ओमान ची गुहा…….

डोंगरात लुप्त असे असंख्य पाण्याचे स्त्रोत असतात. खडका मध्ये जिथे कमकुवत जागा असेल तिथून ते खाली झिरपत येतात. खडकात जर चुनखडीचे प्रमाण जास्त असेल तर त्या चुनखडीत पाणी शोषले जाते. कालांतराने तिथे जमिनी पासून वर चढत जाणारे ‘ऊर्ध्वमुखी’ व छतापासून खाली झेपावणारे ‘अधोमुखी’ लवणस्तंभ तयार होतात. ही प्रक्रिया वर्षानुवर्षे चालू असते. शेंदरी,पांढरा,सोनेरी, करडा, गुलाबी, बेज असे रंग येथील निसर्गाच्या कलाकारीत पाहण्यास मिळतात. अशाच प्रकीयेमुळे त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या गुहा तयार होतात.

‘अल हुता केव्ह’. Al Hoota Cave लवण स्तंभांची प्रेक्षणीय गुहा. मस्कत पासून ‘निझवा’ ह्या ठिकाणी ‘जबल अल शम्स’ म्हणून डोंगरांची रांग आहे त्याच्यातील ‘अल हजर’ डोंगरात ही गुहा पाहण्यास मिळते. एका मेंढपाळा ने शोधली आहे. दोन मिलिअन वर्ष जुनी आहे. साडे चार किलोमीटर चा परिसर ह्या गुहेत फिरण्यास मिळतो. ही गुहा पाहण्यासाठी ओमान ची पहिल्या ट्रेन ची सुरवात करण्यात आली. ही ट्रेन बऱ्याच वेळेला बंदच असते. चालण्याची तयारी ठेवावी लागते. गुहा पाहण्यासाठी आतमध्ये पायऱ्या बांधण्यात आलेल्या आहेत. २३० पायऱ्या चढल्यावर आपण गुहेच्या सर्वात उंच ठिकाणी म्हणजे ६५ मीटर उंची पर्यंत वर येतो. पुन्हा २०० पायऱ्या उतरून खाली यावे लागते. गुहा पूर्णपणे थंड असून हवेचा पुरवठा गुहेत खेळवला आहे. वाळवंटी परिसरात, विशेषतः डोंगरावर एकही झाड सुद्धा नसते. अशा ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात लुप्त असे पाणी असेल ह्यावर परिसर पाहून मुळीच विश्वास बसत नाही.

ह्या संदर्भातले एक उत्कृष्ट असे संग्रहालय प्रवेश द्वारापाशी आहे. अशा खडकात सापडणारी स्फटिके, खडकांचे विविध नमुने, येथील कीटक, असा संग्रह आहे. २.७ किलोमीटर लांब असे टनेल म्हणजे बोगदा आहे. नंतर आपण प्रत्यक्ष गुहेत प्रवेश करतो.
आद्रतेचे प्रमाण ९०% आहे. पाणी झिरपून अत्यंत नयनरम्य असे विविध आकार तयार झालेले आहेत. सिंह, जॉर्ज वाशिंग्टन ह्यांची चेहेरे पट्टी, माश्याचा आकार, मला तर तेथे गणपतीचा आकार सुद्धा स्पष्ट दिसला. आपण आपापल्या संस्कृती नुसार नजरेने पाहत असतो.
गल्फ मधील सर्वात मोठी केव्ह आहे. १८ डिसेंबर २००६ ला लोकांकरिता ओपन केली गेली. दरोरोज ७५० लोक भेट देतात. फोन करून तुम्हाला उपलब्ध वेळ व दिवस सांगितला जातो. प्रत्येकाचे रेकॉर्ड असते. गुहेतील ईको सिस्टीम बिघडू नये म्हणून ही खबरदारी काटेकोर पणे सांभाळली जाते.१०० लोक एका वेळेला पाठवले जातात. उच्छ्वासाचे चे प्रमाण वाढेल म्हणून ही खबरदारी घेतली जाते. तुम्हाला येथे बुकिंग करूनच जावे लागते. अचानक गेलात तर भेट करून देतील याची खात्री नाही.

येथे ८०० मीटर लांब व्याप्तीचे २३ डिग्री उष्ण तापमानाचे तळे आहे. तिथे अशा गुहेतल्या पाण्यात राहणारे आंधळे मासे आहेत. (Garra barreimiae) अशी जात त्यांची आहे. डोळ्याचे आकार आहेत पण डोळे अविकसित अवस्थेत असतात हे मासे अशाच प्रकारच्या जैव परिस्थितीत गडद अंधाराच्या पाण्यात असतात. विजेरीच्या साह्याने ह्यांना पाहावे लागते. संपूर्ण गुहा गाईड दाखवीत असतो. शांत गूढ हिरवे पाणी पाहून हे मासे बिन डोळ्यांचे खाणे कसे शोधत असतील असा प्रश्न मला पडला. ते बारीक जीव शोधून खातात असे गाईड ने सांगितले. पाण्यात नेहमीच ताज्या पाण्याचा पुरवठा सतत सुरु आहे. तसेच हे पाणी पुन्हा झिरपून दुसरीकडे जाते व पुढे कुठेतरी 'वादी' म्हणजे पाण्याचे अस्तित्व असलेली जागा तिथे बाहेर पडते.

इथे फोटो काढायला पूर्ण बंदी आहे. मोबाईल किंवा कॅमेराचा फ़्लॅश चालत नाही. ओमान गव्हर्मेंट ने काही फोटो उपलब्ध करून दिले आहेत. तसेच विशिष्ट परवानगी काढून असे शूटिंग केले जाते. त्यातीलच काही उपलब्ध अशा संग्रहातून काही फोटो मिळाले. ते इथे पोस्ट करीत आहे.

आवर्जून बघून यावी अशी ओमान ची अल हुता केव्ह आहे. वाळवंटी शुष्क भागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असताना पाणी मात्र जमिनीच्या अंतर्गत भागातून वाहत असते. पाण्याने तयार झालेली ही भव्य दिव्य गुहा बघणे म्हणजे शांत, थंड, गूढ वातावरणातील हा विसरू न शकणारा अनुभव निश्चितच आहे.

22 प्रतिक्रिया (+add yours?)

  1. sahajach
    फेब्रुवारी 17, 2010 @ 22:11:33

    ताई मस्त झालीये पोस्ट……आणि ही जागा माहित असल्यामुळे अजुनच मजा आली वाचताना…..आई बाबा आले होते तेव्हा गेले होते अल-हूटाला त्या आठवणी जाग्या झाल्या बघ!!!
    त्या मास्यांबाबत आमच्या गाईडने सांगितले होते की परिस्थितीनुसार जे नॅचरल ऍडाप्टेशन होते त्यानुसार त्या मास्यांचे डोळे कालौघात असे झालेले आहेत कारण त्या अंधारात त्यांना डोळ्यांचा काहीच वापर होत नसे!!!!!

    उत्तर

    • anukshre
      फेब्रुवारी 18, 2010 @ 07:55:25

      तन्वी,
      केव्ह पुन्हा पुन्हा जाऊन पहावीशी वाटते कारण प्रत्येक वेळेला नवीन सौन्दर्य लक्षात येते. ओमान मध्ये खूप पर्यटन स्थळे आहेत. अजूनही बरेच खूप काही छान मी पहिले आहे लिहीन नक्की…..

      उत्तर

  2. हेमंत आठल्ये
    फेब्रुवारी 17, 2010 @ 22:13:53

    पृथ्वीवर किती सुंदर आहे. आणि किती वैविध्यपूर्ण आहे. माहिती दिल्याबद्दल आभार

    उत्तर

  3. सुहास
    फेब्रुवारी 18, 2010 @ 03:36:57

    वाह…खरच काय सौंदर्य आहे ह्या पृथ्वीवर…आणि तायडे तू तर एकदम मस्तच चित्र उभा केलास ह्या गुहेच..लकी आहेस तू विज़िट केलास ह्या जागेला प्रत्यक्ष…हे फोटोस पीकासा वर अपलोड कर ना जमल्यास आणि लिंक शेअर कर 🙂

    उत्तर

    • anukshre
      फेब्रुवारी 18, 2010 @ 08:07:36

      सुहास,
      ओमान गव्हर्मेंट ने हे फोटो नेट वर उपलब्ध करून दिले आहेत. काल मी पोस्ट करताना ओमान टेल ची नोटीस येत होती की आपले लिखाण निरीक्षण केले जात आहे.

      उत्तर

  4. Ashwini
    फेब्रुवारी 18, 2010 @ 07:29:47

    sahi ch ekdam mast aahe hi mahiti … 🙂

    उत्तर

    • anukshre
      फेब्रुवारी 18, 2010 @ 10:51:16

      अश्विनी,
      मस्तच जागा आहे एकदम युनिक!!! बाहेर पडल्यावर काहीही बोलण्याच्या मनस्थितीत आपण नसतो इतके आवाक झालेले असतो. प्रत्यक्षात खूप भव्य दिव्यआहे.

      उत्तर

  5. gouri
    फेब्रुवारी 18, 2010 @ 10:01:03

    मस्तच महिती दिलीस … आखाती वाळवंटी देशात एकसुरी वाळवंटापलिकडे पाहण्यासारखं विशेष काही नसावं हा माझा (उगाचच असलेला) समज तुझ्या एकाहून एक पोस्ट बघून दूर होतोय 🙂

    उत्तर

    • anukshre
      फेब्रुवारी 18, 2010 @ 10:56:56

      गौरी,
      अजून ओमान बद्द्ल काहीच लिहून झालेले नाही. इथली प्रेक्षणीय पर्यटक ठिकाणे अफलातून सुंदर आहेत. स्वच्छ, सुंदर, पारदर्शक समुद्राचे पाणी व किनारे, इथले डोंगर, परंपरा. आणि खादाडी च्या जागा लिहिते आता धडाधड….वाचत रहा. खरच वाळवंटात पण खूप सौदर्य आहे हे मात्र इथे आल्यावर मलाही कळले. दुबई सारखा नुसत्या बांधकामाचा देश नाही तर अप्रतिम निसर्ग आहे.

      उत्तर

  6. Harshal
    फेब्रुवारी 18, 2010 @ 15:48:11

    खूपच सुंदर . . . नवीन माहिती मिळाली . . . खरच खूप अप्रतीम आहे .

    उत्तर

    • anukshre
      फेब्रुवारी 18, 2010 @ 16:08:16

      धन्यवाद हर्षल,
      मी पाहून खूपच स्तिमित झाले होते. पण इथे ओमान सरकारकडून पोस्ट किंवा नेट निरीक्षले जाते. तशी सूचना लगेच येते. पण बरेचसे फोटो नेट वर उपलब्ध सरकारने करून दिलेले आहेत. मला काही खुलासा करण्याची वेळ इथे येऊ नये म्हणून मी लिंक देत नाही. आपण पाहून आनंद नक्कीच वाढवू शकता.

      उत्तर

  7. akhiljoshi
    फेब्रुवारी 18, 2010 @ 16:41:02

    खूप छान आणि प्रेक्षणीय आहे सगळ..
    आपल्या भारतात असलेल्या एकूण गुहांपैकी ८० % गुहा
    या सह्याद्रीच्या range मध्ये आहेत..
    आणि मुख्यत: त्याचा वापर हा network सारखा केला जायचा..व्यापारासाठी …
    मुख्यत: पावसाळ्यात खूप पावूस असला कि सुरक्षित ठिकाणी राहणे वगैरे उद्देश असावेत..
    बुद्धकालीन किवा पांडवकालीन लेणी हि त्या हि कितीतरी आधी बांधली गेली असावीत..
    नित निश्कार्ताप्रात येताच नाही आपण… मतभेद इतके असतात कि नक्की सत्य काय ते कळायला खूप वेळ लागतो..
    कधी कधी सत्य काळातच नाही…

    असो लेख छान होता..म्हणजे आहे..
    उपयुक्त असा…

    उत्तर

    • anukshre
      फेब्रुवारी 18, 2010 @ 16:47:53

      अखिल,
      इतक्या दीर्घ विचार करून लिहिलेल्या प्रतिक्रिये साठी धन्यवाद शब्द पण अपुरे आहेत. ही गुहा मात्र अशा कारणाकरता होती असा काही उल्लेख आढळला नाही.

      उत्तर

  8. आनंद पत्रे
    फेब्रुवारी 18, 2010 @ 17:50:41

    सुंदर पोस्ट आणि छान माहितीकरिता धन्यवाद!

    उत्तर

    • anukshre
      फेब्रुवारी 18, 2010 @ 18:03:09

      धन्यवाद!आपणच म्हटल्यावर आता मी आभारी आहे असेच म्हणू शकते. जेव्हढे शक्य आहे तेव्हढे नक्की लिहिणार. माझ्या समवेत आपण हा आनंद घेऊ शकाल हेच मला सुखावणारे आहे.

      उत्तर

  9. Aparna
    फेब्रुवारी 20, 2010 @ 22:55:55

    गौरीशी सहमत आणि इथे अशा गुंफ़ा काही ठिकाणी आहेत आम्ही २००७ मध्ये एका ठिकाणी गेलोही होतो… Caverns म्हणतात…फ़क्त आता गाइडने सांगितलेलं सगळं विसरले आहे(chemistry behind it…)…कधीतरी नुस्ते फ़ोटो पोस्ट करेन शोधुन……

    उत्तर

    • anukshre
      फेब्रुवारी 21, 2010 @ 16:18:29

      फोटो पण मस्तच वाटतील पाहायला. सध्या ओमान बद्धल पोस्ट टाकायच्या असे ठरविले आहे नाहीतर पाहून बरेच दिवस झालेले असतात. मलाही विसरायला होते.

      उत्तर

  10. देवेंद्र चुरी
    फेब्रुवारी 22, 2010 @ 17:02:30

    मस्त दर्शन घडवलत ‘अल हुता केव्ह’ च…

    उत्तर

    • anukshre
      फेब्रुवारी 24, 2010 @ 15:05:52

      अल हुता केव्ह, खूपच मोठी आहे. ७ किलोमीटर पर्यंत मोठी आहे, त्यातील काहीच भाग पर्यटक करिता ओपन केला. ह्याचा एक व्हीडीओ पण गुगल ला आहे.जरूर पहा, छान आहे.

      उत्तर

  11. महेंद्र
    फेब्रुवारी 27, 2010 @ 18:40:45

    पर्यटकांना एक मेजवानी आहे ही गुहा म्हणजे. अगदी तिथे जाउन पाहिल्यासारखं वाटलं वाचतांना.

    उत्तर

  12. sureshpethe
    मार्च 23, 2010 @ 22:19:20

    ह्या नैसर्गिक गुहा व लेणी ह्यात खुप फरक आहे !लेख सुंदर व प्रेक्षणीय आहे…गुहेत हिंडवून आणल्याने मस्त वाटले.

    उत्तर

Leave a reply to Ashwini उत्तर रद्द करा.