अमीर ची शाळा…….. शिक्षकांची शाळा

थ्री इडीयट, एकदाचा पहिला. हा सिनेमा पाहावा का? कुठल्या वयाला हा सिनेमा पाहणे योग्य आहे? वास्तव जग असेच असते का? ह्या वर अनेक ठिकाणी चर्चा झालेली आहे. प्रत्येकाचे मत,आवड वेगवेगळी असते. माझा मुद्दा असा आहे की, अमीर ला शाळा, किंवा कॉलेज ज्या पद्धतीने असावे असे वाटत होते. त्या ‘त्याच्या शाळेचे’ चित्रीकरण फार कमी दाखवले आहे. सायकल वर मोटर चालवून गिरणी दाखवली आहे, असेच काहीसे सायन्स वर आधारित त्याच्या शाळेचे प्रयोग फार घाईने दाखवले गेले. लहान मुले दिव्याची वायर सोडून खाली सोडतात, तिथल्या उभ्या व्यक्तीला आरोग्याच्या दृष्टीने काही घातक परिणाम तर होत असेल का? ह्याचे प्रयोग पण लहान मुलांनी अनुकरण करण्याची भीती वाटते.

अमीर ज्या होस्टेल ला राहत होता तेथील रेक्टर कधीच दिसले नाहीत? होस्टेल ला दारू सहज उपलब्ध असते? अजिंक्य चे पुढे येणारे प्रश्न मला भेडसावू लागले आहेत. मुले आत्महत्या करतात, पोलीस चौकशी नाही? घरी आल्यावर आम्ही अजिंक्य शी चर्चा करायचे ठरविले, तोच आपणहून म्हणाला, आई मला जगात वाईट काय आहे ह्याची कल्पना आहे. मी असले सीन कधी मनावर घेत नाही. पण छोट्या मुलां करिता अवघड आहे. असे बरेच वादादीत मुद्दे आहेतच. मी शिक्षिका असल्याने मला शाळेचे चित्रीकरण ह्या मुद्द्या वर जास्त भर असावा असे वाटले असावे.

अमीर च्या शाळेने जे काही ओझरते प्रयोग दाखवले, त्यावरून मी माझ्या पूर्वीच्या शाळा जगतात मनाने गेले. प्रत्यक्ष असे अनेक प्रयोग मी स्वतः शाळेत राबविले आहेत. जेंव्हा वार्षिक शास्त्र प्रयोग प्रदर्शन असते तेंव्हा शास्त्र शिक्षक व वर्ग शिक्षक ह्यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी प्रयोगाचे सादरीकरण करतात. मला मुळात स्वभावतः प्रतिकृती बनवण्याची विशेष आवड आहे. माझ्या शाळेने मला पूर्ण संधी दिली. मी प्रदर्शनाची तारीख कळली की, मुलांच्या घोळक्यात कायम असायचे, त्यांच्या कल्पना, काही माझे बदल असे करीत मी ज्या मुलांना मार्गदर्शन केले ते विद्यार्थी आंतर शालेय पासून ते राष्ट्रीय स्तरावर बक्षीस पात्र ठरायचे.

मला मात्र कधीच मार्गदर्शक शिक्षक म्हणून खात्या तर्फे प्रमाण पत्र मिळाले नाही. कारण मी शास्त्र विषयाची शिक्षिका नाही. असे आपले शिक्षण खाते नियम बद्ध आहे. शाळेने, माझ्या सहकारी शिक्षकांनी, माझ्या विद्यार्थ्यांनी कायम माझा गौरव करून मला नेहमीच प्रोत्साहित केले. तुम्ही ज्या विषयाच्या शिक्षिका म्हणून सरकारी नोंदीत आहात त्या विषय पुरतेच पहा. असा नियम असल्याने शिक्षकांची इतर विषयाची आवड खुंटली जाते. आपल्याला काही मिळणार नसेल तर का करा? असा प्रश्न काही सहकारी मला विचारायचे. ज्याचा तो पाहून घेईल. साहजिकच आपल्या आवडीला आपणच कुंपण घालणे होय. माझ्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळते, आपल्या शाळेचे नाव आज राष्ट्रीय स्तरावर घेतले जाते हि माझ्या सन्माना पेक्षा खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही करा, आम्हाला ह्यात घेऊ नका. असे ही सल्ले मी पचवलेत. पण स्वभावानुसार असलेली मूळ आवड मला धडपड करावयास भाग पाडते.

मी सायकल च्या सीट मागे असलेल्या कॅरिअर वर पाणी ओढ्ण्याकरिता असलेली मोटर ठेवली. ह्या मोटर ची जोडणी सायकल च्या चाकांशी केली. विजेची मदत न घेता, जसे सायकल ला पायडल केले जाईल तशी मोटर कार्यान्वित होऊन पाणी साठवलेल्या टाकीतून ओढून बागेत ठिबकसिंचन पद्धतीने पाठविता येईल. ही प्रतिकृती प्रत्यक्ष चालवून दाखविता येत होती.आपल्या संकुलाच्या जिन्याच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवताच खालच्या टाकीतले पाणी वरच्या टाकीत येऊन पडेल. अशी रचना पायरीची करून दाखविले होती. जेणे करून विजेची बचत होऊन पाणी सुद्धा मिळेल.

आता सुद्धा अमीर ने दाखवलेली स्कूटर वरची गिरणी स्टार माझा ने गेल्या वर्षी जळगाव च्या पेंटर व्यक्तीने केली आहे म्हणून बातमी दाखवलेली होती. तीच गेल्या वर्षीची बातमी पाहून तर अमीर ला चित्रपटाची कथा सुचली तर नसेल. असो शाळा हा जिव्हाळ्याचा विषय आहे. ह्याचे फोटो शाळेत कदाचित असतील. मिळतील तेंव्हा दाखवीन. पण पोस्ट लिहिण्याचे अडू नये म्हणून लिहिले. आपल्या आठवणी ह्या फोटो पेक्षा खूप जवळच्या असतात. आता सुद्धा मी वेगवेगळ्या माध्यमातून प्रतिकृती बनवीत असते. मला बी.एड. महाविद्यालयात असताना मुंबई विभागाचे प्रथम पारितोषिक मिळाले. शिक्षणाच्या अध्ययन प्रक्रियेत प्रतिकृती द्वारा उलगडा सहज सोपा होतो.

माझा विषय पर्यावरण, भूगोल मग शास्त्र विषयात लक्ष घालण्याचे काम नाही असा सरळ धोपट मार्ग अवलंबिला जातो. पण मी प्रतिकृती म्हंटले की कुठल्याही विषयात सहभागी होत होते. बक्षीस, पुरस्कार हा विचार मनात येऊन दु:खी कधीच झाले नाही. माझी शाळा, माझे शास्त्र विषयाचे सहाध्यायी शिक्षक नेहमीच मला प्रोत्साहन देत होते. सगळ्यात महत्वाचे होते की, मला विद्यार्थ्यांबरोबर काम करावयास मिळायचे. नामांकन, लोकप्रियता याची गणिते माझी आयुष्यात कधी उत्त्पन्न झालीच नाहीत. माझा विषय शास्त्र शाखेशी पण जवळचा आहे. प्रोजेक्शन करून प्रतिकृती बनविणे हे तर माझ्या आवडीचे काम आहे. माझा विषय पूर्ण जगात कुठे ही नोकरी देऊ शकतो.

भूगोल विषय हा प्रात्यक्षिक केल्याशिवाय पूर्ण करता येत नाही. दूरस्थ शिक्षण याचे घेता येत नाही. सर्वांनी दुर्लक्षिलेला हा विषय पण मला कधीच नोकरी शिवाय घरी बसावे लागले असे झाले नाही. सरकारी नोकरी, शाळेपासून ते महाविद्यालयात अध्यापक म्हणून सहज काम करता येते. कंपनी मध्ये पण पर्यावरणाचे मापदंड सांभाळावे लागतात. अशा कंपनीत पण नोकरी मिळते. जगमान्य विषय पण त्याची व्याप्ती बरीच मोठी आहे. पण आपल्या शिक्षण खात्याने माझ्या सारखे असे अनेक शिक्षक असतील. त्यांना विषयानुसार गृहीत धरल्याने काम करण्यास मर्यादा घातल्या आहेत. हा दृष्टीकोन जर खात्याने बदलला तर अशा प्रायोगिक गोष्टींवर भर देणारे अमीर सारखे शिक्षक आपसूकच तयार होतील. नुसता अभ्यास क्रम बदलून ताण विरहित अभ्यास होणार नाही त्यासाठी शिक्षक म्हणून सरकारने घातलेल्या मर्यादांचा पण पुनर्विचार करावयास हवा.

ठराविक पठडीतून शिक्षक जात असतात. त्यांच्या कौशल्यांना, आवडीला वाव मिळाला पाहिजे तरच अध्ययन हे खाते वाटपासारखे साचे बंद होणार नाही. विषय हे एकमेकांना पूरक असतात. शिक्षकाच्या काम करण्याऱ्या क्षमतेला संधी अधिकृत पणे द्या तरच निकोप वातावरणात शिक्षक पण राहतील. एखाद्या शास्त्र शिक्षकाला जर कलेची आवड असेल तर शाळेत व शिक्षण खात्यात त्याला योग्य ती संधी मिळणे आवश्यक आहे. किती वर्ष आपलेच विषय कवटाळून बसणार? मग अध्ययन व अध्यापिकता ही कंटाळवाणी होते.

साचेबंद काम हे सरकारी नोकरीत, खाजगी नोकरीत करावे लागते. शिक्षण खात्यात अशी मनोभूमिका अमीर च्या चीडचीडेला कारणीभूत ठरते. आज अमीर च्या ठिकाणी अनेक शिक्षक आहेत. कंटाळवाणी अभ्यास पद्धती विद्यार्थ्यांची आहेच पण शिक्षका करिता पण आहे. विषय ज्या त्या शिक्षकाने शिकवणे योग्य आहे. काही स्पर्धा ह्या शिक्षंका करिता असतात. परंतु गणिताच्या सरांनी जर चित्रकलेच्या स्पर्धेत मुलांना मार्गदर्शन केले तर ते ग्राह्य धरले जात नाही.

मी वर्गशिक्षक असल्याने मी जर गणिताच्या काही स्पर्धा करिता मार्गदर्शन केले तर त्या विद्यार्थ्यांना स्पर्धेला पाठवताना गणित शिक्षकाचे नाव घालावे लागते. असे शिक्षण खाते नियमात कटी बद्ध आहे. मग कोणता शिक्षक अशी फुकटची कामगिरी करेल. शिक्षक पण माणूस आहे. विद्यार्थ्यांकरिता करणे हे खूप त्यागाचे लक्षण आहे अशी झळाळी, अशी लेबले म्हणजे आपले टॅग लावणे सोपे आहे पण ज्याचे जळते त्यालाच कळते. खऱ्या, सच्च्या शिक्षकाला मान सन्मान काय महत्वाचा? माझी मनोभूमिका सगळ्यांनाच पटणारी नक्कीच नव्हती. आपले नाव नसले म्हणून काय झाले? प्रश्न विचारणे सोपे होते पण आजच्या काळात व्यवहार्य नक्कीच नव्हते.

अशी अमीर ची शाळा सर्व शिक्षकांना नक्कीच आवडेल. पण त्यातील काही प्रयोग मात्र टाळले तर चांगले होईल. कारण मुलांबरोबर शिक्षकांचा पण साचेबंद शिक्षण पद्धतीत कोंडमारा होतोच आहे. विषय आपल्या शिक्षणा प्रमाणेच शिकवावा पण इतर विषयांशी त्याची जोडणी ही काळाची गरज आहे. ज्या ठिकाणी शेती हा प्रमुख व्यवसाय तेथील भागाचा आहे तिथे शेती विषय अभ्यासास असावाच. शहरी भागात छोटे व्यवसायभिमुख विषय असावेत.

असे बदल झाले तर ऑल इज वेल….आपण सुद्धा म्हणू शकू. अमीर ची शाळा खऱ्या अर्थाने शिक्षकांच्या मनातील शाळा होय.

Advertisements

29 प्रतिक्रिया (+add yours?)

 1. सुहास
  Jan 19, 2010 @ 17:55:50

  खरय, शिक्षकाच्या दृष्टीकोणातुन मांडलेले तुमचे विचार पटले. एवढा गांभीर्याने विचार खरच मनात आला नव्हता. मग करमणुकीचा भाग सोडला शाळेचा तर ऑल वाज़ नॉट वेल

  प्रत्युत्तर

  • anukshre
   Jan 20, 2010 @ 08:30:02

   सुहास,
   ह्नं!!! अस आहे शिक्षकांचे शाळा रेटणे कारण खात्याच्या, मंत्र्याच्या ताब्यात शाळा असते. असे अनेक कल्पक शिक्षक मला माहिती आहेत की जे आपल्या विषय पुरते अडकून पडले आहेत. शिक्षकांचा पण ह्या शिक्षण पद्धतीच्या नियमात कोंडमारा होतोच.

   प्रत्युत्तर

 2. विशाल तेलंग्रे
  Jan 19, 2010 @ 18:45:43

  ताई, मनापासून खुप आवडला हा लेख… एकंदरीत खर्‍या शिक्षकाच्या मनात नेमकं काय असतं हे कळालं… मी सध्या अभियांत्रिकी करतोय, तेव्हा मला सुद्धा माझे काही अनुभव आठवले माझ्या शालेय काळातील… तु म्हणतेयस, तसे(तुझ्यासारखे), शिक्षक बहुदा खुपच कमी पाहण्यात येतात. बहुतेक शिक्षकांकडून अजुनही विद्यार्थ्यांना असंच सांगण्यात येतं की कोणत्याही विषयाचं खोलवर ज्ञान घेण्यापेक्षा सगळ्याच विषयांचे थोडे-थोडेच ज्ञान घ्यावं… म्हणजे त्या विषयांचा गुलाम बनावं… हे ठिकही असू शकतं, पण मला नाही पटत…

  अजुन एक सांगायचं म्हणजे शिक्षकाची नेमकी पार्श्वभूमी कसून तपासली गेली पाहिजे. येथे जर चूक झाली तर पुढे राष्ट्राचे वाटोळे कोणी नाही थांबवू शकत…. गावाकडे बहुतेक ९० टक्के शिकणारे विद्यार्थी असे असतात, ज्यांच्या शिकण्यामागं कसलाही उद्देश्य नसतो. कुणी सांगितलं किंवा गावातून कुणी डीएड-बीएड केलं असेल अन ५-६ हजारांवर कुठेतरी संस्थेच्या शाळेत २-३ लाख रू. भरून शिक्षकाची नोकरी लागली असेल, तर गावातील विद्यार्थी घरच्यांच्या, काही समाज-कंटकांच्या किंवा स्वतःहून आवड नसतांनाही या भानगडित पडतात. गावाच्या जवळपासच या अभ्यासक्रमासाठी कॉलेजेस असतात. ऐन परिक्षेच्या वेळी ही विद्यार्थी विना-अभ्यास केल्याचे तसेच परिक्षेला बसतात. अन तुला कल्पना असेलच, अशा ठिकाणी किती कॉप्यांचा बाजार चालतो ते… आपले पोलिस लोकं मात्र २०-३० रू. उकळून टपर्‍यांवर आरामात चहा पितात. यातील बहुतेक विद्यार्थी फर्स्ट क्लास मध्ये पदव्या मिळवून, अमाप पैसा ओतून शिक्षक म्हणून नोकरीवर लागतात. जी मुले-मुली अशा मास्तरांचे विद्यार्थी असतील, त्यांचे काय हाल होत असतील…..????? नोट इट…! मान्य आहे, असले बोगस शिक्षक फार वेळ टिकत नाहीत पण या कालावधित विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरणं जरा अवघड असतं…. माझ्याही अन बहुतेकांच्या शालेय काळात असे शिक्षक प्रत्येकाने बघितले आहेत(असतीलच)….

  तर तु सांगितल्याप्रमाणे, अभ्यासक्रम बदलून काहीच हस्तगत होणार नाही.. हे एकदम पॉवरफुल सेण्टेन्स आहे.. त्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या मनावर लहानपणापासूनच योग्य संस्कार(म्हणजे त्यांच्याशी योग्य तर्‍हेने सुसंवाद साधून त्यांना सर्व गोष्टींची कल्पना देऊन त्यांच्यामधील अंगिभूत गुणांना वाव देण्यासाठीचे सौम्य प्रयत्न, म्हणजे त्यांना त्यांच्या भविष्याचा नेमका अंदाज येऊ शकेल या अर्थाने..), ज्यांमुळे त्यांच्यावर कसलेही (शारिरीकदॄष्ट्या/मानसिदृष्ट्या) दडपण येणार नाही याची योग्य काळजी घेऊन जर केलेत तर त्यांना पुढील अवजड वाटणारा अभ्यासक्रम युजर-फ्रेण्डलि वाटू लागेल… येथे शेवटी सर्वात महत्वाचा वाटा असतो तो म्हणजे शिक्षकाचा… जर असं झालं, तर का नाही आमच्यासारख्या विद्यार्थ्यांच्या मनात जिज्ञासा अन उत्सुकता जागृत होणार…. व्हायलाच पाहिजे, फक्त कोणीतरी हे सर्व करणारा हवा…

  थ्री इडियट्सबद्दल माझं मत सकारात्मक आहे. हं काही सीन्स जरा हानिकारक ठरू शकतात लहान मुलांसाठी पण ओव्हरऑल रेटिंग इज गुड इनफ…. यातून मिळालेला एक संदेश, “सक्सेस के पिछे मत भागो, सिर्फ सिखते रहो, सक्सेस (झक) मारके तुम्हारे पिछे आयेगा।” मी खुप लहानपणापासूनच फॉलो करतोय….

  माझं वैयक्तिक मत असं आहे, सिस्टिम बदलणं तसं सोपं पण नाहिये अन अवघड तर मुळीच नाहिये (माझा आदर्श हिटलरने ते सिद्ध करून दाखवलंय!)…. कुठेही, कधीही जे मिळतंय (म्हणजे नविन असं काही, चांगलंही असू शकतं अन वाईटही… पण यातून काही तरी नक्कीच शिकण्यासारखं असतं, तेच जर तुम्ही सोडलं तर मात्र तुम्हीच त्याला जबाबदार असता….) आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वार्थ असावा पण तो स्वतःसाठी न बाळगता सर्वांच्या कल्याणासाठी बाळगावा…. (माझी कॉमेण्ट तर भरपूर लांबलिय ताई, लक्षच नाही राहिलं… मला माफ कर हवं तर, बाकिच्यांचा विचार मी इथे केलाच नाही, इतरांना पण कमेण्ट टाकायला जागा लागेलच ना….!)

  😉

  विशल्या!

  प्रत्युत्तर

  • anukshre
   Jan 20, 2010 @ 08:24:44

   विशल्या,
   खूपच छान प्रतिक्रया दिलीस. लिहित जा तुला पाहिजे तेव्हढ मी इथून जागा वाढवीन इतरांसाठी, त्यासाठी तुझे विचार अपूर्ण ठेवू नकोस. तुझा प्रत्येक मुद्दा म्हणजे माझी पोस्ट पूर्ण झाली. मी फार गंभीर पद्धतीने लिहिते असे वाटत होते त्या मुळे पोस्ट मध्येच थांबवून टाकली, पण तू माझ्या मनातील बरेचसे मुद्दे अगदी व्यवस्थित मांडलेस. धन्यवाद! पोस्ट चा इतका छान विचार केलास म्हणून

   प्रत्युत्तर

 3. Ajay
  Jan 19, 2010 @ 18:49:13

  ह्म्म तुम्ही मांडलेल्या मुद्यावर मी सुद्धा सिनेमा पाहिल्यानंतर विचारच नाही केला. कदाचित पाहिला आणि हसण्यावारीच नेला अशामुळे असेन. पण मुद्दे चांगले आहेत, स्पेशली मुलांशी चर्चा करण त्याच्यावर हे त्याहून चांगलं.

  -अजय

  प्रत्युत्तर

  • anukshre
   Jan 20, 2010 @ 08:18:46

   धन्यवाद अजय,
   प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो. मी मुळात शिक्षिका असल्याने माझा जरा जास्त भर ह्या मुद्द्यावर असावा असे मला वाटते. असो मी पण हा चित्रपट छान एन्जॉय केला

   प्रत्युत्तर

 4. खोचक
  Jan 19, 2010 @ 21:07:01

  शीर्षकावर आक्षेप:
  अमीर हा फक्त एक नायक आहे. त्यात सांगितलेली कथा त्याची स्वत:ची नाही. मग “अमीरची शाळा” कशासाठी?
  श्रेय द्यायचेच तर कथा लेखकास द्यावे. कथा लेखका(मग तो कोणी का असेना चेतन किंवा अभिजात जोशी) ऐवजी नायकास एवढे अवाजवी मह्त्त्व का द्यावे?
  आणखी एक उदाहरण. तारे जमी पर मध्ये सुद्धा आमीरला महत्त्वा कशासाठी आपण मूळ लेखक अमोल गुप्तेंना का विसरतो?

  प्रत्युत्तर

  • anukshre
   Jan 20, 2010 @ 08:12:03

   धन्यवाद खोचक,
   आपले म्हणणे बरोबर आहे. सक्षम कथा लेखक व तेव्हढ्याच ताकदीचा कलाकार ह्या दोन्ही गोष्टी चित्रपट लक्षात ठेवण्याचे कार्य करतात. पण सामान्य माणसावर चित्रपट बघताना अभिनयातून साकारलेला कथा लेखक दिसतो. नटरंग चे लेखक आनंद यादव, गीतकार गुरु ठाकूर, व अतुल कुलकर्णी ह्यांनी हा चित्रपट साकारला. अतुल कुलकर्णी ने जर नीट अभिनय केला नसता तर कथा सुद्धा लक्षात राहिली नसती. सगळ्यांची नावे घेणे शक्य नसते, नाहीतर नावामुळे मराठी माणसाने मराठी माणसाला अडवले हा इतिहास पण मराठी चित्रपटांसाठी आहेच की

   प्रत्युत्तर

   • Ashwini
    Jan 22, 2010 @ 07:16:10

    same mail mala pan forward kar me pan marathi/english SSE/CCBSE/ICSE hya sagalya janjalat aahe 🙂

   • anukshre
    Jan 22, 2010 @ 10:15:44

    अश्विनी, नक्कीच तुलाही मेल फोरवर्ड करीन.

 5. gouri
  Jan 19, 2010 @ 21:51:58

  malaa ek shala kaadhayachee aahe. kadhi yetes bhoogol shikavaayalaa?

  प्रत्युत्तर

  • anukshre
   Jan 20, 2010 @ 07:58:30

   गौरी,
   अजून तुझ्या तिळगुळाच्या वड्यांचा विचारात आहे. शाळेचे म्हणशील तर केंव्हाही बोलाव. तुझ्याकरिता खास येईन. मुख्याधापक तूच होणार आहेस का? सध्या तरी आपली ब्लॉग ची शाळा
   चालवूया. छान वाटले, भेटायला आलीस म्हणून……

   प्रत्युत्तर

 6. आनंद पत्रे
  Jan 19, 2010 @ 23:00:20

  खुप छान विषय मांडलात, खरंय तुमचं, तश्या शाळा खरोखरचं फायद्याच्या असतील.
  तुमचा दुसरा मुद्दा शिक्षण पद्धतीबाबत सुद्धा बरोबर आहे, नामांकन नसेल तर कोण दुसर्‍याच्या फंदात पडेल.

  प्रत्युत्तर

  • anukshre
   Jan 20, 2010 @ 07:54:45

   धन्यवाद आनंद,
   अशी पोस्ट टाकू का नको असा विचार करीत होते कारण काहीसे गंभीर वळण माझ्या लेखनात जाणवते. पण आपल्या पहिल्याच प्रतिक्रियेने मला हुरूप आला. काहीतरी बरे लिहिले असावे. खरच मनापासून आभारी आहे.

   प्रत्युत्तर

 7. Ashwini
  Jan 20, 2010 @ 10:24:22

  hmmm nehimi pramane chan aani sakhol lihile aahe bharich ki tu kharokhrach all rounder aahes master in all subjects to player/good mother /cook all alll 🙂

  प्रत्युत्तर

  • anukshre
   Jan 20, 2010 @ 10:54:28

   कसलं कसलं म्हणत्येस माझ्याबद्धल ग अश्विनी, अग, अजून तुम्ही खूप लहान आहात, मिळतील तुलाही असे वैविध्यपूर्ण अनुभव. आयुष्य जसे अनुभव देते त्याप्रमाणे आपण प्रगल्भ होतो. माझी पुढची पोस्ट वाच आवडेल. तुझ्या पिढीचा मोठेपणा आहे की तुम्हाला व्यक्तिमत्व विकसित होण्यासाठी प्रयत्नाची जाणीव आहे. म्हणून तुमची यंग जनरेशन माझ्या सारखे ताई कॅटॅगीरिचे ब्लॉग न कंटाळता वाचून कौतुक करते. काही वर्षानंतर माझ्या जागी तू असशील. असे चालायचेच. एका पिढी कडून पुढच्या पिढीकडे हा प्रवास निरंतर पणे होणारा आहे. आयुष्य संधी उपलब्ध करून देत असतेसच त्या डोळसपणे शोधता आल्या की, मग असा सर्वंकष विकास होतोच. अजून काय लिहू तुझ्या कौतुका पुढे हे कणभरच आहे.

   प्रत्युत्तर

 8. sonalw
  Jan 20, 2010 @ 13:16:54

  khup changle mudde maandlet. majhya mulichi shalet jaaychi warsh jawal yetayat tase anek prashn malahi bhedsawatayat. tyabaddal tumachi mat jaanun ghyala aawdel.

  Bhashe pasun te boardaparyant pratyek goshtit paristhiti gambhir aahe. majhya mulila marathi shalet ghalawe as khup watat hot. pan changalya marathi shala shodhan kathin aahe. gharajawal farsha nahitach. ICSE ki SSC ki CBSE? Khar tar ha prashn tulanene soppa aahe sodwaayala. Pan sadhya saglyach prakarchya shala ‘practical’ shikshan denyachya nadat mulanwar aani tyanchya paalkanwar wichar n karata bhar taaktayat. yawarchi majhi post wel milala tar jarur waach.

  ya saglyat, aaplya mulala/mulila rat race paasun door thewat, kharach chaanglya prakare jagnyach shikshan den he ek challenge aahe. ‘Shikshan’ tehi shaley shikshan he ek sadhan aahe fakt. sampurn ‘Jagan’ naahi. He thaswaayla haw.

  ase khup wichar yetat. uttar shdhan chaluch aahe.

  प्रत्युत्तर

  • anukshre
   Jan 20, 2010 @ 17:01:26

   सोनल,
   मी नक्की तुझी पोस्ट वाचेन. तुझी तळमळ समजते. मुलीकरिता योग्य शाळा निवडणे खूप विचार करून निर्णय घ्यावा असे मला वाटते. कारण आपल्या निर्णयावर भवितव्य अवलंबून असते. सध्याच्या काळात माध्यम ते करिअर इथपर्यंत पालक म्हणून आपणच महत्वाचे आहोत. अधिक बाबतीत आपण मेल वर सविस्तर बोलू शकू असे मला वाटते. कारण पाल्याचा
   विचार हा स्वतंत्र विषय आहे. मी मेल पाठवते. लवकर भेटूच….

   प्रत्युत्तर

 9. Nilima
  Jan 20, 2010 @ 17:26:51

  Hmmmmmmm mi tar Aswini shi shamat aahe Anutai realy ur the all rounder 🙂

  प्रत्युत्तर

  • anukshre
   Jan 20, 2010 @ 17:42:22

   नीलिमा,
   खूप दिवसांनी आलीस? अश्विनी चे कसले मनावर घेतेस. तू ही तिच्या सारखीच आहेस. असे विना अपेक्षा प्रेम असणे हीच तर तुमची खासियत आहे. माझा कमजोर असा हा भाग आहे. मी काहीच बोलू शकत नाही ग. कसे ग आपले नाते? फक्त विचारांची देवघेव, ते पण प्रत्यक्ष न बघता!! अशा अनोख्या नात्यापुढे मी नतमस्तक आहे… पुढची पोस्ट वाच. माझे मन मी व्यक्त केले आहे.

   प्रत्युत्तर

 10. vaibhavshripad
  Jan 22, 2010 @ 00:59:03

  नेहमीसारखाच अप्रतिम जमलाय लेख…!

  बरं मी जुना ब्लॉग प्रायव्हेट केलाय…!
  आता हा नविन ब्लॉग सुरु केलाय बघु कितपत प्रायव्हेट राहतोय…!
  बर आणखी एक तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रीया वाचुन वाटलं नकोच थांबवावं लिहणं….!

  प्रत्युत्तर

  • anukshre
   Jan 22, 2010 @ 10:31:14

   वैभव,
   आपले स्वागत! सगळ्यांचे मन राखलेत खरच छान वाटले. ब्लॉग व लिखाण अजिबात बंद करू नका. आपले विचार मांडण्याची , सर्वाना मित्र म्हणून जोडण्याची ही उपलब्धता म्हणजे आपला ब्लॉग अत्यंत कल्पक आहे. लिहित रहा. धन्यवाद!!

   प्रत्युत्तर

 11. shilpa
  Jan 22, 2010 @ 08:27:08

  खुप छान विषय मांडलात. काही प्रश्न माझ्याही डोक्यात होते ते वाचताना काही उत्तरं मिळाली. असो. अमिरच्या शाळेचं माहित नाही पण मला तोत्तोचानची शाळा साकारायला आवडेल. आयुष्यात जर अशी संधी मिळेल तर कोबायशिंची शाळा साक्षात उतरवायला मला आवडेल पण आजच्या काळात अशा शाळेत आपल्या बच्चुला पाठवायला कितीजणांना आवडेल शंकाच आहे.

  प्रत्युत्तर

  • anukshre
   Jan 22, 2010 @ 10:13:02

   स्वागत शिल्पा,
   तोतोचानची शाळा छान पर्याय आहे. ह्नं!! अशी शाळा मिळाली तर बरेच जण मुले पाठवायायचा नक्की विचार करतील. आपले असे मन प्रफुल्लीत करणारे विचार सांगायला आवर्जून येत रहा. धन्यवाद!!

   प्रत्युत्तर

 12. हेमंत आठल्ये
  Jan 22, 2010 @ 12:38:09

  फारच गंभीर विचार केला तुम्ही ३ इडीयटवर. नेहमी प्रमाणे छान लेख लिहिलात.

  प्रत्युत्तर

  • anukshre
   Jan 22, 2010 @ 14:41:35

   धन्यवाद हेमंत,
   मला ही तुमच्या सारखेच वाटते. उगाचच गंभीर लेख लिहिते अस झालाय खर. पण चित्रपटाचा आनंद घेतला हे ही तेव्हढच महत्वाचे आहे.

   प्रत्युत्तर

 13. sawant paramanand
  Nov 25, 2010 @ 17:41:30

  mala tumche lekh ani abhipry postane pathava me te mazya jilhatil mulana ani shikshakana zerox karun deto.
  paramanand shridhar sawant
  ar &post -Koloshi
  Taluka -Kankavli
  Dist- Sindhudurg.
  Pin -416610

  प्रत्युत्तर

  • Anukshre
   Nov 27, 2010 @ 07:45:42

   नमस्कार श्री. सावंत,
   आपले अनुक्षरे मध्ये हार्दिक स्वागत!!

   आपण माझ्या पोस्ट आपल्या जिल्ह्यातील शिक्षकांना आणि मुलांना वाचण्यास देणार आहात ह्या पेक्षा अधिक आनंद दुसरा नाही. आपल्या विचाराकारता मी आपली अत्यंत आभारी आहे. मान सन्मान, पारितोषिके ह्या पेक्षा आपली सामाजिक कळकळ अधिक आदरणीय आहे. आपण शिक्षक आहात का? आपण मला पत्ता दिलात पण मी भारताबाहेर मस्कत म्हणजे ओमान देशात राहते. आपण दिलेल्या पत्त्यावर पत्र पाठवणे जरासे अवघड आहे कारण येथे आपल्या सारखे पोस्टमन नाहीत कि सहज पोस्टाची पेटी नाही. कंपनीकडे अनेक प्रक्रिया करून पत्र पाठवून सुद्धा कधी मिळेल याची खात्री नाही. आपण माझ्या पोस्ट आपल्या इथून कॉपी करून घेऊ शकता. आपण पोस्ट वाचण्यास दिल्यावर जरूर मते कळवा. संपर्कात रहा. भारतात आले कि जरूर आपल्या शाळेत येईन. मी हि बरीच वर्षे शिक्षिका म्हणून काम केले आहे.

   आपल्या ह्या स्तुत्य उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा…

   प्रत्युत्तर

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: