एक ललित उशीचे…….

परवा अंधारून आले होते, पाऊस पडेल. वर्षभरात इथे ह्या महिन्यात साधारण पणे दोन दिवस पाऊस पडतो. शुक्रवार चा वार म्हणजे सुट्टी, दिवसभर आराम केला. संध्याकाळी मात्र गारवा पाहून घरात बसवेना, ह्यांना खरे तर बरे नव्हते तरी पण स्व:ताच म्हणाले, “चला मस्त हवा आहे भटकायला जावू’’. जवळच समुद्र किनारा आहे. अत्यंत स्वच्छ किनारा, पाणी पण पारदर्शक आहे. तिथेच ओमानी लोक बार्बेक्यू पेटवून चिकन भाजत होते, मला भाजलेल्या भूट्या ची दणकून आठवण आली. थोडेसे पुढे गेलो तर बुचाच्या थोड्या उग्र पण मोहक वासाने मला अजून आनंदित केले. बाजूला डोलणारी नारळाची झाडे मला आपल्या किनाऱ्याची आठवण करून देतात. असे फिरून मॉल मध्ये थोडी रोजची खरेदी करून माघारी आलो.

येणारा पाऊस, त्यावेळी असणारे ढगाळ वातावरण दोन गोष्टींचा अनुभव देते, एकतर मिळेल त्या दिशेला दूरवर भटकायला जाणे किंवा डोंगराचा माथा गाठून, मनाला पंख लावून, ढगांजवळ जावून, हवा पूर्णपणे पंखात भरून, विहार करावासा वाटतो. डोंगरमाथा किंवा समुद्र किनारी जावून, निशब्द बसून, राहणे व निसर्गाने इतका सुंदर दिलेला अनुभव अनुभवणे

पावसाळी वातावरण होते. इथे ड्रेनेज सिस्टीम नाही, म्हणजे रस्त्याच्या बाजूला गटारे नाहीत की ज्यामुळे पाणी वाहून जाईल. दोन दिवसाचा पाऊस पण आख्खे मस्कत तळ्यासारखे करतो. मोठ्या मोठ्या वादी म्हणजे नाले आहेत की, जे डोंगरावरचे पाणी वाहून आणतात. एकाही डोंगरावर झुडूप सुद्धा नाही. बाहेर पूर येतो. म्हणून आज मुक्काम घरीच केला. आजचा दिवस लोळण्याचा असे मनोमन ठरवून टाकले. वातावरण निर्मिती पण पोषक होती. पोस्ट काय लिहायची काहीही विचार सुद्द्धा नव्हता. टीव्ही वर पण आज मन रमत नव्हते.

दुसरा अनुभव म्हणजे मस्त लोळणे. हातात पुस्तक, बाजूला गरमागरम चहा, खेकडा भजी असेल तर ‘सोने पे सुहागा’. गळ्या पर्यंत आपलेच पांघरुण व आपलीच उशी. भटकंती करून झाली की, पावसाच्या दुसऱ्या दिवशी असे भाग्य मिळणे, हीच पुण्याईची जाणीव कदाचित असेल.

दुपारी मस्त पैकी गरमागरम जेवून डोळे बऱ्यापैकी पेंगत होते. आज माझ्या पुण्याईचा कडेलोट मी करणार होते. मला चहा घेतला की छान झोप येते. ही माझी आवड घरी अगम्य आहे. गुबगुबीत गादी, गळ्यापर्यंत पांघरूण असा सरंजाम मला दुपारी पण लागतो. डुलकी असो नाहीतर वामकुक्षी म्हणा पण मला सरंजाम सहित राणी सारखे निद्रा देवीची आराधना करायला आवडते. कसे घरीच रॉयल वाटते. पण दगा!!!!!!! झाला. एका साथीदाराने साथ सोडली. माझेच दुर्लक्ष झाले म्हणा, सरंजाम हवा पण राणी सारखे लक्ष ठेवता येत नाहीना. ह्या कुशीवरून त्या कुशी वर वळते. पण डोळे काही बंद होईना? काहीतरी गोंधळ नक्की झाला.

चाचपडून अंदाज घेतला तर माझ्या डोक्याखाली आधार म्हणून घेतलेली उशी बदलली गेली होती. काल उशीचा अभ्रा मी धुवून भलत्या उशीलाच घातला. आपलीच उशी आपल्याला कळते. आमच्याकडे तर उशी बदलली गेली तर वादळे निर्माण होतात. म्हणतात न, ‘रात्र चांगली तर दिवस चांगला’. हे गणित दिवसा पण आहे. माझ्या माहेरी तर माझी आई जागा बदलली तर झोपतच नाही. उशी बदलणे किंवा कुठलीही उशी चालणे ह्याला फार मोठे मन लागते. मी लग्न ठरले तेंव्हा आईला विचारले होते माहेरची साडी जशी अलका कुबल ची असते तशी मी माझी उशी नेवू का? ह्याला आंधळे प्रेम म्हणतात का ते माहित नाही पण ज्यांना माझ्या सारखी खोड आहे त्यांची उशी बदलली की अस्वस्थ वाटते. मनाचा आधार म्हणा किंवा डोक्याचा आधार म्हणा ही उशी फार जवळची असते.

ह्याच उशीच्या कुशीत आईने तान्हे असताना शेवरीच्या कापसाची किंवा म्हातारीच्या कापसाची छोटीशी उशी करून त्यात निजवले असते. मोहरी वापरून तान्ह्या मस्तकाला गोल आकार प्राप्त व्हावा म्हणून आजी नातवंड करिता खास उशी करीत असे. उशीत लहानपणी आईचा ओरडा किंवा बाबांचा मार खाल्ला की तिच्यात तोंड खुपसून भोकाड नाही तर मुसमुसत रडायचे, तरुणाईत हिचा आधार घेत हिरवाई अनुभवायची, प्रेमाच्या छुप्या गोष्टी उशीखालीच दडवून झोपायचे. कितीतरी कल्पना वास्तवात ह्या उशीच्या आधाराने पहिल्या. उशांची मारामारी आता पण आवडेल करायला. भरभर कापूस उडाला की, परी राज्यात गेल्या सारखे वाटते.

उशी बद्धलचे इतके ममत्व ट्रेन च्या प्रवासात मात्र वैताग देते. बर्थ नामक प्रकार व हवेने फुगणारी उशी बरीच स्टेशने जागीच ठेवते. विमानाचा रात्रीचा प्रवास म्हणजे ट्रेन चा भाऊच. जे लोक वारंवार प्रवास करतात त्यांच्या सवई ह्या जागतीकरण सारख्या उद्दात झालेल्या असतात. तो विषय वेगळाच आहे. पण घरी आल्यावर मात्र आपली उशी सगळे ताण विसरायला मदत करते. अशी ही आमच्या लहानपणी पट्ट्या पट्ट्यांच्या कापडाची खोळ उशीला असायची. हे पट्ट्यांचे कापड मोठ्या अर्ध्या विजारीला पण असायचे फक्त त्या काळी थ्री फोर्थ असे गोंडस नाव नव्हते.

आई बाबां च्या उशीवर डोके टेकले की, आश्वासक वाटायचे. बाळाच्या उशी पण लाडोबा असते. अभ्रा बदलला तरी आतली उशी आपली आहे का नाही ते तिच्यावर डोके टेकले की कळते. कापसाची उशी ते फोम ची उशी असा आलेख आहे. प्रत्येकाला आपल्या आवडी प्रमाणे, गरजे प्रमाणे स्वातंत्र्य आहे. एकच उशी का उशांची चळत असे ही व्यक्ती प्रमाणे वैव्हीध्य आहे.

ह्या सगळ्या माझ्या उशीच्या शोधा, शोधीत मला मात्र ‘उशी’ पोस्ट सापडली, त्यावर एक चारोळी पण मी लगेच लिहिली. ती अशी………

‘उशीने तरुणाईत सुखाला, जागा दिली,
दुखः झाले तेंव्हा, अश्रुना वाट दाखवली,
मी मेलो तेंव्हा रडली सारी आप्त मंडळी,
‘उशीने’ मात्र नेहमीची, जागा सोडली’

अशी ही उशी की मनुष्य जिवंत असेपर्यंत साथ देते मात्र नंतर जमिनीवरच डोके ठेवले जाते. ज्यांना उशीच लागत नाही त्यांची गोष्ट निराळी पण सर्वसाधारण पणे उशी हा अविभाज्य घटक आहे शांत निद्रेच्या आधाराचा.

कष्टकरी हाताचा आधार घेतात, दगडाचा आधार पण घेतात पण कसे सुखाने झोपतात. आपण मात्र गुबगुबीत गादीत लोळत सुखाचे ललित मांडत राहतो……

26 प्रतिक्रिया (+add yours?)

  1. Anonymous
    डिसेंबर 13, 2009 @ 21:56:50

    खूप छान वर्णन आहे.

    उत्तर

  2. Ashwini
    डिसेंबर 14, 2009 @ 07:08:31

    hehehe mala pan maza ushi shivay zop yet nahi ……. mast aahe lekh …dusari ushi ghetali ki man dukhate aani nahi ghetali ki zop yet nahi 🙂

    उत्तर

  3. महेंद्र
    डिसेंबर 14, 2009 @ 09:57:11

    गेली १२ वर्ष एकच उशी वापरतोय. अगदी खरंय , अजिबात झोप येत नाही उशी बदलली की.

    उत्तर

  4. Ajay
    डिसेंबर 14, 2009 @ 20:21:44

    अनुश्री,

    मलाही माझीच उशी लागते, उशी शिवाय झोप येणं अशक्य पण उशी असतानासुद्धा माझा हात डोक्याखाली का जातो हे मला अजुन समजलेलं नाही. बाकी उशीच ललित मस्त जमलंय. लिखानाचा हा प्रकार भारी आवडला. एकदा प्रयत्न करुन पाहवा म्हणतो , काय म्हणता ? 🙂

    -अजय

    उत्तर

    • anukshre
      डिसेंबर 15, 2009 @ 07:45:07

      अजय,
      लिही नक्की तुझ्या दृष्टीकोनातून वेगळे काहीतरी वाचायला मिळेल. तुला अजून एक विषय सुचवू का? घरी प्रत्येकाची वृत्तपत्र वाचण्याची वेगळी ढब असते त्याबद्धल पण लिही, किंवा
      फोनवर बोलत असताना हातवारे खूप जण करतात हा विषय ही खूप मनोरंजक होईल. उशी बद्धल चे पण वाचायला नक्की आवडेल. कळव काय करतोस ते. आणि हो येत रहा असाच….
      ‘अनुश्री’ केलेले संक्षिप्त नाव पण आवडले.

      उत्तर

  5. Ajay
    डिसेंबर 15, 2009 @ 09:41:28

    तुमचं नामकरण माझ्या हातुन झाल आहे. भानस च्या भाग्यश्री म्हणुन अनुक्षरे च्या अनुश्री असं मी नामकरण केलय. 🙂
    विषय सुचविल्याबद्दल आभार, ललित लेखन हा प्रकार नीट समजावुन घेऊन मी नक्कीच लिहीन.
    धन्यवाद .

    -अजय

    उत्तर

  6. Ajay
    डिसेंबर 15, 2009 @ 15:25:57

    तुझ्या कमेंट ला पोच दिली आहे माझ्या ब्लॉगवर. जरुर वाच. अनुजा नावामुळे मला एकदम कन्फुज करुन टाकलसं तु 🙂

    उत्तर

    • anukshre
      डिसेंबर 15, 2009 @ 22:17:26

      अजय,
      वर्ड प्रेस साठी च्या ब्लॉग ना अभिप्राय देण्यासाठी ओपन आय. डी.किंवा सिलेक्ट प्रोफाईल ऑप्शन
      पर्याय टाक म्हणजे अनुक्षरे नावानी अभिप्राय येईल. अजून किती अनुजा ना अवघड होईल काही सांगता येणार नाही. ऑप्शन ओपन आय डी आठवणीने कर.

      उत्तर

  7. आनंद पत्रे
    डिसेंबर 15, 2009 @ 20:03:20

    जबरदस्त जमलाय लेख. भावासोबत उशी वापरून केलेली मारामारी खूप आठवली, जाम मिस करतोय.
    शेवटच्या दोन ओळी… मार्मिक.

    उत्तर

  8. भुंगा
    डिसेंबर 15, 2009 @ 20:33:29

    अरे वा, ” एका उशीचे मनोगत ” .. छान..!!
    काही वर्षांपुर्वीच “तीची” सवय लागली… आणि आता “ती” आणि “सवय” दोन्हीही सुटत नाहीत… काही सवई चांगल्या असतात, नाही का?

    उत्तर

    • anukshre
      डिसेंबर 15, 2009 @ 21:10:29

      अभिप्राय मध्ये पण कसलं भन्नाट लिहिलंय. ‘ती’ आणि ‘सवय’ एकदम भारी लिहिलंय भुंगाराव तुम्ही, पोस्ट पेक्षा जबरी…….. असते अशी पण छान सवय, झोपे करता सगळ्या सवयी चालतात

      उत्तर

  9. देवेंद्र चुरी
    डिसेंबर 16, 2009 @ 08:44:49

    पहिल्यांदाच उशीबद्दल कोणी इतक्या आत्मियतेने लिहल असेल अस वाटते.मलाही माझीच उशी लागते.माझी उशी ५-६ वर्षे जुनी आहे (कव्हर बदलल आहे 🙂 )पण आज प्रथमच तिच्याकडे वेगळ्या द्रुष्टीकोनातुन पाहिल…बाकी ते तुमच्या आइला अलका कुबलच्या माहेरच्या साडीसारख तुम्ही ’माहेरची उशी’ नेउ का असे वि्चारले ते प्रकरण भारी वाटले … एखाद्या सिनेदिग्दर्श्काने हे उशीपुराण वाचल तर ’माहेरची उशी’ काढायला वेळ लागणार नाही… 🙂

    उत्तर

  10. Kanchan Karai
    डिसेंबर 16, 2009 @ 14:21:29

    हे मात्र खरं. उशी बदलली की झोप नीट लागत नाही. शिवाय चहा पिऊन झोप लागू शकते ह्या विधानाला अनुमोदन देईन. उशीबद्दल लिहिलेला पहिला वहिला लेख असावा हा.

    उत्तर

    • anukshre
      डिसेंबर 16, 2009 @ 14:39:23

      मस्त वाटले आपण दोघीही एकाच पठडीतल्या आहोत. जेवण झाल्या नंतर घेतलेला चहा थकावट दूर करून फ्रेश पणे झोपण्यास सहाय्य करतो. ह्या लेखामुळे आपली आवड जुळली हे ही चांगले झाले.
      आपली उशी कितीही प्रेमाचे माणूस असले तरी उदार मनाने नाही न देवू शकत नाहीतर आपल्या झोपेचे खोबरे झालेच……

      उत्तर

  11. bhaanasa
    डिसेंबर 17, 2009 @ 06:12:57

    मग काय रात्री उशीला विचारलेसं ना…बाई गं आज मी तुला तुझा हक्क व अपरिहार्यता अगदी यथोचित लिहीली. मग उशीचा कापूस मस्त फुलला असेल आणि तुझी रात्र खासच सुखनैव पार पडली असेल. 🙂 छान जमलेय उशीपुराण….

    उत्तर

    • anukshre
      डिसेंबर 17, 2009 @ 07:58:58

      सखी भानस,
      कसलं मस्त लिहिलंस!!!! भारी वाटलं!!
      तुझी मस्त प्रतिक्रिया वाचून माझे मन मात्र नक्कीच उशी पेक्षा जास्त फुललंय…….. मी दिवसनरात्र अशी राहण्याकरिता येत रहा कायम.मी वाट पाहीन सदैव.

      उत्तर

  12. Nilima
    डिसेंबर 17, 2009 @ 11:35:24

    ushichi post ekdam mastech aahe aawdli 🙂 tumhi agdi great aahat Etke sagle suchte kase??? mala tar kay lihave kuthun surwat karavi ha prashn padto 😦

    उत्तर

    • anukshre
      डिसेंबर 18, 2009 @ 13:50:17

      नीलिमा,
      पोहता येत नसूनही पाण्यात पडला की, बुडू नये म्हणून मनुष्य काहीतरी धडपड करतो, तसे माझे झाले आहे एवढेच……….तू पण लिहायला सुरवात कर. लवकर तरबेज होशील. बाकी काही विशेष नाही रोजचे रुटीन….आलीस म्हणून मस्त वाटले.

      उत्तर

  13. gouri
    डिसेंबर 22, 2009 @ 09:12:48

    mast jhaaley ushiche manogat.

    hostel la jaataanaa mi maajhi ushi gheun gele hote 🙂

    उत्तर

  14. महेश कुलकर्णी
    ऑगस्ट 03, 2012 @ 18:19:28

    सुंदर.मस्त.

    उत्तर

यावर आपले मत नोंदवा