सिंदबादच्या सफरींची आठवण झाली. इथे एका राउंड अबाउट म्हणजे रस्त्याच्या एका सुंदर वळणावर राजमहाला समोर सुशोभित अशा आकर्षक हिरवाईत अत्यंत देखणे पणाने, डोलदार अशी सिंदबाद ची बोट उभारून ठेवली आहे. बोटीच्या खडतर प्रवासाची जाणीव होऊन सवेंदना थिजल्या होत्या.
मस्कत च्या इतिहासातला सुवर्ण क्षण पुन्हा एकदा जसाच्या तसा अनुभव घेण्यासाठी ‘ज्वेल ऑफ मस्कत’ ह्या बोटीचा प्रवास, मान्यवर सरकारी अधिकारी, बोटीवरच्या खलाशांचे नातेवाईक ह्यांच्या साक्षीने सुरु झाला. भव्य असा उदघाटन सोहळा व प्रत्यक्ष बोटीचा प्रवास सुरु झाला. ही बोट पूर्वीच्या पद्धतीने बांधण्यात आली आहे. १९९८ साली इंडोनेशियन समुद्रात मोडक्या अवस्थेत अशा बोटीचा शोध लागला. तिथून पुढील कार्य सुरु झाले. आताची बोट म्हणजे ह्या पुरातन काळाच्या बोटीच्या अवशेषावरून जसा च्या तसा आराखडा तयार करण्यात आला. नंतर तिची बांधणी चे नियोजन झाले.
एकही खिळा न वापरता फक्त नारळाच्या काथ्याच्या साह्याने बांधून मूळ ढाचा तयार केला गेला. आफ्रिकन जंगलातील घाना येथून लाकूड घेतले गेले. ओमान च्या कंताब येथे तिचे काम करण्यात आले. फक्त १७ खलाशी घेऊन ही बोट प्रत्यक्ष मस्कत ते सिंगापूर असा प्रवास करणार आहे
पूर्वी दिशा दर्शक म्हणून सूर्य व चंद्राच्या साक्षीने ‘कमाल’ ( kamal – an ancient navigational tool ) यंत्राच्या साह्याने बोट चालवली जायची. तेच तंत्र व तेच यंत्र आता सुद्धा वापरणार आहेत.
ही बोट प्रथम मस्कत- कोची( भारत) येथे थांबून पुन्हा पाण्याच्या बाहेर काढून तिचा ढाचा तपासाला जाणार आणि तिचे चुणाम (anti fouling ) पाहून पुन्हा एकदा नवीन थर देण्यात येईल. नंतर श्रीलंका–पेनांग बेट–मलेशिया व शेवटी सिंगापूर येथे जुलै च्या मध्य पर्यंत पोहोचणार आहे. सिंगापूर येथे संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे. सिंगापूर व मस्कत ह्यांच्या सहर्कायाने ही बोट पुन्हा व्यापार उदीमाच्या स्मृतींना उजाळा देणारी ठरेल. तसेच पूर्वीच्या श्रमांना दिलेला सलाम आहे.
ह्या लिंक वर ह्याची माहिती आहे. ओमान सरकारने प्रत्येक घडामोडीची अत्यंत सविस्तर माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. जवळ जवळ साडे सातशे फोटो आहेत तसेच ह्या बोटीचा कप्तान सालेह सैद अल जाबरी ह्याचा व्हीडीओ सुद्धा आहे. काही खलाशी तर पहिल्यांदाच प्रवास करणारे आहेत. पण त्या सर्वाना काटेकोर पणे प्रशिक्षित केले गेले. कप्तान व त्याच्या सह खालाश्यांचे मनोधैर्य खूपच भक्कम आहे. बोटीवर त्यांचे खाण्याचे समान कुठे ठेवले असेल?. तसेच विश्रांती बोटीवर नेमकी कशी घेणार? पाण्याची साठवण कशी ठेवत असतील? अशा मला भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे ही साईट पाहून मिळाली.
फक्त दिलेल्या साईट वरच्या डाव्या बाजूच्या प्रत्येक बाबीवर आठवणीने क्लिक करून पहाच.
बोट बांधण्या पासून ते तिच्या प्रत्यक्ष प्रवास पर्यंत आपण पण अत्यंत आदराने सलाम करतो. अशा स्तुत्य प्रयत्नांना यश नक्कीच येईल. जगाचा नियंत्रा प्रत्येक धर्मात वेगळ्या नावाने असला तरी परंपरा जपण्याच्या ह्या आगळ्या वेगळ्या प्रवासासाठी शिडांना वाऱ्याची गती देईल. नारळी पुनवेचा सागराचा मान त्याला श्रीफळ अर्पून आपण ही कोळी बांधव समवेत सर्वांच्या शुभ सागरी प्रवासाची मनोकामना व्यक्त करतो.
यंदाच्या पुनवेला ओमान चे पण नावाडी सामील करूया. कारण देशाला सीमा आहेत, सागराला नाही व आपल्या सर्वधर्म समान संस्कृतीत पण मनाला बंध नाहीत. ओमान मध्ये पण सर्वाना आदराची वागवणूक मिळते कारण भारताशी बरीचशी मिळती जुळती परंपरा येथे ही आहे.
धन्यवाद ओमान सरकारचे व प्रवासासाठी ‘ज्वेल ऑफ मस्कत’ ला शुभेच्छा.
फेब्रुवारी 18, 2010 @ 21:49:32
स्तुत्य प्रकल्प आहे…
फेब्रुवारी 19, 2010 @ 14:22:46
आनंद,
मला अपडेट मिळाले की लगेच पोस्ट तयार केली. अजून तरी प्रत्यक्ष बोट बनवताना पहिली नाही त्यामुळे ही साईट विशेष आवडली.
फेब्रुवारी 18, 2010 @ 22:27:38
कुठलीही निर्मिती हि सर्वोच्च सुखाचा आनंद देवून जाणारी असते…
त्यातून एखाद्या बोटीची निर्मिती हि स्वताला होणा-या अपत्य इतकेच समाधान त्या खलाशांना देवून गेली असेल..
त्याच्या प्रवासासाठी सर्वांच्या शुभेच्छा आहेतच…
बोटीतून सफर करायची इच्छा हि खूप आहे..
titanic ने बोट काय आहे ते चित्रपटातून दाखवले.
बोट निर्माण करणे म्हणजे खावूचे काम नाही..
इथे जवळच दाभोळ परिसरात (६५ कि.मी.) भारती ship yard चे unit आहे..
तेथेही बोटी उभारणीचे काम चालते..
बोट बंधने म्हणजे काम आहे विराट
तिची तारांगायाची किमया करून जाते अचाट..
प्रवास दिमाखात करते अफाट..
चिरत जाते समुद्राची लाट न लाट
फेब्रुवारी 19, 2010 @ 14:26:17
अखिल,
बोट बांधणे हे जिकरीचे काम आहे. पण ह्या साईट मुळे बरीचशी कल्पना येते.
फेब्रुवारी 19, 2010 @ 03:23:10
मस्तच…ज्वेल ऑफ मस्कत’ ला माझ्यापण शुभेच्छा. लिंकवर फोटो आणि वीडियोस फार छान आहेत
फेब्रुवारी 19, 2010 @ 14:30:09
सुहास,
हा प्रोजेक्ट इतका व्यवस्थित त्यांनी साईट वर दिला आहे की पूर्ण प्रकल्पाची कल्पना कळते.
फेब्रुवारी 19, 2010 @ 08:33:40
sahi ch ki bharabhar post yayla lagalya parat keep it up …….. 🙂
फेब्रुवारी 19, 2010 @ 14:34:30
अश्विनी,
बोटीचा अनावरण सोहळा झाला आणि लगेच साईट वर माहिती आली म्हणून घाईत पोस्ट केली, नाहीतर बोट कोची ला पोहोचायची आणि मग माझे लिखाण व्हायचे. हा हा हा!!!!!.
फेब्रुवारी 22, 2010 @ 16:47:41
माझ्यापण मनापासुन शुभेच्छा ज्वेल ऑफ मस्कत’ ला ….
खुपच छान माहिती आहे त्या साइटवर…
फेब्रुवारी 24, 2010 @ 15:12:31
एकही खिळा, स्क्रू नसलेली बोट कशी बांधतात, त्याचे काम कसकसे टप्प्यात पूर्ण केले हे पाहणे खूपच छान वाटते. इतके डिटेल रेकॉर्ड हे किती उत्तम प्रकारे
ठेवतात. बोटीचा प्रवास व्यवस्थित सुरु आहे.
फेब्रुवारी 27, 2010 @ 00:44:54
मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
फेब्रुवारी 27, 2010 @ 18:37:29
साहसाची आवड ही मानवाला असतेच. आपले पुर्वज जसे जगायचे तसे जगणे शक्य आहे कां? याची चाचपडणी म्हणजे हे असे साहसी प्रवास. सिंदबादच्या सफरी वाचतच लहानाचे मोठे झालेली आपली पिढी, जमलं तर नक्कीच जाइन कोचीनला गेल्यावर बोट पहायला. 🙂 (अर्थात तेंव्हा काम निघालं तरच)_