या बरोबर असणाऱ्या दोन डॉ. मैत्रिणी पैकी एकीचा डॉ. शामल जोग ह्यांच्यावरहि काळाने घाला केला.
१७ वर्षाचा मुलगा वडिलान बरोबर बसून गाडी शिकत होता. हलगर्जी पणा, बेजवाबदार वृत्ती आणि नियमांचे उल्लघन ह्या मुळे आज आमच्या कुटुंबावर तर अवकळा आली पण कराड शहराला हि दोन डॉ चा मृत्यू हि लाजिरवाणी बाब आहे. कृष्णा मेडिकल कॉलेज चे अपरिमित नुकसान ह्यांच्या मृत्यू मुळे झाले आहे.
माझी नणंद डॉ. मंजिरी नानिवडेकर हिचे अनेक थिसीस आज नेट वर उपलब्ध आहेत. दहावी पासून ते मेडिकल पर्यंत सर्व शिक्षण गोल्ड मेडल घेऊन पूर्ण केले होते.
http://www.ojhas.org/issue31/2009-3-14.htm हि एक लिंक मी देत आहे.
आपल्यापैकी जे कोणी डॉ. होत असतील त्यांना तिचे लिखाण नक्की उपयोगी पडेल म्हणून हा बझ्झ तिच्या साठी केवळ तिच्या रक्षाबंधनाच्या ओवाळणी साठी…….
आजचा माझा बझ्झ वरचा ‘बझ्झ परिवार’ बरोबर झालेला संवाद मी येथे पोस्ट मध्येच देत आहे. सर्वांच्या सदभावना ह्या मनास उभारी देणाऱ्या आहेत.
धन्यवाद!!!!
सुहास झेले – ओह्ह्ह खूप वाईट झाल
झम्प्या झपाटलेला – खरंच खूप लाजिरवाणी गोष्ट आहे.. गाडी शिकण्यासाठी ह्या माजखोराना मुख्य रस्तेच मिळतात का? आणि हे आर टी ओ वाले १७ वर्षांचा मुलगा गाडी चालवत असतो तेंव्हा काय झोपा काढतात काय… हलगर्जीपणामुळे आपल्या समाजाचे, देशाचे किती नुकसान आपणच करत असतो… आणि फक्त १५ ऑगस्टला म्हणतो” मेरा भारत महान”
आ का – देव त्यांचा आत्म्यास शांती देवो..
@सुहास खरोखर भयंकर मानसिक धक्का आम्हाला आहे.
@झम्प्या झपाटलेला…..आपण म्हणता तशीच प्रतिक्रिया आमची पण झाली. आज आख्खे कराड तीव्र प्रतिक्रया देत आहे. असल्या माजोरड्यांना शिक्षा व्हायलाच हवी.
@ आका…..काय लिहू रे!!!! ८५ वर्षाचे सासू सासरे अखंड अश्रू ढाळत स्वतःचा मृत्यू मागत आहेत… सगळे भारतात सोडून आले आणि धाव घेतली बझ्झ वर आपल्यांसाठी…. –
Vidyadhar Bhise – ताई… खूपच दुःखद घटना आहे गं! आम्ही तुझ्या दुःखात सहभागी आहोत!
विद्या…… संध्याकाळी रोजचे चालण्यासाठी अगदी जवळच्या आणि आतील रस्त्यावर नेहमी ह्या तिन्ही मैत्रिणी जायच्या……..अशाच निघाल्या आणि दोघी घरी परत आल्याच नाहीत..एक मात्र बचावली ती पण मानसिक धक्क्यातून सावरली नाही. पोलीस खटल्यातून त्यांना कधी शिक्षा मिळणार???? रस्त्याच्या कडेने गटाराच्या बाजूने चालत होत्या मागून गाडी आली ब्रेक च्या ऐवजी ऐक्सिलेटर केला आणि दोघेही पळून गेले. गाडी पलटी होऊन गटारात पडली. बाहेरून काहीही जखम नव्हती. बरगड्या तुटून शरीराच्या आतील बाजूस घुसल्या त्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव होऊन……
आनंद पत्रे – ताई… आम्ही तुझ्या दुःखात सहभागी आहोत!
सा बा – आम्ही तुझ्या दुःखात सहभागी आहोत!
Kanchan Karai – ताई, आम्ही तुझ्या दु:खात सहभागी आहोत
महेंद्र कुलकर्णी – वाईट झालं. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
हो रे आनंदा, आज तुमच्या साठीच बझ्झ वर आले. धनंजय ला धीर देताना मी मात्र एकटी पडते म्हणून बझ्झ वर सगळ्यांना भेटण्यासाठी आले… कोणी कोणाची कशी समजूत काढायची??? तिची मुलगी अदिती अमेरिकेत एम डी करत आहे. आज मला मामी ची भूमिका पार पडताना तारांबळ उडते…. नणंदेचे मिस्टर डॉ. रवींद्र पण सर्जन असल्याने लेक व वडील खूपच समजूतदार आहेत. हि घटना कोणाच्या तरी गाडी वर हात साफ करण्याच्या हट्टापाई……..आम्ही सर्व भोगतो आहोत.
सारिका खोत – खुप वाईट झालं.
महेंद्रजी, तुमची मच्छर दाणीतील कुजबुज तिला फार आवडलेली पोस्ट होती. आताच्या सुट्टीत पण तिने भेटल्यावर मला सर्व ब्लॉग परिवार बद्धल आवर्जून विचारले होते. ती आपल्या सर्व ब्लॉग्स ची नियमित वाचक होती. तिच्या प्रतिक्रिया कधीही मला हि नव्हत्या मी विचारले तर म्हणाली होती…… ब्लॉग मित्र मैत्रिणी इतके छान लिहितात कि मी एकेक पोस्ट सर्वांच्या वाचत असते.
योगेश मुंढे – अनुजा ताइ…खुप वाईट झालं…देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो….आपल्या सर्वांच्या दुःखात आम्ही सामील आहोत….परमेश्वर आपणास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना.
Akhil Joshi – ध्यानीमनी असा काही नसताना असा आघात पचवण किती कठीण असत नाही? तुमचे दु:ख तर फारच आकस्मिक आहे… त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना…
सारिका, कांचन, साबा, योगेश….
आपल्या सर्वांच्या भावना ह्या आम्हाला निश्चितच खूप आधाराच्या आहेत. आपण सर्वाना भेटण्यासाठीच आज आले. आनंदात तर आपण एकत्र आहोतच पण एकमेकांचे दुखः सुद्धा वाटून घेतो. हीच भावना आपल्याला एकमेका करता ओढीने सतत एकत्र ठेवते.
श्रेया रत्नपारखी – हे फारच भंयकर आहे. काय लिहावे कळत नाही. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला यातून लवकरात लवकर सावरण्याची शक्ती मिळावी ही सदिच्छा.
श्रेया,अखिल,
वाहतुकीच्या गलथान कारभार मुळे, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे, नियमांचे सहज उल्लघन ह्या मुळे जीवित हानी होऊन व्यक्ती, कुटुंब व समाज ह्यांचे अपरिमित नुकसान होते. पुणे, कोल्हापूर. कराड च्या सर्व मुख्य वर्तमान पत्रात हि बातमी आलेली होती. आजची माझी पन्नासावी पोस्ट हि असणार…. असे वाटले पण नव्हते. बझ्झ वर तर आहेच पण पोस्ट पण टाकते कारण तिच्या अनेक थिसीस चा उपयोग अभ्यासाकरता कोणाला तरी झाला तर खरी ओवाळणी झाली.
आजचा बझ्झ म्हणजे पोस्ट म्हणून टाकणार आहे. पुन्हा हे सर्व टाईप करणे शक्य नाही. तिच्या थिसीस ची लिंक अभ्यासूना, विद्यार्थ्यांना…..जरूर पाठवा. हीच आपल्या सर्वांकडून डॉ न सदभावना ठरेल. मंजीरीचे थिसीस परिपूर्ण ज्ञान आहे जे कधीच व्यर्थ जाणार नाही…
माझी पन्नासावी पोस्ट तिच्या साठीच……
ऑगस्ट 23, 2010 @ 16:43:34
बाप रे… भयानक आहे हे खूप. आम्ही तुमच्या दुखा:त सहभागी आहोत.
ऑगस्ट 24, 2010 @ 08:08:44
मैथिली,
खूपच भयानक आहे. सहज फिरायला जाणे काय आणि…… अतिशय गलथान कारभार वाहतुकीचा आणि रस्त्यांच्या अवस्थांचा झाला आहे. रस्ता इतका अपुरा आहे कि साधे चालणे हि मुश्कील होते आणि अशात गाडी शिकाऊ माणसाने चालवली तर…… असेच निपराध बळी होतात.
ऑगस्ट 23, 2010 @ 19:40:47
http://www.dainikaikya.com/DainikAikya/20100818/5303554642866865982.htm
आणि
http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=KolhapurEdition-8-1-17-08-2010-e480c&ndate=2010-08-18&editionname=satara
ऑगस्ट 24, 2010 @ 08:04:58
महेंद्र्जी,
आंम्हाला ह्या बातम्या बघणे हि सुचत नव्हते खरच खूप आभारी आहोत. तिचे नाव असलेले प्रत्येक कात्रण आम्ही जपून ठेवतो. आतापर्यंत तिचे शोध निबंध, केस स्टडी ह्याची कात्रण सांभाळली आहेत. आपण लिंक पाठवून खूपच आधार दिलात. आपण पाठवलेली प्रत्येक लिंक जपून ठेवू. खूप खूप धन्यवाद!!!! आपण आवर्जून मंजिरीच्या बातम्यांचा पाठपुरावा करून आम्हाला त्यांची लिंक पाठवलीत धनंजयला खूप गहिवरून आले. असाच आपला आधार आहे म्हणून ह्या अस्मानी संकटा मध्ये धीर धरून आहोत.
ऑगस्ट 23, 2010 @ 19:43:18
http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/6328057.cms
आणि
http://72.78.249.107/esakal/SearchNews.aspx?tag=doctor
ऑगस्ट 23, 2010 @ 21:03:00
khup dukh zal wachun…….aamhi thumchya dukhat sahbhagi aahot……..
ऑगस्ट 24, 2010 @ 08:10:32
सुषमा,
आपण धीर देत आहात म्हणून सहन करणे जरा तरी शक्य होते. पण अशा बेमुर्द चालकांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी.
ऑगस्ट 23, 2010 @ 21:21:22
Anuja tai,
kalach mi Mubait alo. Sakali tu aaleli asashil mhanun tujhya mobile var tu kadachit asashil mhanun phone kela to swiched off ch hota. Nantar Pramodajina phone kela tevha kalale. jhale he pharach vait jhale. Dhanajayravanchi kashi samajut kadhu kalat nahi. Aikun kshanbhar bhambavun gelo hoto.
ऑगस्ट 24, 2010 @ 08:14:05
काका,
चालणे पण कठीण होऊन बसले आहे. काळजी घ्या. कोण कोणाची व कशी समजूत काढणार हेच कळत नाही. आज रक्षाबंधन धनंजय ला सावरणे खूप कठीण झाले आहे. माझी आई जाऊन हि ६ महिने पण झाले नाहीत तोच काळाचा आघात झाला.
ऑगस्ट 23, 2010 @ 23:43:16
मला आता कळल ग …खुप वाईट वाटल.
हया एकाच वर्षात तुला दुसर्यांदा असा धक्का बसला आहे.. 😦
काळजी घे…
ऑगस्ट 24, 2010 @ 07:54:23
देवेंद्र,
खरय, सावरण खूप कठीण जातंय. आई जाऊन ६ महिने पण झाले नाहीत तोच हा अपघात……
ऑगस्ट 25, 2010 @ 08:46:44
khup wait zala, aamhi tumchya dukhhat sahabhagi aahot
ऑगस्ट 25, 2010 @ 12:20:40
नमस्कार,काजल,
आपण सर्व जण आमच्या ह्या जीवघेण्या अनुभवात सहभागी आहात हाच आधार खूप धीर देतो.
डिसेंबर 27, 2010 @ 16:51:12
baryach divsani mi aali tumchya blogver aani hi vait batmi kalli 😦