वेळापत्रक आणि मी………

वेळापत्रक आणि मी हा सहसंबध खरे तर माझा जवळचा विषय. शाळेत असताना किंवा लहानपणापासून हे सर्व आठवणे म्हणजे असे काही उल्लेखनीय घडले नाही तर लिहिणार काय? हा एक प्रश्नच आहे. एक बरे असते की शाळेचे वेळापत्रक, आपल्या कार्यालयाचे वेळापत्रक हे ठरलेले असते म्हणून निदान ह्या दोन्ही ठिकाणी बरोबर वेळेत पोहचायचे. शिक्षिका असल्याने शाळेत विद्यार्थ्यांसारखे उशीर करून चालत नाही. वर्ग सांभाळायला पर्यायी शिक्षक असला तर ठीक नाहीतर वर्ग शिक्षिकेशिवाय तसाच राहू शकतो.

पण अशी अनेक वेळापत्रके केली व ती कधीच पूर्ण झाली नाहीत. कॉलेज ला असताना संध्याकाळी नियमित मैदानावर खेळायला जायचे कारण तसा नियम क्लब चा होता. वेळ पाळण्याचे बंधन असले की सगळ्या गोष्टी वेळेतच होतात. स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करिता एखादे ध्येय किंवा उद्दिष्ट पूर्ण करणे हे एकवेळ जमते. पण अशाच दुसऱ्या गोष्टी वेळ पाळून, नियम करून जमतातच असे नाही. अशा गोष्टी का झाल्या नाहीत म्हणून कारणे शोधणे म्हणजे आपलेच समाधान करून घेणे ठरते. सकाळचा ठराविक व्यायाम, चालणे,किंवा पोषण मुल्ये पाहून खाणे, आहारात प्रोटीन पाहून बदल करणे, अशा गोष्टींचा नादच सोडून दिला आहे. जे वेळेत जमत नाही ते उद्या पासून नक्की करू असे ठरवत असते.

अजिंक्य चा जन्म झाला आणि मला वयानुसार तान्ह्यांचे खाणे काय असते ही पुस्तके वाचण्याचा छंद लागला. आपले बाळ आरोग्यपूर्ण असावे म्हणून मी तो जसजसा मोठा होईल तसे अनेक पुस्तकांचा आधार घेऊन आईशी हिरहिरीने चर्चा करून अनेक पोष्टिक मुल्ये जपणारे असे त्याच्या खाण्याच्या वेळेचे पत्रक बनविले व स्वयंपाकाच्या दारावर लावुन ठेवले होते. त्याचा दिनक्रम, भुकेच्या वेळा इत्यादीचा कुशलतेने विचार करून अनेक डाळींचे रवे, पीठे, भाजी चे सत्व ह्याचे बारकाईने टिपण करून डोळ्यासमोर ठेवले. आई ऐकून घेत होती, रवा, पीठे वैगरे बनवून ठेवण्यासाठी मदत पण करत होती. पण स्वतःचे मत काही व्यक्त करीत नव्हती, मी विचारले तर म्हणाली तुमची पुढची पिढी, नवीन विचार चांगले आहेत.

इथेच माझे हे वेळापत्रक कोलमडले, कारण अजिंक्य ला सुरवातीला मी मोठ्या कौतुकाने भाताची पेज वैगरे भरवली पण आई पोळ्या करीत असताना त्याला पोळीचा छोटासा तुकडा तूप लावुन चघळायला द्यायची हा ही पठ्या माझे आधुनिक विचार केलेले खाणे फुर्र करून तोंडातून उडवायचा. भाजी केली की, छोट्याशा ताटलीत देऊन त्याच्या पुढे ठेवायची, मजेत भाजी चिमटीत पकडून खायचा. आपले पुस्तकी शहाणपण फारसे उपयोगाचे नाही हे समजून मी वेळापत्रकाचा कागद काढून टाकला. आईची पोष्टिक मुल्ये सोपी होती. आपलेच जेवण तेल, तिखट, मसाले कमी करून प्रथम बाळांना द्यायचे मग तो पदार्थ मोठ्या करिता बदल करून वाढायचा. आपण जेवत असताना त्यांना नेहमी आपल्या बरोबर जेवणासाठी बसवायचे आपोआपच चांगल्या सवयी लागतात. बाळ मोठे कधी झाले हे मलाच समजले नाही. सर्व घरचेच, पण बाळापासून ते वयस्कर पर्यंत सर्वाना आरोग्य पूर्ण व संस्कार सहित वदनी कवळ घेता म्हणून जेवणास सुरवात करून देणारे ठरले

अजिंक्य च्या अभ्यासाचे वेळापत्रक हे कायम अयशस्वी झालेले आहे. मी त्याला वेळापत्रक करून द्यायचे. आज हा अभ्यास पूर्ण करायचा आहे म्हणून उद्यापासून बघू असे वचन मला देतच राहिला. आता मात्र तो स्वतःचा अभ्यास स्वःताच करतो. काही अडले तरच मदत करावी लागते. ठराविक वेळी काही विषय आवर्जून करतो असे माझ्या लक्षात आले. त्याला विचारले तर म्हणतो कसा तूच आतापर्यंत किती वेळा मला अभ्यासाचे वेळापत्रक करून दिले त्यामुळे मी स्वतः अभ्यास करायला लागलो. संध्याकाळच्या वेळी खेळून आला की रात्री तो वाचन करतो व सकाळच्या वेळी लिखाण करतो.

मला वाटत होते की माझे प्रयत्न फुकट गेले पण त्यानेच वेळापत्रकाचे निरीक्षण करून स्वतः ही जवाबदारी घेतली हे पण माझ्या अयशस्वी वेळापत्रकाचे यश म्हणावे लागेल. बरेच वेळेला वाटते की शाळेतले प्रोजेक्ट्स आपल्यालाच पूर्ण करावे लागतात. मुले कधी करणार हा प्रश्न पडतो पण ती एकटी करायला लागतात तेंव्हा समजते की त्यांनी आपली निरीक्षणं करून ठेवली होती. मुलेच आपल्याला धीर देतात. स्वतः ते कधी शिकतात ते आपल्याला समजत नसते. असा हा दुसरा वेळापत्रकाचा प्रयोग.

सकाळच्या वेळेत चालणे हे आरोग्यदायी नक्कीच आहे पण हे मला काही निग्रहाने जमत नाही. काल झोपच पूर्ण झाली नाही, कंटाळा आला, नाहीतर सकाळची कामे डबे तयार करणे कोण करणार इत्यादी कारणे माझीच मला मी देत राहते. स्वतःचे वेळापत्रक अजूनही जमत नाही. कामाला निघायचे त्याआधी घरातील सर्व कामे लगबगीने पूर्ण करावी लागतात. कामाचे नियोजन मात्र जमावेच लागते कारण कार्यालयात वेळेवर पोहचायचे असते. सध्या एक विम्याची जाहिरात सतत दाखवतात त्यात कर्मचारी आरोग्याच्या काळजीने व्यायाम करतात. जाहिरातीसारखे दरोरोज कामाच्या ठिकाणी काही वेळ आलटून पालटून प्रत्येकाला असे व्यायाम प्रकार करावयास कार्यालयातच जागा ठेवली किंवा एखादे छोटेसे जिम ठेवले, किंवा मार्गदर्शनाने योगासने करून घेतली तर? अशक्य बाब आहे पण प्रत्यक्षात आली तर आरोग्यम धनसंपदा असा कर्मचारी वर्ग तयार होईल.

तसेच जेवणाच्या वेळेत सलाड, कोशिंबिरी असे पोष्टिक मुल्ये जपणारे पूरक अन्न पुरवठा (घरगुती ऑर्डर) करून डब्याच्या सोबत घेतले तर दुपारचे जेवण उरकणे न राहता, उत्साह वाढवणारे ठरेल. अर्थात बरेच कर्मचारी सहभागी असले तर सहज शक्य होईल. असे माझे व्यायामाचे वेळापत्रक कार्यालयात करता येईल का म्हणून आशेवर राहिले आहे. तसेच सलाड वैगरे पैसे देऊ पण आयते मिळू दे अशा इच्छे वर तग धरून आहे.

अजिंक्य वडिलांच्या पावलावर पाय ठेवून पक्का खवय्या झाला आहे. सध्या मी घरचे मेनू आठवडी प्रमाणे करण्याचे नवीन वेळापत्रक ठरविले आहे. महिन्याचे साधारणपणे चार आठवडे त्या प्रमाणे एक आठवडा पंजाबी, गुजराथी, चायनीज, मराठी व पाचवा आठवडा आलाच तर कॉनटीनेनटल असे नाश्ता, जेवण त्या त्या पद्धतीचे करायचे असे ठरविले आहे. आतापर्यंत तरी घरी माझ्या नवीन कल्पनेचे ह्या दोघांनी स्वागत केले.

सध्या गुजराथी आठवडा सुरु आहे त्या प्रमाणे फुलके, ज्वार बाजारांनी रोटली, खिचडी, कढी, ढोकले, खमणी, उंधियो असे प्रकार करून झाले. गुजराथी पद्धतीची भाजी, त्यात कच्छ असा प्रदेश पण मी सहभागी करून घेतला आहे. पण मलाच मध्येच पिठलं भाकरी करावी असे वाटू लागले आहे. नवनवीन वेळापत्रके करून माझीच मी मोडत असते. वेळापत्रके बनवण्याची हौस काही पूर्ण होत नाही. असे माझे उत्साहपूर्वक प्रयोग कोलमडतात, पण बनवता येतात हा तरी आनंद आहेच.

अजिंक्य ला प्रांतीय मेनू कळावेत व आई पण सुगरण आहे हे दाखवायचा सुप्त हेतू आहेच.खवय्ये हे उत्तम खाणे असेल तर विना तक्रार मजेत असतात. म्हणून माझा हा आटापिटा चाललेला असतो. आठवडी मेनू ठरला असला तर आधीच तयारी करून ठेवता येते. माझ्या ह्या वेळापत्रक मुळे हे दोघेही खुश आहेत. त्यात पण माझे शाकाहारी व त्यांचे सामिष असे दोन्ही मेनू करीत असते. सकाळी कामाला निघण्या आधी दिवस भराचे खाण्याचे नियोजन करून तशी तयारी करून असते. खाण्यात प्रांतीय वाद माझे घर मानत नाही. सर्व जाती धर्माच्या खाण्याला समान वागणूक मिळते. मला ह्या दोघांच्या उत्साहाकरिता हे वेळापत्रक कसोशीने अमलात ठेवले पाहिजे.

माझ्या ह्या अभूतपूर्व अनेक वेळा पत्रकांमुळे ह्यांना नवीन वर्षाच्या संकल्पना म्हणता येणार नाही कारण अनेक वेळा पत्रके मला गरजे प्रमाणे सुचतात. कधीही एक जानेवारीला मी काहीही ठरवत नाही. कारण पूर्ण वर्ष नवनवीन संकल्पना नव्हे तर वेळा पत्रके मी बनवत राहते. आता मात्र सकाळी जमत नाही म्हणून संध्याकाळी आवर्जून हेल्थ क्लब ला जाते. मदती करिता कामाला मुलगी ठेवली आहे. नवीन अत्याधुनिक उपकरणांची मदत घेऊन पूर्ण होणारी नवीन वेळा पत्रके बनविणार आहे.

Advertisements

23 प्रतिक्रिया (+add yours?)

 1. akhiljoshi
  Feb 11, 2010 @ 15:10:27

  अनेक वेळापत्रके हि कोलमडणारी असतात,
  किवा जे वेळा पत्रक वापरतात.. ते काट्यानुसार काम करतात..
  आपण त्यातले नाही असे एकदा कळले कि वेळापत्रक न आखता
  उत्स्फुर्तपणे मेंदूच्या घड्याळानुसार काम करणे..
  कारण वेळापत्रकाप्रमाणे वागणाऱ्या गटात काम करणारी मनसे असतात..
  पण त्यांना वेळ दाखवण्यासाठी घड्याळ चालू असावे लागते आणि त्यासाठी
  चावी देण्याचे काम काही माणसांनी करावे लागते..
  कदाचित त्यासाठीच आपला जन्म झाला असावा…
  काहीजण तर (म्हणजे माझ्यासारखे ) कि by hooks or by crooks
  काम वेळेतच पूर्ण होत. पण आता वेळापत्रक पाळूनच ते काम पूर्ण होते असे नाही..
  पण ठराविक वेळेच्या आतमध्ये पूर्ण होते हे निश्चित..
  लोड शेडींग वगैरेचा प्रोब्लेम असला तर दिवसाचे वेळापत्रक कोलमडते पण शेवटी रात्री जागून काम केले तर
  ते वेळापत्रकात बसत नसले तरी दिलेल्या वेळेच्या आतच काम होते. त्यामुळे शेवटी
  बाकी लेख उत्तम..
  वेळापत्रकानुसार लेख ब्लोग वर आला… आणि कदाचित वेळा पत्रकानुसारच माझी पहिली comment आली आहे..

  प्रत्युत्तर

  • anukshre
   Feb 11, 2010 @ 15:18:09

   अखिल,
   प्रतिक्रिया खरच पहिली आली मंजूर लगेचच केली. धन्यवाद !!! प्रतिक्रिया नेहमी प्रमाणे मार्मिक आहे. आवडली.

   प्रत्युत्तर

 2. akhiljoshi
  Feb 11, 2010 @ 15:12:07

  माझ्या आईंचे स्वताचे असे वेळापत्रक नव्हते.. ती तिचे काम करत होतीच… पण आमचे वेळापत्रक जमविताना
  स्वताच्या वेळापत्रक कडे दुर्लक्ष केले म्हणून आमची घडी (मराठीत घड्याळ म्हणू शकता ) नीट बसू शकली आहे..

  प्रत्युत्तर

 3. Ashwini
  Feb 11, 2010 @ 15:44:51

  chan ga …. ekdam mast ..vela patrak asave pan tyat tya vele chi garaj olkhun badal karay chi munbha asavi 🙂

  प्रत्युत्तर

  • anukshre
   Feb 11, 2010 @ 15:51:22

   ह्नं खरय तुझे अश्विनी, आपल्या स्वान्त सुखाय साठी असावे सर्व नियम. परिस्थिती प्रमाणे लवचिकता त्यात असावी.

   प्रत्युत्तर

 4. gouri
  Feb 11, 2010 @ 21:10:47

  नवीन वर्षाचा संकल्प मलाही कधी करता येत नाही … कारण मनात आलं की ते लगेच त्या क्षणी अंमलात आणायची घाई असते … नव्या वर्षापर्यंत थांबलं तर त्यातली गंमत संपून जाते ना 🙂

  प्रत्युत्तर

  • anukshre
   Feb 12, 2010 @ 09:18:38

   संकल्प करणे ह्या विषयवार बोलणे सुद्धा मला अवघड आहे. मी पण तुझ्यासारखेच गरजेनुसार ठरवत असते. मजा लवकर संपते हे मात्र पटले.

   प्रत्युत्तर

 5. ╚» विशाल तेलंग्रे «╝
  Feb 11, 2010 @ 21:18:00

  वेळाऽऽपत्रक आणिऽऽ मीऽऽऽऽ….! छत्तीस चा आकडा आहे, इंजिनिअरिंगला लागण्याअगोदर बारावीपर्यंत मी नुसते वेळापत्रकं बनवू बनवू परेशान होतो, एक ते दीड तास नुसतं प्लॅनिंग करण्यामध्ये जायचा, पुढचा १ तास त्याच्या डिजाईनमध्ये (रंगरंगोटी वगैरे टाईमपास!) ….. मग काय, भिंतीवर टाईम टेबल लावला की बघायचं सध्या काय करणं आहे, ओह्ह, शीट्टऽऽऽ, हे आत्ताच करायला हवं का?? अन त्यासाठी एवढा वेळ? १५-२० मिनिटं करतो, जास्त करायची गरज नाही, असं स्वतःलाच म्हणवून घेत त्या वेळापत्रकाचा बट्ट्याबोळ करून टाकायचो… गेल्या वर्षीपासून मात्र मी हे सगळं थांबवलंय, पण जेव्हा परिक्षा येतात, त्यावेळी कमी वेळेत सर्व अभ्यासक्रम कसा पूर्ण करता येईल (रीव्हाईज नाही बरं का!! 😉 ) यासाठी मात्र घंट्यापरत वेळापत्रक बदलते! 🙂

  ताई तू गृहीणी + आई + शिक्षिका आहेस, तुला मात्र वेळापत्रकांशिवाय पर्याय नाही! पण त्यामुळे स्वतःमध्येच जागृत होणारा “धाक”, म्हणजेच वेळापत्रकानुसार कोणतीही गोष्ट पार पाडण्यासाठीचे मानसिक दडपण, प्रत्येकाला आवश्यक असते. मी तो “धाक” अजुनही जागृत करू शकलो नाही, याचा जरास विरह आहे.

  अजिंक्य तुझ्या निष्फळ झालेल्या वेळापत्रकांचा बोध घेत पुढे अतिशय छान गोष्टी शिकला, ही गोष्ट खरंच खुप कौतुकास्पद आहे! यावरून मी मात्र एक गोष्ट शिकलो की, कोणतीही गोष्ट यशस्वी झाली तरच ती योग्य असते असे नाही, काही गोष्टी अयशस्वी होऊनही खुप काही मोठ-मोठाली अनिश्चित कामे करून जातात.

  बाय द वे, अजिंक्य किती वर्षांचा आहे आता, त्याचा वाढदिवस कधी असतो गं..?

  विशल्या!

  प्रत्युत्तर

  • anukshre
   Feb 12, 2010 @ 09:23:27

   विशाल,
   समर्पक प्रतिक्रिया दिलीस. मला काय मेसेज द्यायचा होता हे मात्र तुला छान समजले. मी तुला उद्या मेल पाठवते आज इकडे वीक एंड असल्याने नेट स्लो आहे. बाकी सर्व गप्पा मेल वर करूया. प्रतिक्रिया मात्र अतिशय योग्य दिलीस.
   ताई

   प्रत्युत्तर

 6. सुहास
  Feb 12, 2010 @ 03:44:06

  तायडे,
  आपला आयुष्य असे असंख्य वेळापत्रक सांभाळतच जात…
  शाळा-कॉलेजच्या तासांचा वेळापत्रक, परीक्षेचा वेळापत्रक, अभ्यासच वेळापत्रक, ट्रेन-बस चा वेळापत्रक, ऑफीसचा वेळापत्रक, महिन्याच्या खर्चाच वेळापत्रक,…अश्या किती किती प्रकारे आपण गोष्टी एक्सिक्यूट करत असतो ह्या वेळापत्रकामुळेच.
  पोस्ट मस्तच नेहमीप्रमाणे 🙂 🙂

  प्रत्युत्तर

  • anukshre
   Feb 12, 2010 @ 09:34:11

   सुहास,
   आयुष्यातली अनेक वेळापत्रके सांभाळण्यातच बराचसा वेळ खर्ची पडतो. काही यशस्वी होतात तर काही अपूर्ण राहूनही बरेच काही शिकवून जातात. खास धन्यवाद “तायडे” करिता…… हे खर मनापासून बोलणे झाले. अतिशय आवडले!!!

   प्रत्युत्तर

 7. rajashri
  Feb 12, 2010 @ 09:51:46

  hi,

  tuja kalpana & anubhav kadhich aamchya pasun dur nako tevus asech tuja bolg madun sangt ja. khup bare vatte marathi vachun.
  ho aani tuza muda velapatrk. kharch aaushat kadhi vagla yet nahi velapatrkane.
  aapn ek velaptrak aakhto, aani tyache kahitri veglch houn jate.
  mi fakt shalet astana velapatrkcha vapar kela pan tyat pan nehami chukiche velaptrk ghyeun jaychi, tyamule mala nehmi shikankdun orda & panishment milaychi.
  aabhari aahe tuji ki khup chhan anubhav sangitles.

  प्रत्युत्तर

  • anukshre
   Feb 12, 2010 @ 10:30:38

   राजश्री,
   इतक्या कौतुकाने आवर्जुन प्रतिक्रिया दिलीस ह्याचाच आनंद खुप मोठा आहे. अभिप्रायातले भाव महत्वाचे आहेत. तू अशा इंग्लिश पण मराठी प्रतिक्रिया दिल्यात तरी काहीही फरक पडत नाही. पण तुला जर मराठीतच देण्यासाठी त्रास होत असेल तर http://www.google.com/transliterate/ ही साईट तुला माहिती असेलच.
   कसे ही तुझ्या सोइने व सवडीने प्रतिक्रिया देत जा. मला इथून तुमचे स्पेलिंग एडीट करता येते. त्या प्रमाणे मी करते. बऱ्याच वेळेला ऑफिस मध्ये घाईत एखादा शब्द राहून जातो. मी समजू शकते,पण मी शिक्षिका असल्याने सर्व वाचून पाठवते. बिनधास्त पाठवत जा. मस्कत मध्ये एकत्र असताना पण एव्हढे बोललेले नसू, दूर गेल्याने जवळची माणसे कळतात हेच खरे. धन्यवाद म्हणणे खरे तर खूप ओपाचारीकता ठरेल पण पहिलीच प्रतिक्रिया असल्याने तुझे ‘अनुक्षरे’
   मध्ये स्वागत!! अभिप्राय बद्धल खूप खूप आनंदाने आभार!!!

   प्रत्युत्तर

 8. rajashri
  Feb 12, 2010 @ 09:54:25

  maze kahi lihitan chukle asel tar maf kar karn. ha maza pahilach anubhav aahe, mi pahilyancdach cooments dete aahe.

  प्रत्युत्तर

 9. हेमंत आठल्ये
  Feb 12, 2010 @ 13:13:36

  खूपच छान. वेळापत्रक सगळ्याच गोष्टीत असत. तो आपल्या जीवनाचा एक भाग आहे. छान नोंद आहे.

  प्रत्युत्तर

 10. sahajach
  Feb 12, 2010 @ 15:32:51

  ताई खरय़ं तुझं बरेचदा बनवलेले वेळापत्रक कोलमडते….मुलं लहान असताना तर ती शक्यता जास्त!!!!

  पोस्ट छानच झालयं पण मला एकच सांगायचेय तुझ्या गुजराती आठवड्यातली कढी माझ्या घरापर्यंत येउनही खायची राहिली… 😦
  अमितने मिटक्या मारत खाल्लीये आणि मला सारखे बोलुन दाखवतोय……हेहे…

  प्रत्युत्तर

  • anukshre
   Feb 12, 2010 @ 21:55:00

   साधी कढी आणि खिचडी होती. अमितला आवडली न मला आनंद झाला आणि हो पुन्हा पण पाठवीन असा काय विशेष मेनू नाही आहे हा.

   प्रत्युत्तर

   • sureshpethe
    Feb 14, 2010 @ 16:15:39

    …..आणि मेनू विशेष असेल तरी ’ हवाच ’ असेल तर सांग अनुताई घरपोच करेल,

    …फक्त ते वेळापत्रकात बसवून द्यावे/घ्यावे लागेल .. म्हणजे उगाच कोलमडायला..आणि कडमडायला नकॊ !

    हे चांगले आहे तुम्हा दोघींचे परस्परात…याच दोघी इकडे मग बघतो !!

    पण ही वेळात वेळ काढून वेळापत्रक करण्याची संवय मात्र कधीही चांगलीच…किती वेळा कोलमडायला झाले हे तरी नक्कीच कळेल ना त्यामुळे !!

   • anukshre
    Feb 14, 2010 @ 21:08:09

    काका,
    आपणाला नक्कीच भेटणार आहोत. आवर्जून पोस्ट ला भेट दिलीत खूप आपलेपणा जाणवला…..

   • sureshpethe
    Feb 17, 2010 @ 07:25:24

    आमच्या दोघीत मध्येच का लुडबुड केलीत म्हणून झापले नाहीस ह्याबद्दल धन्यवाद !!

   • anukshre
    Feb 17, 2010 @ 07:37:43

    काका हे काय भलतंच!! आपण मोठे आहात आपला अधिकार आहे अस झाले तर मी भाग्यवान समजेन, कोणी तरी मला आपलेपणाने सांगतंय हेच तर दुर्मिळ झाले आहे. काही चुकत असेल तर खुशाल कान पकडा, हा आपल्या स्वभावातला निर्गवी पणा आहे म्हणून तर मी पण काका म्हणतेय न…………

 11. महेंद्र
  Feb 27, 2010 @ 18:49:13

  वेळा पत्रक हा तर जीवनाचा अविभाज्य अंग आहेच – असलं की अडचण, नसलं की खोळंबा..

  प्रत्युत्तर

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: