नाच रे मोरा……..मस्कत च्या पावसाळी वनात.

पावसाळी दिवस जवळ आले कि, आषाढी मेघ व मोरांचे नृत्य जसे ह्या गाण्यातून मनात रुंजी घालू लागते तसे मन हि मोररंगी होऊन प्रफुल्लीत होते. भारतात हे सहज शक्य आहे कारण पाऊस व भारतीय मनाचे दृढ असे नाते आहे. मस्कत मध्ये सुद्धा हा अनुभव घेता येतो. पाऊस नाही, वाळवंटी देश सर्वसाधारण तापमान हे ४५ ते ५५ पर्यंत असतेच मग हे कसे शक्य आहे? जिथे प्रतिकूल परिस्थिती असते तिथे मानवी श्रम, बुद्धी, आणि उपलब्ध पैसा असेल तर शक्य करता येते. पावसाळी वनाचे म्हणजे ज्याला रेन फोरेस्ट असे म्हंटले जाते ते वन इथे आहे.

आपण नेहमी हॉटेल मध्ये जातो एखादा धबधबा, बागेत फिरणारी बदके, छोट्याशा तळ्यात उमलेली कमळे हे सर्व साधारण रिसोर्ट चे रूप असते. जेवण्यास, गप्पा करण्यास निसर्गाच्या सानिध्यात असणे आता अप्रूप राहिले नाही. मस्कत मध्ये बरका म्हणून एक भाग आहे अत्यंत रुक्ष आहे असे म्हणणे आता योग्य होत नाही कारण इथे अल नाधा रिसोर्ट च्या मागे हे पावसाळी वन उभारलेले आहे हे वन आच्छादित आहे. इथले ‘श्री ददवाल’ आडनावाचे गृहस्थ हे भारतात्तून वीस वर्षापूर्वी सुगंधी वनस्पती संशोधनासाठी आले होते. त्यांची हुशारीव चिकाटी, संशोधन वृत्ती ह्यामुळे आज हे वन निर्माण झाले आहे. दोन ते चार व्यक्ती हाताशी घेऊन सुरवातीला काकडी, लिंबू, काही फळभाज्या असे उत्पादन केवळ छोट्याशा ग्रीन हाउस मध्ये घेतले.

अथक परिश्रम करून आज विस्तृत असे रेन फोरेस्ट झाले आहे. घनदाट जंगल, पावसाळी वातावरण, जंगलातून जाणाऱ्या छोट्या पायवाटा मध्ये मध्ये अंगावर उडणारे पावसाचे तुषार हे खरोखरी जंगलाचा आनंद मिळवून देतात. बाहेर तापमान ४५ असताना आत मध्ये जंगलात केवळ २५ डिग्री सेल्सिअस तापमान असते. संगणकावर एक रेन फोरेस्ट चा स्क्रीन आहे अगदी तसाच फील येतो.

पावसाचे तुषार व पावसाळी कुंद, थंड अशी वेगळीच हवा मनावरचे सगळे ताण चटकन नष्ट करते. नुसते जंगल नाही तर तुम्ही प्रवेश केल्यावर प्रथम एक नाद ऐकू येतो जंगलातील पक्षांचे किलबीलणे, हळूहळू येणारा असा ढगांचा आवाज व नंतर पानांवरून ओघळणारे व अंगावर उडणारे पावसाचे तुषार सर्व अकृत्रिम आहे ह्या वर विश्वास बसत नाही. खंडाळ्याच्या घाटाचा, केरळच्या जंगलाचा असा प्रत्येकाला जसा परिचित तसा भास नव्हे तर खरच अनुभव येतो.

आज दद्वालजीना रेनमॅन म्हणून ओळखले जाते. सदाहरित घनदाट जंगल तर आहेच पण इथे जगातल्या सर्व प्रकारच्या आंब्याची झाडे आहेत. काही जातींना वर्षभर आंबा मिळतो. २००० आंब्याची झाडे आहेत. एका जातीला दीड ते दोन किलोचा एकेक आंबा लागतो. ५०० ते १००० किलो आंबा दरोरोज इथल्या बाजारात विकण्यास पाठवतात. ७५ एकरवर लिंबू व सफरचंदाची झाडे आहेत. प्रत्येक फळझाड इथे विस्तृत प्रमाणात आहेत. श्री दद्वालजी व स्टीफन यांनी ग्रीन हाउस मध्ये विविध ओर्चीड पण यशस्वीरीत्या वाढवली आहेत त्यात कीटक खाणारे पिचर ओर्चीड पण आहे.

आंब्याच्या वनात नाचणारे सुमारे ६० मोर आहेत. विस्तृत असे तळे त्या मध्ये विहार करत असलेली बदके. असंख्य जातीचे पक्षी इथल्या पावसाळी वनात सुखाने मनसोक्त घरटी करून आहेत. केळ्याचे अफाट असे उत्पादन आहे. एव्हढेच काय पण द्राक्ष मळे, उसाची शेती पण इथे आहे. ३५० एकर जमिनीने त्यांना साथ दिली व भरघोस उत्पादन देऊ लागली. पावसाळी वन हे इनडोअर आहे पण बाकीची शेती हि केवळ मोकळ्या जमिनीवर हिरवे हिरवे गडद गालीच्या चे नेत्रसुख देऊन तप्त अशा ओमानी वातावरणात शांतता निश्चित देते.

अत्यंत आकर्षक अशी फुलझाडे, ग्रीन हाउस मध्ये फुलझाडांवर उडणारी फुलपाखरे, ससे, हरीण, कुत्रे, अनेक जातीचे पक्षी असा छान झु येथे आहे. अजूनही फक्त ३० टक्के काम झाले आहे ७० टक्के बाकी आहे अशी नम्र भावना श्री. दाद्वाल्जींची आहे. ह्या सर्वाचे श्रेय ते इथल्या निसर्गाला, परिश्रम करणाऱ्या फार मोठ्या अशा कर्मचारी वर्गाला देतात. पाण्याचे योग्य नियोजन, खताचे प्रमाण योग्य ठेवून नैसर्गिक खत ते वापरतात. त्याकरता जमिनीचा काही भाग खत निर्मितीसाठी ठेवला आहे. इथे पाऊस नसताना उस, कापूस, तांदूळ पासून ते ओर्चीड पर्यंत इथे निर्माण केले आहे. सतत प्रयोगशील वृत्ती व नम्र पणा इथे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. आखाती देशाचे, युरोपिअन, ओमानी लोक पावसाळी वनात नेहमीच येतात.

असा हा रम्य पावसाळी वनाचा अनुभव, आंब्यांचे वन नृत्य करणारे मोर, अनेक पक्षी, विविध फळे, फुलझाडे यांनी आकर्षित केलेला परिसर, तेथील वास्तव्य संपूच नये असे वाटते. ह्या निसर्ग समवेत भारतीय लाझीझ अशा पदार्थापासून ते अनेक देशांचे पदार्थ आपली भूक व रसना तृप्त करतात. अर्थात मुख्य आकर्षण आहे ते इथले रेन फोरेस्ट म्हणजेच पावसाळी सदाहरित जंगल.

भारताची आठवण आली कि सरळ जावे ह्या वनात व मनाच्या मोराचा पिसारा अलगद फुलवून ताण विसरून ओमानी वनात रमावे . प्रसन्न करणारा एखादा दिवस पण सकारातमक ठरतो. वनाचा आनंद व त्यामागचे परिश्रम व हरित पृथ्वीचा दिलेला संदेश मला रिसोर्ट मध्ये भावला व तो आपल्यापर्यंत पोहचवला.

रिसोर्ट मध्ये असणारी ट्री हाउसेस, २१ मीटर लांबीचा सोना टनेल, जोजोबा गार्डन, स्पा, रोझ गार्डन, सोलर, शेती असा विस्तृत आवाका ह्या रिसोर्ट चा आहे. केवळ व्यवसाय म्हणून नव्हे तर प्रतिकूल परिस्थितीत पण निसर्ग निर्माण केला जाऊ शकतो. कल्पकता व हिरवाईची आवड हि मुख्य प्रेरणा आहे. ओमान मध्ये का शक्य नाही म्हणून घेतलेला ध्यास हा बुद्धीजीवी तर आहेच पण निसर्ग निर्माण करून गो ग्रीन करता केलेला यशस्वी असा प्रकल्प ठरतो.

17 प्रतिक्रिया (+add yours?)

 1. सुहास
  मे 17, 2010 @ 11:35:38

  वाह मस्त आहे..एकदम आनंदवन…रेनमॅन (श्री ददवाल) यांच खूप कौतुक वाटत…
  त्याना खूप शुभेच्छा…

  उत्तर

  • anukshre
   मे 17, 2010 @ 11:52:33

   ‘आनंदवन’ इतका सुंदर अभिप्राय तोही पोस्ट वाचून एका मिनिटात खरच आनंद झाला. मस्त आहे रिसोर्ट, प्रतिकूल परिस्थितीत केलेले यशस्वी प्रयत्न! केल्याने होत आहे रे…..हे एकदम पटले. श्री. ददवाल अत्यंत विनम्र आहेत. मुंबईत प्रख्यात प्रयोगशाळेत प्राणी, वनस्पती ह्यांच्या तंतू व जीवनपेशी वर संशोधन करत होते. त्यांना ओमान मध्ये येण्याची संधी मिळाली व त्यांनी संधी दिल्याचा विश्वास सार्थ ठरविला.

   उत्तर

 2. विशाल तेलंग्रे
  मे 17, 2010 @ 11:42:49

  ग्रेट… वाळवंटात वर्षावन फुलवण्याची ही संकल्पना खरेच खुप ग्रेट आहे… माहिती अगदी छान दिलीहेस ताई तू, फोटोज पन मस्तच आहेत…

  उत्तर

  • anukshre
   मे 17, 2010 @ 12:00:03

   वर्षावन हाच योग्य शब्द आहे मी जरा सोपा करून पावसाळी वन असे संबोधले. विशाल, हे वन खरोखर वन वाटते कुठेही अकृत्रिमता वाटत नाही. कुठेही कसलीही जोडणीही दिसत नाही, पाऊस म्हणजे सुखद असे तुषार कुठून येतात समजतही नाही. एकदम नैसर्गिक!!!

   उत्तर

 3. Ashwini
  मे 17, 2010 @ 12:12:20

  kay ga kuthe gayab aahes ajun lekh nahi vachala pan comment dete aahe mail kar

  उत्तर

  • anukshre
   मे 17, 2010 @ 12:23:59

   लेख वाच सावकाश, भेटलीस लगेच हेच आपलेपण अधिक गडद हिरवाईची मैत्री जपते. ह्या mahina akherila bhartata yenar आहे tyamule आता पोस्ट na unhali sutti. lihinyapeksha tumhala sarvana प्रथम bhetnar आहे. madhayntari मी इथल्या marathi mandalachya karyakrmat sahabhagi होते म्हणून पोस्ट la vel देऊ shakale नाही.

   उत्तर

 4. Ashwini
  मे 17, 2010 @ 12:16:20

  sahi aahe ekdam in door kase kele asel na sagale ……..gr8 🙂

  उत्तर

  • anukshre
   मे 17, 2010 @ 12:29:01

   hech vaishistya aahe v te mala avadale mhanun ethe share kele. aplyakade asun apan japat nahi jyana he milat nahi te matr ase nirman karun santulan rakhatat. hya pudhachi post bahutek musacat la parat aalyavar hoil pan apan bhetnar aahot ha anand khup aahe.

   उत्तर

 5. Naniwadekar
  मे 17, 2010 @ 20:23:50

  अनुजाबाई : या प्रकारचे लेख तुम्हाला छान ज़मतात. पण फोटो आणि वर्णन बाज़ूबाज़ूला ठेवल्यामुळे वाचनप्रवाहात खंड येतो. आज़ची नरेन्द्र प्रभू यांची गंगोत्रीवरची पोस्ट पहा. त्या प्रकारे पूर्ण लेख आधी आणि सर्व फोटो नन्तर टाकल्यास वाचायला सोपं ज़ाईल.

  – नानिवडेकर

  उत्तर

  • anukshre
   मे 18, 2010 @ 08:06:43

   धन्यवाद श्री. नानिवडेकर,
   आपण म्हणता तसा प्रयत्न निश्चित करून पाहेन. मस्कत ची छोटीशी का होईना अशी मराठीतली पुस्तिका तयार करायचा मानस आहे पाहूया कधी जमते त्यासाठी मला फोटो असे त्या त्या परिच्छेदला अनुसरून शक्यतो घ्यावे लागतात. मस्कत ची संस्कृती, परंपरा इथली वैशिष्ट्ये लिहिण्याचा विचार केला आहे. आपला पाठींबा हा अनमोल आहे. कालच आपली प्रतिक्रिया एका ब्लॉग वर वाचली आणि आपली आठवण आली कि आपण बऱ्याच दिवसात भेटलो नाही अर्थात मीही लिखाण करत नव्हते. आज आनंद झाला कि आपण लगेच अभिप्राय दिलात पुनःश्च धन्यवाद. श्री. नरेन्द्रजींचे लिखाण नक्कीच वाचेन.

   उत्तर

 6. आनंद पत्रे
  मे 17, 2010 @ 22:44:00

  अनुताई, पोस्ट लिहिण्यासाठी धन्यवाद…. ब्लॉग खुप सुना-सुना वाटत होता.
  अतिशय सुंदर माहिती आणि अतिशय खास प्रयत्न.. खरंच आनंदवन…

  उत्तर

  • anukshre
   मे 18, 2010 @ 07:49:39

   खरय आनंद, गाडी रुळावर येण्यासाठी तू, सुहास, अश्विनी, गौरी, राविन्द्रजी, पंकज, श्रीताई ,विशाल आणि बऱ्याच जणांनी सतत माझ्या संपर्कात राहून मला धीर आणि प्रोत्साहन दिले म्हणून मी लिहिण्यासाठी पुन्हा सुरवात केली. ह्या महिना अखेरीला मी भारतात दोन महिने सुट्टी करता जात आहे. त्यामुळे कदाचित पोस्ट नसतील. माझ्या कडे तुझा मोबाईल नंबर नाही, तिकडे आल्यावर निदान बोलणे तरी होईल. माझा मुक्काम पुण्यात आहे. असो भेट झाली तर अधिक बेहतर होईल. कळव. अजून असे जरा हटके असे खूप लिखाण बाकी आहे. निश्चित लिहिणार मला जे जे आवडते ते मी सगळ्यांना कळवणार, एका देशाची संपूर्ण माहिती कळते. मातृभूमी तर प्राण आहे पण कर्मभूमी श्वास आहे.

   उत्तर

 7. देवेंद्र चुरी
  मे 19, 2010 @ 07:07:28

  त्या मरुभुमीत अस सदाहरित वन आणि वर पाउसाचीही साथ वा्ह…..हे वन बनवायची संकल्पना आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी दद्वाल हयांनी घेतलेली मेहनत ग्रेटच…समस्त विश्व ग्लोबल वार्मिंगच्या विळख्यात गुरफ़टत जात असतांना खरच अश्या योजना राबवण्याची आज आपल्याला नितांत गरज आहे…असो ताई बर्याच दिवसांनी ब्लॉगवर लेख आलेला पाहुन चांगल वाटल…

  उत्तर

  • anukshre
   मे 19, 2010 @ 07:56:40

   धन्यवाद, देवेंद्र सृजन अभिप्राय दिलास. मला हि असे वन खूप आवडले म्हणून सर्वाना सांगितले. हो! बऱ्याच दिवसांनी पोस्ट दिली. मनस्थिती ठीक नव्हती व इथल्या सांस्कृतिक कार्यक्रमात मन रमावे म्हणून सहभागी झाले होते. म्हणून हि फारसा वेळ उपलब्ध होत नव्हता. असो आता माझी लिखाणाची गाडी पूर्वपदावर आली आहे असे मला वाटते. ह्या महिना अखेरीला मी भारतात येणार आहे त्यामुळे पोस्ट ना उन्हाळी सुट्टी देणार आहे. खूप काही छान वाचनीय असे द्यायचे आहे त्यामुळे जसा वेळ मिळेल तसे पोस्ट असतीलच. अभिप्राय खूप आवडला व माझ्या पोस्ट ची मनापासून वाट पाहत होतास हीच प्रेरणा मला आश्वासक आहे. धन्यवाद!

   उत्तर

 8. sonal Waikul
  जून 03, 2010 @ 09:38:27

  khup chaan mahiti dilis Anuja tai.
  Must visit destination aahe as watal.

  उत्तर

 9. हेमंत आठल्ये
  जुलै 07, 2010 @ 13:14:44

  तुमच्या सर्वच नोंदी खूप छान आणि माहितीपूर्ण असतात. पण आजकाल तुम्ही कामाच्या व्यापात अधिक असतात का? बर्याच दिवसांपासून तुमची ‘ब्लॉग’ भेट होत नाही. तुमचा एक वाचक..

  उत्तर

  • anukshre
   जुलै 23, 2010 @ 11:32:58

   हेमंत,
   तुमची प्रतिक्रया वाचून खूप छान वाटले. आपली भेट होत नव्हती कारण मी दोन महिने पुण्यात सुट्टी करता राहत होते. कालच मस्कत ला परत आले आहे. लवकरच पोस्ट असेल. असेच आवर्जून भेट देत रहा.

   उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: