सहावी जाणीव(Sixth Sense)

आमच्याकडे व्हरपूल ची उपकरणे आहेत. तुम्ही पण घ्या. काजोल नाही का जाहिरातीत सारखी सांगते की, तिच्या फ्रीज ला कळते पटकन बर्फ तयार करावा. कारण ह्या उपकरणात sixth sense technology’ आहे. असे मला माझी शेजारीण बरेच दिवस सांगत होती. माणसातल्या मनातले तर कळते पण, मशीन ना सुद्धा समजते. काल पासून तर एन. डी. टी. व्ही. वर मागच्या जन्मी चे रहस्य सांगणारा नवीन रिअलिटी शो सुरु झाला. खरे खोटे त्यांनाच माहिती. ८४ लक्ष योनी नंतर मनुष्य जन्म मिळतो असे पुराणातून ठामपणे सांगितले आहे. आज आपण सत्य मानणे हे अनेक बाबी तपासून, तावून सुलाखून आपली मते तयार करतो.

संमोहन शास्त्र किती प्रगत आहे काहीच कल्पना नाही.. शक्य आहे हे सर्व? अनेक प्रश्न माझा मुलगा मला विचारणार याची खात्री होती. तत्पूर्वी मी नेटची मदत घेण्याचे ठरवले, सहावी संवेदना असे सर्च ला दिले तर एक व्हीडीओ मिळाला.

‘प्रणव मिस्त्री’ ह्यांनी ‘TED sixth sense technology’ म्हणून मनुष्याच्या मनातले काम व आधुनिक तंत्रज्ञान ह्यांचा मेळ घालून एक डीव्हायसीस तयार केले आहे. मी काही जास्त लिहित नाही कारण मीच गोंधळून गेले आहे. माझा हा गोंधळ कमी व्हावा म्हणून मी सगळ्यांशी हा व्हीडीओ शेअर करते कारण अजिंक्य ला योग्य ते समजावून सांगण्यासाठी मला अधिक जाणून घेणे योग्य वाटते.

हे पाहून विचार करीत राहिले की मागच्या जन्माचे रहस्य कळण्याकरिता पण कुठले उपकरण शरीराला लावले आहे का? शास्त्र, विज्ञानाचा शोध म्हणून स्वीकारायचे का मूर्ख बनवतात म्हणून गप्प बसायचे? म्हणून शेवटी कमीतकमी शब्दांची ही पोस्ट लिहिली. संगणकाच्या महाजालावर माहिती खूपच आहे. शेवटी प्रश्न मनात कायम राहिला खरेच वास्तव जगात हे शक्य आहे, असेल तर परिणाम काय होणार?

पूर्वी संमोहित करून शस्त्रक्रिया केलेले दाखले आहेत. मला वेळ जाणून घ्यायची आहे मनगटावर घड्याळ नाही. तरी बोटाला काही पट्टी गुंडाळून, गळ्यात काही उपकरण ठेवून मनगटावर घड्याळ उमटवता येईल? जे मला वेळ दाखवेल. व्हीडीओ तर दाखवले आहे. असे असेल तर बोर्डाची गणिते हात ते हात अशी उमटवून हातोहात परीक्षा केंद्रात सहज विद्यार्थ्या पर्यंत पाठवता येतील. छे माझे मन फार भरकटत चालले……काय सांगायचे पुढच्या पिढीला? रेड्याच्या मुखातून वेद उमटले ते………. का मनातले पण मशीन ने शोधून काढता येते किंवा मागचा जन्म कळतो हे!!!!!!!

आताच डॉ. धनसिंग चौधरी, अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीचे शाम मानव ह्यांनी पुनर्जन्मात मनुष्याला नेणे हे थोतांड म्हणून सांगितले, व ह्याचा परामर्श करून खोटे सिद्ध करून दाखवू असे आव्हान दिले आहे. माझे ही सपष्ट मत आहे की हे थोतांड आहे. चला निदान एकाचा तरी निकाल लागला.

टेड तंत्रद्यानाचे हा एक व्हीडीओ अजून माझी उत्सुकता वाढवू लागला आहे.

23 प्रतिक्रिया (+add yours?)

 1. Suhas Zele
  डिसेंबर 08, 2009 @ 22:20:16

  Apratim…Ideas worth Spreading 🙂

  उत्तर

 2. प्रसाद साळुंखे
  डिसेंबर 08, 2009 @ 22:58:16

  मस्त वाटलं, आता मला संगणकाबरोबर किडे करावेसे वाटताहेत

  उत्तर

  • anukshre
   डिसेंबर 09, 2009 @ 08:25:46

   प्रसाद आपले स्वागत!
   जरूर किडे करा कारण त्यातूनच हा काहीसा वेगळा शोध मला लागला. TED Sixth Technology खूप माहिती आहे.

   उत्तर

 3. महेंद्र
  डिसेंबर 09, 2009 @ 05:49:58

  मला तरी पटत नाही हा प्रकार. मी टिव्ही वर तो शो पाहिला.. सरळ लक्षात येत होतं की ती बाईऍक्टींग करतेआहे म्हणुन.फुल टू करमणुकप्रधान कार्यक्रम म्हणुन या कडे पाहिल्यास ठिक आहे.. पण या विषयकडे टेक्निकल सब्जेक्ट म्हणुन पहाणं योग्य वाटत नाही.

  उत्तर

  • anukshre
   डिसेंबर 09, 2009 @ 08:22:09

   महेंद्र्जी,
   पुनर्जन्म शोधणे हा प्रकार निव्वळ थोतांड आहेच माझे ही असेच मत आहे, परंतु आता हे अद्यावत तंत्रद्यान विकसित झाले आहे. किती अजून असे शोध लागतील ते काळालाच ठावूक.
   अजिंक्य ला अजून काही माहिती देता येईल का असे शोधत होते. मला गरज होती sixth sense समजावून सांगण्याची.पण ह्य़ा गरजे मूळे मला हा व्हीडीओ मिळाला.

   उत्तर

  • भुंगा
   डिसेंबर 09, 2009 @ 09:05:14

   महेंद्रजींशी सहमत!
   मला वाटतं अशा कार्यक्रमांकडे “करमणुक” म्हणुनच पहावे.

   उत्तर

 4. Ashwini
  डिसेंबर 09, 2009 @ 08:02:42

  hmmm six sense baddal mahit nahi mala pan kadhi kadhi mazi telepathy khup jordar kam karate ekhadi vaktichi khup aathavan yaavi aani tyane ph karava … ajun barech

  उत्तर

  • anukshre
   डिसेंबर 09, 2009 @ 08:36:56

   अश्विनी,
   मला पण एव्हढे माहिती नव्हते पण असे ही शोध आहेत असा काहीसा हटके व्हीडीओ मिळाला. भविष्यात असे ही निश्चित होईल.’टेलीपथी’ हा छान विषय आहे की, खूप व्यैयक्तिक पातळीवर ह्याचा विचार केला जाऊ शकतो. लिहीन……..तेंव्हा तुझे ही अनुभव सांग नक्की, पुढच्या आठवड्यात पोस्ट देते. तरी पण तू आवर्जून भेट दे TED Sixth Technology ह्या साईट ला, खूप माहिती मिळते.

   उत्तर

 5. Nilima
  डिसेंबर 09, 2009 @ 12:05:07

  hmmm sixth sense maze tari maat aahe sixthsense asto. jo program chalu zhala aahe
  to mi ajun baghitla nahi tya mule tya badel kay mi sangu nai sahket. ha pan sixth sense baddel maze tari matt aahe asto. bhukampe honya aadhi animals aaplya aaplya parine suchit kartat. aagdi sadhe exampel ghevu aayi la bala la kevha bhuk lagte hey atomatic samjtach na???
  khar tar prtekat sixth sense asto faqt konakona cha to jagrut aasto tar kona cha supt asto etkech.
  aata ethe maza svetacha anubhav sagne kitpat thik aahe mahit nahi pan ethe mala sangavasa vatatoy.
  mi 10th madhe astana mazhya mama mami cha acident zhala tyat tyanchi 2mule varlit:(
  acident honya chya 2,3 dives aagoder mala sarkhe sonu aani bhavula bethavese vatat hote etki echa hohoti ki mala ethe shbdat mnadata yenar nahi, pan 10th chi exam tondaverch aalya mule exam zhalyaver janarch hoti mhanun aapli gappe basli. aayi javel tase boli pan hoti jawun yevu ka?? pan nakar milala 😦 2,3 divsatach batmi kalali ki mama mamicha shegav la jatana acident zhala aahe 😦
  te jevha picnic la nighanar hote tevha ji mule varli tya doghanchi hi wish navhati tyanchya barober janyachi agdi te radun radun sanget hote aamhla nahi yayche aamhala nilu tai kade jaychye aaji ne agdi tyana choklets etc devun gadit basvle tyana khotech sangitale ki aapen nilu tai kade jaat aahot 😦
  tya chimuklyana aadhich kale hote ka kay honar aahe te??? 😦 mala tyana sarkhi honari bethaychi wish hey sagle kay hote??? kadachit sixth sense na??
  sixth sense asto te anubhava varunch samjel.
  pan tai hey sagle lahan mulana ( ajinkya) la kase patvun dyache motha prashnch aahe.

  उत्तर

  • anukshre
   डिसेंबर 09, 2009 @ 15:03:46

   नीलिमा डोळ्यात पाणी आल बघ. काय लिहू ग मी, संवेदना गारठल्या. अग. मी टेलीपथी वर पोस्ट लिहिणार होते, पण तुझा अनुभव वाचून सुन्न झाले. आणि हो वेळ मिळाला की जरूर साईट ला जावून व्हीडीओ बघ.मला तरी नवीन होता हा विषय, डीव्हायसीस ने कळते म्हणून…..कदाचित आपण भारतात जाऊ तोपर्यंत असे काही प्रोडक्ट आले असेल…….

   उत्तर

 6. HEENA
  डिसेंबर 09, 2009 @ 13:49:31

  PUNARJANAM AND SIXTH SENCE ARE TWO DIFFERENT THINGS ALTHOUGH THEY ARE SEEMS TO CO-RELATED WITH EACH OTHER. SOMETHING WHICH IS HAPPENED IN PAST OR IN YOUR PREVIOUS BIRTH THAT IS PUNARJANAM. AND SOMETHING IS GOING TO HAPPEN IN FUTURE AND YOU COMES TO KNOW IT BEFORE IT HAPPENED, THAT IS THE POWER OF SIXTH SENSE IN YOU, WHICH IS IN ALL OF US MORE OR LESS AND EVEN IN ANIMALS OR BIRDS ECT. IF THERE IS SUCH TECNOLOGY THROUGH WHICH WE LEARN MORE ABOUT OUR / SOMEBODY ‘S FUTURE THEN I LIKE TO GO FOR THAT TO SECURE MY OR MY FAMILY’S FUTURE. I THING YOUR MASSEGE THROUGH THIS POST IS CLEAR TO ME, YOU MEAN TO SAY THAT -FORGET ABOUT THE PAST THINK ABOUT THE FUTURE! ISN’T IT?

  उत्तर

  • anukshre
   डिसेंबर 09, 2009 @ 15:30:27

   हीना,
   पुनर्जन्म ओळखणे हे एक थोतांड नक्क्कीच आहे. परंतु संमोहन शास्त्र…….ते आता शोध लागलेले व्हीडीओ त दाखवलेले डीव्हायसीस इथपर्यंत ह्या विषयाची व्याप्ती मी दाखवण्याचा प्रयत्न केला. तू बरोबर ओळखलस. मागचा जन्म शोधणे पेक्षा (ह्याच जन्मातल्या सहा महिन्या पर्यंत व्यक्तीला सामोहानाद्वारे मागे नेऊन त्या वर उपचार
   करू शकतो असे शाम मानव व डॉ. धनसिंग चौधरी ह्यांनी मुलाखतीत सांगितले). आपण पुढे येणारा नवीन शोध अधिक प्रगल्भतेने पाहणे आवशक आहे. (आवशक असेल तर
   उपचार करावा पण ते सुद्धा खूपच वैयातिक पातळीवर असते ) पण नवीन शोधा मुळे पुढची प्रगती कशी होईल हा विचार अधिक चांगला असतो. अर्थात टेलीपथी मी लिहिलेली नाही पण ही पण निसर्गात असलेली, मनुष्याच्या वैयक्तिक पातळीवर जाणवते.

   उत्तर

 7. Nilima
  डिसेंबर 09, 2009 @ 17:21:56

  😦 ho maze dekhil aaj paret te sagle athvle.
  tumhi telypathi vercha lekh lawkerch post kara 🙂 mi ghari gelyaver
  video nakki baghel, karen blogg vachte office madhe basun 🙂 vachayla milto
  heych bhagy pan video baghn mhanje aatich hoyil. ghari gelyawer baghel 🙂

  उत्तर

  • anukshre
   डिसेंबर 10, 2009 @ 11:38:58

   नीलिमा,
   हो मी लिहीन लेख टेलीपथी वर पण व्हीडीओ पाहण्या आधी एकदा प्रतिक्रिया वाच कारण बऱ्याच शंकांना मी उत्तरे दिली आहेत. प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगवेगळा असू शकतो. आपल्याला
   काही माहिती करून घेण्याआधी सर्व दृष्टीकोन पाहणे म्हणजे योग्य माहितीनिशी शहानिशा करून घेणे होय. तुझ्या काही शंका असतील तर नक्की विचार मी तुझ्या मेल वर उत्तर देईन.
   बाय, टेक केअर.

   उत्तर

 8. sureshpethe
  डिसेंबर 11, 2009 @ 08:55:00

  Anukshare

  सहावी जाणीव…खरं तर ’ जाणीव ’ हा वापरलेला पर्यायी शब्द् मला अधिक चपखल वाटतोय. जाणीवा ह्या व्यकिगत स्वरूपात असतात आणि त्याला सहावी काय …दहावी काय …किंवा हज्जारावी काय अनंत रूपे येऊ शकतील कारण कोण कोणाला…कींवा कॊण कश्याने संमोहित करेल किंवा हॊईल सांगणॆ अवघड ! त्याची technology’ म्हणजे संपलेच … नाही सुरू झाले !
  जन्माचे रहस्य भगवंतांनी एकदाच सांगीतले…. आम्ही आपले अजून अर्थच जुळवीत आहोत.
  पण विषय तरी रहस्यमय घेतलायस !

  उत्तर

 9. Kanchan Karai
  डिसेंबर 11, 2009 @ 14:29:09

  ब्लॉगवर व्हिडीओ दिसत नाहिये. मी हा व्हिडीओ आधीच पाहिला आहे. मानवी शरीरदेखील पंचमहाभूतांपासूनच बनलेलं आहे, तेव्हा सर्व गोष्टी अगदीच नाकारू शकत नाही. वास्तववादी असणं चांगलंच पण आपण प्रत्येक गोष्टीसाठी पुरावा मागू शकत नाही. काही गोष्टी फक्त ’असतात’, त्यांची जाणीव होते पण दिसतीलच असं नाही. व्हिडीओत दाखवलेल्या गोष्टि अतिरंजीत असतील पण तसं घडणारच नाही असं खात्रीशीररित्या म्हणता येणार नाही. तरिही प्रत्येकाला आपल्या पुनर्जन्मातील गोष्टी आठवणं भंपकच वाटतं. हल्ली आपण कामात इतके बुडालेलो असतो की काल काय खाल्लं, ते आज आठवताना मारामार होते. टेलिपथी व सहावी जाणीव याचे अनुभव ब-याच जणांना येत असतात.

  उत्तर

  • anukshre
   डिसेंबर 11, 2009 @ 15:34:43

   खरय कांचन पण असेही होवू शकते का? ते काळच ठरवेल. मला व्हीडीओ नवीन होता म्हणून पाठवला. असो अभिप्राय बद्धल धन्यवाद.

   उत्तर

 10. sagar
  डिसेंबर 19, 2009 @ 09:15:33

  Namaskar
  Hi mazi pahilich vel blog la bhet denyavhi….AN mazya fieldshee related post mhatlyavar aavarjun vachala….Let me cleare tumhi jo samaj karun ghetalay ki Manat clock aalyavar te hatavar automatic yete te tas nahiye mulat..Tyachya Hatachya botana junya mouse che senser (Ball vala mouse )basvale aahet je hatachi movement olakhatat an tyapramane tya aalelya movementchya position varun S/W detect karte ki hi movement clock sathi aahe v te clock dakhavate..

  Tich gosht camera babatit.hatanchi visheeshya rachna keli ki mouse chya seneser kadun yenarya data varun S/W olakhte ki te camera aahe v tyaprmane kam karate….Its pure technology based ….Tyanae S/W programme ch asa banavala aahe ki aaplyala vatate ki to manatle olkhat ahe….Thodkyat tumhi botane gol kelyas tithe 100% clock ch yenar,camera sarkha rectangle kela ki te as camera work karnar….Tumchya manat kahihi aale tari….

  Mala vatat maz mahana tumhla clear zal asel v Sixth sense Tech suddhya….

  उत्तर

  • anukshre
   डिसेंबर 20, 2009 @ 11:14:54

   anukshre :

   धन्यवाद सागर,
   आपण विश्लेषण सविस्तर केले आहे. मी शिक्षिका होते. ह्या तांत्रिक गोष्टी अधिक कळाव्या म्हणून मी असे विषय लिहिते. माझी शंका किंवा मत सर्वसाधारणपणे असेच कोणाच्या ही मनात येवू शकते. विषय अनेक व्यक्तींना कळतो. मलाही योग्य माहिती मिळते तशीच ती सर्वाना
   कळावी. एक समाजाची बांधिलकी म्हणून मी माझ्या परीने छोटासा प्रयत्न करते. माझी अशी ही शाळा मीच चालवते. मी शिक्षिका तर आहेच पण विद्यार्थी म्हणून ही शंका, मते प्रकट करते. एक डेप्थ विषयाला प्राप्त होते व सर्वकष विकास होतो.

   उत्तर

 11. Padalkar Ramchandra
  ऑगस्ट 16, 2010 @ 10:27:35

  Sixth Sense – Thrilling potential sixth sense by Pranav Mistry
  how to save this video clip or can we downlaod it or can you send this.

  उत्तर

  • anukshre
   ऑगस्ट 23, 2010 @ 08:21:49

   श्री. रामचंद्र पाडळकर आपले स्वागत !!
   हो, हा व्हीडीओ यु ट्युब वर प्रणव मिस्त्री चा आहे. आपल्याला डाऊन लोड करून घेता येतो. अभिप्राय बद्धल आभारी आहे.

   उत्तर

 12. BHUSHAN
  डिसेंबर 13, 2011 @ 21:42:30

  mala vatle ki yha weles SRILANKA WORLD CUP CRICKET jinkel ani kharas zale,maza mulga kevhatari padnar aahe ani karas padla hath mudala AASEKAHI anubhav mi barech ghetale aahe ani mala vatu lagale sixth sence aasu sakte TAYMULE MALA SIXTH SENCE ANI TELEPATHYVAR AABHYAS VA SANSODHAN KARAYALA AAVADEL

  उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: