पुरुष दिन……….शुभेच्छा .
आज शुक्रवार आमच्या कडे सुट्टी असते. रविवार सारखे जरा आरामात चालते. माझे अहो! मात्र रोजच्या सारखे ५ ला उठतात. मीच ७ वाजेपर्यंत ताणून झोपते. रोजचा सकाळचा चहा तयार असतो. कामाच्या दिवशी सगळे लवकरच उठतो. ह्यांना मात्र असे एक दिवस सुद्धा उशिरा पर्यंत झोप येत नाही. असो.
हॉलमध्ये चहाचा कप घेवून आले तर टी. व्ही. वर एक स्त्री आपल्या पतीला धपाधप बडवत होती असा व्हिदिओ होता. चर्चा सुरु होती….पुरुष दिन ची. ह्यांच्यावर स्त्रिया अत्याचार करतात. म्हणून कायदा बदला, किंवा अजून एक कायदा तयार करा. स्त्री ची बाजू दाखवत नव्हते. वकील पण सहभागी होते. कायदा काय आहे ते सांगण्याकरता. असो हा झाला प्रोग्राम सकाळी पुरुष दिन बद्धल……
आज सुट्टीचा दिवस, आणि साजरा करण्या करता घरच्या दीड पुरुषांचा विचार केला पाहिजे. आता एक माझे अहो! दुसरा मिशी फुटत असलेला माझा छोकरा हा अर्धा. तसा मुलगा लगेच म्हणतो कसा, मी का अर्धा? अरे बाळा तुला मिशी फुटायला लागली म्हणून. बाबा सुखावला पण मी मात्र माझे छोटेसे पिल्लू अजून जपते त्या करता तुला अर्धा ठेवला. सकाळी मी उठे पर्यंत हे घर बरेचसे आवरून ठेवतात. रात्रीची भांडी जागेवर जातात, दोरीवरचे कपडे घड्या करून ठेवतात. हे लहानपणापासून आईला मदत करत आले आहेत. माझी एक दिवसाची सकाळची झोप जपतात. कोशींबर करता काकडी, जमेल तेव्हढी भाजी चिरून ठेवतात. स्वयंपाक घरात ह्यांची लुडबुड चालू असते, एकीकडे माझ्याशी गप्पा करत असतात. माझ्या आईला, बहिणीला, माझ्या जावेला सगळ्यांना मदत करत असतात.एक तर स्वभाव खवय्या, आणि खिलवायला पण आवडते.
त्यातून ह्यांची रास ‘ कन्या ‘ म्हणजे राशी प्रमाणे बरहुकूम स्वभाव. तसा सुट्टी करता खास बेत, ह्यांचा वाढदिवस म्हणून, दीपावलीचा पाडवा, बहिणीचे भाऊ आहेत म्हणून भाऊबीज, आणि एक हो माझा वाढदिवस म्हणून खास बेत, आता पुरुष दिन.
मातृदिन, महिला दिन हे माझे डे आहेत न. पण ह्या मध्ये प्रमुख आचारी मीच असते. ह्यांची मदत असतेच, पण स्वयंपाक झाल्यावर पहिल्या घासाला ह्यांचा चेहरा फार बोलका होतो. हे दडपण पण मीच झेलते डोळ्यासमोर गोष्टी असल्या तरी हे जोरदार आरोळी ठोकतात, मिळत नाहीये तेंव्हा मीच तिथूनच काढून हातात देते. मी शाकाहारी ह्यांच्या करता मासे, चिकन करायला शिकले. त्यांच्या आवडी करता, प्रेमासाठी मीच बदलले. माझ्या आवडीकरता, सोयी साठी,मला बरे नसते म्हणून, मला कंटाळा आला म्हणून, हे हॉटेल मधून खूप वेळेला जेवण घेवून येतात. कारण त्यांना माहिती आहे, की आपल्या बाळ करता मी करियर सोडून घरातच असते. काम करण्याची सवय असली की पुरुषांना निवृत्ती नंतर काय? हा मोठ्ठा प्रश्न पडतो. छंद म्हणून काही जोपासायला वेळ मिळाला नसतो. म्हणूनही पोकळी पुरुषात लवकर तयार होते. स्त्री म्हणून ती घरात केंव्हाही राहून स्वताला रमवून घेते काम सोडून कसे चालेल? तुमच्या मागण्या कशा पूर्ण होणार? तुमच्या पगारात घर चालेल का? असल्या पुरुषी प्रश्न ती उध्भवूच देत नाही. घर सांभाळत राहते.
असा चाललाय संसार, असे होतात डे साजरे. परस्परांवर असलेला विश्वास, प्रेम, आपण एकमेकां करता आहोत. ही भावना, आपलाच अंश म्हणून आलेला छोटासा जीव, त्यांना वाढवण्यात पुन्हा जगलेले बालपण, आई वडील किंवा मोठी माणसे यांचा जिव्हाळा ह्यावर घर बुलंद, अभेद्य होते. घर ते समाज व पुढे राष्ट्र अशीच घडामोड अविरत असते. मदत करणे, एकमेकांना जपणे, भांडणे किंवा मत भिन्नता होणारच कारण दोन वेगळी माणसे कायम एकत्र राहण्यासाठी लग्न करून, एकाच छताखाली कुटुंब तयार करून राहतात. मुलगी एक दिवस आपले घर सोडून नव्या घरात राहायला येते तेंव्हा तिच्या सवई जपणे, तिने पण नवीन स्वीकारणे हे पती पत्नी दोन्ही बाजूनी सकारात्मक असावे लागते. तरच रोज पुरुष दिन, महिला दिन, व बालदिन घरात साजरा होईल.
मला अत्यंत आवडणारे एक गाणे लगेचच पाहायला मिळाले…..बम चिकी चिकी बम, चिकी बम बम, एक दुसरेसे करते है प्यार हम, एक दुसरे के लिये बेकरार हम, एक दुसरे के वासते मरना पडे तो है तैयार हम……
पोस्ट करता विषय सुचला, ह्यांनी फक्त आमटी भात कर म्हणजे तुला पोस्ट चे लिहायला वेळ मिळेल. आमटी मात्र परवा सारखी कर, मला खूप आवडली होती. अजून एकदा मला तशीच हवी आहे. ह्याच प्रेमा करता अनेक गोष्टी मी झेलायला तयार आहे. लेकाने पण, आई, खेकडा आज नको उद्या कर.आज तू लिही अजून काय हवे सांगा सगळ्यांचे असेच काहीसे अनुभव असतात त्यातूनच शिकायचे, एकमेकांच्या आनंदात सहभागी व्हायचे. आयुष्य सुखी करायचे. जगात चांगले, वाईट दोन्ही आहेत. आपल्याला दोन्ही बाजू नीट माहिती असतातच असे नाही. आपल्याला संसार आनंदी करायचा आहे, थोडेसे बदलूया, स्वीकारुया, हसत राहूया एव्हढेच आज.
पूर्ण परिवाराला पुरुष दिनाच्या शुभेच्छा . असा पुरुषांचा दिवस असतो, ह्याचा शोध आम्हाला आजच लागला.
नोव्हेंबर 20, 2009 @ 13:32:38
hahaha mast aahe lekh !!!
नोव्हेंबर 20, 2009 @ 15:48:19
alis, mast mast vataya
नोव्हेंबर 20, 2009 @ 14:38:56
आज सकाळी घरुन निघालो. बायको माहेरी गेलेली असल्यामुळे थोडा वेळंच झाला उठायला. तर कसंतरी धावत पळत तयार होऊन निघालो. आधिच वेळ झाला होता, म्हणुन नेहेमी प्रमाणे लोकलने न जाता बस ने जाउ असा विचार केला. बस स्टॉप वर जाउन उभा राहिलो, आता उभंच रहायचं तर नेमकी नशिबाने समोर एक सुंदर मुलगी.. म्हंटलं चला.. वेळ बरा जाईल…आणि ती पण चक्क हसली की माझ्या कडे बघुन.. 🙂 मला वाटलं की माझ्या मागे कोणी उभा आहे कां.. पण नाही.. ती मला बघुनच हसली होती… 🙂 काय राव . मजा आहे नां???
आता ४० नंबर आली की सरळ दादर ला उतरुन आधी कार्पोरेट ऑफिस ला जाउन मग दुसरी बस घेउन जाउ या चेंबुरला. बस आली, आणि बस मधे चढलॊ. नेहेमी प्रमाणे समोरच्या बाजुला जाउन उभा राहिलो, कारण बसायला जागा नव्हतीच. स्त्रियांच्या सिट वरच्या एका स्त्रीने उठुन मला जागा दिली. मी म्हंटलं.. अहो कशाला उगिच बसा तुम्ही, तर ती गोडसं हासली, म्हणाली नाही … बसा हो तुम्ही, आमचं काय , आम्हाला तर रोजच बसायला मिळतं.. स्पेशल रिझर्वड सिट्स आहेत ना आमच्या साठी. आज तुम्ही बसा- फॉर अ चेंज….
ऑफिस ला पोहोचलो, आणि लिफ्ट च्या रांगेत उभा राहिलो. माझ्या समोर ९ व्या मजल्यावरची मिसेस ब्रेगेन्झा उभी होती. १४ लोकं झाली, नेमका मी होतो १५वा.. लिफ्ट मन थांबा म्हणला.. आणि तेवढ्यात ब्रेगेन्झा बाहेर आली, आणि म्हणली.. तुम्ही निघा.. मी नंतर येईन.. मला खरंच काही समजत नव्हतं. इतकी उर्मट बाई, की जी कधी कोणासाठीच काही करित नाही … .. कां म्हणुन तिने मला पुढे जाउ दिलं???
ऑफिस मधे आलो तर समोरच रिसेप्शनिस्ट हसली, आणि गुड मॉर्निंग म्हणुन हासली.. मी पण हलकेच स्माइल देउन पुढे गेलो आणि जागेवर बसलो. दिवसाची सुरुवात.. नेहेमीप्रमाणे बाजुच्या सॉफ्ट बोर्ड वर असलेल्या गणपतीला हात जोडले .. आणि बाप्पा.. दिवस चांगला जाउ दे रे बाबा …. असं म्हणुन क्षणभर प्रार्थना केली. तेंव्हाच मला गणपतीच्या फोटो मधे शेजारी असलेली ऋध्दी सिध्दी ने हसल्या असं वाटलं… खरंच की भास होता तो????
हल्ली डिक्टेशन देणं तसं कमीच झालंय. जास्तित जास्त रिप्लाय फक्त इ मेल नेच दिले जातात. तरी पण कांही शासकिय विभागांना पत्रंच पाठवावी लागतात. काही पत्र द्यायची होती, म्हणुन मुद्दाम स्टेनो ला बोलावले, आणि ती एकदम हसरा चेहेरा घेउन समोर आली. डिक्टेशन दिलं.. आणि तिने दहाच मिनिटात ती दोन पत्र टाइप करुन आणुन दिली. रुटीन मधे कमित कमी २ तास तरी गेले असते. पण फक्त १० मिनिटात??अरे हे चाललंय तरी काय?? काय होतंय हे?? सब कुछ उल्टा पुल्टा!!!
संध्याकाळी घरी येतांना फिश मार्केटला गेलो. तिथे एका मावशिला पापलेटचा भाव विचारला.. साधारणपणे वस्सकन ओरडुन बोलणारी ती कोळीण मामी हसंत हसंत बोलली. मासा उचलुन त्याचं तोंड दाबुन चेक केलं तरी पण ती ओरडली नाही. म्हंटलं कितिला देणार? तर म्हणे तुला जे द्यायचं ते दे…. मला तर कळेच नां.. हे काय होतंय?? अरे भाव करणं नाही, कांही नाही.. हे कसं आयुष्य?
असे खुप प्रसंग आहेत पण कॉमेंटचं पोस्ट होऊ नये म्हणुन थांबवतोय..
तेवढ्यात तुमचं पोस्ट वाचलं.. पुरुष दिन आहे होय … म्हणुन!!!!!!!
नोव्हेंबर 20, 2009 @ 15:47:03
‘अग!, बाई अरेच्च्या’! असतो असा दिवस. ‘हे’ मागून म्हणतात, ”नशीब जोरावर आहे महेंद्रांच”.पण त्यात तुम्हाला काका म्हणाले नाही कोणी. ही पण जमेची बाजू आहे म्हणा. म्हणून वहिनींना सारखे माहेरला पाठवू नका.
असेच असेही अनुभव वाढते राहू देत……….
नोव्हेंबर 20, 2009 @ 15:03:38
मला काय वाटतं माहित आहे की आपल्याला नात्यांचा, व्यक्तींचा विसर पडू नये म्हणून दिन साजरे केले जातात. मी स्त्री मुक्ती वाली नाही, पण बघ ना, बायकांचेच डे जास्त असतात. पुरुषदिनही असतो हे नव्याने समजलं. रोजचं आयुष्य, कुरबुरू होणार, वाद होणार. पण ते सर्व तिथेच संपवून आनंदाने राहिलं तर प्रत्येक दिवस ’डे’ सारखाच साजरा करता येईल.
नोव्हेंबर 20, 2009 @ 15:51:38
तुझे म्हणणे अगदी १००% सही आहे. हा दिवस म्हणजे आम्हालाही एक नवीन शोध आहे.
नोव्हेंबर 20, 2009 @ 16:30:55
एका सुंदर घरातील जागतिक पुरुष दिनाच वर्णन केले आहे.. 🙂
मस्त लिहिलंय
नोव्हेंबर 20, 2009 @ 19:47:04
धन्यवाद व आभारी आहे.
नोव्हेंबर 21, 2009 @ 09:30:23
हा एक दिवस पुरुषांचा नाहीतर किती अत्याचार होतात त्यांच्यावर ह्या विडियो मध्ये पहा … 🙂
नोव्हेंबर 21, 2009 @ 10:23:32
समाजात दोन्ही अनुभव येत असतात. ज्या प्रमाणे अंग दाखवणारे कपडे मुली घालतात त्याचप्रमाणे लो वेस्ट
प्यांट पण मुलांच्या दिसतात. चित्रपटांचे आदर्श, संस्कारांची पायमल्ली, तसेच भारतीय संस्कृती च्या अभिमानाचा
अभाव दिसतो. घरापासून समाज तयार होतो.म्हणून मी घरात नात्यांची जपणूक, आदर, जोडलेले नाते यशस्वी
होण्याकरता थोडेसे बदलावे व थोडेसे स्वीकारावे तरच घर सुंदर होते हे सांगण्याचा प्रयत्न केला.आपण जो विदिओ
पाठवलात तसे पण आहे. परंतु महेंद्र ना मी लिहिले आहे, ‘कोणी काका म्हणाले नाही’ कारण, त्यांना भेटलेल्या प्रत्येक
स्त्री ने ‘एक पुरुष’ म्हणून त्या दिवशी रिस्पेक्ट दिला. असे ही अनुभव येतात. समाजाच्या नीतीमूल्यांची जपणूक
पुरुष व स्त्री या दोघांनीही केली पाहिजे. घरात आईवडील मुलांना ओव्हर प्रोटेक्ट करतात त्याबद्धल ए. लाय. सी
ची ट्रेन मधील जाहिरात पहा आपण त्यावर लिहिलेत तर अजून एक दृष्टीकोन मिळेल.
अभिप्रायात दोन्ही बाजू उलगडून दाखवल्यात आभरी आहे.
नोव्हेंबर 21, 2009 @ 15:33:29
अनुजाताई पोस्ट छान..मी आज जरा सवडीने वाचतेय…
मला नुसता शनिवारी लवकर उठणारा नवरा असला तरी चालेल…बघ ना आज शनिवार सकाळचे साडे सहा वाजलेत आणि भूतासारखी एकटी उठलेय..नशीब सध्या हे ब्लॉग्ज वाचायचंही काम असतं 🙂
बाकी महेन्द्रकाकांची प्रतिक्रिया छान आहे…त्यांना आता प्रत्येक विषयावर पोस्ट लिहायचं घाऊक काम दिलं पाहिजे..म्हणजे नुसता विषय सांगितला तरी दोन दिवसांत ते दोन पानं देतील आणि तीपण दर्जेदार….
असो…भरकटतेय…पुरुषदिनाच्या शुभेच्छा….
नोव्हेंबर 21, 2009 @ 16:01:01
अपर्णा,
तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. महेंद्रंच काय बाबा बोलायचं! दिव्याने सूर्य दाखवल्यासारखे आहे. त्यांची प्रतिक्रिया उशिरा आली तरी आनंदच होतो. सवय त्यांनीच लावली आपल्याला हो न? पुढच्या ‘स्टार माझा’ चे स्टार आहेत. भारतात
गेलो की, बहुतेक सगळ्यांना त्यांचे घर नक्की( त्यांना न विचारताच मी हे मंजूर केल आहे). तोपर्यंत असेच भेटत राहू या.भानस, तन्वी पण माझ्या ह्या प्रस्तावा वर अनुमोदन करतील.
नोव्हेंबर 21, 2009 @ 20:12:10
हो माझं तर अनुमोदन आहेच….आणि जर कधी आपण सर्व मायदेशात एकत्र असण्याचा योग आला तर मात्र नक्कीच भेटलं पाहिजे…:)
नोव्हेंबर 22, 2009 @ 12:50:11
मला काका म्हंटलेलं पण आवडतं. परवाच खरोखरचा आजोबा झालो. चुलत भावाचा फोन आला की त्याच्या मुलिला मुलगी झाली म्हणुन.. एकदम विचित्र फिलिंग आलं होतं. पण छान वाटलं नंतर..
स्टार माझा .. छे.. पुन्हा नाही पार्टिसिपेट करणार.. त्यांनी कसं इव्हॅल्युएशन केलं ते त्यांनाच माहिती.. आय एम नॉट द पार्टी टु इट.. इन फ्युचर….
नोव्हेंबर 22, 2009 @ 14:31:06
महेंद्रजी,
तुम्ही लिहा आंम्ही प्रेमाने वाचतो. काका काय किंवा आजोबा काय संतुलित व्यक्तिमत्वाला काहीच फरक पडत नाही.आपणाला एक पुरुष व्यक्ती म्हणून रिस्पेक्ट दिला गेला हे पुरुष दिनी महत्वाचे.
मार्च 08, 2011 @ 12:26:09
हा दिवस म्हणजे आम्हालाही एक नवीन शोध आहे.
🙂
सही लिहले आहे… मस्त !!
मार्च 08, 2011 @ 14:46:13
धन्यवाद, धन्यवाद!!! असतो बर का पुरुष दिन!! चला आजच्या दिवशी तुम्ही पण खुश!!!