13 जानेवारी 2010 18 प्रतिक्रिया
Previous ……….खेळ मांडला….मांडला……मांडला…!!!!!!!! Next मी उद्योजिका…….. व्यवसाय मराठी मनाचा.
अनुक्षरे....माझे विश्व..
ह्या HTML कोड द्वारे आपण आपल्या ब्लॉग वर 'अनुक्षरे' घेऊ शकता.
<a href="https://anukshre.wordpress.com" target="_blank"><img title="Anukshre" alt="Anukshre" src="http://goo.gl/MMa1" />
जानेवारी 13, 2010 @ 23:05:52
हे सगळे तू केले आहे का? केले असेल तर पार्सल पाठव… ब्लॉगमीट मध्ये मी दाखवेन आणि घरी नेऊन खाईन.
जानेवारी 14, 2010 @ 09:18:04
पंकज,
१८ / १ / २००७ ला सफरचंद फील तिळाच्या लाडवाना दिला होता. बीटचा रंग वापरला होता. देठाकरिता लवंग टोचली होती. फोटो वर तारीख आहे बघ. ह्या वर्षी साधे केलेत. गुळपोळी पण मला छान करता येते.
अनिकेत च्या नियमात बसत असेल तर ब्लॉग मीट ला जरूर घेऊन जा.
जानेवारी 14, 2010 @ 02:20:53
अनुजा, मकर संक्रांतीच्या तुम्हाला व सर्व कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा! लाडू व इतर पदार्थांचे फोटो बघून तोंडाला खरोखर पाणी सुटले आहे. पुरावा देता येत नाही. 🙂
जानेवारी 14, 2010 @ 03:12:50
सॉरी तुमच्या या पोस्टवरचे तिळगुळाचे चित्र मी माझ्या मनावर फक्त आजच्या दिवसासाठी हेडर मध्ये टाकले आहे.
जानेवारी 14, 2010 @ 09:28:21
रविन्द्रजी,
तिळगुळ वाटायचा असतो त्या मुळेच आनंद मिळतो. माझा फोटो आपण स्वीकारलात आनंद द्विगुणीत झाला. आपल्याला व आपल्या कुटुबियांना खूप शुभेश्च्या!!! सणात सोर्री वैगरे काहीही नसते. तीन वर्षापूर्वी मी सफरचंदाचा लूक लाडवाना दिला होता तो ही फोटो आपणाला आवडला असेल. नाविन्य पूर्ण कल्पनेनी सजावट करत असते. साधेच पण आपले वाटतात म्हणून यंदा असे केलेत. धन्यवाद!
जानेवारी 15, 2010 @ 20:10:07
मला तिळगुळाचे लाडू भारी आवडतात. अश्याच नाविन्यपूर्ण कल्पना राबवाव्यात हीच इच्छा. आणि हो मी आताच या ब्लॉग विश्वात आल्याने तीन वर्ष्यापुर्वीचे फोटो बघू शकलो नव्हतो. शक्य असल्यास ब्लोगवर टाकावे.
जानेवारी 15, 2010 @ 21:01:09
धन्यवाद राविन्द्रजी,
मी दोन नंबरचा फोटो तीन वर्षापूर्वीचा टाकला आहे. कारण त्या नंतर मी तिळाच्या लाडवाचे स्टोबेरी शेप केले होते. तसेच मी शक्यतो खाण्याचे रंग टाळते. बीट चा रंग वापरते. आता मात्र साधेच केलेत. मी पण ब्लॉग तीन महिन्या पूर्वी सुरु केला आहे. प्रत्येक वेळी फोटो काढावे असे ह्या पूर्वी फारसे कधी वाटले नाही पण हा दृष्टीकोन ब्लॉग ने दिला.
जानेवारी 14, 2010 @ 03:44:09
तुम्हाला पण संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा..
जानेवारी 14, 2010 @ 09:40:01
धन्यवाद,
@महेंद्र्जी, @आनंद,
आपणाला शुभेश्च्या!
जानेवारी 14, 2010 @ 08:05:44
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा..
जानेवारी 14, 2010 @ 08:34:11
wish u the same ………. u seems tobe very busy ………….
जानेवारी 14, 2010 @ 09:35:07
अश्विनी,
धन्यावद, खरच खूप व्यस्त होते. नंतर तुला सविस्तर मेल पाठवते. शुभेश्च्या!!
जानेवारी 14, 2010 @ 10:26:01
मिठाई पाहुनच तोंडाला पाणी सुटलंय… 🙂
मकर संक्रांतीच्या तुम्हाला व सर्व कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
जानेवारी 14, 2010 @ 12:05:29
भुंगा,
मिठाई?? अरे वा!!! माझे तिळाचे लाडू सफरचंदाची मिठाई वाटली. मला जमेल तेव्हढी कलाकुसर करते झाल. धन्यवाद!!
जानेवारी 14, 2010 @ 11:52:06
सफरचंद फील तिळाच्या लाडवाना..Simply Great. करून पाठवून दे ना प्लीज़ :p
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…तिळगुळ घ्या गोड गोड बोला
जानेवारी 14, 2010 @ 11:59:50
so sweet comment!! सुहास नक्की पाठवीन!! धन्यवाद!
जानेवारी 15, 2010 @ 08:15:36
तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा!:) दुसरा व तिसरा फोटो…. म्हणजे पदार्थ गं….एकदम मस्तच. दे बाई पाठवून.
जानेवारी 15, 2010 @ 11:52:18
भानस,
दुसरा फोटो जुना आहे. दर वर्षी काहीतरी नवीन करते पण नंतर फोटो ब्लॉग करीत लागतील हे तेंव्हा माहिती नव्हते. खाऊन मोकळे, म्हणून जुना टाकला आहे. आणि तुझ्या पदार्थापुढे
हे काहीच नाहीत ग. तुला माझी एक कविता संक्रातीचे वाण म्हणून इथे पब्लिश करते……
सौभाग्य लेणे सुगड संक्रांतीचे,
नाते सांगते अपुल्या जीवनाचे.
सुगड मातीचे नश्वर देह सारा,
अनुभवाच्या गोडव्याचा करवा उसाचा.
तुरट चवीचे हरभरे दाणे सारे,
भरले घटात कष्टांचे वन साचे
लाल गाजर सुगडी ठेवले,
सौभाग्या भोवती स्त्री खुलून दिसे
काटा साखरेचा टोचणी जिभेला,
हळूच मुखी घोळावा, गोडी मिळे संसाराला.
लाडू तीळाचा, गुळाच्या पाकातला,
सांगे संसार करावा नेटका सारा.
रुक्मिणीच्या ओटी वाण भरले,
असूनही पंढरपुरी तिचे स्थान निराळे
वाण माझे अपुल्या घरातील ‘ स्त्रीला’,
साजरा करा सण आनंदाने संक्रांतीचा,
नमस्कार माझा रुक्मिणी विठ्ठलाला.
अनुजा कडून हार्दिक शुभेश्च्या!