अशी मी ….आणि अशी माझी मुंबई

माझी प्रोफाईल……. २६/११ साठी,

आपली जन्मभूमी ह्याचा अभिमान असणे हे सहजीच आहे. कर्मभूमी पण तेव्हढीच जवळची असते. आपल्या आयुष्यातले चढ उतार, भावनिक, मानसिक धागे दोरे हे आपल्या गावाशी, शहराशी वेढून असतात. मी मुंबईची म्हणून मला माझ्या शहराने मोठे केले. त्या शहराला माझे शिक्षण, माझे अनुभव आज अर्पित करते. ते ही २६/११ ला कारण ही तारीख माझ्या मुंबईची आहे. भारतच काय पण सर्व जग जणू काही दहशतीने वेठीस धरले होते. त्यातून माझी मुंबई ही कायम टार्गेट असते. हा मुंबईच्या इतिहासातला काळाकुट्ट दिवस पण पोलिसांनी, कमांडोज, ह्यांनी निडरपणाने मुकाबला करून दहशतवाद्याचा बिमोड केला. गतिमान, धाडसी, संवेदनक्षम, हळवी, विचारी अशी माझी मुंबई.

मी मुंबईत जन्मले, शिक्षण, करिअर सर्व काही मुंबई. माझी प्रोफाईल ही मुंबईचाच घटक आहे. जन्म घाटकोपर, शाळा ठाणे, कॉलेज रुइया ह्या परिघातच मी मोठी झाले, भक्कम बनले, सक्षम, उच्च विद्याविभूषित, संवेदनक्षम बनले.

शाळेत असताना पोहणे, मैदानी खेळ ह्यात मला आवड होती.कॉलेज ला गेल्यावर एन. सी. सी. जॉईन केले. मला यु. पी. एस. सी, किंवा आय. पी. एस. परीक्षा देवून आय. ए. एस. किंवा पोलीस ऑफिसर बनायचे मी ठरवले होते. एन. सी. सी. चे प्रशिक्षण चालू असताना अनेक पारितोषिके पटकावली. ऑल इंडिया लेव्हल मिलिटरी चे सिग्नल यंत्रणा करिता अखिल भारतीय श्रेणीचा प्रथम क्रमांकाचा चांदीचा कप मला मिळाला. महाराष्ट्र प्रतिनिधित्व करण्याची संधी मला राजधानीत मिळाली. सर्व ठिकाणी मेरीट होल्डर झाले. फायरिंग, हॉर्स रायडींग, स्युबा डायविंग, प्यारा सेलिंग, ह्या धाडसी प्रकारात अव्वल नंबर टिकवून होते. कॉलेज व एन. सी. सी तर्फे महाराष्ट्रातील सर्व डोंगर, किल्ले ट्रेकिंग करून पाहून झाले.

शिवाजी मैदानावर परेड च्या दरम्यान हेमंत करकरे ह्यांच्याशी बोलण्याचा योग आला होता. आपण प्रशासकीय सेवा करिअर करता निवडा असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी मला केले होते. पण मराठी तरुणांचा तेंव्हा फारसा सहभाग नसायचा. लग्न करून ज्या ठिकाणी सासर असेल तिकडे जायचे असे पुरोगामी विचारांचा पगडा मुलीं भोवती असायचा. मला काही फारसे प्रोत्साहन मिळाले नाही त्यामुळे त्यांना प्रयत्न करते असे म्हटलेले पूर्ण होऊ शकले नाही. मी शिक्षण क्षेत्र करिअर करता निवडले. शाळा ते महाविद्यालय इथे शिकवत राहिले. गाईड चे ट्रेनिंग घेवून आपत्कालीन उपाययोजना, क्याम्प घेवून विद्यार्थ्यांना शिकवल्या.

आज माझे अनेक विद्यार्थी मी सुचवलेल्या प्रमाणे प्रशासकीय परीक्षा देवून रुजू झाले आहेत. मी पूर्ण करू शकले नाही. पण माझ्या विद्यार्थ्यांच्या रूपाने आज करकरे साहेबाना सलाम करते. काही पोलीस ओळखल का टीचर? म्हणून समोर येतात. माझे जे कार्यक्षेत्र आहे ते पुढच्या भावी पिढीचे आहे. त्यामध्ये मी करकरे, साळसकर असे अनेक शूर वीर पाहते.

आम्हा स्त्रीयांना सकाळी एक व्यक्ती अश्लील हावभाव करून रस्त्यात त्रास द्यायची. दहा जणी असूनही सर्व तिकडे दुर्लक्ष करायच्या. मी पोलिसांना फोन करून सांगितले व सर्वांची सुटका झाली. रस्ता निर्वेध बनला. पोलिसांची गस्त सुरु झाली तेंव्हा जाणवले की घेतलेले शिक्षण वाया जात नाही.

एन. एस. एस मध्ये पण सहभागी झाले. अल्प उत्त्पन गट निवडून कांजुरमार्ग विक्रोळीच्या डोंगरा वरच्या झोपडपट्टीत काम केले. मुंबईचे हे जीवन ही फार जवळून अनुभवले. त्यांनी दिलेला प्रेमाचा चहा, आग्रह, आमच्या गटाने त्यांना घरगुती रोजगार करता साधन सामुग्री, शिक्षण देण्याचे काम केले. त्या कुटुंबांचा चेहऱ्यांवर दिसणारा आनंद मला आज आठवला.

अंतर्मुख होऊन विचार करते तेंव्हा हे निश्चितच पटते की आपल्या भूमीचा आपण मोठे होण्यात खूप महत्वाचा हिस्सा आहे. २६/११ च्या भीषण हल्ल्यात नागरिकही खूप मोठ्या प्रमाणात बाहेर येवून मदत करीत होते. पुरात पहिले की एकमेकांना वाचवण्यासाठी शर्थ करीत होते. पाण्यात अडकलेल्या लोकांना अन्न, वडापाव, पाणी सर्व काही घरासारखे देत होते. कोणी कोणाचे नव्हते होते ते फक्त मुंबईकर. ह्यांच्या पण प्रत्येकाच्या प्रोफाईल मध्ये एक मुंबई आहे. निर्भीड, कणखर, हळवी, गतिमान व वैव्हीध्य अशा शिक्षणाने परिपूर्ण असलेली. कितीही संकटे आली तरी न डगमगता धीराने सामोरी जाणारी, बदल स्वीकारणारी, प्राप्त परिस्थितीत पण योग्य मार्ग काढणारी.

मी मुंबईचे प्रतिनिधित्व करते. मुंबईचे लोक जगात कुठे ही मजेत राहू शकतात. भारतात येताना विमानातून झोपडी दिसली कसे आलबेल आहे ते जाणवते. सगळ्यांना सामावून घेतले. भले वाद असतील पण संकट काळी सर्व मुंबईकर असतात. पोलीस अधिकारी ते सामान्य व्यक्ती २६/११ ला एकमेकां करता अश्रू डोळ्यात ठेवून. जे राहिले आहेत त्यांच्या करता मदत करीत होते हे जेंव्हा परदेशी बसून आम्ही टी.व्ही. वर पाहत होतो तेंव्हा मुंबईचा अभिमान आमच्या डोळ्यात पाण्याने भरून गेला.

आम्ही नाही मदत करायला ह्याचे वाईट वाटले. इकडून पैसे, कपडे, धान्य वैगरे मदती करता पाठवतो. पण बॉम्ब स्फोटात मदत कार्य, पुरात भुकेल्याच्या पोटी अन्न, वाचवण्या करता हात इकडून पाण्यात नाही देवू शकत. हात जोडतो ३३ कोटी देवांना की माझ्या मुंबईला, भारताला वाचव संकटातून.

आपल्या आयुष्याची प्रोफाईल म्हणजे आपली जन्मभूमी होय. मी मुंबईची म्हणून तिची व माझी जीवनरेखा सारखी वाटते. अशा मुंबईला सलाम!!!!

9 प्रतिक्रिया (+add yours?)

 1. Ashwini
  नोव्हेंबर 26, 2009 @ 07:22:31

  mumbai tuze salam chan lihile aahe boss ekdam 🙂 !!!!!!!!!!!!!

  उत्तर

  • anukshre
   नोव्हेंबर 26, 2009 @ 11:23:25

   सखे अश्विनी,
   अपेक्षा होतीच तुझ्या अभिप्रायाची. मस्तच वाटले तुला पाहून. तुझ्या कामाच्या व्यस्ततेची पूर्ण कल्पना आहे तरी, आवर्जून लिहितेस एक छान मैत्रीण मला मिळाली.
   आपल्या जडण घडणीत जन्म भूमी, कर्म भूमी ह्यांचा पगडा असतो.मायदेश पुढे आपण काहीच नाही.

   उत्तर

 2. Ashwini
  नोव्हेंबर 26, 2009 @ 08:05:26

  aani ho kasali gr8 aahes tu “फायरिंग, हॉर्स रायडींग, स्युबा डायविंग, प्यारा सेलिंग, ह्या धाडसी प्रकारात अव्वल नंबर” ekdam mast all rounder aahes

  उत्तर

 3. ravindra
  नोव्हेंबर 26, 2009 @ 20:46:46

  अनुजाजी तुमच प्रोफाईल वाचून तुम्ही ग्रेट आहात असेच म्हणावे लागेल.मी स्वतःला मुंबईकरच समजतो.मुंबई व मुंबईकर ग्रेट आहेत. मी जवळ जवळ १८ वर्ष मुंबईमध्ये काढले आहेत. मुंबई काय आहे हे मी चांगले ओळखतो. तेथे अमीर गरीब आणि इतर कोणतेच बंधन नसते. फक्त असते ती माणुसकी.

  उत्तर

  • anukshre
   नोव्हेंबर 26, 2009 @ 22:09:35

   रविन्द्रजी,
   मला जशा संधी उपलब्ध झाल्या तशा मी स्वीकारत गेले. प्रोफाईल मधला पाव भाग सुद्धा झाला नाही सांगून.अनुभव सांगण्याने आपलीही उजळणी होते.
   मी घेतलेला चांदीचा कप इंदिरा गांधी यांच्या कडून स्वीकारला होता. पण जवान, पोलीस, कमांडोज यापुढे मी नतमस्तक होते. ही पोस्ट मुंबई करता
   आहे. मला पण शिकायला मिळते, आपले अनुभव वाचून. सगळे माणुसकीच्या नात्यात बांधलेले असतात हे आपले म्हणणे १०८% सत्य आहे. अभिप्राय द्यायला बऱ्याच दिवसांनी आलात. आपण ब्लॉग मध्ये अनुभवी व जेष्ठ आहात. आपल्या सूचनांचे, पोस्ट पसंतीचे नेहमीच स्वागत!

   उत्तर

 4. Aparna
  नोव्हेंबर 28, 2009 @ 19:48:27

  अनुजाताई, प्रोफाईल एकदम सही आहे. योग्यवेळी काही निर्णय घेता आले असते तर कुठच्या सीमेवर असतीस अस वाटून गेलं… पण त्याबद्दल कटुता न दाखवता तू लिहू शकलीस यातच तुझं मोठेपण….

  उत्तर

 5. akhiljoshi
  डिसेंबर 06, 2009 @ 20:06:19

  संवेदना, आपलेपणाची भावना, थोडासा जिव्हाळा, मदत करायची इच्छा आणि माणुसकी
  या एकमेकांत आपोआप गुंफून जाणा-या गोष्टी आहेत…
  तुमचा हा लेख मी खूप उशिरा वाचला आहे… पण तसा वाचायला वेळ मिळाला कि एक एक लेख वाचतोच आहे…
  हा लेख आवडला,… आपण नागरिक म्हणून जागरूक राहणे आवश्यक आहे.
  आपण जर काही दुसर्याकडून अपेक्षित असलेले आधी आचरणात आणले तर आपण समोरच्याकडून
  अपेक्षा ठेवणे जास्त संयुक्तीत आहे.
  आता राहिली संवेदना जागृत राहण्याची गोष्ट…
  ती तर आपण लहानाचे मोठे होत असताना किवा कदाचित रोजच्या जीवनात जगताना,
  घरच्यांकडून किवा निरीक्षणातून काही काही घटना आपल्याला काहीतरी शिकवत असतात…
  त्याच्यामुळे जर विचार केला तर आपण सक्रीय राहतो… आपल्या भावना आणि संवेदना…
  या प्रक्टीकॅल जगण्याशी निगडीत असतीलही… त्यातून आपण कधी दुर्लक्ष करण्याचाही धोका असतो…
  पण संवेदना दाबून ठेवणे हे केव्हाही वाईट असते. त्यामुळे
  माणुसकीच्या नात्यात आपण जितके गुंतून राहू तितके ते येणाऱ्या भावी काळासाठी
  खूप फायद्याचे ठरणार आहे.. समतोल तर अशामुळेच साधला जातो न..?
  आजही आपल्या देशात खूप चांगल्या गोष्टी आहेतच न.. आणि म्हणूनच देश चालत आहे..
  फक्त वाईट गोष्टी flash जास्त होतात याचे वाईट वाटते…असो.
  लेख छान होता…
  तुम्ही छोट्या लेखातून खूप काही सांगितले आहेत…

  उत्तर

  • anukshre
   डिसेंबर 06, 2009 @ 21:15:45

   अखिल,
   खूपच प्रगल्भ अशी प्रतिक्रया आहे. मी एक प्रयत्न केला काही विचार मांडण्याचा त्याकरिता स्वताचेच उदाहरण घेतले. आपल्या विकासात मायभूमीचा खूप पगडा असतो. छान वाटले. आपल्या विचारांचे स्वागत!

   उत्तर

 6. Amol kuchekar
  एप्रिल 12, 2014 @ 23:17:48

  वरील मजकुर मला खुप आवङला
  आज जेव्हा मि मुबई आस
  नाव जरी ऐकल ना तर मुबई बद्दल
  एक वेगळाचं अभिमान वाटतो
  की मुबई ही माझि राजधानि आहे

  Mumbai is indias hart
  My mumbai is now chenged .
  India is changed
  I love india !

  – अमोल कुचेकर

  उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: