मी उद्योजिका…….. व्यवसाय मराठी मनाचा.

माझ्या वडिलांनी एक छोटासा व्यवसाय सुरु करायचे ठरवले, त्याप्रमाणे व्यवसायाच्या सर्व मिटींग्स आमच्या घरी होत होत्या. मी कॉलेज ला होते. प्रत्येक मिटींग्स न मला आवर्जून वडील तिथे बसवायचे. आईला पटायचे नाही, मुलीची जात संसार करायला लागणार, असे वातावरण नाही मिळाले तर? पण तेंव्हाच व्यवसायाचे आकर्षण मला वाटू लागले. वडिलांनी विचारांची बैठक तयार केली. लग्न होवून सासरी आले. मिस्टर पण इंजिनीअर झाल्यावर त्यांच्या वडिलांचा कारखाना सांभाळू लागले. वय व अनुभव, शिक्षण यांचे त्रैराशिक कमी पडले व नोकरी करू लागले.

मुलगा आता मोठा होउ लागला आहे. त्याचे विश्व वेगळे आहे. मुंज केल्यावर आई म्हणून मी वेगळी पडले ह्या धक्क्याने मी मुंज लागताना एकटीच हॉल च्या बाहेर येऊन खूप रडले. माझ्या बाळाचे मुंडावळ्या लावलेले गोंडस रूप मी अक्षता हाती घेत पाहू शकत नव्हते. तिथूनच मला जाणवले की, बच्चा मोठा झाला आहे, हे मला समजून घ्यायला हवे. मन मानेल तर न.

आता पण तो सुट्टी करिता आईकडे भारतात गेला आहे. एक आठवडा घर सफाई करण्यात गेले. बरे वाटत होते, त्याची लुडबुड नाही. त्याचे कपाट तर मनसोक्त आवरले. नंतर मात्र पसारा नाही म्हणून रडू येऊ लागले. करियर करण्याची वर्ष पिल्लू करिता मी अशीच उधळली. अर्थात त्याचे दुखः कधीच नव्हते. कारण त्याच्या करिता ते गरजेचे होते. पण आता त्याचे विश्व तयार होवू लागले आहे. शिक्षण व पुढील करिअर ह्या करिता तो कदाचित दूर देशी पण जाईल. मग मी काय करू? बायकांचा वेळ घरात जातो पण पुरुषांना मात्र मन खायला उठते. नको ती दुखणी मन आजारी असल्याने मागे लागतात.

माझ्या करिता व ह्यांच्या करिता काहीतरी उद्योग सुरु करावयास हवा ह्या मनात रेंगाळणाऱ्या विषयांनी पुन्हा जोर धरला. ह्याचे श्रेय माझ्या सासू ला जाते. मुलांचे संसार मार्गी झाल्यावर त्यांनी सासऱ्यांच्या मदतीने स्वता:ची दुध डेअरी चालू केली. दोघेही मजेत व्यवसाय करतात. संसारात राहूनही स्वःताचे अस्तित्व त्या दोघांनी जपले. जो पर्यंत तब्येत साथ देईल तिथ पर्यंत करूच. असा निश्चय त्यांचा आहे. वयाच्या ८० नंतर ही मजेत कोणाच्या ही भानगडीत न पडता व्यायाम तर होतोच पण चार माणसे ही भेटतात. मी पण तसाच विचार फार पूर्वी पासून करीत होतेच. योग्य वेळ येण्याची वाट पाहत होते. मुलाच्या विश्वात अडकून त्याला पण मर्यादा घालायच्या हे पटत नाही.

आतापासूनच प्लान्निंग केले तर १५ वर्षात मी नक्कीच उद्योग जगतात माझे नाव मिळवू शकेन. ह्यांच्या आवडीचे इंजिनीअरिंग विश्व व तेथील अनुभव हे माझे पाठबळ होते. म्हणून हेच क्षेत्र निवडले. मी तर इंजिनीअर नाही परंतु मला मार्केटिंग मधील भरपूर अनुभव आहे. प्रत्येक प्रोडक्ट मी अभ्यासले, पूर्ण माहिती मिळवली. माझ्या स्किल वर मी हा व्यवसाय करू शकते हा विश्वास मला आहे. अर्थात ह्यांचे मार्गदर्शन ह्या शिवाय हे शक्यच नव्हते. ह्यांनी रोजचा होमवर्क दिला. मी व्यवसाय करणार, हे माझे स्वप्न म्हणून कधीच नव्हते तर संसाराला सुरवात केल्यावर आपला व्यवसाय योग्य वेळ आली कि नक्की करायचा हे ठरवून ठेवले होते.

अचानक साक्षात्कार झाला असे नसते तर आधी अभ्यासून व्यवसाय केला तर रिस्क मॅनेज करणे बरेच सोईचे होते. परिश्रम खूप आहेत. स्वप्न म्हणून नव्हे तर एक ध्येय म्हणून माझ्या सर्व स्कील च्या मदतीने मी पूर्ण करणार. मला टाटा व बिर्ला एका रात्रीत व्हायचे नाही पण जे काही करेन त्यात पूर्ण समाधानी नक्कीच असेन. सातत्य व नियोजन ह्यावर माझा विश्वास आहे. ही माझी सेकंड रिव्हर्स एन्ट्री आहे. तो मोठा होतोय. आई, मला करिअर करता कदाचित तुझ्या पासून लांब जावे लागेल. माय मॉम इज अ ब्रेव्ह अशी समजूत माझी काढतो.

एक संधी मला खुणावू पाहते. ज्यात मला ह्यांचे व माझे छोटेसे जग पुन्हा दिसते. संसाराची जवाबदारी पेलवत बरेच वर्षे आम्ही आमचा विचार केला नव्हता. आतापासून काही सुरवात केली तर लोनली पिपल म्हणून राहणार तर नाही. आमच्या दोघांच्या वडिलांनी एक मार्ग आम्हाला शिकवला, हेच वय आहे अजिंक्य चे संस्काराचे, व्यवसाय कसा असतो हे आम्ही त्याला शिकवले पाहिजे. भले तो छोटासा असेल पण त्यातूनच कदाचित मराठी मुलाचा व्यवसाय असे समीकरण जमेल.

नोकरीच्या रहाट गाडग्यात छंद म्हणू काही जोपासता आले नाही. अशा आवडीच्या विषयाचा पण व्यवसाय होतो. आमची आवड उद्योग जगात रमायचे अशी आहे. ह्या आवडीला साजेसा व्यवसाय सुरु करते. मराठी माणसाने व्यवसाय करावा हे सांगणे आजकाल एक पद्धत पडली आहे. भांडवल हा मोठा प्रश्न असतो. आम्हालाही आहे. पण अनेक योजनामधून आपण पैशांचे पाठबळ मिळवू शकतो. आता तर रिसेशन सुरु आहे. नोकऱ्या सुद्धा गेल्यात मग हे व्यवसायाचे खूळ काय झेपणार?

दैनदिन गरजा भागवणारे पण व्यवसायच असतात. ठाण्याला एक गुजराती व्यक्ती चिरलेली भाजी विकायला घेवून बसते. हातोहात सर्व संपते.एक दिवस मी उत्सुकता म्हणून विचारले तर त्याच्या मागे असलेली बंद पडलेली कपड्याची कंपनी त्याचीच आहे. धंद्यात खोट आली म्हणून कोर्टाने कंपनीच्या जागेला सील केले. तिथेच समोर बसून हा भाजी विकतो. मी म्हटले तुम्हाला खूप दुख: झाले असेल. त्याने उत्तर दिले, कंपनी बंद पडली म्हणून दुख: नकीच झाले. पण तेच कामगार घेवून आज भाजी कापण्याची मशीन मी ठेवली आहेत. आता बिल्डर मोठे संकुल बांधणार आहे.मी पण एक दुकानाचा गाळा विकत घेतला. ह्याला म्हणतात जिगर..

हि जिगर मराठी माणसात नक्की आहे. फक्त हवे आहे नियोजन व्यवसायाचे. मी आमच्या शिक्षण व अनुभव धरून व्यवसाय नक्कीच करणार. कुठलाही व्यवसाय हा पूरक उत्पन म्हणून पण उपयोगी पडतो. नोकरीचा पगार हा सेफ असतो पण छोटासा एका होईना एक व्यवसाय कुठल्यातरी पिढीने सुरवात म्हणून तरी करावयास हवा.

माझ्या प्रत्येक पावलाच्या पुढे माझा जीवन साथीदार उभा आहे. माझ्या पाठीमागे “भिऊ नकोस…….असे म्हणत माझे गुरु आहेत. मला जे उचित आहे तेच मला निश्चित देतील हि खात्री माझ्या सदगुरूनी मला दिलेली आहे. हेच माझे विश्व आहे. मला खुणावणारी उद्योग जगताची संधी हीच मला नवीन प्रकारे ब्रेव्ह बनवेल.

लेकाकरिता संगणक माहिती करून घेतला, त्याच्या भविष्यात पण आई वडिलांच्या खुणा, संस्कार हेच पाठबळ असेल. मराठी माणसाचा व्यवसाय असाच तर सुरु होत असेल. पिढीजात व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाचे मापदंड वेगळे असतात. पण आमचा छोटासा व्यवसाय मुलाला हे ही कार्यक्षेत्र आहे असे नक्कीच शिकवेल असा विश्वास आहे.

आमच्या वडिलांनी जे स्वप्न पहिले, ते आमच्या पिढीचे ध्येय होते व पुढच्या पिढीचे सत्य असेल. मराठी माणूस व्यवसायात स्थिरावतोय ह्या आशेवर आमचा प्रयत्न……

42 प्रतिक्रिया (+add yours?)

 1. Ashwini
  जानेवारी 15, 2010 @ 13:39:41

  tula nakki 100% yash milel i m sure 🙂 ALL THE BEST!!!!!!!!!!!!!

  उत्तर

 2. आनंद पत्रे
  जानेवारी 15, 2010 @ 14:16:01

  तुमचे प्रयत्न जरुर सफल होतील, माझ्या शुभेच्छा!

  उत्तर

 3. गजानन
  जानेवारी 15, 2010 @ 14:37:36

  छान लिहिलस…

  उत्तर

 4. प्रभास गुप्ते
  जानेवारी 15, 2010 @ 15:57:36

  तुम्हाला मनापासुन शुभेच्छा!

  आम्हाला खात्री असण्यापेक्षा तुम्हाला स्वतःला खात्री असणं जास्ती महत्वाचं!
  आणि ती तुम्हाला आहेच!!

  उत्तर

  • anukshre
   जानेवारी 15, 2010 @ 17:04:43

   प्रभास गुप्ते,
   आपले स्वागत! आपली प्रतिक्रिया आत्मविश्वास दुणावती करती झाली. जे काही करायचे ते पूर्ण विचारांती, रिस्क म्यानेजमेंट तसेच यशाची हवा!!! दोन्ही महत्वाच्या बाबी आहेत. मन संतुलित असेल तर कुठलेही कार्यक्षेत्र अवघड नाही. प्रतिक्रिये साठी धन्यवाद!

   उत्तर

 5. महेंद्र
  जानेवारी 15, 2010 @ 16:25:37

  शुभेच्छा… तुम्हाला नक्कीच यश मिळेल!!!

  उत्तर

  • anukshre
   जानेवारी 15, 2010 @ 17:10:14

   महेंद्रजी,
   आपणा सारखे मित्र, हितचिंतक असताना अजून काय हवे. काही बाबतीत सल्ला घ्यायला नक्की हक्काने येईन. आपल्या कौतुकाची थाप मिळवायची ह्यासाठी पूर्ण प्रयत्न करेन.

   उत्तर

 6. Atul Deshmukh
  जानेवारी 15, 2010 @ 16:52:16

  छान लिहिलंय…..एक सांगावेसे वाटते…..मराठी माणूस उद्योगात आल्यानंतर आणि स्थिरावल्यानंतर त्याचा पहिला शत्रू असतो तो त्याचा समाधानी स्वभाव …म्हणूनच आपल्याकडील आघाडीचे उद्योजग हे बऱ्याचदा आपल्याच क्षेत्राचा आणि त्यातला त्यात महाराष्ट्रात उद्योग करण्यासाठी आग्रही असतात…बरेच कमी मराठी उद्योजग महाराष्ट्राबाहेर कार्यक्षेत्र वाढवण्याचा विचार करतात…आमची कुठेही शाखा नाही हे बदलवायला हवे….जर एखादा उद्योजग एखाद्या उद्योगात दैदिप्यमान यश मिळायला लागला तर त्याने दुसर्या business opportunities चा पण विचार करायला पाहिजे..हे पण नक्कीच कि एकावेळीस वेगवेगल्या domains मध्ये शिरून आपल्या main domain कडे दुर्लक्ष्य व्हायला नको…
  आपला निर्णय नक्कीच वाखाणण्याजोगा जोगा …हार्दिक शुभेच्या पुढील वाटचालीसाठी…..

  उत्तर

  • anukshre
   जानेवारी 15, 2010 @ 17:28:22

   अतुल देशमुख आपले स्वागत!
   खूप महत्वाचा मुद्दा मांडलात. माझ्या साठी नव्हे तर सर्वाना प्रोत्साहित करणारा हा विचार आहे. खरय कुठे ही शाखा नाही म्हणजे मर्यादा होय. इथे मराठी मसाले, आपल्या चटण्या, लोणची सुद्धा मिळत नाही. महाराष्ट्राची प्रोडक्ट कमी आहेत. केप्र, बेडेकर, गायब? मी विचारले होते की आम्हाला एजन्सी देता का? रिस्पोन्स नाही. चितळे तर कानावर हातच ठेवतात. असे आहे काय म्हणणार? व्यापक दृष्टीकोन आपला मूळ व्यवसाय स्त्रोत सांभाळून वाढवायला हवा. काही खाजगी व्यावसाईक यांना विचारले, आम्ही तुमची प्रोडक्ट इथे ठेवतो तर आमचे इथेच ठीक आहे. ही समाधानाची गोष्ट मानतात. आम्हाला दुबई जवळची आहे, पूर्ण सहकार्य मिळते. असेच भेट देत रहा. धन्यवाद!

   उत्तर

   • Atul Deshmukh
    जानेवारी 16, 2010 @ 13:42:02

    धन्यवाद प्रतिक्रियेला पोस्ट वर स्थान दिल्याबद्दल आणि त्यावर प्रतिक्रिया दिल्याबद्दल,
    अहो तिकडे परदेश्यातले तर सोडाच पण इकडे दिल्लीतही मराठी पदार्थ सापडूनही मिळत नाही….घरी महाराष्ट्रात गेल्यावरच कुठे त्यांचा आस्वाद घेता येतो..आणि तेव्हडेच काय पण महाराष्ट्रातही एका district चे प्रसिद्ध पदार्थ वा वस्तू दुसर्या district मध्ये मिळणे कठीण जाते…
    इकडे दिल्लीला दरवर्षी national/international festival होत असते त्यात महाराष्ट्राच्या stall ची इतर राज्यांच्या stalls शी तुलना केलीकी फार दुख होते..
    महाराष्ट्रात इतके वाखाणण्याजोगे पदार्थ/वस्तू/साहित्य असूनही त्याचे नीट presentation आणि marketing केले जात नाही. हे कुठेतरी आपल्यालाच बदलावे लागेल.

   • anukshre
    जानेवारी 16, 2010 @ 14:43:48

    धन्यवाद !अतुल देशमुख, आपण आवर्जून पुन्हा आलात. आत्ता सुद्धा खूपच मार्मिक प्रतिक्रिया आहे. दिल्लीत पण अवघड आहे याची कल्पना नव्हती.

 7. देवेंद्र
  जानेवारी 15, 2010 @ 18:03:07

  यश तुमची वाट पाहात आहे….जोमाने कामाला लागा…आमच्या शुभेच्छा आहेतच ….

  उत्तर

 8. हेरंब
  जानेवारी 15, 2010 @ 20:49:21

  मी खात्रीने सांगतो की मराठी माणसाच्या मनात (आत खोलवर कुठेतरी) आपला स्वत:चा व्यवसाय करायची एक सुप्त इच्छा नक्की असते. पण बरेच जण त्या दिशेने पावलं उचलत नाहीत. पण तुम्ही ते करताय. नक्की यश मिळेल. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा !!!

  उत्तर

  • anukshre
   जानेवारी 15, 2010 @ 21:12:56

   हेरंब.
   आपण मराठी मनाच्या ह्या पैलू वर प्रकाश टाकलात, मनात असतेच फक्त कृती आवश्यक आहे. गुजराथी माणूस मॅनेजर असला तरी त्याची पत्नी घरातून खाद्यपदार्थ, कलाकुसर वर्ग, विणकाम करून देणे असे व्यवसाय न लाजता करते. तिच्या बिझिनेस मध्ये पतीचे स्टेटस कमी होत नाही. मल्याळी लोक तर मिळेल तो व्यवसाय करतात. मी मराठी मागे पडते. कारण
   लोकलज्जा हे एक कारण असतेच. बाकी वैयक्तिक कारणे पण असतात म्हणा पण जर जमू शकत असेल तरीही पूरक व्यवसाय करावा हे धाडस होत नाही. आपल्या मुळे हा हि मुद्दा समजला.

   उत्तर

 9. ravindra
  जानेवारी 15, 2010 @ 21:52:15

  अनुजा,
  तुमचा आत्मविश्वास पाहून तुमचे कौतुक करावे तितके थोडे आहे. तेही तेथे विदेशात राहून व्यवसाय करणे, छान आम्हाला खात्री आहे कि पुढील १५ वर्षात तुम्ही टाटा बिरला नव्हे अंबानी होणारच. आणि हो त्या ठाण्याच्या त्या जिगरबाज उद्योजकाला सलाम करायला हवा.

  उत्तर

  • anukshre
   जानेवारी 16, 2010 @ 07:47:02

   रविन्द्रजी,
   आपण इतक्या अत्मातीयेतेने प्रतिक्रिया दिलीत, मला तर काय उत्तर द्यावे हेच सुचत नाही. मी एक छोटासा नवीन दृष्टीकोन आमच्या परिवारात निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. अजून खूप टप्पे गाठायचे आहेत. काही काळानंतर कदाचित मी काय अनुभवले? काय संपादन केले, काय शिकले ह्या बाबत एखादी पोस्ट लिहीन. परंतु आता काही बोलणे म्हणजे अपरिपक्वता होईल. आपण सर्वांशी विचार विनियम करणार हे नक्की आहे. सगळ्यांनी इतके भरघोस प्रोत्साहन व पाठींबा दिला. हे पण माझे कुटुंब आहेच की…… धन्यवाद. टाटा, बिर्ला, अंबानी क्षितिजे आहेत, मी सध्या तरी व्यवसायात पाय भक्कम करून जमिनीवर ठाम पणे उभे राहण्याचे ठरविले आहे.

   उत्तर

 10. सुहास
  जानेवारी 16, 2010 @ 10:52:45

  आमच्या वडिलांनी जे स्वप्न पहिले, ते आमच्या पिढीचे ध्येय होते व पुढच्या पिढीचे सत्य असेल…Waah
  मनापासुन शुभेच्छा!

  उत्तर

  • anukshre
   जानेवारी 16, 2010 @ 14:39:45

   धन्यवाद! सुहास,
   तुम्ही अजून कसे नाही? हाच विचार करीत होते. व्यसतेतून वेळ काढून आलात. खरच छान वाटले.

   उत्तर

   • सुहास
    जानेवारी 16, 2010 @ 15:43:24

    दोन दिवस थोडा आजारी होतो तापाने, अनुजा. आज आलोय ऑनलाइन दोन दिवसानीं..So couldn’t able to check blogs Sorry 😦

   • anukshre
    जानेवारी 19, 2010 @ 09:02:03

    सुहास,
    आराम करायचा, बरे नाही तर. सॉरी आजारपणात नसते.नेहमीच्या मंडळींची वाट पाहत असते. नाही दिसले तर निदान सर्व ऑल वेल कळले कि बरे वाटते. असो आपली मेल मिळाली परंतु
    माझे फेस बुक ला खाते नाही. आपण मेल ला ओपन करता येईल असे करून पाठवू शकता का? मी आर्कुट ला पण नाही. मुलगा मोठा होतोय माझे अनुकरण करतो म्हणून मीच अशी खाती उघडत नाही. मेल वर भेटू. काळजी घ्या

 11. akhiljoshi
  जानेवारी 18, 2010 @ 20:52:37

  कष्ट करत राहावे
  फळाची अपेक्षा न करता…
  आयुष्यभर असाच जगाव
  कुणाची उपेक्षा न करता…

  तुम्ही म्हणाल नुसत कवितेत लिहायला काय जात
  पण मी जेव्हा फक्त DTP ची कामे करायचो… तेव्हा कधी बिझिनेस करीन अशी शक्यताही नव्हतो…
  १० वर्षापूर्वी १२०० रुपयांची नोकरी केली एका मोटेल मध्ये.. नंतर ITI मध्ये MS ऑफिस शिकवायला faculty म्हणून ४ महिने नोकरी केली..
  नंतर मग घरीच DTP ची कामे करायचो.. आणि मग ती बाहेरून छपाई वगैरे करून घेवू लागलो. कधीकधी खूप अडचण व्हायची.. जॉब्स वेळेवर नाही मिळायचे.

  २००६ मध्ये एकदाच तार आली डोक्यात… आणि ठरवलं आपण या धंद्यात स्वावलंबी व्हायचा………. स्वताचे प्रिंटींग युनिट असायलाच पाहिजे…
  तेव्हा मग कर्ज घेतले आणि मशीन आणले…. आई परवानगी देत नव्हती म्हणून मामला मध्यस्थी केले… साडे तीन वर्षात कर्ज फिटले… त्या काळात नेहमी आई म्हणायची कि अरे बाबा नोकरी कर……… सुखाची नोकरी.. धंद्यात रिस्क आहे.. (कारण त्यावेळी गरज लागली कि आई कडेच पैसे मागायचो.. या काही वर्षात कधी पैशाची गरज लागली तर माझे मित्र माझ्यासोबत नेहमीच राहिले… आता माझ्याकडे ४ माणसे हाताखाली कामाला आहेत.. आपला संपर्क जरी आपण वापरला तरी व्यवसाय करण्यात कुठली अडचण येईल असे मला वाटत नाही…
  आपला संपर्काला फक्त नियोजनाची, दर्जाची, विश्वासाची जोड दिली कि सगळं सुरळीत होत…
  तुमच्याहि व्यवसायाला माझ्या मनापासून शुभेच्छा…
  कुणीतरी मला सुरुवातीला सांगितले होते कि एखादा व्यवसाय जर कुणी सुरु केला आणि त्याने पहिली तीन वर्षे नित काढली कि नंतर त्याचा व्यवसाय वृद्धींगत होत जातो.. कारण त्या तीन वर्षात त्याला vyavasayat येणार असंख्य अनुभव येवून गेलेले असतात.. त्यात तो तरला कि तरला…

  पुन्हा लहान तोंडी मोठा घास घेतला न मी?

  उत्तर

  • anukshre
   जानेवारी 19, 2010 @ 08:55:29

   ,
   मला ही उत्तेजन मिळाले, तुझी जिद्द, चिकाटी, मेहनत पाहून. अशीच भरभराट होऊदे! माझ्याही शुभेच्छा तुझ्या व्यवसायाला. अनुभवात लहान मोठे असे नसते. प्रत्येकाचा अनुभव काहीतरी शिकवून जातो. मला खरच आवडले आमच्या सारखी उशिरा सुरवात नाहीस केलीस. तर आकर्षक नोकरीच्या संधी असताना, व्यवसाय करणे हीच तरुणाई कडून अपेक्षा आहे. स्वताचे
   जग निर्माण करा. नोकरीचे बॉस चे रडगाणे गाण्यापेक्षा स्वताची उमेद, जिद्द छोटासा व्यवसाय सुरु करून जग पहा. खूपच आवडली तुझी प्रतिक्रिया सर्वाना मार्गदर्शक ठरेल.

   उत्तर

 12. तो
  जानेवारी 19, 2010 @ 21:08:58

  वा छानच आहे. वाचून मस्त वाटले…..
  माझ्या शुभेछा.

  – तो
  to99.wordpress.com

  उत्तर

 13. Aparna
  जानेवारी 21, 2010 @ 06:47:41

  शुभेच्छा…मग कुठला व्यवसाय सुरू करताहात आणि मायदेशात की परदेशातच??

  उत्तर

  • anukshre
   जानेवारी 22, 2010 @ 10:40:38

   अपर्णा,
   अर्थात इथेच मस्कत मध्येच करणार. ऑईल व गॅस फिल्ड चा प्रामुख्याने व्यवसाय इथला आहे त्या संदर्भात काही प्रोडक्ट असतील.

   उत्तर

 14. Salil Chaudhary
  जानेवारी 21, 2010 @ 16:36:17

  ताई हा लेख मी खुप उशीरा वाचला आणि खुप उशिरा याला प्रतीक्रीया देतो आहे याबद्दल मला खुप खुप वाईट वाटतंय. हा लेख लिहिण्याच्या खुप खुप आधी कदाचित इतर कोणाच्याही आधी तुम्ही व्यवसायाची सुरुवात करत आहात हे मला तुम्हीच सांगीतलंत पण त्यामागची ही कहाणी आज कळली. मला बर्‍याच गोष्टी खुप उशिरा कळतात 😦

  माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत हे वेगळे सांगणे न लगे. काहीही मदत लागली तर ताई मी सर्वप्रथम तुमच्यासोबत असेन ही खात्री असुद्यात.

  उत्तर

  • anukshre
   जानेवारी 22, 2010 @ 10:35:48

   धन्यवाद सलील,
   तुझी प्रतिक्रिया पाहून खूप खूप छान वाटले. मला माहिती आहे, की हा माझा भाऊ माझ्याबरोबर कायम असणार आहे. काही मदत हवी असल्यास मेल कर.

   उत्तर

 15. sureshpethe
  फेब्रुवारी 03, 2010 @ 05:46:02

  इतक्या विचारपूर्वक धंद्याचा घाट घालणार म्हटल्यावर तो ” घाटदार ” होणार हे वेगळॆ कोणी सांगायला हवेय का? …… संपूर्ण पाठींबा

  उत्तर

  • anukshre
   फेब्रुवारी 03, 2010 @ 08:17:46

   धन्यवाद काका, इतका खंबीर पाठींबा असल्यावर खरय कशाचीच चिंता रहाणार नाही. मनापासून लिहिलेले काळजापर्यंत जाऊन पोहचले.

   उत्तर

 16. RANGNATH.G.DHOLE
  सप्टेंबर 02, 2010 @ 17:04:28

  Koshish karnewalo ki har nahi hoti Best of luck!

  उत्तर

  • anukshre
   सप्टेंबर 03, 2010 @ 08:00:17

   नमस्कार श्री. रंगनाथ ढोले,
   आपले स्वागत!! खरय अडचणी येतात पण त्या आपण पुढे जाण्यासाठी मार्गदर्शक आहेत असे समजले तर अडचणीवर मार्ग निघतो. आपला बहुमूल्य पाठींबा असाच राहू द्या. भेट देत रहा. अनेक अनेक धन्यवाद.

   उत्तर

 17. sunil kharade
  सप्टेंबर 18, 2010 @ 15:49:00

  शुभेच्छा… तुम्हाला नक्कीच यश मिळेल!!!

  उत्तर

  • anukshre
   सप्टेंबर 19, 2010 @ 10:13:10

   धन्यवाद श्री. सुनीलजी,
   आपले स्वागत! माझे प्रयत्न सुरूच आहेच. हळूहळू जम बसतोय. आपला असाच पाठींबा मला राहावा हि सदिच्छा. संपर्कात राहा, असेच भेटत राहू. धन्यवाद!!

   उत्तर

 18. sunilbabu
  ऑगस्ट 25, 2011 @ 10:44:18

  SUNIL BABU – dhandyat pramanik asave pan samadhani nasave

  उत्तर

 19. manisha
  सप्टेंबर 19, 2011 @ 16:01:00

  tumach likhan mala khup ani agadi manapasun aavadl . purushachya mage stri khambir ubhi asel tar sansarachi gadi thambel kashala. Majhihi mala swatala proof karnyachi khup ichha aahe pan pathimba milane kathin.

  उत्तर

  • Anukshre
   सप्टेंबर 19, 2011 @ 16:33:56

   नमस्कार, आपला मनापासूनचा प्रतिसाद खूप आवडला. आपले स्वागत!!!! आपणही आपल्याला कधीतरी सक्षम आहात हे सिद्ध नक्कीच करू शकाल, घरातून पाठींबा मिळण्यास वेळ लागत असेल तर थोडा काळ जाऊदे, योग्य वेळ पाहून, आपल्या व्यवसायामुळे घरातील कोणाचे काहीही कमी पडणार नाही ह्याची खात्री द्या. सुरवातीला जरा अवघड जाईल पण जो प्रयत्न करतो त्याच्या मागे देव खंबीर पणे उभा राहतो. माझ्या सदिच्छा सदैव आपल्यापाशी आहेत. कधीही काही मदत हवी असल्यास किंवा गप्पा करायच्या असतील तर जरूर भेटू. पोस्ट अशाच वाचून अभिप्राय देत राहा. सध्या माझे हि लिखाण कमी झाले आहे. प्रतिसाद पाहून लिहिण्यास हुरूप येतो.. आपण मैत्रिणी म्हणून भेटत राहूच.

   उत्तर

 20. SureshBikkad
  जुलै 08, 2012 @ 17:17:42

  As regards to my memory the thoughts are written by you are veryrealistic as wel as proudfull and good guidance for youngsters. thanks a lot

  उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: