कशासाठी एव्हढे……………..हे तर प्रेमासाठी.

”आई, आत्या, काकू, मावशी…………आम्ही भारतात येतोय”

सुट्टी अजूनही मस्तच असते. आम्ही दरवर्षी जून महिन्यात भारतात जातो. हा निरोप फोन वर देवून झाला की इकडे व तिकडे दोन्ही ठिकाणी लगीनघाई सुरु होते. साधारणपणे मे महिन्यात परीक्षांचे व ह्यांच्या सुट्टीचे नियोजन करावे लागते. मग लगबग सुरु होते प्रथम खरेदीची, दरवर्षी ही भलीमोठ्ठी यादी होते.

वयस्कर व्यक्तींची नावे निदान दहा तरी जण जवळचे असतात. घरचे तीन ते चार, आमचे काका, आत्या, मावशी हे मागच्या पिढीचे जेष्ठ नागरिक, त्यात शेजारचे आजी, आजोबा, मित्र मैत्रिणींचे आईवडील असे मिळून साधारण वीस पर्यंत होतात. त्यांच्या वयानुसार सुकामेवा, गरम कपडे, बी. पी. मोजायचे यंत्र वैगरे. आई व सासूबाई ह्यात एखाद दोन व्यक्ती आवर्जून सांगतात. कोणाची पंचाहत्तरावी तर कोणाची साठी झाली असते. मग त्या नुसार जरा वेगळा विचार करून खास खरेदी करायची. जेष्ठ नातेवाईक पासून सुरवात होते.

सुकामेवा पण मऊ असा बेदाणे, काजू, अंजीर घ्यायचा उगाच जर्दाळू, बदाम असे कडक प्रकार टाळायचे. गरम कपडे पण हलके व उबदार हवेत. इकडे खर तर उन्हाळा खूप पारा पन्नास अंश पर्यंत जातो, तशीच थंडी पण बोचरी कारण मूळ वाळवंटी देश आहे. अनेक देशातील वस्तू मिळतात. त्यामुळे अमेरिका ते आफ्रिका सर्व आहेच. चीन तर कुठे ही असतोच. असो ह्या परदेशी वस्तूंचे आकर्षण अजूनही आहे. त्यामुळे आजी आजोबांची खरेदी प्रथम करणे.

नंतर खरेदी करणे मधली पिढी सर्वांची खरेदी एकाच पद्धतीची करायची. ड्रेस कापड, पर्सेस, परफ्युम, मेकपचे सामान सर्व काही नामवंत देशांचे.मैत्रिणी, मित्र, त्यांचा परिवार. शेजारच्या सख्या, सोसायटीचे काही खास लोक की जे आमच्या घरावर लक्ष ठेवतात. दीर, भाऊ, पुतण्या, भाचे,त्यांचे काही जवळचे आहेत त्यांच्या करिता पण घ्या असा फोन भारतातून हमखास येतो. ह्या वयोगटाची यादी खूप विस्तारत जाते.

मोबाईल ते लॅपटॉप, घड्याळे, कॅमेरा काय काय घ्यायचे? भारतात घेणे चांगले कारण नंतर त्याची सर्विस मिळते. शक्य तिथे पटवून सांगतो. तरीही यादी असतेच. आता तर विमानतळावर खूप त्रास होतो. स्मगलर आरामात बाहेर पडत असतील, पण सामान्य वर्ग चेहेरे पट्टी असूनही अडवणूक होते.त्यात आता तापाचे फॉर्म भरावे लागतात. खूप वेळ जातो. वैताग येतो. आम्ही मुंबईत अजूनही टपरींवर पण खातो. कसे ठणठ्णीत आहोत. पण ती वेळ नसते हे पटवून देण्याची मुकाट्यानी तासंतास वेळ जातो.

नंतर नंबर असतो बच्चे मंडळींचा. इथे नुकताच जन्म घेतलेला सर्वात छोटा नातेवाईक ते कॉलेज ला जाणारे युवक इतका मोठा विस्तार असतो. आता ह्यांच्या सर्व गोष्टी भारतात छानच मिळतात पण आम्ही परदेशावून येत असल्याने घरा समोरच्या दुकानातून विकत घेणे विचार सुद्धा करता येत नाही. मस्कत वरून येतात आम्ही म्हटलेच, घरात फॉरेन च्या वस्तू येतील. आम्ही इकडूनच घेवून जातो. अपेक्षा भंग करणे जीवावर येते. चॉकलेट ते जर्किन.परफ्युम, मनगटा वरची घड्याळे, इत्यादी वयाचा विचार करून घेतो.

लग्न होवून बरीचशी भावंडे आईबाबा झालेली असतात. मग अशा वेळी त्यांच्या धर्मपत्नी किंवा नवीन पती व त्यांचे छोटेसे बाळ ह्या बातम्या आधीच दोन्ही आईनी कानावर घातलेल्या असतात. मग वेगळे पॅकेज करावे लागते. कारण काका, मावशी, आत्या, अशा नवीन नात्यांनी ओळखले जाणार असतो. कधी कधी पूर्ण घराकरिता केशर डबी ते कधी सोन्याची पण मागणी होते. घरचे नातेवाईकात लग्न होणार असते मग इकडचे सोने म्हणजे चकाचक. इथे या व आपल्या पसंतीने घ्या. अशी नम्र विनंती करावी लागते.

दारातला गुजराथी दुकानदार तर अंगावरच्या वस्तू, रोख पैसे देतो पण मला देवून जा. असा वाणी हिशोब मांडत असतो. पूर्वीची कामवाली, गेटमन जाता येता अकारण सलाम ठोकतो त्याच्या हातावर पैसे ठेवावे लागतात कारण आम्ही दिवाळीत नसतो व अधिक त्याच्या मुलांकरिता कॅड्बरी परदेशाची ठेवावी लागते.पूर्वीचा दुधवाला, कचरेवाला, अगदी भाजीवाला सुद्धाघराची खिडकी उघडी दिसली म्हणून विचारपूस करायला आवर्जून येतो. त्याच्या नातवंडाची माहिती देतो. एक छोटे का होईना चॉकलेट द्यावे लागते.

एवढा उपद्व्याप कोणी सांगितला? नाही घ्यायचे असे दरवर्षी ठरवतो. पण मायेचे पाश इतके असतात की त्रास झाला तरी आनंदच मिळतो. दोन्ही आई सारख्या सांगतात तुमच्या भल्या मोठ्ठ्या बॅगा भरून काहीही आणू नका. तुम्ही दिसता, भेटता हेच खूप आहे. पण महिनाभर पायाला चक्र लागलेली असतात. प्रत्येक नातेवाईक भेटणे शक्य होत नाही.एकतर पाऊस आम्हाला दमवतो. तरी पण काही घरे करावीच लागतात.

वयस्कर मंडळी आम्ही पुढच्या वर्षी आहोत का नाही असे म्हणून गहिवर देतात. नवीन लग्न झालेल्या भावंडाना खूप उत्साह असतो. एखादी भाची, पुतणी, बहिण शिक्षणाला अमेरिकेत जाणार असते. तिला भेटणे सहज शक्य नाही म्हणून तिकडे ही जातोच. जुने शाळकरी मित्र परिवार, एक ना दोन खूप कारणे असतात. परदेशाहून येणे सोप्पे होते पण प्रत्येक वेळी पाणी, खाणे, झोपेच्या सवई, वातावरण बदल्यामुळे आजारी पडतोच.

खरेदीत पैसा एव्हढा खर्च होतो की वर्षातून एकदा कंपनी तिकीट देते म्हणून बचत करून एकदाच जातो. त्या खरेदीच्या पैशात भारतात दोनदा येवून गेलो असतो. पण दारात उभी असलेली आई, आवडीचा पदार्थ करून जेवायला बोलावणारी मावशी, थरथरणारा हात चेहऱ्यावरून फिरवणारी आत्या, धावत बिलगणारी बच्चे कंपनी, खुश होणाऱ्या बहिणी, मागे मागे फिरणारे भाऊ, आवर्जून बोलावणारा मित्रपरिवार, साध्या स्वभावाची भेटणारी रोजची मंडळी, दारातले मी लावलेले झाड जपणारा गेटमन, कोणा कोणाची नाती सांगू? सर्व आपुलकीने विचारपूस करतात.

ह्याच आपुलकी साठी, जिव्हाळ्यासाठी हा सोस. परत येताना असतात बाबांची घट्ट मिठी, आईचे अश्रू, बहिणींचे दुखी: चेहरे, भावांची काळजी, मित्र परिवाराचे हातात हात घातलेले स्पर्श, साध्या स्वभावानी दिलेली मूक परवानगी, वयस्करांचे आशीर्वाद, बच्चे कंपनीची जावू नका म्हणून घातलेली गळ. सोडवत नाही म्हणून परतांना हे सामान बरोबर परदेशी माघारी घेवून येतो.

पुन्हा मोठी बॅग भरते ती लाडू, घरचे मसाले, मुरांबे, मेतकुट मिरगुंड, घरी केलेली लोणची, बटाटा कीस, चितळे बाकरवडी, केप्र उत्पादने पुन्हा खूप सामान होते. ठराविक वजन नेता येते म्हणून काही शिल्लक राहते. आईचा गलबललेला चेहरा आठवतो. वर्षभर पुरणार नाहीच. बरेचेसे परदेशी मिळते पण त्यात माया, प्रेम नसते. पुरवून पुरवून वापरायचे. कारण पुढच्या जून पर्यंत वाट पहायची असते. कशासाठी एव्हढे तर ह्या प्रेमासाठी. आंम्ही परत परत बॅग भरत असतो भारतासाठी, आपल्यांसाठी…….

14 प्रतिक्रिया (+add yours?)

 1. akhiljoshi
  डिसेंबर 04, 2009 @ 17:24:28

  प्रत्येक घरातून एक तरी आता परदेशात जातोच काही न काही कामा निमित्ताने
  निदान काही महिन्यांसाठी, किवा वर्षासाठीतरी
  खूप छान लिखित केला आहेत आपण हा अनुभव
  वाचताना सगळा आपल्या घरात घडलेल्या गोष्टी वाटतात,
  खूप लोकांना हा विरुद्ध बाजूचा अनुभव नसेल त्यांच्यासाठी
  म्हणजे माझ्यासारख्या अजूनही देशातच असणार्यांसाठी आहे/.
  माझ्या नावाची यादी हि कधी काळी तयार झाली होती…
  भावाच्या नोंद वहीत….

  उत्तर

  • anukshre
   डिसेंबर 04, 2009 @ 21:03:42

   खरय आपले म्हणणे.प्रत्येक घरचा एक सदस्य जरी परदेशी असला तरी जिव्हाळा तेव्हढाच राहणार कायम. आपण ही परदेशी जाल तेंव्हा आपली पण बॅग अशीच भरू दे. हाच तर आनंद मिळतो. जे जीवाभावाचे आहेत त्यांच्यासाठीच घरी परतायची ओढ असते.

   उत्तर

 2. gouri
  डिसेंबर 04, 2009 @ 17:40:19

  आम्ही लहान असताना मामा कॅनडाहून यायचा तेंव्हा एका माणसाच्या भारतवारीएवढा तरी त्यांचा भेटवस्तूंवरचा खर्च व्हायचा! पण प्रत्येकासाठी आवर्जून काही आणल्याचं अप्रूप नक्कीच वाटायचं.

  उत्तर

  • anukshre
   डिसेंबर 04, 2009 @ 21:10:07

   गौरी,
   छान आठवण सांगितलीस. आम्ही दिलेल्या गोळ्यांचे कागद पण ही छोटी कंपनी जपून ठेवते. खरेदीची लगबग, करताना मन कधीच भारतात गेलेले असते. घर तर तिकडे आहे. आम्ही इथे फक्त राहतो.

   उत्तर

 3. Aparna
  डिसेंबर 05, 2009 @ 02:19:33

  माझ्यासाठी गेले काही ट्रिपा ही दुखरी नस आहे. खरं सांगु का अमेरिकेत सगळं चीनमधलं आणि चढ्या भावाने असतं आणि मी स्वतः इथं काहीही मेड इन इंडिया दिसलं की स्वतःसाठी आवर्जुन घेते. पहिल्यांदा जाताना सगळ्यांसाठी न्यावसं वाटणं तो खर्च करणं साहजिकच आहे पण प्रत्येकवेळी काय न्यायचं (आणि कधी कधी कशासाठी??) हा प्रश्नच आहे.
  मी या विषयावर माझं खरं खरं मत आणि या देवाणीत आलेले काही अनुभव लिहिले तर अजुन काही लोकांच्या (/नातेवाइकांच्या) ब्लॅकलिस्टमध्ये कायमची जाईन. एकदाच एक घरगुती व्यक्ती इथे आली आणि स्वतःच्या सासरसाठी खरेदी करायची वेळ आली तेव्हा बापरे किती महाग…एक-दोन डॉलर वालं काही आहे का टाइपचे प्रश्न यायला लागले तेव्हा काही न बोलता त्यांची पण खरेदी करून दिली..आत हे ओझं कमी व्हावं….असो..
  पण जेव्हा केव्हा जातो तेव्हा तेव्हा बॅगा आपसूकच भरल्या जातात. मला स्वतःला माझ्या आवडीनेच घ्यायला आवडतं मग तरच त्याला गिफ़्ट म्हणायचं ना??? असो…जरा सौम्य शब्दात लिहायचं होतं …पण….
  आणि हो लेख खूप छान झाला आहे….:)

  उत्तर

  • anukshre
   डिसेंबर 05, 2009 @ 07:58:07

   अपर्णा,
   मला तुझ्याकडून अश्याच प्रतिक्रियेची अपेक्षा होती. ज्याच जळत त्यालाच कळत. आपल्या आवडीने घेतले तरच ते गिफ्ट होते. वर्षभर विचारत पण नाहीत पण बरोबर निघायच्या आधी फोन येतो त्यांच्या मागणीचा……..असेही आहे. हे अनुभव माझ्या जवळ जवळ सगळ्या मैत्रिणींचे आहेत. परखड वाटेल पण ते सत्य आहे.काही नातेवाईक त्यांचे प्लॉट घेतात, जागा विकतात,
   आपल्याला मात्र जागा घेतली का? तुम्ही काय परदेशी? श्रीमंत. असे ही टोमणे स्वताचे लपवून आपल्याला सुनवतात. लिहिणार आहे मी नक्कीच, कारण परदेशचा त्यांचा मुलगा जवळ राहत नाही म्हणून मुलाच्या मनात कायम ओली जळजळीत अश्वथामा जखम द्यायला कोणीही मागे पुढे विचार करीत नाही. जखमेच्या आतली वेदना मी सांगणार. निरपेक्ष भावना हीच खरी
   भेट असते देण्यासाठी व घेण्यासाठी…..

   उत्तर

   • anukshre
    डिसेंबर 05, 2009 @ 11:03:01

    हीना,
    काय लिहू सखे मी? तू सुट्टीला निघालीस त्या आधी तू ही पोस्ट वाचावीस म्हणून पटकन लिहिली. जा बाई प्रेमाने………वाटत रहा भेटी, त्यांच्या आवडीप्रमाणे. झालीस नाराज तर
    भेटून ये आईला, माझाही नमस्कार सांग तिला. विचारून ये पुढची कर्तव्ये, तू आणि मी मिळून पार पाडू, राहुनी अलिप्त सुखी परदेशी.

 4. HEENA
  डिसेंबर 05, 2009 @ 10:24:09

  टुर-टुर ….बाई भारताची टुर, मायेचा देश ,प्रेमाची भेट, ओलावा थेट ….पण सासरच्या लोकांची लिस्टच ग्रेट! एकंदर कल्पना आलीच असेल,तरी पण थोडे थांबून सांगतेच- माहेरी आणि सासरी सारखाच आदरसत्कार होतो तरीही माहेरी कसं भेटवस्तू पाहून प्रेम उतू जात नाही ते आपसूकच उचंबळून येते, तर सासरी जरा भरल्या हातानी जावेलागते (तेही त्यांनी मागविलेल्या वस्तूंनी) !!! आपण वर्षातून १ महिनाच मायदेशात राहणार तो १ महिना जर आपल्याला आनंदात घालवायचा असेल तर एवढी किमत मोजावीच लागते !!! ह्याला संसारात “कर्तव्य बजावणे ” असे म्हणतात- इति माझी आई .

  उत्तर

 5. Ashwini
  डिसेंबर 07, 2009 @ 06:57:36

  lekh mast aahe …. mazi tai pan US madhe asay chi teva amhanala gift anay chi khup uskut ta asay chi aapalya sathi kay aanle yaychi 🙂 lahan hoto tyamule khup majja yaychi…….. aata tase kahi rahile nahi sagali kade sagale milate aani aparna mhantlya sarakhe US madhe sagal ch made in china aste ……..chalo bye ……….

  उत्तर

  • anukshre
   डिसेंबर 07, 2009 @ 08:26:23

   अश्विनी,
   आपल्याला अप्रूप असायचे भेटींचे. अगदी बागेतले फुल जरी कोणी दिले तरी ह्या छोट्याशा भेटीने पण आपण खुश व्हायचो.अजूनही आपले जे कुठलीच अपेक्षा बोलून दाखवत नाहीत त्यांच्या करिता स्वताच्या मनाने घेतलेल्या भेटी ह्या समाधान देतात. अग पण प्रत्येक वर्षी ठराविक लोक लिस्ट देतात. तेंव्हा मात्र आपल्यापेक्षा वस्तुत ह्यांना जास्त इंटरेस्ट आहे हे पाहून मन विषण्ण होते. अपर्णा म्हणते, हीना चे ही हेच मत आहे. मला ही असेच व जवळजवळ सगळ्या मैत्रिणींचे असेच वैतागलेले अनुभव आहेत. आपला जमाना गेला.फुकट नको पैसे देतो वरून आणि असे सुनवतात. तरी पण मन मोडून जात नाही. जेव्हढे शक्य आहे तेव्हढे घेतोच कारण प्रेमासाठी धावत भारतात जातो…..

   उत्तर

 6. Ashwini
  डिसेंबर 07, 2009 @ 13:48:26

  he matra 100% khare aahe ki n magata milal le gift ch jast ~ anand dete …tyat lya tyat lahan mula sathi gift ghenyat jast majja aste 🙂

  aaj kal kona lahan mula cha vadhdiwas asel tari sudha gift denya sathi khup vichar karava lagato hahaha tyala awadel ka tyacha aai/baba na awadel ka kal ch Mr. mhanale aapan gift voucher ch devu awadel te ghetil te lok hehehehe

  उत्तर

  • anukshre
   डिसेंबर 07, 2009 @ 14:58:53

   अश्विनी,
   मनापासून येतेस, कधी घाईत असतेस, कधी मुद्दामहून वेळ ठेवून येतेस………हे एक मिनिट माझ्या ब्लॉग वर येवून वाचून प्रतिक्रिया देणे. मला खूपच अनमोल आहे. हीच खरी भेट ठरते.
   असे जीवनात पण आहेच नं……

   उत्तर

 7. महेंद्र
  डिसेंबर 08, 2009 @ 09:07:35

  कठिण विषय.. काय बोलणार? प्रत्येकाचा स्वतःचा प्रश्न आहे हा.. कसे वागायचे तो.!

  उत्तर

  • anukshre
   डिसेंबर 08, 2009 @ 09:50:40

   इथून तिकडे येताना ह्या गिफ्ट, भले मोठे सामान, आपल्या गुंतलेल्या भावना ह्या बाबी कॉमन आहेत. भारतात मिळते म्हणून कशाला न्या? नवऱ्याचं मत असते, भारतात ह्या ब्यागा मजल्यावर घेवून चढून जाणे अत्यंत जिकरीचे काम होते. पण आम्ही परदेशावून येतो म्हटल्यावर दारातले काही घेणे सयुक्तिक वाटत नाही. इकडे घरातून नवरा बायको भांडणे जुंपतात ह्या मुद्द्द्या वरून. महागाई व मिळणारा पगार ह्यांचे व्यस्त प्रमाण इथेही आहे. हा मुद्दा तर वेगळाच आहे. दुखऱ्या नसेचे दुखणे आहे……

   उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: