ओमान च्या मातीतील कलाकृती….

ओमान मध्ये गावांच्या ठिकाणी मातीच्या आकर्षक वस्तू तसेच वेताच्या वस्तू अशानी दुकाने ठासून भरलेली असतात. अनेक लहान लहान दुकाने रस्त्यालगत असतात. अशा ठिकाणचे फोटो देत आहे. मला काही आवडलेल्या मातीच्या कलाकृती आपणालाही आवडतील.

34 प्रतिक्रिया (+add yours?)

 1. KAVITA SAWANT
  जानेवारी 01, 2010 @ 11:57:44

  7 NUBERCHA PHOTO KASHACHA AHE TE NAHI SAMJALE. PAN KHUP CHAN AHET MATICHA KALAKRUTI.

  उत्तर

  • anukshre
   जानेवारी 01, 2010 @ 13:05:32

   कविता,
   आपले स्वागत! २०१० करिता शुभेश्च्या! ७ नंबर म्हणजे ash tray आहे. आपण मोजड्या असे म्हणतो का? अशा आकाराच्या शूज ना? मला नीटसे आठवत नाही.धन्यवाद.

   उत्तर

 2. अनिकेत
  जानेवारी 01, 2010 @ 12:14:17

  वॉव, कित्ती छान आहेत, तिन नंबरचे तर फारच आवडले मला. (माझ्या वाढदिवसाला गिफ्ट म्हणुन पाठवा ना)

  उत्तर

 3. अनिकेत
  जानेवारी 01, 2010 @ 12:17:40

  मरहबान!

  बाय द वे, मला अरेबीक भाषा सुध्दा फार म्हणजे फार म्हणजे फारच आवडते. कधी काळी मी ती भाषा शिकण्याचा प्रयत्नही केला होता पण आप्त आणि मित्रांनी आधी संस्कृत शिक मग असले काहीतरी प्रकार कर म्हणत मला माझ्या निश्चयापासुन प्रवृत्त केले

  उत्तर

  • anukshre
   जानेवारी 01, 2010 @ 14:04:20

   अनिकेत,
   २०१० साठी शुभेश्च्या! वेगळ्या आकाराचा माठ आहे नं! मलाही आवडला. पण भारतात आणे पर्यंत तुकडे होतील, जपून कितीही आणण्याचा प्रयत्न केला तरी खात्री नाही. हेच तर वाईट वाटते खूप छान गोष्टी मिळतात. पण इथेच बघून समाधान मानायचे. कधी जपून आणला तर नक्की भेट देईन.
   अरेबिक भाषा शिकणे इथे खूप गरजेचे आहे. माझा प्रयत्न सुरु आहे. आंबा, तवा, बटाटा, बाबा, असे खूप शब्द इथेही असेच आहेत. अरेबिक संस्कृतीशी आपला व्यापारच्या निमित्ताने पूर्वापार संबंध प्रस्थापित झालेला आहेच त्यामुळे काही शब्द आपले वाटतात.

   उत्तर

 4. सचिन
  जानेवारी 01, 2010 @ 12:43:18

  मस्त आहेत कलाकृती. ईथे शेयर केल्याबद्द्ल धन्यवाद.

  शेवट च्या फोटोमधील कोबंड्या कशासाठी वापरतात का फक्त शोपीस म्हणुणच.

  उत्तर

  • anukshre
   जानेवारी 01, 2010 @ 13:48:36

   सचिन,
   २०१० साठी शुभेश्च्या! स्वागत! हा तरी शो पीस आहे. पण बागेतले प्लास्टर ऑफ पॅरीस पासून बनवलेल्या अत्यंत आकर्षक अशा हंसाच्या, बगळे, करकोचे आकाराच्या झाड लावण्यासाठी कुंड्या छान मिळतात. पांढरे शुभ्र पक्षी लक्ष वेधून घेतात. भारतात पण मिळत असतील कदाचित म्हणून पोस्ट नाही केल्या. साधारण पाच वर्षाच्या मुलाच्या उंची पर्यंतच्या ह्या कुंड्या असतात व त्यांच्या पाठीत खोलगट जागा केली असते. कळवा, पहायचे असतील तर पुढे अजून काही फोटो ची पोस्ट द्यायची आहे त्यात ऍड करीन.

   उत्तर

 5. sureshpethe
  जानेवारी 01, 2010 @ 12:57:53

  कुंभार, येथून तेथून सारखेच! कलाकृती मात्र सुंदर आहेत !

  उत्तर

  • anukshre
   जानेवारी 01, 2010 @ 13:14:23

   २०१० करिता शुभेश्च्या! धन्यवाद. इथे सगळीकडे लाल मातीच काय पण साध्या मातीचे पण डोंगर सहज नसतात. फार कमी ठिकाणी अशी माती आढळते. म्हणून विशेष कौतुक. मातीच मन वेधून घेते नं, आपली पाळमूळ मातीतच घट्ट रोवली गेली आहेत. म्हणून वाळवंटी प्रदेशात खूप छान वाटतात अशा कलाकृती…….

   उत्तर

 6. महेंद्र
  जानेवारी 01, 2010 @ 19:08:40

  बर्ड हाउस मस्तंच आहे. पण तिथे वाळवंटात बर्ड्सआहेत कां?आमच्या नागपुरला तर उन्हाळ्यात ४७ डिग्री गेलं की चिमण्या टपा टपा मरुन पडतात. म्हणुन विचारलं.

  उत्तर

  • anukshre
   जानेवारी 01, 2010 @ 22:20:27

   महेंद्रजी,
   इथे ही उन्ही पारा ५० डिग्री पर्यंत जातो. तेंव्हा आम्हीच भारतात येतो. आल्यावर ऑगस्ट पर्यंत फारसे पक्षी दिसत नाहीत पण नंतर चिमण्या, साळुंकी, कावळे, पोपट दिसू लागतात. तसे पक्षांचे प्रमाण कमीच आहे. अनेक कावळे पाहीले पण ते भारतातल्या कावळ्या सारखे कर्कश काव काव करीत नाहीत. बसका आवाज वाटतो. कदाचित उन्हाळ्या मुळे असेल कोणास ठावूक? इथे सलाला म्हणून भाग आहे तिथे जून ला पाऊस असतो. मुसळधार अगदी भारतासारखा कदाचित तिकडे पक्षी मायग्रेट होत असावेत एक अंदाज!

   उत्तर

   • ravindra
    जानेवारी 05, 2010 @ 00:37:42

    अरे वा वाळवंतात पक्षी आणि पाउस. आपल्याकडे तर आता पक्षी दिसेनासे झालेत. हळू हळू पाउस सुद्धा

   • anukshre
    जानेवारी 05, 2010 @ 07:37:14

    धन्यवाद रविन्द्रजी,
    पाऊस फक्त डिसेंबर महिन्यात किंवा जानेवारी महिन्यात साधारण दोन ते चार दिवस असतो. ह्या वर्षी दोन तीन दिवस अजून वाढलेत कदाचित ग्लोबल
    ईफेक्ट असावा. डोंगरावर माती नसल्याने रस्त्यावर पुराची परिस्थिती होते. पक्षी आहेत प्रमाण तसे कमी पण कबुतरे अफाट संख्येत आहेत. कावळे, चिमण्या, पोपट , साळुंकी इत्यादी दिसतात.

 7. सुहास झेले
  जानेवारी 01, 2010 @ 21:06:59

  मस्तच आहेत..Thanxx for sharing 🙂

  उत्तर

 8. विशाल तेलंग्रे
  जानेवारी 02, 2010 @ 09:08:03

  ताई, सगळ्या वस्तू एकाहून-एक भारी, लयच भारी…! ते तीन नंबरच्या फोटोतल्या माठावर(??) काय लिव्हलंय अरबी भाषेमंधी…, ते सांगितलं तं बरं होईल…

  नव्या वर्षाच्या शुभेच्छा…

  विशल्या!

  उत्तर

  • anukshre
   जानेवारी 02, 2010 @ 10:00:02

   विशाल,
   २०१० साठी शुभेश्च्या!
   माझा अरेबिक चा अभ्यास पूर्ण झाला की सांगते. मी काही असा विचार केला नाही. तुझा कोणी मित्र हे वाचून सांगू शकत असेल तर मला ही कळव. एक नवीन माहिती मिळेल. छान निरीक्षण आहे. हे माझ्या लक्षात आले नाही. पुन्हा कधी गेले तर नक्की विचारीन व कळवीन.

   उत्तर

   • विशाल तेलंग्रे
    जानेवारी 02, 2010 @ 12:41:59

    चालन, मपल्या कोण्त्याच मितराला हे वाचता येणार नाही, त्यायले नीट इंग्लिश समजत नही तं ही अरबी कुठून समजणार…!!! तशी मले बी कुठी नीट समजते इंग्लिश…! 😉

    तूच एखांद्याला ईचारून कळवजू…

    विशल्या!

   • anukshre
    जानेवारी 02, 2010 @ 12:49:09

    विशाल,
    नक्कीच कळवीन. मी तुझे लेख वाचले. छान लिहिलेत. माझी प्रतिक्रिया वाच.

 9. nicrahul
  जानेवारी 02, 2010 @ 09:26:07

  chaan kalakruti aahet

  उत्तर

 10. gouri
  जानेवारी 02, 2010 @ 12:51:07

  फारच सुंदर … मातीची भांडी म्हणजे माझा वीक पॉईंट आहे 🙂

  नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

  उत्तर

  • anukshre
   जानेवारी 02, 2010 @ 12:58:33

   गौरी,
   मी तुला शोधतच होते. २०१० साठी शुभेश्च्या. मातीची भांडी गोळा करणे हा माझा छंद आहे. १५० किमी पर्यंत जाऊन आले ते ह्या खास कलाकृतींसाठी. अग, खूप छान छान फोटो काढले. पुढे कधी तरी अजून पोस्ट करते. भेटलीस म्हणून छान वाटले.

   उत्तर

 11. Nilima
  जानेवारी 02, 2010 @ 15:41:26

  kalakruti ekdamch chaan aahe 🙂 tumhi buissness chalu kartay kalale best luck pan kashacha te nahi samjle. aani ho tumcha Email ID kay aahe???

  उत्तर

  • anukshre
   जानेवारी 02, 2010 @ 17:15:06

   नीलिमा,
   २०१० साठी शुभेश्च्या! मी तुला मेल करते. बिझिनेस अजून कागदपत्रे व कायदे ह्या मध्ये आहे. लवकरच कळवीन. मराठी माणसाचा बिझिनेस असावा, असे एक कॉमन म्हंटले जाते पण त्यासाठी घरापासून कशी तयारी हवी, मानसिकता कशी हवी ह्यावर पोस्ट देणार आहे. बरीच यंग जनरेशन ब्लोग्गिंग मध्ये आहे. त्यांच्या करिता कदाचित उपयोगी पडेल. अर्थात त्यासाठी माझे उदाहरण दिले आहे.

   उत्तर

 12. देवेंद्र चुरी
  जानेवारी 02, 2010 @ 16:23:47

  छान कलाकृतीं आहेत.मला तो माठ आणी ते घर विशेष आवडल.
  तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

  उत्तर

  • anukshre
   जानेवारी 02, 2010 @ 17:04:24

   देवेंद्र,
   बऱ्याच दिवसांनी भेट होते. २०१० साठी शुभेश्च्या! छान आहेत न कलाकृती. मला मातीचा बटवा पण खूप आवडला. माठ वेगळ्या आकाराचा आहे. घर पण सुबक आहे. छान वाटले बऱ्याच दिवसांनी भेट झाली.

   उत्तर

 13. Manmaujee
  जानेवारी 03, 2010 @ 12:08:47

  खूप सुंदर. . .Thanks for sharing. . . नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!! सध्या मी कैरोत आहे तेव्हा अरेबिक शिकण्याचा माझाही प्रयत्न चालू आहे. . .आता अरेबिक जमते पण शोया…शोया. .:)

  उत्तर

  • anukshre
   जानेवारी 03, 2010 @ 14:57:41

   मनमौजी,
   नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!
   माझी मजल अरेबिक मध्ये शोयाच आहे. पण खूप उपयोगी आहे. माठ वरती अरेबिक मध्ये काय लिहिले आहे. याची उत्सुकता मला विशाल ने
   विचारली आहे. काही वाचून कळले तर कळवा.

   उत्तर

 14. Ashwini
  जानेवारी 04, 2010 @ 08:39:07

  mast aahet ga sagale photo 🙂

  उत्तर

  • anukshre
   जानेवारी 05, 2010 @ 07:42:16

   २०१० साठी खूप साऱ्या शुभेश्च्या अश्विनी,
   मला माहिती होते की तुला ही कलाकृती आवडणार. अजून ही बरेच फोटो आहेत. पोस्ट करीन जमेल तसे. वेळ मिळाला की मेल करून सविस्तर गप्पा करूया. बाय…

   उत्तर

 15. ravindra
  जानेवारी 05, 2010 @ 00:39:39

  आपल्या सारखे तिकडे सुद्धा मातीची भांडी बनवितात. संस्कृती जवळ जवळ सारखीच वाटते. छान कलाकृती आहेत. 🙂

  उत्तर

 16. Pranav
  जानेवारी 05, 2010 @ 08:53:54

  मला शेवटचा फोटो फार आवडला. पिगी बॅंक आहे का ती?
  गेल्या काही वर्षात भारतात सुद्धा रूरल आर्ट आणि हॅंडी क्रॅफ्टची प्रदर्शने जागोजागी लागलेली दिसतात. मजा येते बघायला.

  उत्तर

  • anukshre
   जानेवारी 05, 2010 @ 09:14:24

   प्रणव,
   आपले स्वागत! २०१० साठी शुभेश्च्या!! तो फक्त शोपीस आहे. मला पण असेच वाटले होते म्हणून उलटसुलट करून पाहीले. आपणाला आवडल्या छान वाटले, माती नेहमीच आकर्षित करून घेते हेच खरे आहे. धन्यवाद!!.

   उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: