गुरुत्वाकर्षणच्या विरोधात……..

गुरुत्वाकर्षण च्या नियमाप्रमाणे कुठलीही वस्तू उंचावरून किंवा उतारावरून खाली पडते, यात काही वादच नाही. परंतु निसर्गात काही गोष्टी गुरुत्वाकर्षण च्या विरोधात पाहायला मिळतात. ह्यालाच इंग्लिश मध्ये anti garavity म्हणतात. सर्वसाधारण कुठल्याही कार म्हणजे चारचाकी गाडीला नियंत्रण करण्यासाठी ब्रेक, accelerator, गिअर असतात. ज्या योगे आपण गाडी सुलभतेने चालवू शकू.

गाडी चालू करून जर आपण गिअर न्युट्रल ला केला तर गाडी पुढे जात नाही. पायथ्यापासून उंचीवर किंवा चढावरून खाली येत नाही. परंतु anti gravity मुळे गाडी जरी nutral ला असली तरी ती पुढे ओढली जाते. आता जरी चढ असला तरी ती गाडी चढावर आपोआप वर जाते

ओमान मध्ये ‘सलाला’ ह्या ठिकाणी हे बघण्याची संधी मिळाली. मी येथे जे व्हीडीओ दिले आहेत ते यु ट्यूब वरून घेतले आहेत. पण गाडी न्युट्रल असूनही निदान ४० कि मी प्रती तास वेगाने पायथा ते चढ किंवा उलट वरून वेगाने खाली येते. ह्या व्हीडीओत रस्त्याचा चढ लक्षात येत नाही परंतु टेकडी एवढा चढ प्रत्यक्षात आहे. इथे हा व्हीडीओ व्यवस्थित दिसतो का? कळवावेत, गाडीची स्थिती प्रत्यक्ष कशी असते हे मी निवडलेल्या व्हीडीओ त स्पष्ट दिसते.

हे कसे घडते किंवा ह्याचे लॉजिक काय आहे हा पूर्ण पणे वेगळा मुद्दा आहे, मी जावून आले प्रत्यक्ष अनुभव घेतला म्हणून पोस्ट द्वारे आपल्याला तो कळवून आपण हि आनंद घ्यावा.

भारतात लडाख येथे आहे, तसेच अजूनही काही देशात हा point आढळतो. मला तांत्रिक भू गर्भ ज्ञान व त्याचा सखोल अभ्यास नाही. परंतु आवर्जून जावून हा अनुभव घ्यावा असे पर्यटक स्थान आहे.

व्हीडीओ ज्या पर्यटकांचा आहे त्यांचे आभार.

26 प्रतिक्रिया (+add yours?)

 1. आनंद पत्रे
  डिसेंबर 18, 2009 @ 23:02:38

  अहो आश्चर्यम!! असे खरेच होवु शकते का ?
  लडाखला जावं लागेल 🙂

  उत्तर

  • anukshre
   डिसेंबर 19, 2009 @ 07:05:26

   धन्यवाद आनंद,
   मस्कत ला आलात तरी नक्की दाखवेन. व्हीडीओ स्पष्ट दिसतोय नं. nutral ला असूनही गाडी पुढे जाते हा अनुभव नक्की मिळतो. म्हणून पोस्टल केलाय.

   उत्तर

 2. madhuri
  डिसेंबर 19, 2009 @ 07:22:18

  optical illusion cha ha prakar ahe. tithli rachana neat pahili tar lakshat yete. Aplyala diste tase naste

  उत्तर

 3. Ajay
  डिसेंबर 19, 2009 @ 07:38:32

  अ‍ॅमझींग, या व्हिडीओ मध्ये तो चढ नाही दिसत पण न्युट्रल असताना ही ४० च स्पीड यातुनच सर्व काही समजत. तु तिथे खाली उतरुन उड्या किंवा थोडस पळून पाहिल का म्हणजे काही फरक जाणवला का 🙂

  उत्तर

  • anukshre
   डिसेंबर 19, 2009 @ 15:12:24

   अजय. हो इथे चढ दिसत नाही पण यु ट्यूब वर असे अजून काही व्हीडीओ आहेत जेथे चढ कळतो पण त्याच्यात पर्यटकांचे संभाषण व चेहरे दिसतात. म्हणून टाळून हा निवडला. मी येथे उतरून चालून पहिले नॉर्मल रस्ता आहे. विशेष काहीही नाही जाणवले. ह्या मागे नक्कीच काही शास्त्र किंवा लॉजिक आहेच. पण स्पीड चा आनंद मी घेतला. तो ही गाडी nutral ला असून. बाकी काथ्याकुट करीत नाही बसले.

   उत्तर

 4. madhuri
  डिसेंबर 19, 2009 @ 07:39:23

  please visit http://en.wikipedia.org/wiki/Gravity_hill

  North americet hi ashi barich thikane ahet jithe guides tumhala misguide kartat. tumhi ekhadi perpendicular vastu tyawar pahilit tar lakshat yeel. baryach shiklelya loknacha yawar wishwas basto he ek ascharyachi gosht ahe

  उत्तर

 5. महेंद्र
  डिसेंबर 19, 2009 @ 15:30:19

  मस्त आहे जागा.. पहायलच हवी. माधुरी, थॅंक्स फॉर लिंक, आणि अनुजा फॉर द पोस्ट..:)

  उत्तर

  • anukshre
   डिसेंबर 19, 2009 @ 15:41:57

   महेंद्र्जी, मस्कत ला केंव्हा येता? माधुरी यांनी दिलेली लिंक माहितीपूर्ण आहे. लॉजिक तर नक्कीच आहे. हा अनुभव पण आनंद देणारा आहे.
   पुन्हा सुद्धा आपल्या बरोबर जायला आवडेल. nutral ला स्पीड येतो.

   उत्तर

 6. महेंद्र
  डिसेंबर 19, 2009 @ 17:30:58

  नक्कीच आवडेल यायला तिथे.. बघु या कधी जमतं ते..

  उत्तर

 7. ravindra
  डिसेंबर 19, 2009 @ 21:15:31

  मला एक कळले नाही की anti gravity ह्याला का म्हटले आहे ते. गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध असेल तर गाडी पृथ्वी पासून लांब हवेत तरंगायला हवी. तसे येथे होत नाही. दुसरे तुम्ही डोंगरावरून उतरतांना सुद्धा गाडी सरकते असे लिहिले आहे, माझ्या मते गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात ती गाडी चालत असेल तर डोंगरावरून खाली स्वतः येणार नाही. असो मला हा दृष्टी भ्रमाचा प्रकार आहे असे वाटते. म्हणजे असे की जे असते ते दिसत नाहीआणि जे दिसते ते असत नाही. 🙂 🙂

  उत्तर

  • anukshre
   डिसेंबर 19, 2009 @ 21:46:00

   रवींद्र,
   यु ट्यूब ला anti gravity असा सर्च दिला की बरेच व्हीडीओ बघायला मिळतात. इथे ह्या जागेला पण असेच नाव आहे. त्याच बरोबर ह्याच्या
   लॉजिक ची पण माहिती net वर मिळते. गाडी nutral असूनही जाते. आपण दृष्टी भ्रम म्हणताय, हे लॉजिक पण असेल कदाचित पण गाडी पुढे जाते हे नक्की. nutral असताना गाडी पुढे जाते हे मी स्वत अनुभवले आहे.इथे चढ पण आहे तसाच स्पीड चा अनुभव येतो.
   मी एक अनुभव दिला, प्रत्येकाने आपल्या परीने शोध घ्यावा. लॉजिक नक्की आहे.पण त्या करिता ही पोस्ट नाही. मी फक्त माझा अनुभव लिहिला.

   उत्तर

 8. Suhas Zele
  डिसेंबर 20, 2009 @ 11:16:03

  हो लडाख ला मॅग्नेटिक हिल आहे….निसर्ग कधी कधी स्वत:च असे अपवाद निर्माण करतो..सलाला बद्दल मी पहिल्यांदाच एइकतोय पण आता मी लडाख ला जाईन तेव्हा स्वत: वीडियो आणि एक्सपिरियेन्स घेऊन येइन. खरच खूप माहितीविषयक माहिती आहे ही. थॅंक्स…I m eargly waiting for my Ladakh trip 🙂

  उत्तर

 9. हेमंत आठल्ये
  डिसेंबर 20, 2009 @ 20:43:05

  तुमच्या नोंदी खरच खूप छान असतात. आणि तुमचा ब्लॉग देखील खूप छान आहे. मी काही तुमच्या इतका ज्ञानी नाही. ना अशा गोष्टी मला फार कळतात. पण तरी देखील तुमची लेखन पद्धत फारच चांगली आहे. त्यामुळे बराच काही आशय कळला. आणि हो, मी कोणतीच प्रतिक्रिया देत नाही हे देखील खर आहे. त्याबद्दल क्षमस्व. माझा असा काही नियम नाही की कोणालाच प्रतिक्रिया द्यायची म्हणून. यापुढे नक्की देईन. बाकी तुमचा लेख आवडला. खूपच छान लिहिता.

  उत्तर

  • anukshre
   डिसेंबर 20, 2009 @ 22:03:53

   हेमंत स्वागत!
   धन्यवाद ब्लॉग वाचलास म्हणून. मी पण ज्ञानी वैगरे काही नाही असा गैरसमज करून घेवू नकोस. मी अनेक वर्ष शिक्षिका होते. त्यामुळे
   मला काय लिहायचे आहे त्याबाबत मी स्पष्ट असते, व स्पष्ट सांगते सुद्धा हा माझा स्वभाव आहे. तुला ज्या पोस्ट आवडतील त्या बाबत जरूर सांग.
   मी सगळ्यांना प्रतिक्रियांना आवर्जून पोच द्या असे सांगते. वर्गात विद्यार्थी पहिल्या बेंच वर कायम असला तरी हजेरी पटाची सवय काही जात नाही.
   असो ह्या अशा शाळे बद्धल लिहीन कधीतरी……तू मात्र गुड बॉय सारखा आलेला मला ब्लॉग बोर्ड वर दिसतोस पण गप्प असतोस. म्हणून हे सगळे तुला सांगणे आहे….

   उत्तर

 10. Ashwini
  डिसेंबर 21, 2009 @ 07:45:01

  Hi, Mast aahe lekh … aani tu kayam veg vegale lihites mhanun pan bhavtes hehehe kasale yamak julale bagh yete ch aata maskat la

  उत्तर

  • anukshre
   डिसेंबर 21, 2009 @ 08:03:35

   अश्विनी,
   तुझ्या ही प्रतिक्रिया नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या असतात. मी तुझ्या प्रतिक्रिया दुसऱ्या ब्लॉग वर पण असलेल्या वाचत असते. तू वैयक्तिक कौतुक करतेस म्हणून नाही पण तुला लिखाणाच्या अध्यारुत किंवा लिखाणाच्या पद्धतीवरून नेमके कसे वाचायचे हे उत्तम जमते. त्यामुळे सर्व ठिकाणी तुझ्या प्रतिक्रिया सकारात्मक असतात.धडा वाचणारा संपूर्ण वर्ग असतो पण आशय लक्षात घेवून जो वाचतो, त्याचे वाचन
   जास्त परिणामकारक असते. आता हे मी कसे ओळखते, मी हस्ताक्षर किंवा लिखाणाच्या पद्धतीवरून ओळखू शकते.हा माझा अनुभव आहे. असो फारच मोठी पोच होते.नेहमी येतेस, मी पण कायम तुझी वाट पाहत असते.मस्कत ची अजून खूप ठिकाणे माझ्या पोस्ट वर यायची आहेत. खूप छान आहे मस्कत, वाचत रहा. इथे भारता सारख्या खूप सुट्ट्या नाहीत व वैयक्तिक सुट्टी पण एखाद दिवसाची कधीतरी घेता येते. मी पोस्ट लिहीन तेंव्हा खुलासा करणार आहेच. त्यामुळे ठिकाणे पाहायला जाण्यासाठी पण खूप थांबावे लागते.

   उत्तर

 11. Ashwini
  डिसेंबर 21, 2009 @ 10:02:25

  khup ch koutuk kele maze heheh mala zepat nahi ase koni maze koutuk kele ki ………… mala tuzi khup ch madat lagel pudhe pudhe mala mulila chan chan shikvay che aahe tya sathi 🙂

  उत्तर

  • anukshre
   डिसेंबर 21, 2009 @ 10:16:21

   अश्विनी,
   मी तुला मेल पाठवते. म्हणजे onl सुद्धा गप्पा करता येतील. तुला माझ्याशी संपर्क साधता येईल.काही काळा नंतर मी प्रतिक्रिया अप ग्रेड करीत असते. त्या मुळे इमेल वर बोलू. हक्काने सांगितलेस हे मनाला स्पर्श करते झाले. अजून काय लिहू??? शब्दच नाहीत.

   उत्तर

 12. akhiljoshi
  डिसेंबर 23, 2009 @ 21:00:45

  कुठलाही नियम हा अपवादाने सिद्ध होतो…
  किवा अपवाद असेल तरच त्याला नियम म्हणतात… कसाही..

  अनुभव छानच असेल……… इथे गुरुत्वाकर्षणाचा नियम फक्त माहित होता… अशाही गोष्टी
  घडतात, आश्चर्य चकित करतात… नवल आहे…
  आणि अशा गोष्टी तुम्ही अनुभव म्हणून कथन करता म्हणून आमच्या सारख्यांना कळते..
  आभारी आहे..

  उत्तर

  • anukshre
   डिसेंबर 24, 2009 @ 08:12:46

   अखिल,
   मी जे पाहते तसं मी लिहिते पण कधी तरी मी न पाहिलेली पर्यटक ठिकाणे पण लिहिणार आहे. तसं मी पोस्ट मध्ये लिहीनच. असो. मी प्रत्येक जागेचे भौगोलिक नियम नाही लिहित बसत, प्रत्येक जण आपल्या परीने समजावून घेत असतो. मी फक्त तू म्हणतोस तसे मस्कत मी
   दाखवते. बाकी इतिहास व भूगोल, शास्त्र सगळे आहेच कि, पण निदान अशा जागा पाहिल्या तरी पाहिजेत. अशा मताची मी आहे. शास्त्रीय कारणासहित
   लिहिणे हा प्रकार पर्यटक स्थान माहिती लिहिताना योग्य नाही.तो संपूर्ण वेगळा विषय आहे. मी चमत्कार असे ही म्हणत नाही व शास्त्रीय कारणे लिहिण्याच्या उद्योगात पडत नाही. हा थिसीस नाही. तुला हे समजले पण…….. जाऊदे. तू आनंद घेतलास, हेच मला आवडले.

   उत्तर

 13. अनिकेत
  डिसेंबर 30, 2009 @ 15:30:15

  हम्म.. फसवताय ना? मागुन कोणीतरी गाडी ढकलत होतं ना? खरं सांगा! मागचा व्हिडीओ नाहीचे!!
  ही ही ही. असो.. अशी जागा लडाखमध्ये आहे हे ऐकुन आहे. बजाजच्या डिस्कव्हर च्या जाहीरातीत तो ‘मॅग्नेटीक पाईंट’ दाखवला आहे.

  असो, अनुभव मस्त मजेदार असेल यात शंका नाही

  उत्तर

  • anukshre
   डिसेंबर 30, 2009 @ 21:26:43

   अनिकेत,
   स्वागत! मी कशाला फसवू? या इकडे व पाहून जा. यु ट्यूब वर ‘anti gravity salalah oman ‘ असे दिले कि अजून व्हीडीओ पाहायला मिळतील. मी निवडून घेतला कारण काही व्हीडीओ त त्या
   कुटुंबाचे संवाद आहेत. असो अनुभव मस्त होता.

   उत्तर

 14. rohan
  जानेवारी 06, 2010 @ 12:07:48

  मी स्वतः ऑगस्ट मध्ये लडाख मधील ‘मॅग्नेटिक हिल’ येथे जाउन आलो आहे. मस्त अनुभव होता. गाडी कितीही पळवली तरी पळत नाही. स्लो होते एकदम. रस्त्यावरील एका जागेत उभी केल्यास अपोअप पुढे सरकू लागते… अश्या अजून काही जगान वर जायला आवडेल … मस्त स्पोट.

  उत्तर

  • anukshre
   जानेवारी 06, 2010 @ 12:17:06

   रोहन,
   २०१० साठी शुभेश्च्या!!! ये मग मस्कत ला. अजून ही छान जागा आहेत लिहिणार आहे. तुलाही त्या जागा आवडतील.

   उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: