खारीचा वाटा, पर्यावरणाच्या सेतूसाठी………….

सध्या कोपेनहेगन च्या परिषदेवर, जागतिक पर्यावरण व त्यातील राजकारणावर भरपूर लेख येत आहेत. हिमनगांचे वितळणे. समुद्राने सीमारेषा बदलणे, वाहतूक, औद्योगिक करण असे वर्षानु वर्ष चावून चोथा केलेले विषय पुन्हा नवीन घास घेतल्या सारखे चावत राहतात. हा विषय आवाका फार मोठा आहे. वर्तमानपत्राचे एक पान सुद्धा अपुरे पडेल.

घरचे पर्यावरण पण अनेक वेळेला असेच चघळून बोलले गेले आहे. मी काय नवीन लिहिणार, असे असले तरी खारीचा छोटासा सहभाग पण रामाला महत्वाचा होता. आपण नुसते वाचतो, आपल्यावर वेळ आली तर कळवळून लिहितो. पण खरेच आपण आपल्या घरापासून पर्यावरण राखण्यासाठी कृती करतो का? लेखांची मांदियाळी त्यात सुद्द्धा जड जड शब्द वापरून लेख पण समस्येसारखा होतो. जे कोणी पर्यावरण वाचवण्यासाठी अगदी मनापासून कृतीशील आहेत त्यांना माझा सलाम!

आजच्या युगात कोणाला वेळ आहे असे करायला? खरय पहाटे पासून ते मध्य रात्री पर्यंत कामाचे, जवाबदारीचे, संसाराचे, तब्येतीचे, अशी अनेक ओझी आपण वाहत असतो अव्याहतपणे, अविरत करतो कारण दुसरा पर्याय नाही. स्पर्धात्मक युगात राहण्यासाठी धडपड करणे हा निश्चित आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. पण आठवड्यात, महिन्यात असे छोटेसे काम केले तरी त्याचे समाधान खूप काळ पर्यंत साथ देते. हा अनुभव माझा आहे.

मी सोसायटी किंवा गृह संकुल गृहीत धरून सांगते. आवारात घरची भाजीची देठे, किंवा फळांचे अवशेष, झाडाचा पाचोळा असे एकत्र करून नैसर्गिक खत मिळू शकते. घरात गॅलरीत, गच्चीत कुंडीत असे खत तयार करू शकतो. ज्याचा उपयोग परिसरातील झाडां करिता केला जावू शकतो. पण हे करणार कोण? कचरेवाला कचरा घेवून जातो, किंवा डक्ट मध्ये टाकतो. असा जैविक कचरा वेगळा गोळा करून ठेवायचा हे काम लक्षात राहील का? खरेच अवघड आहे? कचरे वाल्याला शिकवा, तो पण वेगळा चार्ज मागेल. पुन्हा सोसायटीचे बिल वाढेल. समस्या वाटेल पण सर्वांच्या मताने घेतल्यास पर्याय मिळू शकतो. अशक्य नाही, पण जमणार कसे? ह्या विचारात हे सर्व विसरतो. सर्वाचे सहकार्य सुरवातीला उत्साहाचे असते पण सातत्य कसे राहणार?

वर्तमान पेपर पासून पिशव्या बनवणे. स्वत: करिता उपयोग होतो. पण व्यवसाय म्हणून गृहिणी परिसरातील दुकानदारांना विकू शकतात त्या योगे घरात राहून व्यवसाय करता येईल. हे म्हणायला सोप्पे आहे पण पुन्हा करणार कोण? बाजारात उपलब्ध असल्यास विकत घेवू पण असे काही करायला वेळ नाही. ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही. कोणीतरी वाचून अमलात आणेल हि आशा मला नक्की आहे.

पुण्यात नवीन बांधकामांना रेन हार्वेस्टिंग सक्तीचे केले आहे. नेहमी प्रमाणे ह्या गोष्टी प्रत्यक्षात कार्यान्वित कमी प्रमाणात दिसतात. आपण गच्चीतले पाणी खाली ड्रेनेज ला सोडतो. त्याऐवजी जमिनीत टाकी बांधून साठवले तर, आपल्याला व परिसराला अडचणीच्या वेळेला उपयोगी पडेल. योजना मांडायला गोंडस असतात. पण आपण सर्वांना ह्यात सहभागी करून घेतले तर, गोंडस न राहता कणखर पणे कार्यान्वित निश्चित होतील. गरज आहे ती महिन्यातून एकदा एकत्र येण्याची व सातत्य पणे कार्यान्वित राहण्यासाठी नियोजन करण्याची, तसेच पर्यावरणाचे भान, समाजाची बांधिलकी जपणे. ह्यातुनच मनातला राम आपल्याला मिळतो कारण कृती खारीच्या वाट्याची असते.

आम्ही घरच्या बाल्कनी, गच्चीत कुंड्या मध्ये जैविक खत तयार करतो. भाजी, तांदूळ डाळ साधारण पणे दोनदा धुतो ते पाणीझाडा करिता वापरते. घरी गांडूळ खत पण बरेच जण तयार करतात. घरच्या कुंड्या मध्ये मका लावतो, त्याचा जनावरासाठी ताजा हिरवा पाला संस्थेमार्फत शेतकऱ्याला पाठविला जातो. जुन्या साड्या पासून गोधड्या बनवतो. साड्या, मका बी, खतासाठी लागणारे बेसिक सामान संस्थे तर्फे आणतो, तयार करून देतो.

कुठलीही प्रसिद्धी नाही, गाजावाजा नसतो. पर्यावरणासाठी, शेतकऱ्यासाठी. गरिबासाठी, देशासाठी जो तो आपल्या परीने सेवा देतो. ह्याचे प्रशिक्षण पण दिले जाते. तुमची भक्ती आहे का ह्या बेस वर नक्की नाही तर तुम्हाला स्वता:साठी शिकायचे आहे व त्याच बरोबर समाजाकरिता करण्याची इच्छा आहे. एव्हढेच मनात असावे लागते. मग तुमचा परमेश्वर किंवा श्रद्धा स्थान वेगळे असले तरी शेवटी एकाच जगतनियान्त्र्याकडे ही सेवा जाणार आहे. राम असो किंवा रहीम असो!

बरेच जण अशी सेवा वेगवेगळ्या संस्थे मार्फत करीत असतात. बचत गट, महिला गट, अशा अनेक माध्यमा तर्फे खूप जण सेवा व अर्थार्जन करीत आहेत. मी माझ्या संस्थेशी निगडीत आहे म्हणून माझा अनुभव लिहिला. असे काम मांजरीच्या गळ्यातील घंटा सारख्या अशक्य पठडीतील नाही. व्यवस्थित नियोजन केले तर आपल्या मनातील मदत करू इच्छिणारी खार आनंदाने विहार करू शकेल. मन सुखी तर आयुष्य आनंदी. हाच तर राम आहे जीवनातला. भले खूप मोठ्या प्रमाणावर करणे शक्य नाही पण जिथे कुठे जमेल तिथे फक्त पैशाने नव्हे तर कृतीने पण सहभागी होणे म्हणजे पर्यावरण करिता आपल्या क्षमतेला सक्रीय करणे होय.

घरात बऱ्याच वेळेला अकारण लाईट राहतो म्हणजे बाहेर जाताना बंद करण्याचे विसरतो, आंघोळीचे पाणी बदली भरून वाहत राहते, आवडते म्हणून अकारण भरपूर पाणी अंगावर घेतले जाते. बिल आम्ही भरतो कारण पैशांची क्षमता आमची आहे. असे असले तरी निसर्गा कडून तुम्ही मिळवता. हे नुकसान किंवा ह्याची भरपाई निसर्गाला पैशाच्या बळावर भरून देता येत नाही. रस्त्यावर लाईट दिवसभर चालूच राहतात असले तर????? पाणी पाईप फुटलेला असतो. हे सर्व कोण सांभाळणार ?

मस्कत मध्ये ह्या गोष्टी व्यवस्थित नियोजन बद्ध आहेत. परदेशाची सवय झाली की भारतात राहणे अवघड होते. ही पण माणसे आपल्या सारख्याच रक्त मासाची आहेत. परदेशाची असा शिक्का त्यांच्या भाळी नाही. मग आपण नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असूनही का मागे पडतो?. घरासाठी, परिसरासाठी, देशासाठी पर्यावरणाचा विचार करून, एखादी जरी गोष्ट केली. काही अंशी तरी आपण खारीच्या पाठीवरील रामाच्या चार बोटांचे प्रेम मिळवू शकू.

इथे समुद्राचे पाणी गोडे करून आम्हाला पुरविले जाते. मी पोस्ट करणार आहे ह्या वेगळ्या विषयासाठी, माहिती गोळा करणे चालू आहे. रत्याच्या दोन्ही बाजूला गच्च हिरवाई ची अनेक झाडे लावली आहेत. नयन रम्य भल्या मोठ्ठ्या निजामशाही बागा आहेत. बाथरूम चे सांडपाणी वेगळे गोळा करून त्यावर शुद्ध होण्याची प्रक्रिया केले जाते. हे पाणी बागांना व झाडांना वापरले जाते. अत्यंत काटेकोर पणे अमलात आणतात.

पावलोपावली भल्या मोठ्या डोंगर रांगा आहेत. सरळ सपाट जमीन कमी आहे. प्रत्येक रस्ता डोंगर कापून तयार केला आहे. डोंगरावर एकही साधे झुडूप पण नाही पण शहरापासून दूर जबल अकतर, सलालासारखे भाग मात्र भारताच्या पर्यावरणाशी मिळते जुळते आहेत. विरुद्ध पर्यावरण असूनही हे राष्ट्र समतोल राखून आहे. निसर्गाच्या संतुलनाची आपण मात्र जाण ठेवत नाही.

पर्यावरणाचा सर्वकष विचार जसा आंतरराष्ट्रीय पातळीवर केला जातो. तसाच घरात चार जणाच्या कुटुंबात पण व्हायला हवा. आपल्या जाणीवांना, जवाबदारीला ओळखले पाहिजे. आपली निष्क्रिय झालेली चेतना उत्फुल्लित करण्यास हवी. चावून चावून चोथा झालेले पर्यावरण विषय आता कृतीशील बनवून काहीतरी आपल्या परीने योगदान करावयासच पाहिजे. आपल्याला परिसरात अशा योजना कुठे राबवल्या जातात, आपण सहभागी होवू शकतो का? अशी माहिती मिळवून काही ठोस उपाय करता येतील का? या बाबत आपण जागरूक होवून एकत्र आलो तर पर्यावरणाचे राजकारण संपुष्टात नक्की येईल.

आपण समाजाचा एक छोटा परंतु महत्वपूर्ण घटक आहोत. एकट्याने जमेल तसे करणे व अनेकांना एकत्र करून भरीव काम करणे. ह्यातच पर्यावरण जपले जाते. छोटी खार पण पिढ्यान पिढ्या रामाची प्रेमाची चार बोटे पाठीवरती घेवून दिमाखदार पणे आपल्याच घराच्या आजूबाजूला दबकत, सावध, पण चाणाक्ष नजरेने फिरते. खार मदत करीत होती. बघता बघता सेतू सीतामाई कडे जाण्या करिता तयार झाला. प्रभू श्रीराम तिचे दैवत होते. वानर तिचे आदर्श झाले व खार मात्र सेतू जोडीत कधीच मनाने सीतामाईचे दर्शन घेवून आली

निसर्ग सांभाळून केलेला सेतू, जो आपल्याला पर्यावरण जोडण्यास सांगत आहे. निसर्गासाठी, आपल्या साठी मनातील खार कृतीशील होणे गरजेचे आहे.

20 प्रतिक्रिया (+add yours?)

 1. Ajay
  डिसेंबर 21, 2009 @ 21:16:42

  मी सुद्धा ए॑कलं आहे की तिथे पाण्यासाठी मिटर आहे म्हणजे जेवढ पाणी तुम्ही वापराल तेवढ्यावरच चार्ज. आपल्याकडे मात्र खुप ढोबळ हिशोब असतो. आपण निर्सग्स्त्रोताने समृद्ध आहोत म्हणुनच माज करत आहोत. एक दिवस निर्सग हे सारं उट्ट वसुल केल्याशिवाय कसा राहीन.
  खुप व्यवस्थित आणि अभ्यासपुर्वक विवेचन.

  -अजय

  उत्तर

  • anukshre
   डिसेंबर 21, 2009 @ 21:26:47

   हो अजय, इथे प्रत्येक घरासाठी वेगळे पाणी मीटर आहे. हा उपाय पण आपल्याला चालू शकेल. फक्त मीटर च्या तंतोतंत रीडिंग वर लक्ष पाहिजे. असे सेटिंग पण काही नवीन नाही……..

   उत्तर

 2. आनंद पत्रे
  डिसेंबर 21, 2009 @ 22:05:49

  आपल्याला असेच थर्ड वल्ड कंट्री नाही म्हणत ते… लोकांना समजले पाहीजे ना?
  सार्वजनीक ठिकाणी जर तुम्ही कचरा टाकण्यासाठी डस्ट बीन शोधता तर तुम्ही वेडे आहात किंवा अतीशहाणपणाचा आव आणतायं असे बाकी सगळ्याच्या चेहर्यावर भाव असतात.
  रोड टॅक्स, म्युनिसिपल टॅक्स भरतो म्हणुन रस्त्यावर कचरा फ़ेकणारे महाभाग आहेत इथे. असे लोक पर्यावरणाचा कधी विचार करतील..
  बघुया कधी सावध होतात ते. मी माझ्या कुवतीप्रमाणे पर्यावरण खराब न होवु देण्याची दक्षता घेतो.
  तुमचे विवेचन उपयोगी आहे…

  उत्तर

  • anukshre
   डिसेंबर 21, 2009 @ 22:12:59

   धन्यवाद आनंद. आज बरीच मोठी प्रतिक्रया पहिल्यांदा दिलीत. आवडली,आपली त्या मागची भावना समजली. अवघे धरू पर्यावरण साठी सुपंथ……..

   उत्तर

 3. ravindra
  डिसेंबर 21, 2009 @ 22:35:27

  अप्रतिम लिहिले आहेस. अगदी माझ्या मनाचे विचार आहेत. आणि हो मी कोणी ऐको अगर न ऐको माझे कर्तव्य पार पडतो आणि वातावरणास हातभार लावतोच. मी पावसाळ्यात टेरेसवर वतार हार्वेस्टिंग करतो. सोसायटीतील लोक ऐकत नाहीत म्हणून. या वर्षी बघू जमले तर. दुसरे घरात भाजी पाल्याचा कचरा निघतो तो बारीक करून टेरेस वरील झाडांना खत म्हणून घालतो. पाणी वाचविणे तर आमच्या घरात नित्याचे होऊन बसले आहे. साधे अक्वा गार्डचे सुरुवातीचे सोडावे लागणारे पाणी सुद्धा सौ. वाया घालवत नाही. हा खारीचा वाटा नाही का? प्रत्येकाने आप आपल्या परीने शक्य तितका हात भर लावला तर आज सुद्धा ग्लोबल वर्मिनला आला बसू शकेल हे माझे पक्के मत आहे. मी आता पर्यंत बर्याच पोस्ट या विषयावर टाकल्या आहेत. त्या ही माझ्या मराठी हिंदी आणि हो इंग्रजी ब्लोगवर सुद्धा. मी माझ्या मनावर पाणी वाचवा मोहीम चालविली आहे त्यावर २१ लोकांनी सहमती दर्शविलीआहे.

  उत्तर

  • anukshre
   डिसेंबर 21, 2009 @ 22:54:29

   धन्यवाद. मी पण पाणी वाचवा ला क्लिक केले आहे. पूर्ण सहमत. छान वाटले आपण हे सर्व करता.माझा सलाम! वृक्ष वेली आम्हा सोयरी वनचरी..
   प्रत्यक्षात प्रत्येकाने आणले तर…. निश्चित हा खारीचा वाटा नक्कीच आहे. त्यापुढे जावून म्हणेन आपणा कडून शिकण्या सारखे खूप आहे. घरी वहिनींना
   आवर्जून माझा नमस्कार पोहचवा. आपल्या ह्या विषयाच्या पोस्ट नक्की वाचेन. मी एक प्रयत्न केला लिहिण्याचा..

   उत्तर

 4. Aparna
  डिसेंबर 22, 2009 @ 04:24:17

  माझ्या जिव्हाळ्याचा विषय. छान माहिती दिलीत…संपुर्ण सहमत आणि वाचक आपापला खारीचा वाटा उचलतील..केवळ पाणी वाचवण्यासाठी मी इथे कामवालीची सोय नसताना भांड्यांसाठी डिश-वॉटर जमेल तितका टाळते…बरेच छोटे छोटे उपाय आहेत आपला खारीचा वाटा म्हणून करतेच आणि इतरांना नको असताना सल्ला देऊन पाहाते…दहापैकी एकाने जरी ऐकलं तरी एक खार वाढली काय???

  उत्तर

  • anukshre
   डिसेंबर 22, 2009 @ 07:43:26

   अपर्णा,
   मी जाणीव सांगते, गरज सांगते. पाणी हा एक मुद्दा तर आहेच पण इतर हि बरेच उपक्रम मी स्वत: करते. कामवाली बाई जितके पाणी वापरते त्या पेक्षा गरजेप्रमाणे मोजून पाणी स्प्रिंकल ने मशीन वापरते. त्यामुळे पाण्याची बचत होतेच.

   तू म्हणतेस कि हे सल्ले आहेत पण आपण जी गोष्ट करतो ती जरूर सांगावी एखाद्याला सल्ला वाटेल किंवा प्रेरणा पण मिळेल. मतितार्थ कसा घ्यायचा हे व्यक्ती पुरस्सर आहे. मर्यादित, संकुचित विचार व उच्चार ह्या कडे दुर्लक्ष केलेले चांगले…

   उत्तर

 5. Ashwini
  डिसेंबर 22, 2009 @ 08:06:16

  khare aahe tuze ekdam nusate bolat asto aapan pan karat kahi nahi mala sang ashi ekhadi sanstha pune ethe asel tar ……

  उत्तर

  • anukshre
   डिसेंबर 22, 2009 @ 08:25:39

   अश्विनी,
   तुला आता लगेच इमेल पाठवते. सविस्तर सगळे सांगते. जेव्हढे जमेल तेव्हढे शिकून घ्यावे. आपल्याला ही निर्मितीचा आनंद मिळतो, ज्ञान कधीच वाया जात नाही. मला बरीच ठिकाणे माहिती आहेत मी कळवते. तू विचारलेस, ज्ञान मिळवण्याची जिज्ञासा मला दिसली. त्यातूनच छोटीशी
   सेवा घडते. मला तुझा अप्रोच खूप आवडतो. खुसपटी काढण्यापेक्षा हे नक्कीच विधायक आहे. असो मेल वर भेटू…..

   उत्तर

 6. gouri
  डिसेंबर 22, 2009 @ 09:46:34

  khoop chotya chotya goshti asataat pratyekala karata yenya sarakhya.

  punyat aata ola kachara society madhyech jiravane, rainwater harvesting navya gharansaathi bandhankarak aahe – radat khadat ka hoina pan ammalbajavani suru jhali aahe.

  उत्तर

 7. gouri
  डिसेंबर 22, 2009 @ 15:51:58

  अनुजा, मी टॅगलंय तुला. माझी आजची पोस्ट बघ.

  उत्तर

 8. sonalw
  डिसेंबर 23, 2009 @ 16:05:04

  chaan lekh. Ha majhyahi jiwhalyacha wiahay aahe. majhya parine mi karat asate kahi bahi.
  paani waachawane, kachara rastyawar na takne, bhajiwalyakade kaapdi pishawi gheun jane ityadi. khat karnyacha wichar aahe. ajun amlat aanla nahi.
  Fukat janare ushte paani eka baadlit gola karun jhadanna ghalta yeil.
  Elctronics che main switches band karaychi saway lawawi. tya mule vampire electricty waachwata yete.
  Khar tar pratyekane aaplya dainandin jiwanat thoda wata ucalala tari khup farak padel. Pan galyashi yet nahi to paryant lok jhopunach raahtat.
  kititari ase prayatn thikthikani chalu aahet. kahi societies panyachya babtit swayanpurn jhalyat. rain harvesting ch paani borewell la jodal tar he howoo shakat. pan bahutaunsh lok dusaryane kahitari karnyachi waat paahat astat.

  उत्तर

  • anukshre
   डिसेंबर 23, 2009 @ 18:50:24

   सोनल स्वागत!
   बरेच छान छान कळले. बरे वाटते जेंव्हा आपण आपल्या परीने करतो तेंव्हा. खूप नियोजन पूर्व तुमचा प्रयत्न आहे. आपली प्रतिक्रिया १००% पटली. अशाच येत रहा. मी वाट पाहीन.

   उत्तर

 9. akhiljoshi
  डिसेंबर 23, 2009 @ 21:07:57

  आता साधी गोष्ट आहे..
  सगळ्यांनी बचतीचा मार्ग अवलंबला पाहिजेच..

  आपण आपले नैसर्गिक साधन संपत्तींचा -हास करतो आहोत आणि मग त्याच्याच नावाने बोंबलत
  हे वाचवा ते वाचवा करतो..
  पाणी वाचवा या कार्यक्रमासाठी निष्कारण प्रत्येक समोर एक एक बिसलेरी ची बाटली ठेवली असते..
  प्रदूषण वाचवा कार्यक्रमाला कधी कुणी चालत गेले आहे का स्वताच्या ऑफिस मध्ये?
  किवा आता कार्बन उत्सर्जन जास्त होते म्हणून मीटिंग ला किती लाईट मुळे कार्बन जाळला असेल?
  वीज बचतीच्या मीटिंग ला AC किती लावत असतील?
  कसलं का नि कसला काय..

  आपण मध्यमवर्गीय माणसांचे sandwitch मधल्या मध्ये.. सामान्य माणसाने जगायचे कसे?
  आम्ही रोज क्रिकेट खेळतो…….. तिथे आम्ही विकेट बनवत आहोत त्यासाठी पाणी हवे होते…
  तर आम्ही ते उपलब्ध केले खाजगी पाणी वितरक कडून…….. तो म्हणाला कि १२००० लिटर चा tankar …
  तुम्हाला हवे २००० लिटर पाणी.. बाकीचे मैदानावर मारून जातो…
  त्याला सांगितले उगाच पाणी फुकट जाईल.
  तू हवे तेवढेच पाणी दे………….. बाकीचे पाणी कुणाला तरी असेच दे… ज्याला गरज असेल…….पण पैसे मात्र
  सगळ्या tankar चे आमच्याकडून घे.. उगाच गरज नसेल तर मैदानात कशाला पाणी मारतोस?

  असे काही बारीक बारीक निर्णय घेवून आपणच संवर्धन करू शकतो……. असे मला वाटते..
  पण…. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे…

  उत्तर

  • anukshre
   डिसेंबर 24, 2009 @ 07:53:02

   खूपच छान व सविस्तर विचार करून प्रत्यक्ष अमलात आणता. हे पण संवर्धन आहेच. असाच येत रहा. आणि हो tag लिहिलास कि नाही?
   क्रिकेट खेळताना पाण्याचा पण विचार कधी हे सुचलंच नव्हतं. खूप समाधान वाटले. एक चांगला मुद्दा मांडलास.

   उत्तर

 10. विशाल तेलंग्रे
  जानेवारी 02, 2010 @ 08:38:58

  ताई, खुपच मस्त सांगितलं आहेस तू… प्रत्येकाच्या प्रतिक्रिया पण खुपच माहितीपूर्ण आहेत. अखिल जोशींचा अभिप्राय खुपच छान! मला या लेखाची लिंक आनंद पत्रेंनी दिली. आजच्या घडीला आपल्या सर्वांसमोर फक्त हेच पर्याय उपलब्ध आहेत, वाचवा, वाचवा अन फक्त वाचवा. नैसर्गिक संसाधने फुकट मिळतात म्हणून त्यांचा असा वारेमाप वापर आपण सगळ्यांनीच(मीसुद्धा) चालवला आहे. कारण या गोष्टीला फक्त जे करतात तेच जबाबदार असं मानलं तर आपण त्यांना तसं करण्यापासून अडवलं का नाही… आपणही त्या लोकांप्रमाणेच या येऊ घातलेल्या गोष्टीला बरोबरीचे जबाबदार आहोत. आपण स्वतःच्या पायावरच कुर्‍हाड पाडून घेतलिय, हे काही आता परत सांगायला नको. पाणी, इंधने यांचा अशा रितीने होत असलेला वापर एक दिवस यांचा व आपला र्‍हास करेल, हे सुद्धा सुज्ञ मंडळी जाणतात. इतरांचा भरवश्यावर जर आपण हातावर हात धरून बसणार आहोत आणि राहणार, की कोणीतरी काहीतरी करत असेलच, अन आपल्याला काय जमतंय त्यातलं, आपली लायकी नाही असे विचार मनात येत असतील तर नव्या वर्षाच्या या मूहूर्तावर तुम्हाला हे विचार बदलण्याची खुप मोठ्ठी गरज आहे. प्रश्न खुप मोठा आहे. सगळ्यांनी जमेल तशी, आपापल्या परीने मदत करावी ही सदिच्छा…

  आत्ताच माझ्या मनात आलं म्हणून सांगतो, काही श्रीमंत लोकांच्या घरी (नक्कीच पैशाने अन किंवा मनाने असणारे), अंघोळ करण्यासाठी शॉवर घेतात… नुसतं अंग स्वच्छ अन ताजेतवाने करण्यासाठी एक बकेटभर पाणी पुरेसं असतं, आमच्या घरीही आम्ही एक-एक बकेटच घेतो. या तर्‍हेच्या अंघोळीमुळे वेगळा आनंद अनुभवायला तर मिळेलच सोबत पाणी कीती वाचेल, याचा विचार अवश्य करावा.

  मी ग्लोबल वार्मिंग संबंधित लिहिलंय…
  १. नविन वर्ष – माझं रीझोल्युशन…
  २. यापेक्षा तिसरे महायुद्ध परवडेल…

  विशल्या!

  उत्तर

  • anukshre
   जानेवारी 02, 2010 @ 10:08:57

   विशाल,
   फारच छान प्रतिक्रिया आहे. आनंद पत्रे चे आभार! अखिल नेहमीच छान लिहितो, पण सध्या काही ब्लॉग वर दिसत नाही. मी तुझे लेख नक्की वाचेन.
   अतिशय समर्पक अशी तुझीही प्रतिक्रिया आहे. धन्यवाद!

   उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: