कासवी ची दृष्टी………..

कासवी ची दृष्टी तिच्या पिल्लांवर असते. ती लांबूनच नजरेने पिल्लांचा सांभाळ करते. पुराणात, कथांमध्ये अनेक वेळेला हे विधान पाहायला मिळते. हल्ली डिसकव्हरी चॅनेलवर खूप वेळेला कासवांची फिल्म पाहायला मिळते. पण प्रत्यक्षात पाहणे म्हणजे काही अप्रूप च आहे. इथे ओमान मध्ये ‘सूर’ म्हणून मस्कत पासून 300 कि. मी. अंतरावर ओमान चा किनारा आहे. तिथे ‘ रासल- हद’ म्हणून किनारा कासवांसाठी प्रसिद्ध आहे. दर वर्षी साधारण तीस हजार पर्यंत संख्या त्यांच्या येण्याची आहे. हा किनारा हा साध्या किनाऱ्या पेक्षा खूपच वेगळा आहे. आम्ही पण प्रत्यक्ष पाहण्यासाठी गेलो.

जून ते सप्टेंबर. ह्या कालावधीत फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. साधारणपणे पाच वेळा अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येतात. ऑक्टोबर नंतर संख्या तशी कमी होते. पण दिसतात. उबदार व फार वाळूचे थर असतात म्हणजे साध्या किनाऱ्याच्या पेक्षा खूप वाळू असते. मध्य रात्री नंतर जावे लागते. गडद अंधार, निशब्द किनारा, वाळूत पाय ठेवल्याबरोबर गुढग्या पर्यंत पाय खोल खोल रुतत जातो. सारखे वाटते पाया खाली हलते, बहुतेक कासवाचे पिल्लू तर नाही. धाक धुक होत जावे लागते. पण प्रत्यक्षात अंडी घालण्याची जागा जरा दूर असते. हे परत येताना कळते.

अत्यंत सुरक्षा व्यवस्था आहे. तुम्हाला बरोबर मोबाईल चा रिंगटोन सुद्धा वाजवण्याची परवानगी नाही. काही फॉर्म भरून जावे लागते. नियमांची काटेकोर बजावणी होते. किनारा पूर्णपणे ओमानी बघतात. तुम्हाला एक ओमानी माणूस सोबत दिला जातो. बोलणे पण करायचे नाही. कॅमेरा चा फ़्लॅश अजिबात चालत नाही. अंधारात पाय खोल खोल रुतवत जावे लागते. इथे ही मी लेकाचा हात घट्ट पणे पकडून ठेवला होता.

मागून ओरडावेसे वाटत होते. नको हा अंधार, जावू या परत. आंधळी कोशिंबीर होती. पण कडक नियमांच्या धास्ती मुळे आवाज फुटत नव्हता. आपले माणूस कळत नव्हते. साधारण समुद्राच्या दिशेने चाललो होतो. समोर येणारा वाळूचा ढीग आठ वर्षाच्या मुलाच्या उंचीचा होता. एक टेकाड स्व:ताला बुडवत पार केले की दुसरे. धृतराष्ट्राची गांधारी पट्टी असूनही बावचळली नसेल.

येथे प्रामुख्याने हिरव्या पाठीचे कासव लाल समुद्र व भारतीय उपसागरातून अंडी घालण्यासाठी येतात. साधारणपणे पूर्ण वाढीची कासवी पस्तीस वर्षाची होते तेंव्हा अंडी घालण्यासाठी सक्षम होते. पूर्ण वाढ ही १.२ मीटर लांब व २०० किलो वजनाची असते. एका वेळी साधारण १०० ते २०० अंडी असतात. स्व:ताच्या पायांनी खोल खड्डा गोल गोल चक्राकार आकारात वाळू उडवत तयार करते, अंडी घालते. पुन्हा ती प्रचंड ढिगारा सदृश वाळू एकसारखी करायची. अंडी पूर्णपणे झाकून ठेवायची. किती हे कष्ट! मी उगाचच मनात चुकचुकत होते. प्रसव वेदना तिच्या डोळ्यातून साधारण पणे द्रव्या सारख्या वाहत होत्या. पप्पा कासव कुठे असतो कोणास ठावूक? त्यापेक्षा पक्षी बरे, दोघे मिळून तरी घरटे तयार करतात.

दरवर्षी कासवी अंडी घालण्याकरिता येतेच असे नाही. पंचावन ते साठ दिवस आधी अंडी घालतात. पिल्लू अंड्यातून बाहेर आले की ७२ तासाच्या आत समुद्रात पाण्यात जाते. घारी, समुद्र पक्षी, पाण्यातले मोठे मासे खूपशी पिल्ले खावून टाकतात. आणि विशेष बाब म्हणजे ती प्रत्येक वेळेला तिचा जन्म ज्या किनाऱ्यावर झाला तिथेच ती अंडी घालते. असे ही माहेरपण!!

बरेच जण उपस्थित असतात. त्यांना फरक पडतो तो आवाज व उजेड ह्यामुळे, नाहीतर परत माघारी जातात. व अंडी उजेडामुळे खराब होतात. पिल्लू तयार होवू शकत नाही. म्हणून मध्य रात्री उबदार वाळूत, पण थंड वातावरणात त्यांचा मौसम असतो. त्यामुळे आधीच परदेशी कायदे कडक त्यात कासवांचा किनारा तर अहोरात्र पहाऱ्यात असतो. मोकाट रानटी कुत्रे, माणसे ह्याकरिता राखणदारी असते. अंडी घालून झाली की त्याभोवती एक सूचना फलक लावून जागा संरक्षित करतात. परवानगी शिवाय दिवसा पण जाता येत नाही. किनाऱ्यावर पोलीस ठाणे आहे.

असे असूनही खूप जण नियमांचा भंग करतात. वाळूत नुकतीच जन्मलेली पिल्ले हातात धरून त्यांना संसर्गजन्य बनवतात. त्यांचा आयुष्याचा काळ साधारण पाचशे वर्ष मानला तरी जन्मल्यावर फार थोडी पिल्ल एव्हढी मोठी होत असतील. इथे पोलीस कारवाई पण अतिशय कडक असते. कासवांची अंडी बरेच जण खाण्यासाठी वापरतात. म्हणूनच ह्या विशेष जाती करिता कायदे आहेत.

तुम्हाला बऱ्याच एन. जी. ओ. कासवांची घरटी म्हणजे अंडी घालण्याची जागा, दत्तक म्हणून देतात. ठराविक रक्कम तुम्ही द्यायची त्याचा उपयोग ह्यांच्या संवर्धनासाठी केला जातो. अंड्यातून पिल्ले बाहेर आली की तुमच्या घरट्याची आठवण म्हणून तुम्हाला त्यांचा विशेष फोटो पाठवला जातो. घरट्याचे संरक्षण केले जाते. कासवांच्या क्लब चे मेंबर बनविले जाते. अर्थात पाण्यात पिल्ले गेल्यावर त्यांच्या नशिबावर सोडून द्यावे लागते. पण तो पर्यंत तरी तुम्ही घरी राहूनही पिल्लांवर कासवी सारखी दृष्टी ठेवू शकता. असे ही पालकत्व स्वीकारता येते.

इथे घरी पाळण्या करिता सहज बाळ कासवे मिळतात. घरची कासवे टोलेजंग होत नाहीत. पाण्यातली कासवे मी ही घरी आणली आहेत. चार वर्षांची झाली. आणली तेंव्हा रुपयाच्या नाण्याच्या आकाराची होती, आता आपला तळवा पूर्णपणे रुंदावला तर जेव्हढा होईल त्या आकाराची झालीत. खूप शहाणी, खूपच तरतरीत आहेत. आमच्या घरचे लहानथोर जे येतात ते त्यांच्यातच रमतात. त्यांच्याबद्धल एक स्वतंत्र पोस्ट होईल. आम्ही त्यांच्या जोडीला ‘चिनू मिनू’ हाक देतो तेंव्हा नावाप्रमाणे प्रतिसाद देतात. संध्याकाळी जेंव्हा माझे मिस्टर घराच्या जवळ येतात तेंव्हा ते धडधड आवाज करीत मला सांगतात. असे खूप बोलके सवांद त्यांच्यात व आमच्यात होत असतात. ह्याचा अर्थ त्यांची संवेदना खूप सक्षम असते.

कासावीची दृष्टी किंवा ती आपल्या नजरेने पिल्लांवर लक्ष ठेवते म्हणे. असे कथांमधून वाचावयास मिळते. म्हणजे नेमके कसे? हा उलगडा मला अजून झाला नाही. अंडी घालून समुद्रात जाते. तिथे पिल्लांवर कसे काय लक्ष ठेवते हे मी अजून पहिले नाही. असो पुरणाची वांगी पुराणातच! कथा ह्या रूपक असतात. पण मी माझ्या नजरेने निसर्गावर सोपवलेले जीवन पहिले.

अशीच वाळूत अंडी घालायला मगर येते, पण पिल्ले आपल्या तोंडात धरून घेवून जाते. कासवांची पिल्ले जन्मली की स्व:ताच समुद्रात आयुष्याच्या ओढीने चालू पडतात. त्यांचे आईबाबा भेटतात कि नाही, ह्याचे रहस्य समुद्राच्या पाण्यातच दडले आहे. त्यातल्या कन्या आई होण्यासाठी तिथेच परत येतील. कासवीने केलेल्या घरटे ते समुद्र ह्या मार्गावरूनच पिल्ल समुद्राकडे एकमेकांना चिटकून चालत राहतात.

डोळ्यासमोरून अंधारात पाहिलेली कासवीची दृष्टी मला निसर्गाकडे पाहण्याचा उत्कट अनुभव देती झाली.

Advertisements

20 प्रतिक्रिया (+add yours?)

 1. Ashwini
  Dec 07, 2009 @ 07:18:37

  mast aahe lekh …… maza bhava ne pan 2 choti kasave palali hoti pan ti geli mahit nahi ka te pan chan vatay che …. height mhanje tyane ti ghari aanali aani baba ch sagale awarat basay che pani badal ne khayala ghalane etc 🙂

  प्रत्युत्तर

  • anukshre
   Dec 07, 2009 @ 08:03:01

   अश्विनी,
   पहिला नंबर पुन्हा आला. मध्यंतरी व्यस्त असावीस बहुतेक. असो. लेख तुला आवडला हे बरे झाले. भारतात ओरिसा येथे आहे टर्टल बीच, एव्हढ्या लांब जाऊन पाहणे शक्य झाले नाही. इथे जवळच आहे म्हणून खास पाहायला गेलो होतो. इथे लवण स्तंबाची खूप मोठी केव्ह आहे. तो ही अनुभव युनिक आहे. लिहीन पुढे…… आणि अजूनही खूप आश्चर्ये ओमान मध्ये खास पाहीली. विचार आहे जमेल तसे लिहायचा…

   प्रत्युत्तर

 2. साळसुद. पाचोळा
  Dec 07, 2009 @ 07:54:00

  मस्त माहिती आहे. फोटो त्याहुनही छान माहिती देताहेत…अस्सच लिहित राहा आम्हीही परत भेट देत राहु या ब्लागला

  प्रत्युत्तर

  • anukshre
   Dec 07, 2009 @ 08:12:07

   नमस्कार साळसूद पाचोळा,
   आपले स्वागत! मस्त नाव आहे साळसूद पाचोळा! आपल्याला लिखाण आवडते. छान वाटले. मी नक्कीच १०८% प्रयत्न करीन व्यवस्थित लिहिण्याचा. आपण सुद्धा अभिप्राय द्वारे पाठींबा असाच देत रहा.

   प्रत्युत्तर

 3. Nilima
  Dec 07, 2009 @ 11:40:55

  TUMCHE SAGLE LEKH VACHLE KHUP chhan lihlay khas karun kashasathi evhade ha kupch aawdla, aata ha lekh me khas karun mazhya MR. dakhvnaar aahe karen ki tyachi aani maazi nehmich INDIA t jatana Bhandane hot astaat ka tar tyache aap le matt aajkal hey sagl Indiat pan milte ka ethun oze ghevun jayche nehmi ramayn hote pan mi aap li ji kheredi karyachi ti kartech 🙂 pan dokyala baam lawun. kadachit tumcha ha lekh vachun pudhil veles tari mala india t jatana chi khredi kartana dokyala baam lawawa nahi lagnar :)) karen kadachi mazya MR. patlele asel 🙂

  प्रत्युत्तर

  • anukshre
   Dec 07, 2009 @ 11:58:01

   धन्यवाद नीलिमा,
   जरूर भेटी घे आपल्या आवडीने सर्वांसाठी, कारण कष्टा पेक्षा, किमती पेक्षा भावना अधिक मोलाच्या असतात. फक्त त्यात मागण्याच्या अपेक्षा
   वारंवार नसाव्या. अशी रास्त इच्छा आहे एव्हढेच.आणि हो जरूर या ओमान ला! आम्ही पण शारजाह ला येत असतो. शेजारीच तर आहोत आपण.जसे कासवाच्या पोस्ट जागी……कशासाठीच्या प्रतिक्रिया आपण दोघीही लिहितो. असो जागा महत्वाची नाही तर भावना अधिक जवळच्या…..कळवा मला आपण जरूर भेटूच……तुमच्या अहोना! माझाही नमस्कार पोहचवा. खरेदी ओमान मध्ये आपण दोघीही करू..

   प्रत्युत्तर

 4. sahajach
  Dec 07, 2009 @ 14:58:50

  ताई मस्त माहिती दिलीयेस…..लवकरच Al-Hoota caves बद्दल लिही!!!

  प्रत्युत्तर

 5. gouri
  Dec 07, 2009 @ 19:51:16

  mastach mahiti aahe … ‘maherapan’ khaasach 🙂
  photo mule ani maja aali vaachaayala.

  प्रत्युत्तर

  • anukshre
   Dec 08, 2009 @ 08:14:23

   गौरी,
   जिथे जन्म घेतला तिथेच परत बाळंतपण, माहेरपण…..मलाही हे खासच वाटले. कस कळत न ह्याना.निसर्ग पाहावा व शिकावा ह्यांच्या कडूनच……

   प्रत्युत्तर

 6. harekrishnaji
  Dec 07, 2009 @ 21:11:23

  कोकणात ही वेळास परिसरात् असेच दृश्य असते

  प्रत्युत्तर

  • anukshre
   Dec 08, 2009 @ 08:09:25

   नमस्कार आणि स्वागत श्री. हरेक्रीष्णजी,
   आपण छान माहिती दिलीत. मला ‘वेळास’ बद्धल अधिक माहिती देवू शकाल का? कदाचित कोणाला सांगायला उपयोगी होईल.
   आपल्या अभिप्राय बद्धल धन्यवाद.

   प्रत्युत्तर

 7. महेंद्र
  Dec 08, 2009 @ 08:59:18

  ऑलिव्ह रिडले टर्टल म्हणुन हिरव्या पाठीची टर्टल्स ओरिसाच्या समुद्र किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी वर्षातुन एकदा येतात. त्याच जागेवर आता टाटाचं पोर्टचं काम सुरु आहे. त्या विरोधात एक एनजीओ काम करते आहे. ग्रिन पिस डॉट ओआरजी.. ही साईट आहे त्यांची.
  तुम्ही जे प्रॉब्लेम्स वर लिहिले आहेत ते सगळे खुप जास्त प्रमाणात आप्लया कडे पण आहेत. कासवाची अंडी ही डेलिकसी म्हणुन ओरिसा मधे खाल्ली जातात. लेख खुप माहितीपुर्ण झालेला आहे. काल दिवसभर कामाच्या व्यापात वाचायला वेळ मिळाला नाही.
  तुम्ही कधी गेला होता पहायला? अंडी घालतांना की पिलं बाहेर पडतांना?? लेख छान झालाय..

  प्रत्युत्तर

  • anukshre
   Dec 08, 2009 @ 09:34:03

   महेंद्र्जी,
   हो मी पण ऐकून आहे ओरिसा बद्धल, इथे पण ओलिव्ह रिडले जातीचीच असतात. आम्ही गेल्या वर्षी गेलो होतो. आता माहिती नाही तो किनारा तसाच आहे का अजून कारण गोनू वादळाने उधवस्त झाला होता. ह्या वर्षी कोणी जावून पाह्ल्याचा रिपोर्ट आला नाही. भारतात असूनही इतके लांब कधी खास कासावांकारिता जमले नाही. इथे कार ने सहज सोप्पे आहे. पण हा अनुभव काहीसा वेगळा होता. हे मात्र नक्की.इथे ऑफिसेसना एक आठवडा सुट्टी मिळते ईद साठी, नंतर फक्त शुक्रवार त्यात जमवावे लागते. बाकी स्वताच्या सुट्ट्या म्हणजे भारतात जाण्यासाठी एक महिना. वर्षभर कंटाळा आला म्हणून सहज सुट्टी घेता येत नाही.त्यामुळे जसे जमेल तसे जातो.

   प्रत्युत्तर

 8. Bhau Katdare
  Sep 30, 2012 @ 10:11:35

  स.न.
  आपला कासवी ची दृष्टी हा ६ डिसेंबर ११ चा लेख वाचला. छान आहे.
  आम्ही सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेच्या वतीने २००२ साल पासून महाराष्ट्रा मध्ये सागरी कासव संरक्षण संवर्धन मोहीम राबवत आहोत. ३० गावात काम करत असून ३२००० पेक्षा जास्त पिल्ले समुद्रात सोडली आहेत. वेळास येथे कासव महोत्सव करत असतो.
  संस्थेचे इतर अनेक प्रकल्प आहेत. अवश्य साईट पहावी.
  तेथील कासव संरक्षण संवर्धना बाबत अधिक माहिती मिळाल्यास आपल्यकडे काम करताना त्याचा विचार करता येईल.
  शुभेच्छा!
  भाऊ काटदरे, चिपळूण, रत्नागिरी, महाराष्ट्र

  प्रत्युत्तर

  • Anukshre
   Mar 06, 2013 @ 21:02:33

   श्रीयुत भाऊ काटदरे. नमस्कार, मी जरूर माहिती आपल्याला कळवीन. वेळास येथील आपल्या प्रकल्पाची माहिती मला आहे. आपण साईट ची लिंक पाठवावी म्हणजे येथे ती कायम स्वरूपी सर्वांना पाहण्यास राहील. आपल्या अभिप्राय बद्धल सहर्ष आभारी आहे.

   प्रत्युत्तर

 9. Mahendra Spad
  Oct 07, 2012 @ 08:02:41

  it’s best info about tortoise. I have also one tortoise in my home. It’s very beautiful situation when i fed his food in his home. When i give his food he come close to me .I feel very different. And i love my tortoise very much………..

  प्रत्युत्तर

 10. swati
  Aug 29, 2015 @ 13:56:58

  कासव बरोबर कस बोलायचं ?

  प्रत्युत्तर

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: