भित्या पाठी……………….. ब्रह्मराक्षस

पाठ, पोट, अंग, पाय, अजून काय काय डोळे भरून पाहतात. गर्भार रूप वेगळे शोधता सहज येते म्हणे. तिथे पण रंगाला महत्व पण आहे.गोरा रंग चालत नाही, चक्क काळ्या रंगाची स्तुती करतात (भारताच्या इतिहासाची कल्पना असावी). तो काय किंवा ती काय पूर्ण परिवारावर मनापासून प्रेम करणारे असंख्य आहेत. थंडीत, पावसाळ्याच्या सुरवातीला ह्या जमाती कडे आदराने पहिले जाते.

चिखलातले कमळ जितके लोभस असते तसेच ह्यांच्या कडे पाहतात. पाय तर इतके आकर्षक, व मजबूत रीतीने आपल्याकडे आनंदाने धावत येतात. त्यांचे स्वागत पण जंगी केले जाते. माझा ही मुलगा फार लहानपणी ह्यांच्या प्रेमात पडला. घरी आणूया म्हणून बाल हट्ट करू लागला. शेजारणी कडे प्रेमाखातर, तिच्या दारात उभा राहू लागला. देवदास होण्याआधी मीच घट्ट मन करून आपल्याही घरी येतील असा विश्वास मुलाला दिला. कडा उतरून जाणारी हिरकणी मला आठवली.

हा पाहुणा बोलवण्यासाठी खास काही स्त्रिया पुढाकार घेवून त्यांना आपल्या घरी पोहचवतात. त्यांना घरच्या व्यक्ती एव्हढे आदराचे स्थान असते. बाळकृष्ण कसा नंदाच्या टोपलीत आरामात पहुडला होता. तसेच हे टोपलीतून घरी येतात. मावशीबाई म्हणतात. ह्या मावश्या, लगबगीने भरदुपारी खणखणीत आवाजात आरोळी देतात. माशांचा कोयता अजूनही चोरांच्या जातीला धाक देतो. रेल्वे मध्ये ह्या, “म्हावर हाय बाजूला व्हा’’ असे बिनदिक्कत ठाण्कावतात.

अश्याच एका मावशीला शनिवारी संध्याकाळी, माझा लेक घेऊन आला. त्याला दिलेल्या वचनामुळे मी पण कटिबद्ध होते. मावशी, ”जरा हात लाव टोपलीला” म्हणून हुकुम देती झाली. मी मासा प्रजातीशी ओळख नुकतीच करून घेतली होती. वरण भात परब्रह्म असणारी मी, नवखीच होते. टोपलीत एका कपड्याखाली हे खेकडे महाशय झाकून ठेवले होते. सगळे हलत डुलत होते.त्यातला एकही बाहेर पडू शकत नव्हता. बाहेर पडला तर, पाय नेतील त्या दिशेला सैरावैरा अक्षरशः पळतो. जुजबी माहिती मला होती. कोळीण पण निवांत होती. मला एक खेकडा हवा होता.मी तर बादच होते, हे परदेशी नोकरीला होते. कोळीणीच्या लक्षात हे नवखे पण आले असावे. माझ्या चौकश्या सुरु केल्या. घरात म्हातारी कोण? माझी आई.शेवटी, असे ठरले की,तिने रविवारी दुपारी येवून मला चिम्बोरीची पाकनिष्पत्ती दाखवायची. चहा पिवून कोळीण मावशी गेल्या. वाटपाचे सामान तयार करून ठेव, असा प्रेमळ आदेश पण दिला. अर्धा तास मैत्रीचा झाला.

रात्री बेड वर पाठ टेकणार, एव्हढ्यात चिरंजीव बोलते झाले. आई कॉट च्या जवळ आता खेकड्या सारखे हलले. बोलून महाशय दोन मिनिटात झोपून गेले. १० वाजले होते. शेजारी आई होती.ताडकन उठली, बघ बघ गेला का कॉट खालती. अग, मी नाही घेतला, मावशी उद्या देईल. आई,म्हणते खेकडे ते काय भरवसा? तू चहा करत असताना टोपलीतून सटकला असेल. माझे ही अंग शहारले. हो की ग. मी टोर्च घेतली व कॉट खाली उजेड पाडला. जमीन व कॉट ह्याच्यात एक वीतभर अंतर होते. पेटी कॉट होती. आणि मला काहीतरी हलताना उजेडात दिसले. असेल जळमट म्हणून समाधान करून घेणार तोच, तिथला आकार हलायला लागला. आई, पण डोकावून पाहत होती. किंचाळत कॉट वर गेली व माझ्या लेकाला कडेवर उचलून हॉल मध्ये, सुरक्षित ठिकाणी गेली. लहानपणी शाखा केल्याचा परिणाम होता.

अर्धा तास मी जमिनीवर पडून, न्याहाळत होती. माझी खात्री झाली, की हा सटकून घरात घुसला. काय करावे सुचेना. असाच राहू दे का? नको. कॉट वर झोप येईल? आई बाहेरून, शाकाहारी खावे, तिला भजीला पण खेकडा म्हटलेले चालत नाही. पंढरपूर मध्ये मंदिरा समोर माझे आजोळ आहे. त्यामुळे साहजिकच त्रागा होणे स्वाभाविक, पण नातवंड आग्रह पुढे सर्व माफ होते. झाडू आणला म्हटले, हुस्कावावे बाहेर आला की, झाडूने दाराबाहेर ढकलावे. जस, जसा झाडू फिरवत होते. तसा तो, अजूनच आत जावून बसला. मला मात्र जमिनीला नाक टेकवून कंटाळा आला. बेडरूम दार लावून टाकावे, सकाळी पाहू. तितक्यात पहिले की दाराला पण फट आहे. खिंड लढवावी लागणार अशीच चिन्ह होती.

कॉट सरकावी म्हणजे त्याला ढकलता येईल. पण माझे काम इतके बलवत्तर की कॉट, जुन्या गाद्या सहित पूर्ण खण भरलेली होती. हरकत नाही. आलिया भोगासी दुसरे काय? भावाला बोलवावे कारण रात्रीचे १२ वाजले होते, अशा वेळी भाऊराया पण उपलब्ध नव्हता. एकेक सामान काढून शेजारच्या रूम मध्ये ठेवू लागले. खालती लक्ष ठेव तुझा पाय तो पकडेल हा सल्ला आई सतत देत होती. दीड तास गेला. पलीकडे डोंगर रचला गेला. कॉट सरकवली, त्याचा पत्ता कुठे? पुन्हा वाकले तर कॉट च्या खाली सपोर्ट असलेल्या कोनाड्यात बहुतेक चढला असावा.पुन्हा कॉट जागेवर ठेवली. माझे षड्यंत्र रचणे सुरु झाले. आईला दया आली म्हणाली, ही जात पाण्यात असते. सुकून मरेल. तू कॉट खाली पाणी ओत. रात्रीचे २ वाजले. आता पाणी? म्हणायच्या आत तिने भरकन दयाळू भावनेने बादलीभर पाणी ओतले सुद्धा

पाणी ढकलत होते. हा पठ्या काही बाहेर यायला तयार नव्हता. खोली स्वच्छ धुतली गेली. पहाटेचे चार झाले. चहा घ्यावसा वाटू लागला. आईने ही जवाबदारी घेवून मला खोलीत त्याच्या वर लक्ष ठेव असे बजावले. हॉल मध्ये चिरंजीव गुडूप सोफ्यावर झोपला होता. जाम वैतागले. ह्या कोळण्या का बरे असे बिनधास्त ठेवतात? सकाळी दुधवाला आला, घाईत होता तरी म्हटले, बघ बाबा. कॉट खाली डोकावून म्हणाला, दिसत नाही काही. पण असेल असे वाटते. तुम्ही लोक खाता म्हणून मच्छी महाग झाली. काय बोलणार? अरे बाबा, तमाम ख्व्यायांची जात एकच असते, भेदभाव पहाटे कशाला? चहा दिला. तो ही गेला. शेजारीण तमिळ सकाळी चालायला बाहेर पडली, खिडकीतून डोकावून विचारते, कल रातमे बहुत आवाज आ राहता, आप भी फोरेन शिफ्ट हो रही होक्या? काय सांगणार महाभारत. कुछ नही,ऐसेही काम कर राही थी. थोडक्यात आटोपले. रात्रीदहाला सुरु झालेला शोध, सकाळी सहा वाजेपर्यंत संपला नव्हता. सोसायटीतले दुकान उघडले, त्याच्या पोऱ्याला बोलावले. कॉट उपर ढकलो असे ऐक्शन सहित समजावले. कॉट वर उचलली पहिले.जळमट पाण्याने भिजून चिटकून बसले होते. पोऱ्याला चहा व पैसे दिले.

सामान पुन्हा भरण्यात नऊ झाले. ह्यांचा फोन आला, आवाजा वरून म्हणाले बर नाहीये का? पंधरा मिनिटे फोन बिल झाले. चिरंजीवाना उठवले. तो बाबांशी त्यापुढे बोलला. आई तुला तिची गमंत झाली ते सांगणार आहे. अर्धा तास मी खेकडा पुराण सांगत होते. तर म्हणतो कसा मला ते इतके आवडतात. आता पण जमिनीवर दिसतात. कपाळाला हात लावून घेतला. सकाळी दहा वाजता कॉट वर पाठ टेकली. कोळीण आली तिला सांगण्यात वेळ गेला. आई तर दिवसभर फोन वर ज्याला त्याला हेच सांगत होती. आता त्यांना सराईतपणे पकडून रस्सा, तर्री करते. मुलगा त्यांच्या पायाची नामो निशाणीही शिल्लक ताटात ठेवत नाही. सगळे फस्त होते. अजूनही त्यांचा हिसका विसरले नाही. म्हणतात न भित्या पाठी………

Advertisements

20 प्रतिक्रिया (+add yours?)

 1. ajay
  Nov 19, 2009 @ 15:22:34

  आई ग…तोंडाला पाणी सुटलं, फोटो पाहुन तर माझी जीभ चांगलीच खवळली आहे. खेकडा घरात घुसल्याची गंमत बाकी भारी.

  -अजय

  प्रत्युत्तर

 2. महेंद्र
  Nov 19, 2009 @ 18:19:05

  मला तर ऍलर्जी आहे ’शेल’ असलेल्या प्राण्याची.. नाहीतर करी करुन खाऊन टाकली असती..

  प्रत्युत्तर

  • anukshre
   Nov 20, 2009 @ 00:04:54

   महेंद्रजी,
   अरेरे! काही वैद्यकीय गोळ्या नाहीत. त्रास खूपच असेल तर विचार न केलेला बरा. मला पण मी तुमच्या इंदोर ची एलर्जी
   आहे, असे समजून पोस्ट वर पोट भरायची सवय लावून घेतली. कधी आम्ही येणार? जाऊ दे तुम्ही असा आनंद देता
   हेच पोटभर आहे.

   प्रत्युत्तर

 3. bhaanasa
  Nov 19, 2009 @ 20:03:21

  हा..हा…मी बाबा एकदम भित्री भागुबाई याबाबतीत…..मी पण त्याला बाहेर काढल्याशिवाय झोपलेच नसते.शिवाय मी पक्की शाकाहारी….आणि अजयच्या तोंडाला पाणी सुटलेयं…..हेहे. खेकडा पुराण भारी बरं का.

  प्रत्युत्तर

  • anukshre
   Nov 19, 2009 @ 23:44:28

   भानस,
   माझाही तुझ्याबरोबर नंबर आहेच. शाळेत असताना मला गांडूळ ह्या जीवाची इतकी शीशारी यायची की शेवटी त्याचे
   रुपांतर भीतीत झाले. असतात एकेक शत्रू….घरात पण त्रास देतात.
   अजय ला इकडे, तिकडे पाहत होते, पण महाशय खेकडा पाहून अवतरले. खाऊन झाले का? अजून रिपोर्ट नाही आला.तुडुंब खाऊ दे, भरपेट निद्रिस्त होऊ दे
   अजिंक्य ला फक्त आजची पोस्ट भन्नाट आवडली, आता करा असा हुकुम आहे.

   प्रत्युत्तर

 4. Kanchan Karai
  Nov 19, 2009 @ 21:40:11

  हा, हा, हा. फार करमणूक झाली. मी लहान असताना आम्ही सहा महीने काल्हेर गावी राहिलो होतो, तेव्हा आम्ही झोपेत असताना, असाच एक पाहुणा घरात शिरला होता. पण तेव्हा मी खूप लहान होते त्यामुळे फारसं काही आठवत नाही. डिश सॉलीड दिसतेय. मी कधी खेकडा खाल्ला नाही पण काळा खेकडा चविष्ट असतो असं ऐकलं आहे. रंगीत खेकडेसुद्धा असतात ना?

  प्रत्युत्तर

  • anukshre
   Nov 19, 2009 @ 23:32:19

   कांचन,
   काल्हेर चे आठवले की कळव, धम्माल येईल पुन्हा एकदा. माझ्या धाकट्या बहिणीने, आईला असेच लहानपणी, एक अंकल संध्याकाळी आपल्या घरात आले. मग माहिती नाही ते बाहेर गेले का? बाबा होते, तरी पण आईने आख्खे घर
   म्हणजे (टू बेडरूम) अक्षरशः उलथे पालथे केले. आईचा आज वाढदिवस, वाचून तिला आठवेल व छानशी हसेल.अशी भेट,
   दिली.

   प्रत्युत्तर

  • anukshre
   Nov 19, 2009 @ 23:52:31

   कांचन,
   इथे निळ्या पाठीचे मिळतात. इतर रंगाबाबत मी पण अनभिज्ञ आहे. कोणा खवय्यांची प्रतिक्रिया आली तर कळेल.
   नाहीतर नेट पुढे ताट ठेवायचे.

   प्रत्युत्तर

 5. Ashwini
  Nov 20, 2009 @ 07:15:51

  hmmm lekh chan aani ratra bhar chalela khekda shodh pan sahi aahe ….. 🙂 mazi majal fakt “egg” etkich aahe … tuza aai sarakhich mazi aai aahe tila sadhe omlet cha pan vas sahan hot nahi purna shakahari hhahaha chalo bye

  प्रत्युत्तर

 6. Ashwini
  Nov 20, 2009 @ 09:46:29

  khup chan vatale maza comment chi vat baghites te….. kasa aste na tu lekh lihites aani mi lekha chi vat baghate mag tu comment chi mag mi tu maza comment var dilelya pratikriye chi hahahhaah

  प्रत्युत्तर

 7. Kanchan Karai
  Nov 20, 2009 @ 15:09:10

  अगं मी दीड वर्षाची होते तेव्हा, जेव्हा ही घटना घडली. एकदा आईला म्हटलं मला असं स्वप्न पडलं की घरात खेकडा आलाय, तेव्हा आईने खुलासा केला की असं खरंच घडलं होतं. रंगीत खेकडे म्हणजे पांढरट पाठीवर लालसर नक्षी असलेले खेकडे पाहिलेत मी. आमच्या इथे एक कॅथलिक कुटुंब आहे, त्यांच्याकडे पाठीवर क्रॉस असलेल्या खेकड्याचं ते कवच आहे भिंतीवर टांगलेलं. निळ्या खेकड्याचं चित्र मिळालं तर टाक ना इथे!

  प्रत्युत्तर

  • anukshre
   Nov 20, 2009 @ 15:57:55

   मॉल ला गेले कि नक्कीच फोटो घेते. खेकडा कुठल्याही रंगाचा असला तरी रस्सा मात्र लाल रंगाचा होतो. हे पण ज्ञान मला अजब वाटले.आईला दे वाचायला, पुन्हा एकदा मजा येईल.

   प्रत्युत्तर

 8. gouri
  Nov 20, 2009 @ 17:42:35

  Hmm … sahich aahe khekadyaacha kissaa … 🙂

  mi lahaan asataanaa khekade naahi, pan baki barech prani raahaayache aamachya ghari – saap, naag, mungoos, kharutaai, lokanni nadivar anoon sodaleli kutryaachi pille, maanjarachi pille…

  प्रत्युत्तर

  • anukshre
   Nov 20, 2009 @ 19:51:14

   गौरी,
   फुलांमध्ये आणि प्राण्यांमध्ये तू राहतेस. निसर्ग इतका जवळून पाहायला मिळतो. भाग्यवान आहेस, धीट ही असशीलच. खेकडा पण अनुभवलास, तुझे पण प्राणी प्रेम वाचायला नक्कीच आवडेल.

   प्रत्युत्तर

 9. sahajach
  Nov 21, 2009 @ 08:14:13

  सगळ्यात शेवटी माझा नंबर…..मस्त मजा आली वाचताना…..आमच्या लहानपणी ईगतपुरीला अनेक खेकडे पाहिलेत, नंतर रोह्यालाही तसेच. आपल्याकडेही कॉर्निशला उभे राहिले की दिसतातच ते!!! पण अनुभव भारी आहे तुझा!!!
  बाकी आम्ही पक्के शाकाहारी…अगदी egg ही नाही त्यामुळे बाकी काय कमेंट करू!!!!

  प्रत्युत्तर

  • anukshre
   Nov 21, 2009 @ 10:37:09

   वाट पाहून तुला फोन करणार होते. माझी पदार्थ करण्यात, व मांसाहारी वर बोलण्या पुरतीच मर्यादा आहे.मस्त
   मेतकुट भात करते त्या दिवशी पण लेकराला आवड आहे व दुसऱ्या दारात जाऊन उभे राहण्या पेक्षा आपण करावे.
   आवड झाली किंवा असेल तर ते ही अन्नच आहे. माझी खेकडा पकडा ही धडपड आवडली ना……..

   प्रत्युत्तर

 10. Aparna
  Nov 21, 2009 @ 15:26:37

  अनुजाताई छान लिहिलंस…मजा आली वाचताना आणि चिंबोर्यांची (आम्ही खेकडे बिकडे नाही म्हणत बा) आठवण…माझा भाचा लहानपणी “चिंबोली चिंबोली” करून जेवायचा म्हणजे एकीला तशीच स्वतःच्या नजरेखाली घरात फ़िरत ठेवायचेही बाबा…मजा यायची भाच्याला पाहायला..
  इथे चायना मार्केटमध्ये मिळतात पण मुख्य कुठले घ्यायचे ते माहित नाही आणि करायची अक्कल नाही हे काळी वेगळं सांगुक नका…असो तर मग आई-बाबा इथे आले तेव्हा त्यांनाच बाजारात जाऊन आणले आणि मग स्वयंपाकघरात फ़क्त जावई आणि आई दोघांनी मिळुन साफ़ केले आणि आईच्या हातचा तो रस्सा मस्त ओरपला..त्या दोघांचं मी चित्रीकरण पण करुन ठेवलयं एकदा पोस्टलं पाहिजे या विषयावर…

  प्रत्युत्तर

  • anukshre
   Nov 21, 2009 @ 15:47:55

   पोस्टल कर मलाही काही नवीन पद्धत कळेल करायची. आम्ही पण चीम्बोरीच म्हणतो.खाणारा ओरोपतो तेंव्हा
   मलाही बघून समाधान मिळते. माझा संबंध फक्त करण्यापुरता…… महेंद्र, भानस, रोहन लिहितात, मी सारखे कित्ती वेळा त्या ब्लॉग वर जाऊन नुसतेच हादडायचे, माझ्या घरीही आदरातिथ्य केले पाहिजे न. महेंद्र ,न चालत नाही हरकत
   नाही इडली पण करून ठेवली आहे.अजय तर खाऊन आलाच असेल.

   प्रत्युत्तर

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: