एक होता काऊ आणि एक होती चिऊ पासून अनेक गोष्टी आपण ऐकत आलो आहोत. कावळ्याच्या हुशारीच्या गोष्टी तर अनंत काळापर्यंत अस्तित्वात राहणार आहेतच. प्रत्येक भाषेत हा काऊ आपल्याला भेटतच असतो. चिमणी आपल्या संसारात इतकी मग्न होती की दाराबाहेर मैत्री करता उभा असलेला कावळा तिने दार उघडून कधीही घरात घेतला नाही. तिला तिच्या पिल्लांची काळजी होती, एकदा का त्याला घरात घेतला तर तो आपल्यालाच हुसकावून बाहेर काढेल. चिऊची काळजी व्यर्थ नसावी.
‘पैलतोगे काऊ कोकताहे, शकून ग माये सांगताहे…..’ असा हा काऊ शुभ शकुना करता पण आहे. हाच जर जिवंत माणसाला स्पर्श करून गेला तर सूतक लागले म्हणून विधी धर्मात आहेत. नेहमी घराबाहेर राहणारा पण आईने ओळख करून दिलेला, बाळाच्या बरोबरीने हा पण घास खाणारा असतो. आईला न घाबरता बिनदिक्कत घास घेऊन जातो. आई हाच काळा, कर्कश ओरडणारा पक्षी प्रथम का बरे दाखवीत आली असावी.
रंगीत जग खूप सुंदर आहे पण काळा पण तितकाच सुरेख आहे. बाळाची नजर स्थिर व्हावी व कर्कश आवाजाने ऐकण्याची एकाग्रता शक्ती वाढावी असा हेतू असेल का? तोंडात दात नसताना ह्याची ओळख होते. आईला बिलगून घास खाताना हाच काऊ प्रथम भेटतो. मग छोटीशी चिऊ अवतरते, सुंदर नाजूक भावना आई दाखवते. मन धीट करण्याकरता काऊ खूप मदत करतो. आईच्या विश्वासहार्य आधाराने बाळ कठोर आवाज स्वीकारायला व काळा रंग ओळखायला शिकते.
घरी येणारा पाहुणा ह्याच्या मुळे आधीच कळतो. निसर्गात आपत्ती येणार असेल, किंवा ती ज्या झाडावर राहत असेल त्याच्या आजूबाजूला जर साप येत असेल तर अनेक कावळे एकत्र येऊन एकच कर्कश गलका करतात. अचानक प्रचंड संख्येने कसे व केंव्हा एकत्र हे आपल्याला कळतच नाही. ह्यांचे नेटवर्क खूप पावरफुल आहे. आपल्याला अंदाज येतो की अवकाळी पाऊस, वादळ, गारा तत्सम गोष्टी घडणार आहेत. हा स्वतः सतर्क असतो व इतरानाही सावध करतो. पक्षी किंवा प्राणी हे सूचक असतात पण हाच एक पक्षी आहे की एकत्रित ओळ करून मोठ्या संख्येने दिसतो.
आपल्या घरट्यात कोकिळेची अंडी पण उबवतो, त्याला अंड्याची संख्या मोजता येत नाही का? एखादे जास्तीचे अंडे आहे ह्याची जाणीव असूनही अतिशय प्रेमळ पणे त्या अंड्यातून पिल्लू बाहेर येईपर्यंत आपल्या अंड्या सारखी काळजी घेतो. ह्याला कोणीही फसवू शकत नाही कारण ह्याच्या कडे बुद्धी आहे, मग कोकिळा कशी बरे निवांत राहते? कारण शोधले तर, माहित असूनही उगाचच एखाद्याच्या निष्पाप जीव घ्यायचा ह्याच्या तत्वात बसत नसावे. पण कोणी खोडी काढली तर डोक्यावर चोच मारून जखमी करण्याची नामी शक्कल पण स्वभावात दिसते. ह्याला पण मानवाचा स्पर्श झाला तर ह्याचे भाई ह्याला टोच मारून मारून जखमी करून मृत करतात. जखमी झाला तर त्याच्या भोवती जमून तो मरे पर्यंत एकच कर्कशाट करतात. मेलेला कावळा फारसा दिसत नाही कारण म्हणे ह्याला दीर्घायुष आहे.
सूतक कार्यात तर ह्याला अनन्य साधारण महत्व आहे. दहाव्याच्या पिंडाला हा शिवलाच पाहिजे नाहीतर आत्म्याच्या इच्छा अतृप्त आहेत असे शास्त्रात मान्य आहे, असे अनुभव ही येतात. व्यक्तीच्या आवडीची गोष्ट नेमकी कावळ्या कडून उचलली जाते. अनेक कावळे तिथे घुटमळत असतात पण पिंड ठेवल्यावर एखादा पुढे येतो व झपाट्याने घास घेऊन जातो. आत्म्याच्या इच्छा अतृप्त असतील तर संबधित नातेवाईकांनी तिथे उच्चारून त्या पूर्ण करण्याचे जो पर्यंत वचन कावळ्याच्या कानात पडत नाहीत तो पर्यंत माणसाना ताटकळून रहावे लागते.
असा हा काऊ कधी नव्हे तर मला रोज सकाळी खिडकीच्या बाहेर झाडावर एक मिनिटा करता दिसू लागला आहे. हीच वेळ होती की मला आईचा भारतातून फोन यायचा. माझा आवाज फोन वर (मस्कत हून) कावळ्याने ऐकला आणि ठाण्यात पिंडाला कावळा शिवला. असा माझे व आईचे नेटवर्क काऊ च्या माध्यमातून सुरु झाले. हाच आधार मला फोन च्या ऐवजी तो भेटून देतो. आज मला हा काऊ उद्याचा विश्वास देत आहे. एक काउ माझ्याकरता आहे.
एप्रिल 06, 2010 @ 12:01:43
hmmmm mala mahit hote story kuthe yevun thambnar aahe te …
एप्रिल 06, 2010 @ 14:33:15
मनाचे बळ कुठून तरी शोधावे लागते म्हणून काऊ च्या गोष्टीचा असा शेवट झाला. तुम्ही सर्वांनी धीर दिलात म्हणून लिहिण्यासाठी सुरवात तरी केली….
एप्रिल 08, 2010 @ 10:26:31
तायडे, परत लिहायला सुरूवात केलीस अभिनंदन. ह्या पोस्ट च्या शीर्षकावरूनच कळला होत की काय असेल ह्यात. आपण परवा फोन वर पण बोललो होतो ह्या बद्दल. हे काउच पावरफुल नेटवर्क आपण कोणाच्या आगमनचीच वार्ता देवो. मस्त झाली आहे पोस्ट..
एप्रिल 10, 2010 @ 17:02:45
हरी ओम, लहानशी कावळ्याची गोष्टा जीवनाचे सार सांगून गेली. आयुष्याकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन मांडलास तो मनाला भावला. बाकी गोष्टीत नसणारी गोष्टही कळली. खूप आवडली.
एप्रिल 12, 2010 @ 11:58:05
धन्यवाद हिना तुझ्या दोन्ही प्रतिक्रिया ह्या खूपच धीर देऊन गेल्या, तुझा गोष्ट वाचण्याचा दृष्टीकोन पण खूप भावला. इथे तूच तर एकटी माझ्या अत्यंत जवळची आहेस. तुझा आवाज ऐकला नाही तर मला खरच एकटे वाटेल. आई नंतर मला प्रेमाने विचारणारी, माझ्या लहान बहिणीच्या वयाची असून देखील मला धीर देणारी तू आहेस म्हणून मी पण मस्कत ला परत आले.
एप्रिल 16, 2010 @ 19:13:37
chhan lihilay tai . manala bhidnare
kalji ghya. lihat raha.
एप्रिल 18, 2010 @ 12:49:05
धन्यवाद सलील,
कावळा वेगळ्या दृष्टीकोनातून लिहिण्याचा प्रयत्न केला. तुला लिखाण आवडले खूप आनंद झाला. हो मी सर्वांची व माझी काळजी घेईन.
एप्रिल 18, 2010 @ 11:25:19
कावळ्याची अशीही महती आहे, हे आज नविनच कळाले. कोकिळेचे अंडे कसलाही मत्सर न बाळगता मनापासून काळजी घेणारा हा काळा कावळा सर्वांसाठी एक आदर्शच आहे… खिडकीत भेटणारा कावळा, काही दिवस तरी तुला सावरण्यास मदत करेल, असा विश्वास आहे.
काळजी घे!
पुढील लेखाची वाट पाहतो आहे!
एप्रिल 18, 2010 @ 12:42:46
विशाल,
प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद. प्रगल्भ अभिप्राय आहे. मोजक्या शब्दात पण समर्पक भावना व्यक्त केल्यास. तुझा हा आपलेपणा खूप आवडला.
ताई.
एप्रिल 19, 2010 @ 10:29:35
khup sparshun geli g hi post. aapal manus aaplyatun sharirane nighun gel tarihi te aaplach asat shewataparyant. aani shewatala saglya dhara ekach hotat. to paryant hi aapli manas aaplyala ya na tya rupat te aslyachich paawti det raahtat. Tula yatun saawraayla tujhi aaich aali aahe as samaj.
एप्रिल 19, 2010 @ 14:56:07
धन्यवाद सोनल,
तुझे शब्द व विचार मनास धीर मिळून, आपलेपणाची जाणीव करून देणारे ठरले. जेंव्हा मला खूप एकटे वाटते तेंव्हा तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रिया वाचत राहते. आपला परिवार आहे हि भावना दृढ होऊन पुन्हा नवीन दृष्टीकोनातून उमेद वाढते. खूप दिवसांनी आलीस, पण भेटलीस म्हणून मनापासून आनंद झाला. अजूनही आई नाही हे मानायास मन तयार नाही, विषय सुचत नाहीत पण लवकर पुन्हा लिहायला लागेन.
एप्रिल 25, 2010 @ 11:26:57
हल्ली चिऊ काऊ चे जग राहिलेले नाही. ते आता ट्विटर ने व्यापलेले आहे. क्वचित्च पक्षी नजरेस पडतात. पण मागच्या महिण्यात आमच्याकडे कबुतरने पिल्लाला जन्म दिला तर अत्यांनंद झाला होता. आता पुनः त्यांनी अंडी घातली आहे.
मे 01, 2010 @ 09:52:07
रविन्द्रजी
खूप दिवसांनी अभिप्राय , छान वाटले. खरय म्हणणे पण चिमुकल्यांना सुद्धा प्रथम आईच काऊ, चिऊ दाखवते. हाच काऊ माझ्या आईच्या तेराव्याला मला एक वेगळा संदर्भ देता झाला म्हणून हि पोस्ट लिहिली आहे. धन्यवाद, भेट देत रहा. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!
एप्रिल 28, 2010 @ 14:27:29
अनुताई तुझ्या ह्या कावळ्याने डोळ्यातून पाणी काढवले ….
.
.खरं तर मला काही वेगळं लिहायचं होतं पन आता लिहिवत नाही….
.
जून मध्ये येत्येस भेटल्या शिवाय जाऊ नकोस
मे 01, 2010 @ 09:44:39
पेठे काका,
अनुताई कशाला? मी लहान आहे आपण अनुजा म्हणावं, उगाचच दडपण येत. मी सध्या मस्कत मराठी मित्र मंडळाच्या कार्यक्रमात व्यस्त आहे, म्हणून उत्तर द्यायला उशीर झाला. क्षमा असावी. हो मी जून मध्ये पुण्यालाच आहे, आपला मोबाईल नं आहे. मी आल्यावर आपणाला संपर्क करेनच. खूप लिहिण्याचे आहे. बघू
वेळ मिळेल तसा नवीन पोस्ट टाकेन. आपण इतक्या लांबून पण आवर्जून माझी काळजी घेत आहात, खूप बरे वाटले. आपणाला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! काळजी घ्या, मजेत रहा. अभिप्राय भावपूर्ण आहे.
मे 01, 2010 @ 02:01:07
छान लिहील आहे . .
लिहित राहा . .
मे 01, 2010 @ 09:37:03
धन्यवाद श्री.स्वप्नील कोल्हे,
आपले स्वागत! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
मे 06, 2010 @ 21:32:27
अनुजाताई, बरेच दिवस झाली पोस्ट नाही… वाट पाहत आहे.
मे 08, 2010 @ 16:02:50
धन्यवाद आनंद,
खरय खूप दिवसात पोस्ट लिहिली नाही. लवकरच पोस्ट नक्की असेल. मे अखेरीस मुंबईला जाणार आहे त्यापूर्वी पोस्ट वाचायला नक्की मिळेल. नंतर मात्र पोस्ट न सुट्टी! इथे बऱ्याच सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी असल्याने लिखाण मागे पडले. आठवण काढलीत खूप बरे वाटले.
मे 25, 2010 @ 17:00:02
ज्या ज्या गोष्टी आई आपल्याला दाखवते, त्या त्या रुपात ती आपल्याला पुन्हा भेटताच असते कि..
कुठे कुठे म्हणून आठवण ठेवत नाही असे नाही… आई नसलो कि माझे काय होईल माहित नाही…
कारण लहानपणापासून आईच माझे बाबा आहेत आणि आईच माझी आई
त्यामुळे मी समजू शकतो… किती वेदना होत असतील त्या.
विसरू शकतच नाही काहीच आपण… त्यामुळे कावळा असेल, चिमणी असेल, किवा हातात चहाचा कप आला तरी,
रात्री झोपताना किवा जेवताना, जाली स्थळी काष्ठी पाषाणी सगळीकडेच तिचा भास होत राहणारच..
आणि आपल्या अंतर्मनातून कोण काढू शकणारे आपल्या दैवताला…
आईचे ऋण फेडता कधीच येत नाहीत ..
आईलाही ‘घेण्याचे’ हात कधीच असत नाहीत .
आई म्हणजे असते दैवत, आईच असते शाश्वत…
अशा या आईचे मातृत्व कुणी विसरत नाही…
जून 10, 2010 @ 10:53:27
tumacha blog vachun khup chan vatale ,aani mala mazya babanchi aathvan aali.
जून 21, 2010 @ 16:06:35
welcome kartiki,
dhanyvad. aai babanchya athvani ashach astatat. tuzya pratikriyela uttar ushira dile karan sadhya mi net pasun dur aahe.