धन्यवाद गौरी, ह्या वर्षाचा छान खेळ घेवून आलीस. तू आज खो!! खो!! सारखा खेळ आम्हाला सगळ्यांना खेळायला लावलास. आवडला. अशाच काही कल्पना नवीन वर्षा करिता असतील तर जरूर पास ऑन करा. आमच्या खेळात प्रतिक्रया देवून सहभागी व्हा आपले स्वागत!! आणि हो! हा खेळ सर्व ब्लॉग वर असेल प्रत्येक ठिकाणी आवर्जून भेट द्या.
TAG—–
1.Where is your cell phone?
रिंग देउन पहा.
( मी माझ्याच सेल ला रिंग देते शोधण्याकरिता)
2.Your hair?
हालच हाल चालू आहेत,
( मुलगा केसाच्या तारा उभ्या करतो आणि ह्यांचा सगळाच खर्च कमी झाला आहे)
3.Your mother?
आई,
4.Your father?
माझा अभिमान, आदर्श
5.Your favorite food?
भेल, पाणीपुरी ( ह्यांच्या भाषेत कचरापट्टी ), बटाटे वडा
6.Your dream last night?
पडतच नाहीत.
( बाहेर कुठे खट्ट वाजले कि जाग येते. पण झोप एका सेकंदात पुन्हा ढाराढूर पंढरपूर)
7.Your favorite drink?
ताक
8.Your dream/goal?
हम्म … इंटरेस्टिंग प्रश्न आहे. सद्ध्या तरी मला स्वतःचा व्ययसाय करायचा आहे.
9.What room are you in?
होम ऑफिस
10.Your hobby?
कंटाळा कधी येत नाही.
( जे परिस्थिती प्राप्त आहे त्यात मी रमते)
11.Your fear?
अपरात्री येणारा भारतातील फोन.
12.Where do you want to be in 6 years?
कायम घराबरोबर
13.Where were you last night?
मस्कत सोडून कुठे जाणार??
( भारतात असते तर कदाचित……)
14.Something that you aren’t?
diplomatic माझा परिवार व स्वतः बरोबर
15.Muffins?
अर्थात कुठलेही गोड पदार्थ
16.Wish list item?
शेतातील घर कौलारू.
17.Where did you grow up?
ठाणे
18.Last thing you did?
tag लिहिण्यासाठी घेतला.
19.What are you wearing?
जीन्स आणि कुर्ता.
( गणपती साठी नऊवारी साडी व नथ, दिवाळीत मात्र छानशी साडी)
20.Your TV?
‘हाय वे ऑन युअर प्लेट’ कार्यक्रमा साठी
21.Your pets?
खिडकीत पाणी पिण्यासाठी येणाऱ्या चिमण्या, चिनू मिनू कासवांची जोडी, आई कडचा मार्शल अल्सेशियन.
22.Friends?
डॉ. अनिरुद्ध जोशी.
( आमच्या परिवाराचे बापू.)
23.Your life?
काही खास नाही. रुटीन.
24.Your mood?
नेहमीच आनंदी
( काम व घर ह्यांच्यात योग्य अंतर ठेवू शकते)
25.Missing someone?
भारत
26.Vehicle?
निसान सनी
( कदाचित काही दिवसांनी टोयोटा land cruzer प्राडो)
27.Something you’re not wearing?
दागिने (नसती कटकट)
28.Your favorite store?
लुलू हायपर मार्केट व Carre fore (मस्कत)
भारतात बिग बाजार, सांगली व कोल्हापूर येथील( माझे सासर) आठवड्याचा बाजार. पुणे येथील कर्वे नगर विठ्ठल मंदिर रस्त्यावर शेतातील ताजी भाजी पहाटे येते, खरेदी साठी सही नेहमीच ताजेतवाने असते.
29 Your favorite color?
सगळे रंग आवडतात.
30 When was the last time you laughed?
गौरीचे tagal वाचून.
(महेंद्र्जी माझ्या सारखे गोंधळले म्हणून….हा हा!!! मी एकटीच नाही)
31.Last time you cried?
रडणे आठवत नाही.
32 Your best friend?
सेकंड ऑप्शन असेल तर नवरा, मुलगा
33 One place that you go to over and over?
अर्थात भारत.
( आई कडे व बापूंकडे बांद्र्याला)
34 One person who emails me regularly?
नवऱ्याशिवाय कोणीच नाही.
35. Favorite place to eat?
मस्कत मध्ये अन्नपूर्णा(साउथ इंडिअन हॉटेल)
व रोहन व पंकज ने सांगितलेल्या खादाडीच्या जागा.
———————————————————————————————————–
@ [ मी हेमंत, अखिल, प्रणव w ,चंद्रशेखर( अक्षर धूळ),यांना tag करते. ]
डिसेंबर 23, 2009 @ 06:34:02
he kay hote 🙂
डिसेंबर 23, 2009 @ 11:14:51
गोंधलळीस नं!! अश्विनी. माझे ही असेच झाले होते. पण गौरी म्हणजे ‘झाले मोकळे आकाश’ ब्लॉग. तिच्याकडून मला व बऱ्याच जणांना tagal केल गेल.खेळ पास ऑन केला म्हणजे उत्तर तर द्यायला हव. थोडक्यात ३५ प्रश्न कॉपी पेस्ट करून त्या करिता आपली उत्तरे द्यायची. असा हा खो!! खो!! रुपी खेळ पुढे पाठवायचा म्हणजे अजून खिलाडू आपण निवडून त्यांच्या कडे tag चे प्रश्न सोपवायचे. अशी साखळी तयार करायची.सगळ्यांचे ब्लॉग वाच व प्रतिक्रिया दे.
डिसेंबर 23, 2009 @ 07:03:35
वा वा 🙂 धन्यवाद
डिसेंबर 24, 2009 @ 08:48:43
हेमंत,
धन्यवाद! पण tag लिहिलास का? लिहिलास कि कळव मी लगेच येते वाचायला.
डिसेंबर 23, 2009 @ 11:55:36
Lay Bhari!!!
डिसेंबर 23, 2009 @ 18:42:09
गणेश स्वागत,
मी आताच तुझ्या ब्लॉग वर डोकावून आले.नंतर निवांत वाचेन. प्रतिक्रिया पण देईन. आता मी तुला tag करते. लिहून टाक उत्तरे पटापट लगेच वाचायला सगळे येतील. कळव. येत रहा. मी पण येईन नक्की वाचण्यास. बाय टेक केअर.
डिसेंबर 23, 2009 @ 12:43:29
कचरापट्टी??? चांगलाशब्द आहे.. मी पाणिपुरी क्रेझी आहे. इतर चाट आवडत नाहीत फारसे…
डिसेंबर 23, 2009 @ 18:35:35
हं! आज आजारी आहे त्यामुळे ह्या पदार्थां बद्धल लिहिले तरी बरीच तब्येत बरी होते. खर ‘धनंजय’ ला विचारा, मला ताप आला कि मी भेळ खाल्ली कि पुन्हा ठणठणीत होते. मनापासून भयंकर आवडते.
डिसेंबर 23, 2009 @ 12:45:09
malaa kaa ho nahi tag kelaa 🙂 ? tujhyaa business suru karnyasathi shubhecha !
डिसेंबर 23, 2009 @ 18:29:15
अजय व्हेरी सोर्री,
काल खूप रात्री मी tag केला. आजपण दिवसभर ताप होता म्हणून नेट वर आता आले. अजूनही चालेल न. बर मी तुला आता प्रतिक्रिया मध्ये tag करते.
ओके!! काल पण आजारी होते म्हणून लक्षात नाही आले. इकडे पाऊस आहे त्यामुळे हवामान बिघडले. तू लिहिलास कि कळव लगेच वाचते.
डिसेंबर 23, 2009 @ 20:14:58
मी तुम्हाला कालच टेगलय 🙂
डिसेंबर 24, 2009 @ 08:35:44
धन्यवाद रविन्द्रजी,
डिसेंबर 23, 2009 @ 20:23:26
विशलिस्ट मध्ये कौलारुचे घर!!!
तुम्हाला सहज शक्य आहे पण खूप मस्त विश!!!!!!!
डिसेंबर 24, 2009 @ 08:16:08
आनंद,
माझ्या विश ला तुझ्या शुभेश्च्या लाभल्या!!! धन्यवाद!
डिसेंबर 23, 2009 @ 21:42:40
अनुजा, खूपच मजा येती आहे या खो खो मध्ये.
आता मी शेत घेतलं ना, की तू त्यात कौलारू घर बांध 😀
आणि अल्सेशियन म्हणजे सहीच की … मला पण पाहिजे एक 🙂
डिसेंबर 24, 2009 @ 07:41:00
गौरी अपर्णा तुझी चौकशी करते आहे. मस्त कल्पना!!! दोघी मिळून राहू. पण भारतात येणे अवघडच आहे इतक्यात तरी. गुंतवून घेतले आहे बऱ्याच ठिकाणी. असो. अग, तू कोल्हापूर जवळची का? तरीही नक्कीच हा प्रस्ताव छान आहे.
डिसेंबर 23, 2009 @ 21:56:56
sundar !!!
डिसेंबर 24, 2009 @ 07:46:28
धन्यवाद राविन्द्रजी,
डिसेंबर 24, 2009 @ 01:17:58
गौरीने चक्क सगळ्यांना कामाला लावुन वर धन्यवाद पण घेतले नाही का….मग कुठल्या व्यवसायात पडताहात???
डिसेंबर 24, 2009 @ 07:45:01
तुझा निरोप गौरीला दिला. पण लगेचच तिची प्रतिक्रिया पहिली. तुला मेल वर कळवीन सगळे व्यवस्थित सुरु झाले की, आताच सर्व सांगणे कठीण आहे.कायदे आणि कागदपत्रे ह्यातून छाननी सुरु आहे.
डिसेंबर 24, 2009 @ 10:46:13
thanks for the tag, I have also posted my response. All the best for your business and other wishes!
डिसेंबर 24, 2009 @ 12:13:19
प्रणव,
स्वागत! माझ्या कडे आपल्या प्रतिक्रियेला क्लिक केल्यावर आपल्या ब्लॉग ची लिंक मिळत नाही. आज नुकतेच प्रकाशित म्हणून dash बोर्ड वर अजून नोंद आलेली नाही. आपला ब्लॉग प्रतिक्रिये वरून मिळण्या करिता चेंजेस करा. मला व सर्वाना सोयीचे होईल. कळवा, आपले उत्तर मला वाचण्यास यायचे आहे.
डिसेंबर 24, 2009 @ 15:32:23
Seems there is some problem as I did some chnages in the blog today. Hope you will be able to see the link now.
http://pranavw.wordpress.com/
Dhanyawad,
Pranav
डिसेंबर 24, 2009 @ 11:19:39
वाह फार छान 🙂
डिसेंबर 24, 2009 @ 12:16:41
कोणी tag केलंय का? नाहीतर ह्याची प्रतिक्रियेत माझ्याकडून tag देते. लिहील कि कळवा. आवडेल वाचण्यास. धन्यवाद सुहास झेले.
डिसेंबर 27, 2009 @ 07:57:27
Me pan “Tag”lo 🙂
डिसेंबर 30, 2009 @ 22:09:12
Hey, thanx for a wonderful comment 🙂
डिसेंबर 24, 2009 @ 22:37:04
सर्वांनी मी दिलेला ब्लॉग वरचा tag जरूर वाचा, खूप छान लिहिला आहे.मी लिंक देत आहे. ब्लॉग पण छान आहे.
डिसेंबर 25, 2009 @ 06:34:25
harshal chi blog link: http://mibajirao.blogspot.com/
-Ajay
डिसेंबर 27, 2009 @ 15:19:47
»» ग्रेट, ताई तु्झा दोन नंबर होता तर, या खेळातला…!!! एवढी मजा आतापर्यंत कधीच आली नव्हती, कालपासून गाल वर आलेत हसून-हसून…. प्रत्येकाने काहीना-काही मस्त मजेशिर लिहिलयं… अजुन असेच नवनविन खेळ पुढील वर्षात बघायला मिळतील अशी आशा… खुप मस्त लिहिलयं… 🙂
»» मला कांचन ताईने खो दिला होता, मला सुरूवातीला काहीच कळालं नाही, पण आत्ता कुठे सर्वकाही व्यवस्थित कळालयं…
»» मी यासंबंधित लिहिलेली पोस्ट येथे सापडेल…
– विश्ल्या!
डिसेंबर 27, 2009 @ 15:48:48
विशल्या,
आत्ता लगेच वाचते. बरे झाले भेटून सांगितलेस. मज्जा आली न taga ट्यागीत. मला खो गौरी ने दिला. तिला खरे श्रेय जाते. तिला पण ‘जी’ ने खो
दिला म्हणे. जाऊदे नदीचे मूळ शोधू नये म्हणतात…. आपण मात्र मज्जा केली. खूप दिवसांनी खेळलो.
डिसेंबर 27, 2009 @ 17:09:51
हाव, लय मजा आली… 😉
डिसेंबर 28, 2009 @ 10:24:51
मला शक्य झालं तितक्यांच टॅगींग वाचून झालंय. तुमचं टॅगींग वाचून छान वाटलं. तुमच्याकडे कासवं आहेत! हे टॅगणं मला पण कळलं नव्हतं. इकडे तिकडे वाचलं नि कळलं. पण मजा आहे. आपल्या सहब्लॉगर्सबद्दल थोडी इंटरेस्टींग माहिती कळते.माझं पण टॅगींग वाचून पहा.
डिसेंबर 29, 2009 @ 10:23:56
कांचन.
धन्यवाद! मी तुझा tag वाचला. मस्त लिहिलस. अभिप्राय दिला. येत रहा.
डिसेंबर 28, 2009 @ 22:47:32
काय उत्तर दिली आहेत ग बाई. छान.:)
डिसेंबर 29, 2009 @ 10:18:37
सुलभा,
स्वागत!! येत रहा. मी वाट पाहीन. धन्यवाद!
जानेवारी 11, 2010 @ 23:49:32
आईला… माझे नाव आहे या पोस्टमध्ये… कसे काय बुवा?
अप्पुन फेमस होरेला मामू… 🙂
खूप मजा आली ही सगळी टॅगाटॅगी करताना…