मी नगरसेविका…………

अनुक्षरे म्हणाली, उद्या एक छान आश्चर्यजनक पोस्ट देते, मी ‘अनुक्षरे’ ला माझ्या मैत्रीणीला माझा निरोप कळवला. दोन दिवस तुझ्या पोस्ट मी वाचू शकत नाही. मागची पोस्ट शोधून वाचायला एवढा वेळ नसतो. त्या पेक्षा दोन दिवस थांब, माझी कारणे तर समजावून घे. सध्या काही लग्न मुहूर्त नाहीत तरी पण लगीन घाई आहे हो माझी. कामाची ही भली मोठी यादी आहे. नाहीतर मैत्रीण असूनही मी प्रतिक्रिया का देत नाही? असा समज व्हायला नको. वाचकांना उसंत मिळेल तेंव्हा येतातच. पण मी मुद्दामहून येत नाही हे का ते तुला समजेल. तशी मी दुसऱ्या पोस्ट वर पण नाही हो असणार. वेळ नाही म्हणजे, कुठेच नसेन इतका प्रामाणिकपणा मी जपला आहे.

मी वसईला चालले आहे आणि गोव्याला माझे मिस्टर. दोन्ही ठिकाणे काही हे माहेर व ते सासर असे नाही. आम्ही आहोत समाजसेवक पण म्हणतात नगरसेवक. वर्षभर काही न काही तरी कामे करीत असतोच. शीणवटा जाणवतो. आमचे पण संसार आहेत. ते सांभाळून समाजा करिता नगरसेवक होणे होय. ह्यांचा पक्ष वेगळा, माझा वेगळा आहे. मुद्दामहूनच वेगळा निवडला.

वर्षातून एकदा आमच्या मतांचे महत्व पक्ष श्रेष्ठींना जाणवते. दोन दिवस फार जपतात. दोघानाही वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यास मिळते. पक्षाच्या खर्चाने, बडदास्त ठेवतात. दोन्ही ठिकाणची माहिती काढून नंतर मुलांना पाठवता येते. दोन पक्ष वेगळे तरी कामे एकाच घरातून करतो आम्ही. वैर, राग, लोभ बाजूला ठेवून जो समाजा करिता काम करतो.

आज मी आता तरी ब्युटी पार्लर मध्ये जाते. कुठे ही खास जायचे असले तर निदान चेहेरा ताजातवाना वाटायला हवा. मी बाहेर दोन दिवसा करिता जात आहे. घरचे सगळे मॅनेज करून निघाले. माझे पतीराज सुद्द्धा बाहेर निघाले. आम्ही एकत्र कुटुंबाच्या सहलीला निघालो नाही. मला दोन मुलगे आहेत. त्यांना माझ्या मैत्रिणीच्या फार्म वर पाठवले. सगळ्यांच्या सोयी लावताना जीव मेटाकुटीला आला.

आता तरी गडबड आहे ती पार्लर ला जाण्याची. कालच कळले आम्हाला वसईला नेणार. आमचा श्रम परिहार होणार. काय काय वसईला मिळते त्याची शोधाशोध ब्लॉग वर केली. हल्ली वर्तमान वृत्त फारसे वाचत नाही. आमच्या सारख्या सेवका बद्धल उगाच ओरड केलेली असते. त्या पेक्षा ब्लॉग चांगले. अद्यावत माहिती मिळते, शिवाय पक्षा कडून मिळालेला संगणक चांगल्या गोष्टी वाचण्या करिता उपयोगी पडतो. काही असे ब्लॉग वर असते, ते वाचायचे नाहीत. क्लिक करणे तरी माझ्या हातात असते. पेपर सारखा धाडकन आपलाच फोटो अंगावर कोसळत नाही.

वसई चा स्पेशल ब्लॉग काही मिळाला नाही. खाणे ते खरेदी बद्धल वाचून हॉटेल वर मागवता येतात. मागे पक्ष कामाकरिता ‘इंदोर’ ला गेले होते. बर झाल मी संगणक प्रशिक्षित आहे. कुठे ही गेले तरी ब्लॉग मुळे अडत नाही. छान खाणे कळले. खुशीत पोटभरून अनेक शुभेश्च्या लेखकाला दिल्या. तशी मी लॅपटोप नेतेच पण आता नाही नेऊ शकत, माझ्या बरोबर निदान बस भर मैत्रिणी आहेत, उगाच त्यांना कळायला नको माझ्या माहितीचा सोर्स. सगळ्या नगरसेवक आहेत.

पण स्त्री स्वभाव उगाच जास्त माहिती नको द्यायला. साऱ्याजणी कशा चकाचक येतील, भारी मेकप, उंची आवड दर्शवणारी साडी, लेदर ला बंदी असली तरी पर्सेस त्याच असतील. माझी हीच धावपळ चालू आहे. खादी साडी, पांढरे केस करून समाज सेवा करणऱ्या आम्ही आंदोलन कर्त्या नव्हेत. ‘तुमची वाहिनी’. असे ममत्व तुम्हाला वाटले तर, तुमच्या समस्या मला सोडविता येतील. मग व्यवस्थित नको का असायला.

आमच्या नगरसेवक मैत्रिणी सारख्या ठरवतो. काय काय करायचे. छे त्या आय टी मधल्या ब्लॉग वर वाचले कसले रटाळ सेमिनार असते. जांभया येतात म्हणे, बिच्चारे! आमचे काही शिक्षण पद्धती,पाणी प्रश्न असे गहन सेमिनार नाही. आम्ही पण सर्वसाधारण गृहिणी आहोत. ज्याचे सरकार ते निर्णय घेतील.

आयते माहेर मिळणार. हाच आनंद मोठा आहे. मी तरी थ्री स्टार हॉटेल ला आहोत पण ‘हे ‘तर गोव्यात पंच तारांकित आस्वाद घेतात. तसा इथे पण स्पा आहे पण त्यापूर्वी बस मध्ये इम्प्रेशन चांगले पाहिजे. हा खर्च माझ्या पाकिटातून नाही करणार. पार्लर वालीचे एक लायसन्स चे काम मी करणार आहे. मग तीच अवघडेल पैसे मागण्यास. असाच लोभ वाढत असतो जन समाजात आमचा.

एकीचा फोन आला नवरा व ती एकाच पक्षाच्या. तर तिची इच्छा आहे की एकच स्पेशल सुट म्हणजे स्पेशल खोली त्यांना मिळावी. कमालच आहे, त्यांचा हनिमून पण पक्ष प्रमुख करतील का? काय सांगू मी कश्या समस्या सोडवते. ‘भुजिंग’ म्हणे खास आहे वसईची खासियत खाण्यासाठी पण ती माहिती पण खाण्यासाठी जन्म असूनही मला ब्लॉग वर भटकंती करून पण मिळाली नाही. ‘अनुजा’ ठाण्याची, तिथून वसई लांब नाही पण ही सुद्धा शिक्षणाच्या अवघड गप्पा करीत बसली. कोणाला विचारले नाही. मग मी ह्यांना विचारले, माहिती मिळवली.

असो पार्लर चे काम आटोपले आता ठेवणीतल्या साड्या, आणि पोहण्याचा सरंजाम पण नेते बरोबर. गुलाबाच्या पाकळ्या पसरवलेला म्हणे तलाव आहे. तरीच स्पेशल सुट हवा आहे. उगाच काही दुसरी भानगड नको निर्माण व्हायला काय करणार आम्ही पण गृहिणी आहोत.

संगीताचा कार्यक्रम पण ठेवला आहे. बरे झाले खूप दिवसात निवांत गाणे ऐकले नव्हते. पाहुणे म्हणून हजेरी असते तेंव्हा पक्षाची जवाबदारी वेगळी असते. रग्गड जेवणे, सगळ्यांशी गप्पा करणे. असेच सोशल असतो आम्ही कारण समाजात मोकळे पणाने फारसे फिरत नाही. समस्या पाहिल्या की वेदना होतात. निवडणूक झाली की आमची स्वता:ची कामे सुरु करतो. म्हणून हा निवांतपणा खाजगी पण, पक्षाचा असतो.

इतके सर्व व्याप आहेत. दोन दिवस मी नेट पासून दूर राहणार आहे. रूम मध्ये सोय आहे. पण शेअर करणाऱ्या नगरसेविका आहेत. त्यांचे कसे चालले आहे. पक्षाच्या मर्जीतले कोण? पक्ष प्रमुखांच्या घरचे काय म्हणतात. झालेच तर एखादीचा नवरा कसा बेताल वागतो त्याला श्रेष्ठी कडून कसे वटणीवर आणायचे सर्व काही पहायचे आहे. कोणाचा परदेश दौरा आहे का? कसा अमलात आणला त्याचे रहस्य जाणणे गरजेचे आहे. अनुजा कधीची मस्कत ला ये म्हणते, पक्षाकडून विमानाचे तिकीट पाहिजे. तो पर्यंत ओमान च्या प्रेक्षणीय स्थळा बद्धल लिही. मी ब्लॉग वर माहिती घेऊन ठेवते. म्हणून तिला सांगितले दोन दिवसा नंतर लिही.

ह्यांना सांगायला पाहिजे, गोवा तसे निर्बंध मुक्त आहे पण तब्येत सांभाळून दोन दिवस सुखात रहा. कारण परमेश्वराला माहिती नाही की, आपण नगर सेवक आहोत म्हणून स्पेशल आपल्यासाठी काही करावे. परमेश्वर असा आहे की, त्याचे काम नगरसेवक करीता अडत नाही.

ता. क.—-आता दिलेली पोस्ट पूर्णपणे काल्पनिक आहे. नगरसेवकांना निवडणुकीत खास करून वेगळे टेवतात. कारण त्यांची मते दुसरा पक्ष मिळवण्याचा प्रयत्न करतो. ह्या बातमी वरून सुचलेली ही पोस्ट आहे. जिवंत अथवा मृत व्यक्तीशी, अथवा कुठल्याही घटनेशी ह्या पोस्ट चा संबंध नाही. वाचकांनी कृपया ही नोंद घ्यावी अशी नम्र विनंती. धन्यवाद.

Advertisements

20 प्रतिक्रिया (+add yours?)

 1. भुंगा
  Dec 16, 2009 @ 21:05:42

  अरे वा! नगरसेवक/ सेविका बनविण्याचा चांगला ‘क्लास’ आहे हं!
  तरी मी म्हणतो असे अस्सल “पुढारी” बनतातच कसे?

  प्रत्युत्तर

  • anukshre
   Dec 17, 2009 @ 07:27:17

   भुंगा,
   मी कसला क्लास घेणार?, राजकारण जन्मतःच असले की जमते. म्हणतात न रक्तातच भिनलेले असते. मी काल दिवसभर सेनेच्या महिला नगर सेवीकेना वसईला घेवून जात आहेत ही बातमी पाहत होते. म्हणून डोक्याचा भुंगा भूनभूणु लागला एव्हढेच……….

   प्रत्युत्तर

 2. Suhas Zele
  Dec 16, 2009 @ 22:18:43

  वाह….एकदम informational and creative 🙂

  प्रत्युत्तर

 3. आनंद पत्रे
  Dec 16, 2009 @ 23:03:35

  अनुश्री,
  महेंद्रजी सारखी तंबी दुराई स्टाइल मस्त….

  प्रत्युत्तर

  • anukshre
   Dec 17, 2009 @ 08:08:25

   आनंद, मी लिहिताना असा विचार केला नव्हता. तंबी दुराई फार वेळेला वाचले आहे असे नाही. महेंद्रजी, ह्या क्षेत्रात माहीर आहेत. मी काय हो!!!!!!!दिग्गजांपुढे. कधीतरी चुकून माकून जमते अशी पोस्ट…….इथे लोकसत्ता येतो पण बऱ्याच वेळेला पुरवणी नसते. नेमका फक्त चार पानी मुख्य पेपर असतो. म्हणून असे लिखाण वाचणे राहून जाते.

   प्रत्युत्तर

 4. bhaanasa
  Dec 17, 2009 @ 06:06:08

  हाहा……… चालू दे. बाकी आवर्जून ता.क. लिहीलास म्हणजे……:P

  प्रत्युत्तर

  • anukshre
   Dec 17, 2009 @ 07:41:21

   भानस,
   आवडली न पोस्ट! तू छान छान पदार्थ पोस्टल करतेस मग तृप्त मनाने असे डोके चालते. काय करावे खायला? हा सतावणारा प्रश्न तू सोडवून देतेस. म्हणून माझ्या पोस्ट मध्ये तू पण महत्वाची आहेस.

   प्रत्युत्तर

 5. Ashwini
  Dec 17, 2009 @ 07:32:57

  khup ghait vachale aahe nantar shant pane vachen tari mast zala aahe lekh 🙂

  प्रत्युत्तर

  • anukshre
   Dec 17, 2009 @ 08:11:27

   अश्विनी,
   सवडीने वाच व कळव. कशी आहेस? मजेत असशीलच. पण कामाचा वाढता व्याप?????? असो. ये नंतर काही प्रोब्लेम नाही.

   प्रत्युत्तर

 6. akhiljoshi
  Dec 17, 2009 @ 13:43:32

  खूप छान….
  बरेच दिवसात आपला ब्लोग बघितला नव्हता (म्हणजे मला कुणीही असे cop करून नजर कैदेत नेलं नाही बर का.) असाच
  जरा कामच होता थोडा म्हणून नाही जमल..
  आता वाचला……… खूप छान रेखाटला गेलाय..
  माझा भाऊ पण नगर सेवक आहे… पण तो इथे आहे. महाड ला..
  त्यामुळे इथे काही विधान परिषदेची निवडणूक अजून लागली नाही..
  नाहीतर… तो हि कुठेतरी असाच गेला असता पक्षाच्या विप बरोबर…
  असो…….. आता तुम्ही हि प्रतिक्रिया वाचून माझाही ब्लोग बघालच अशी स्वार्थी अपेक्षा…

  प्रत्युत्तर

 7. महेंद्र
  Dec 17, 2009 @ 14:52:53

  अगदी फक्कड जमलंय भुजींग ( म्हणजे लेख हो….) . एकदा खाल्लं होतं. चिकनचे तुकडे घातलेले फोडणीचे पोहे..आता पहा, पुन्हा जाव लागेल वसईला. उद्या जायचंय वलसाडला, तेंव्हा जमलं तर वसईला ब्रेक घेउ या..

  तंबीदुराई मी गेली दहा वर्षं नेमाने वाचतोय. मध्यंतरी जेंव्हा सुनिताबाई देशपांडे गेल्या, तेंव्हाचा तंबी वाचलात कां? त्यामधे दिलेली जीएंच्या वरची कोपरखळी मस्त होती एकदम.

  लेख खुपच सुंदर झालाय.

  प्रत्युत्तर

  • anukshre
   Dec 18, 2009 @ 14:15:06

   महेंद्र्जी,
   नक्की जावून या. नवीन माहिती वाचायला मिळेल. ‘भुजिंग’ मी पाहिलेले पण नाही नुसते नाव ऐकले आहे. आता मस्कत हून ‘हीना’ वसईला घरी गेली आहे. ती परत आल्यावर भुजिंग चा क्लास होईलच. आपण तंबी दुराई जो लेख म्हणताय तो मी वाचलेला नाही. मेल वर पाठवू शकाल? बघा सहज मिळाला तर…. आवडेल वाचायला.

   प्रत्युत्तर

 8. Manmaujee
  Dec 17, 2009 @ 17:54:23

  Mast zali aahe post!!!!

  प्रत्युत्तर

 9. Aparna
  Dec 19, 2009 @ 06:38:42

  फ़क्कड जमलंय भुजिंग….मी खाल्लंय कारण लहानपण वसईतच गेलंय ना….:) पण तसं थोडं तिखटच असतं ना म्हणून घरी बाकीच्यांना जास्त आवडतं.
  आणि लोकसत्तेच्या ऑन-लाइन मध्ये तंबी येतं ना…मी भारतात असल्यापासुन अजुनपर्यंत वाचते…

  प्रत्युत्तर

  • anukshre
   Dec 19, 2009 @ 07:20:57

   अपर्णा,
   लेख आवडला न. आता झटपट वसई च्या आठवणी बद्धल लिहून टाक व भुजिंग ची पाककृती पण लिही. मला आवडेल वाचायला, व करायला.

   प्रत्युत्तर

 10. gouri
  Dec 22, 2009 @ 09:16:31

  😀 😀
  mastach

  प्रत्युत्तर

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: