‘फलाज’………वाळवंटातील पाण्याचा पुरवठा.

ओमान मध्ये अत्यंत रुक्ष दिसणारे, एकही झाड अंगावर न बाळगणारे, वातावरणाचे वैविध्य जपणारे असे डोंगर आहेत. पूर्ण देशात विस्तीर्ण असा सपाट असा भूभाग कमी आहे. प्रत्येक मीटर अंतरा वर नजर न ठरेल एव्हढ्या अफाट डोंगर रांगा आहेत. देशाचा दक्षिणेकडचा भाग भारतीय भौगोलिक बाबींशी मिळता जुळता आहे. ‘सलाला’ असे नाव आहे. इथे तुम्ही केरळ किंवा कोकणात आला आहेत असेच वाटेल. जून ते सप्टेंबर अफाट पाऊस, त्यापुढील काही भूप्रदेश वर्षभर गच्च असे जंगल. हिरवाई, फळांच्या बागा. नयनरम्य सौदर्य स्थळे आहेत. ‘अल हजर’ अशा नावाच्या डोंगर रांगा आहेत. ह्या भागाला ‘जबल अल अक्तर’ असे म्हणतात.

मस्कत शहरात मात्र हिरवाई ही रस्त्याच्या दुतर्फा अतिशय उत्तम पणे निर्माण केली आहे. असा देश हा वाळवंटी म्हणून तर आहेच पण आज संपूर्ण आखाती देशात शेती, पाटबंधारे, व जलसिंचनासाठी अग्रसेर आहे. इथे पाऊस खूप कमी आहे, वरील नमूद केलेल्या भागात मात्र अपवाद आहे. असे असताना पेट्रोल करता प्रसिद्ध असून देखील प्रतिकूल निसर्ग न मानता कल्पकतेने स्वयंपूर्ण झालेल्या ह्या देशाची ही ओळख ही मेहनती व प्रामाणिक पणा यांनी समृद्ध आहे.

फलाज’ चा अर्थ पाण्याचा झरा किंवा स्त्रोत आणि अनेक प्रवाह म्हणजे अ’ फलाज असे संबोधतात. वाळवंटातील इथल्या डोंगरांमध्ये लुप्त किंवा सुप्त असे पाण्याचे झरे आहेत. डोंगरातून थेट शेतीकरता पाणी हे बांधीव मार्गाने आणले जाते. ओमान मध्ये जवळ जवळ सर्व शेती उत्पादने घेतली जातात. खडकाळ अशा डोंगर रांगांमध्ये अचानक अशी शेती दिसू लागते. वरकरणी पाहता कुठेही पाण्याचे अस्तिव दिसत नाही. ही हिरवळ व शेती मन व डोळे शांत करते. अशा डोंगरातून निघालेल्या प्रवाहांना येथे फलाज( falaj ) असे संबोधतात

आपल्याकडच्या पाटाच्या पाण्याची आठवण हमखास येते. ही पद्धत इस्लाम धर्म स्थापन होण्याआधी पासूनची आहे. ओमानी पूर्वजांनी परिस्थितीचे आव्हान स्वीकारले व कायम स्वरूपी असे पाण्याचे भूमिंतर्गत व स्त्रोत शोधून काढले. तिथे दगडी असे चॅनल बांधले. झरा ज्या ठिकाणी मिळाला तिथे संरक्षित असे बांधकाम केले. इथल्या डोंगरांमध्ये मातीचे प्रमाण नाही त्यामुळे चढण्यास बिकट व निसरते असे दगड असताना असे बांधीव काम करणे दुरापास्त आहे.

हे बांधीव पाट थोडे थोडके नसून इथे असे ११००० फलाज आहेत त्यापैकी ४००० हे कायम पाण्याचा पुरवठा करतात. ‘घैली’ पद्धत म्हणजे हे प्रवाह उघड्या अशा कॅनल मधून प्रवाहित केले जातात ते पिण्यासाठी वापरत नाहीत तर ‘दौडी’ पद्धतीने बंदिस्त बांधलेले प्रवाह हे शुद्ध असून घरगुती वापराकरता असतात. देखभाल सरकारकडून व ओमानी लोकांकडून अतिशय काळजीपूर्वक केली जाते.
फलाज सिस्टीम चे नेटवर्क खूपच कल्पक आहे. डोंगरांमध्ये अचानक पाण्याचा पुरवठा वाढतो तेंव्हा हे कॅनाल्स एकमेकांना पूरक अशा पद्धतीने पाणी वाहून नेतात. अत्यंत जोरदार असा पाण्याचा पुरवठा झाल्यास शहरी भागात ‘वादी’ म्हणजे ‘नाले’ बांधून ठेवले आहेत. मोठी कार किंवा ट्रक पाण्याच्या दबावामुळे कित्येक किलोमीटर पर्यंत ढकलली जावू शकतात एव्हढा जोर पाण्याला असतो.


तळपता सूर्य पण ह्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन करू शकत नाही. कारण पाणी छोट्या छोट्या अशा दगडी बांधकामात वरून बंधिस्त नसले तरी पाण्याचा मोठा असा भाग सलग नसल्याने ही कल्पकता वर्षानुवर्षे ओमान ला हरित पणा देऊन, शेतीत स्वयंपूर्णता आली. डोंगरांमध्ये लांबलचक असे बांधकाम एखाद्या रस्त्या सारखे भासते. ह्या पाण्याला शेतीकरता कुठेही मीटर किंवा पंप लावलेला नाही.
साधारण पणे वर्षभर पाण्याचा स्त्रोत चालूच असतो. येथे मस्कत शहरात डिसेंबर ते मार्च काळात पाऊस पडतो. पाऊस रोज नसतो महिन्यातून दोनदा पडतो. त्यावेळी जे उघडे फलाज आहेत ते भरभरून वाहतात. परंतु खरा स्त्रोत हा जमिनीखाली दडलेला असतो. ह्या मुळ प्रवाहापाशी म्हणजे ‘मदरवेल’ ची खोली ६५ ते २०० फुट असते व तेथून ५० ते ६० मीटर लांब मुख्य फलाज बांधून काढतात. त्यापुढे ते वेगवेगळ्या बांधीव वाटा मार्फत किंवा पाट काढून प्रवाहित केले जातात.

पाण्याचा पुरवठा ९ गॅलन/ प्रती सेकंद असतो.हा पुरवठा निश्चित पणे जलसिंचनासाठी व पाटबंधारे साठी मोलाचे कार्य करतो. घैली ह्या प्रवाहापासून ५५% तर दौडी पासून ४५ % पुरवठा पाण्याचा होतो. त्यातील दौडी हे अतिशय खोल अशा भूस्तारातून शोधून काढलेले प्रवाह आहेत. ह्यांचेच पाणी पिण्यासाठी पुरवठा करण्यासाठी ओमानी कंपन्या आहेत. आम्ही रतीब प्रमाणे ह्यांचे पाणी विकत घेतो. १ लिटर पासून ते २० लिटर च्या गॅलन मध्ये मिळते. आर्थिक समीकरणे हा वेगळा विषय आहे. पण शुद्ध असे पाणी सहज उपलब्ध आहे.

सलग असा सपाट भूप्रदेश खूप कमी आहे. असे असताना दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या दुसऱ्या शेतीकरता किंवा बागेसाठी हे लोक प्रामाणिकपणे आपल्या शेतीत येणाऱ्या प्रवाहात दगडाचा अडथळा ठेवून गरजे पुरते पाणी घेऊन प्रवाह पुढच्या शेतीसाठी वळवतात. आपल्या परिसरातील फलाज चा भाग स्वच्छ करण्याची जवाबदारी तेथील लोकांची असते. तळातून दगड अतिशय कल्पकतेने एकमेकात बांधल्यामुळे वाळूत पाणी झिरपत नाही. अत्यंत स्वच्छ असे फलाज शेतीकरता पण आहेत. बांधकामाची विशेष अशी अवजारे नसताना कठीण परिस्थितीत हजारो किलोमीटर लांबीचे हे फलाज कौतुकास्पद आहेत.

हाच प्रामाणिकपणा त्यांच्या परंपरेसाठी, देशासाठी हरित मने दाखवतो. भाजी पाला व शेतीकरता स्वयंपूर्ण देश आहे. देशाची गरज भागवण्या करता कमी प्रमाणात उत्पादक गोष्टी बाहेरून स्वीकारल्या जातात.

24 प्रतिक्रिया (+add yours?)

 1. गौरी
  मार्च 13, 2010 @ 20:07:20

  सहीच आहे … पाण्याची किंमत खरोखर समजली आहे त्यांना असं म्हणायला पाहिजे.

  उत्तर

  • anukshre
   मार्च 14, 2010 @ 14:25:40

   गौरी,
   मला डोंगरात असे लांबच लांब कडे कपारीतून दिसणाऱ्या पाऊल वाटा पाहून आश्चर्य वाटले होते. बर ह्या वाटा बांधीव होत्या, चौकशी केली तेंव्हा फलाज आहेत असे लक्षात आले. कसलं मस्त स्वच्छ
   व थंड पाणी बारा ही महिने असते. खरय खूप मिळते आपल्याला पण सगळे वाया जाते, पुन्हा पाणी टंचाई आहेच…….

   उत्तर

 2. ravindra
  मार्च 13, 2010 @ 23:34:55

  अनुजा, खुपच अप्रतिम माहिती दिली आहेस. खुप अभ्यासपुर्ण लेख झाला आहे हा. आता पर्यन्त आम्ही त्या परिसराला वाळवंट म्हणुनच ओळ्खत होतो. इतकी परिपुर्ण माहिती व फोटो कसे मिळविलेत.
  हो एक सांगु का. आपणाकडे जुन्या किल्ल्यांवर अशीच व्यवस्था होती त्या काळी.

  उत्तर

  • anukshre
   मार्च 14, 2010 @ 14:38:39

   रविन्द्रजी,
   आपल्या किल्यांवर अजूनही बारा महिने पाणी पुरवठा करणाऱ्या टाक्या आहेत. पूर्वी संस्कृतीची अशीच देवाण घेवाण झाली असावी. फोटो माझ्याकडे बरेच आहेत पण नेट वर पण उपलब्ध आहेत. ओमान खूप वैविध्य पूर्ण व परंपरेची जपणूक करणारे आहे. अजूनही खूप पोस्ट आहेत, आपण सगळे आवर्जून वाचता म्हणून उत्साहाने मला माहिती झालेले ओमान आपल्यापर्यंत पोहचवण्याचा माझा प्रयत्न………

   उत्तर

 3. सुहास
  मार्च 14, 2010 @ 03:33:06

  माडाच्या मडामंदी पाटाच पाणी जात..गुलाब जाई जुई मोगरा फुलवीत.
  मस्त पोस्ट तायडे… “फलाज” एकदम क्रियेटिव कॉन्सेप्ट आहे.

  उत्तर

  • anukshre
   मार्च 14, 2010 @ 14:44:49

   पोस्ट चे नाव हेच द्यावे असे मनात होते तेच सुहास तू बरोबर सांगितलेस. आपल्याकडे पण नद्यांची जोडणी अशीच अत्यंत महत्वाची योजना होतीच की….. मंत्र्यांच्या राजकारणात देश मागे पडतो हे दुखः भारताचे आहे. शिवाजी महाराजांनी तर प्रत्यक्ष किल्ल्यांवर गोड्या पाण्याच्या टाक्या बांधून ठेवल्या आहेत. फक्त देशाचा विचार सगळ्यांनी प्रथम केला तर खऱ्या अर्थाने सुजलाम….. होईल.

   उत्तर

 4. आनंद पत्रे
  मार्च 14, 2010 @ 08:56:38

  खूपच छान माहिती, इतकी कमी पर्जन्यवृष्टी असताना देखील हे कौतुकास्पद आहे.

  उत्तर

  • anukshre
   मार्च 14, 2010 @ 14:50:57

   आनंद,
   आपल्याकडचे कोकणचे पाणी, देशाचे पाणी असेच वाहून जाते हे दुखः मला मी जेंव्हा फलाज पहिले तेंव्हा प्रकर्षाने जाणवले त्यातून मन बाहेरच येईना. मग देशाला प्रतिकूल न मानता आपलेसे कसे करून घेतले ह्याचे कौतुक ओमान बद्धल वाटले. खूप सुखी, शांत वृत्तीची साधी लोक आहेत.

   उत्तर

 5. Nilima
  मार्च 14, 2010 @ 12:28:23

  Atulniya aahe aap lya indiat lya shetkaryani thode tari shikayla have hyanchya kadun

  उत्तर

  • anukshre
   मार्च 14, 2010 @ 15:02:46

   नीलिमा, खर तर भारतात सुजलाम सुफलाम समृद्धता आहेच की फक्त राजकारणाने वाट लावली बघ, चांगल्या योजना फक्त कागदावरच राहून करोडे रुपये खर्च दाखवून वसूल करतात व शेतकरी मात्र असाच फुकाफुकी संपतो………

   उत्तर

 6. Ashwini
  मार्च 15, 2010 @ 06:56:08

  atishay uttam mahiti aahe ….kharach kiti chan panya jatan aani vapar karit aahet omani lok mast vatale vachun …baghay la hi aawdel …aani tu mhantes tasesh bharatat sagale aahe pan rajkarani lokani kharokhar vat lawali aahe …..

  उत्तर

  • anukshre
   मार्च 17, 2010 @ 12:16:27

   गुढीपाडवा निमिताने काही उपक्रमात व्यस्त होते म्हणून नेट वर आले नाही. प्रतिक्रियांना प्रतिसाद द्यायला उशीर झाला दिलगिरी व्यक्त करते.आपण सर्वाना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
   अश्विनी,
   बघणे पण तितकेच आल्हादायक आहे. स्वच्छ पाण्याचे प्रवाह पहिले की कसे तृप्त वाटते. इथे अशा वादी मध्ये सहलीला जाण्याची जवळ जवळ सगळ्यांची आवड आहे ती पण पोस्ट देईन, आवडेल.

   उत्तर

 7. Manmaujee
  मार्च 15, 2010 @ 10:34:34

  मस्तच. . .भारतात पण अश्या योजनांची योग्य अंमलबजावणी होणे गरजेचे आहे!!! माहितीबद्दल धन्यवाद!!

  उत्तर

  • anukshre
   मार्च 17, 2010 @ 12:23:01

   मनमौजी,
   आपल्याकडे पण नद्यांची जोडणी हा महात्वाकांशी उपक्रम होता म्हणजे….आहे अजूनही. निदान उपलब्ध नैसर्गिक पाणी प्रदूषित करण्याचे रोखले गेले तरी खूप झाले म्हणायचे. खरय आपल्या मताशी सर्वच जण सहमत आहेत. असे काही पहिले की भारत आठवून फार हळहळ वाटते.

   उत्तर

 8. हेमंत आठल्ये
  मार्च 16, 2010 @ 16:39:34

  ओमान खूप सुंदर आहे. आपला देशाची काही कमी नाही. पण राजकारणी.. जाऊ द्या. लेख माहितीपूर्ण आणि सुंदर लिहिलात. आपल्याला नव्या वर्षाच्या शुभेच्छा.

  उत्तर

  • anukshre
   मार्च 17, 2010 @ 12:26:31

   हेमंत,
   इथे फिरताना पदोपदी भारताची खूप आठवण होते. आपल्याकडे हे असे का नाही म्हणून राजकारण व मंत्री ह्या बद्धल तिडीक मनात येते. सर्व काही आहे पण स्वार्थापुढे देश छोटा केला ह्या लोकांनी……

   उत्तर

 9. bhaanasa
  मार्च 16, 2010 @ 23:31:34

  अनुजा, खरेच किती योग्य रितीने वापर करत आहेत गं हे लोक. फारच उपयुक्त माहिती व फोटोही. सगळ्यांनीच जर थोडा विचार केला तर अनेक पध्दतीने पाणी वाचवता येईल. आपल्याकडे एक तर पूर नाहीतर अवर्षण, म्हणत ओरडा करायचा पण त्यावर उपाय करायचे नाहीत आणि चुकून केलेच तर इतके रद्दड की भीक नको पण कुत्रे आवरची गत. मी किती गब्बर होऊ, लोक मरू देत तिकडे. याकडे सारे लक्ष… 😦
  पोस्ट आवडली.

  उत्तर

  • anukshre
   मार्च 17, 2010 @ 12:36:30

   भानस,
   इकडे मला काय, तिकडे तुला काय, देशात किंवा परदेशात, राहून आपली अशीच मनस्थिती होते व चिडचिड होते. वाट लावली ह्या स्वार्थी राजकारण्यांनी. असा नैसर्गिक समृद्धीचा भारत होता असे इतिहासातले धडे वाढतच जाणार….. कोणे एके काळी…….अशी सुरवात पुढील पिढीला करून द्यावी लागेल. सर्वांच्या मनातले विचार तू अतिशय कळकळीने लिहिलेस. असे काही पहिले की खूप अस्वस्थ व्हायला होते. शेतातले, मळ्यातले विहिरीचे पाट माहिती होते, पण देशाकरता असे कल्पक पाट खरच वैविध्य पूर्ण आहेत.

   उत्तर

 10. देवेंद्र चुरी
  मार्च 19, 2010 @ 18:13:12

  फ़लाज…चांगलीच योजना आहे ही….खरच पाण्याची खरी किमंत हयाना समजली आहे म्हणुनच अश्या योजना तिथे राबवल्या जात आहेत…ही माहिती इथे सादर केल्याबद्दल धन्यवाद,…

  उत्तर

 11. sureshpethe
  मार्च 23, 2010 @ 21:28:59

  सध्या भारता साठी खूप ज्वलंत प्रश्न आहे पाण्याचा ! जेव्हा उफाळेल तेव्हा पाण्याच्या थेंबांचे ज्वालाग्राहीत रूपांतर होऊन सगळ्यांनाच स्वाहा करणार आहे. अर्थात सुक्यांबरोबर ओल्यांनाही जळावं हे लागणारच !
  हा फलाज चा ईलाज आमच्या अंगवळणी पडेल, जेव्हा येथे वाळवंट हॊईल ! सध्या आम्ही त्या तजविजीत आहोत !!

  उत्तर

 12. akhiljoshi
  मे 25, 2010 @ 16:43:10

  आपण सगळेच शिव्या देतो……… पण काही ठिकाणी जिथे पाणी कमी आहे किवा
  उन्हाळ्यात तुटवडा जाणवतो… अशा ठिकाणी काही फार कल्पक गोष्टी केल्या आहेत ज्याने पाणी सत्ते
  त्याचा एक लेख आता नवीन साप्ताहिकात येणारे … विस्तृतमध्ये नंतर लिहितो…
  पण कल्पकता आणि थोडा योग्य मार्गदर्शन असेल तर पाणी साठवता आणि योग्य तर्हेने वापरता येते..
  राजकारणाला शिव्या घालणारे किती जन shower चा वापर टाळतात? कितीजण दाढी करता करता
  नळ चालू ठेवतात… खूप पाणी वाया घालवणारे आपणही गुन्हेगारच ठरतो ki..

  उत्तर

 13. mohan ayare
  फेब्रुवारी 26, 2011 @ 22:03:07

  hari om ,excellent info………….thaanx.shriram!!!!

  उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: