मी भारतात २९ मार्च ला येणार होते. आईला घेऊन मस्कत चा तिचा पहिला विमान प्रवास माझ्यासोबत होणार होता. माझ्याकडे कागदी तिकीट राहिले ती देवाघरी २७ तारखेला निघून गेली.
मी रिकाम्या हाताने मस्कत ला परत आले. अधिक काही लिहू शकत नाही कारण ती फक्त माझीच आई नव्हती तर परिसरात तिचा आधार अनेकांना होता. कुठेलेही दुखणे तिला नव्हते पहिल्यांदाच लेकीला भेटण्यासाठी तिच्या हृदयाने परवानगी दिली नाही. गेल्या वर्षी जून ला मी तिला पहिले होते. मी आता पूर्णपणे पोरकी झाले. तिला मात्र माझा ब्लॉग खूप आवडायचा. तिनेही तुमच्या सारखेच मस्कत पोस्ट मधून पहिले. तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रिया पण तिला खूप आवडत होत्या. …….तोची आवडे देवाला. हरी ओम.
जो आवडे सर्वाना…..
30 मार्च 2010 19 प्रतिक्रिया
in ललित
मार्च 30, 2010 @ 13:17:08
😦 😦
मार्च 30, 2010 @ 13:20:38
Kay lihu ………..kalaji ghe …no words
मार्च 30, 2010 @ 13:56:17
Sorry.
मार्च 30, 2010 @ 14:58:43
तायडे, काळजी घे ग. आम्ही सगळे तुझ्या दु:खात सहभागी आहोत
मार्च 30, 2010 @ 21:57:04
अनुजाताई, काय बोलू? 😦 :((
तुम्हाला या कठीण प्रसंगातून तरून जाण्यासाठी धीर मिळो ही त्या जगन्नियंत्याकडे प्रार्थना..
काळजी घ्या.. !!
मार्च 31, 2010 @ 04:48:57
सुहास म्हणतो ते बरोबर अनुजाताई आम्ही सर्व तुझ्या दुखत सहभागी आहोत. तुझ्या सोबत आहोत. नियतीला कोणीं बदलू शकत नाही. प्रत्येकाला एक दिवस जायचे असते असे समजावे व मनाला शांत करावे. व देवाचे मनन सुरु ठेवावे. बरे वाटेल.
मार्च 31, 2010 @ 08:13:31
😦
मार्च 31, 2010 @ 11:47:08
आपण सर्वांनी मला धीर दिलात, आपल्या आपुलकीच्या भावनेनेने मी पुन्हा परिवारात आले.
हरी ओम
मार्च 31, 2010 @ 13:00:43
काळजी घे … 😦
मार्च 31, 2010 @ 16:49:38
मला वाटलं, तू मार्चच्या एन्डला येणार होती तरी मला फोन का केला नाहीस… पण तुझ्या आईवर काळाने असा घाला घातला, हे वाचून खुप दु:ख होतंय, पण स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न कर, प्रत्येकालाच या गोष्टीचा अनुभव नको असला तरी घ्यावा लागतोच! असो, तुझी व घरच्यांची काळजी घे.
-विशाल
मार्च 31, 2010 @ 17:47:53
काय कॉमेंट लिहावी हेच कळत नव्हतं !!तुमच्या दुःखात आम्हीही सहभागी आहोत.
एप्रिल 01, 2010 @ 17:37:45
शब्द नाहीत. काळजी घ्या..
एप्रिल 02, 2010 @ 16:30:07
अनुजा ताई,
काय वाचतोय मी ! अविश्वनीय व भयंकर आहे. क्षणभर सुन्न झालो वाचून ! खरंच आहे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ! तुझे कसे सांत्वन करू हेच समजत नाही. शेवटी त्याचे कडेच प्रार्थना करतो , जो तुला ह्यातून सही सलामत, धैर्याने बाहेर पडण्यासाठी मदत करेल.
एप्रिल 03, 2010 @ 22:50:19
काय लिहाव हे खरच कळत नाहिये ताई…पण हे वाचुन खुप वाईट वाटल….
एप्रिल 05, 2010 @ 06:24:35
अनुजा, काय लिहू गं…. तुला पत्र धाडले आहेच…. तुमच्या सगळ्यांच्या दु:खात सहभागी आहोतच. देव तुला शक्ती देवो. काळजी घे गं.
एप्रिल 06, 2010 @ 11:10:49
ताई 😦
एप्रिल 06, 2010 @ 14:48:13
आपण सर्वांनी धीर दिलात, अशा प्रसंगात कळते की कोण आपले आहे ते, आमच्या कुटुंबियाच्या दुख्खी घटनेत आपण सहभागी झालात, खूप धीर वाटला. आपण सर्वांचे धन्यवाद मानणे म्हणजे औपचारिक ठरेल पण माझ्याकडे खरच शब्द नाहीत एव्हढे मला पुन्हा परिवारात आल्यासारखे वाटले. आईचा पण आत्मा सुखावला असेल, कारण ती तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रिया पण वाचत होती. तिला पण तुम्हाला भेटण्याची इच्छा होती. असेच प्रेम निरंतर राहू दे. पुन्हा लवकरच पोस्ट लिहिण्यासाठी सुरवात करेन.
एप्रिल 10, 2010 @ 17:12:29
हरी ओम, ईश्वर तुला तुझ्या आयुष्यातील ह्या प्रसंगाला सामोरे जाण्याचे बळ देवो. मी व माझा परिवार तुझ्या दुखात सहभागी आहोत. स्वतःला कधीही एकटी समझू नकोस, मला कधीही हाक मार मी ओ देयीन.
मे 25, 2010 @ 16:50:03
माफ करा.. खूप उशिरा पोस्त वाचली..
म्हणजे मी ब्लोग वर नव्हतो…
तुमचे दुख तुम्हीच झेलू शकता.. आम्ही फक्त धीर हि नाही.
धीराचे चार शब्द सांगणार……..
आई हे शेवटी दैवताच असते…
ते नसले तरी त्याचे अस्तित्व आपल्यातच असते…
वेळ लागतोच त्यातून बाहेर यायला..
ईश्वरत त्यांच्या आत्म्यास शांती देवो…