‘म’……मुंबईचा……..‘म’.. मराठीचा……

माय मराठी…………..मोठी मराठी.

काही खरेदी करण्यासाठी मी ‘ कॅरे फोर’ ह्या मॉल मध्ये गेले होते. मी व हे वस्तू घेण्यासाठी मराठीतून चर्चा करत होतो.तिथल्या सेल्स मन शी इंग्लिश मध्ये शंका विचारात होतो. अचानक तो मराठीत बोलला,” हे घ्या चांगले आहे”. माणूस ‘मल्याळी’ शुद्ध मराठी बोलतो. मी काही बोलायच्या आत तो म्हणाला, मुंबईत नोकरी करण्यासाठी माझे आजोबा आले होते.आमची तिसरी पिढी. चांगले आहे, मराठी सक्तीचे करतात त्यानिमित्ताने मराठी बोलणे सुधारते. मी काही मल्याळी बोलू शकत नाही. त्यामुळे ह्या संस्कृतीशी परिचय होऊ शकला नाही.

तामिळनाडू, मध्ये हिंदी पण बोलत नाहीत. पण ती माणसे मुंबईत आली कि मराठी शिकून घेतात, हिंदी चा सराव पण त्यांना होतो. मुंबईत कारखाने उभारून नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या,त्या कारखान्यातून मालक, व इतर कर्मचारी संपूर्ण देशातून आले. इथे अनेक तमिळ असे आहेत की आवर्जून मराठी बोलतात. हिंदी पण बोलतात.

भाषा च्या ह्या घनघोर युद्धात मी मात्र दुसरी कुठलीही भारतीय भाषा बोलू शकत नाही. आज मुंबईत पावलोपावली गुजराथी माणूस आहे. वाणी आहे. तो गुजराथ सोडून इकडे आला, त्याने मराठी बोललेच पाहिजे, तसा तो शिकला. सर्वांशी छान मराठीत बोलतो. माझा मराठी चा अभिमान सुखावतो. काही कामा निमित्त अहमदाबाद ला गेले. तेंव्हा जाणवले, मला गुजराथी समजते, पण घडाघडा बोलता कुठे येते.

राष्ट्र भाषा पण अस्खलित कुठे येते. मी माझ्या तोडक्या मोडक्या हिंदीत संवाद साधताना चुकून, ‘’अरे ये कितनीकू मिलता है. आपुनको नको’’. आता सांगा, धड हिंदी नाही, दुसरी भारतीय भाषा सराईत पणे बोलता येत नाही.आमच्या मराठी शाळा मुलांनी भराव्या म्हणून ‘खिचडी’ देवू ला गलो. ‘इंग्लिश’ मराठी माणसाला शिकावे लागते कारण जगाच्या व्यवहाराची ती भाषा आहे. त्याकरता शाळेत अभिनव उपक्रम राबवतो.

मराठीचे मात्र शुद्धलेखन सुद्धा पुढच्या आयुष्या करता कठीण होते. मराठी लिपी संगणकावर शोधतो. जे काही ज्ञान आमचे आहे, ते पाजळतो पण शुद्धलेखनाची साईट काही मिळत नाही. माझे काम मी चोख बजावतो, माझ्या ज्ञान, विश्वासावर मी दुसऱ्यांना हुशार करतो. मग सहज मिळेल अशी साईट तयार करा. आम्हालाही अभिमानच आहे. मराठी चा. प्रश्न शोधतो, चुका दाखवतो पण पर्याय तयार करत नाही. मी कशाला कोणीतरी करेल.

असा माझा भाषेचा घोळ आहे. मुंबईत ज्या प्रमाणात लोकसंख्या इतर राज्यातून येऊन स्थिरावली. तेव्हढी मराठी भाषा मोठी मोठी होत गेली. मुंबईत मी मराठीच बोलणार कारण भय्या असो, मल्याळी असो, नाहीतर बंगला देशी असू दे. त्यांनीच मराठी बोलले पाहिजे नसेल बोलायचे तर जा, आपल्या राज्यात परत. उगाच गर्दी करतात. मी असे बोलायचा अवकाश इथे पण ‘हे’ इतर आमच्याशी मराठी बोलतात. आपापसात त्यांच्या भाषेत बोलतात. हरकत नाही, माझ्याशी तरी मराठी बोलतात. केव्हढा दबदबा मराठीचा.

सात समुद्र पलीकडे पण मी मराठी…….अशी गर्जना करावी लागत नाही. पण माझ्या भाषा विकासाचे काय हा प्रश्नच राहतो. मल्याळी मराठीतून ओणम समजावून सांगतो. मी म्हंटले मला पण मल्याळी शिकायचे आहे. तर उत्तर येते, आम्हाला मराठी येते. आमचे मराठी चांगले होईल.

मी मग भारतीय भाषा शिकू का नको? कारण सगळे मराठी बोलू लागल्यावर मराठी च्या कक्षा विस्तृत होणार, मराठी मोठी भाषा होऊ लागली आहे. मस्कत मध्ये पण खूप ठिकाणी आम्ही मराठी बोलतो. आहे की नाही मराठी ची मज्जा. मराठी माणसे पण आवर्जून मराठी तून कशी आहेस? मी बरी. असे बोलून, इट इज सो हॉट टुडे. हे दुसरे वाक्य असते. मराठीतून मी ‘इंडियाला’ चालले असे सांगते, मल्याळी त्याच्या गावाचे नाव घेऊन सांगतो. मी माझे काम परदेशी करते आहे असे म्हंटल्यावर सहजीच ‘इंडिया’ असे येणार. मग हा मात्र मुंबई ला निघालात का? असे बोलतो. कारण त्याला त्याचे काम झाले की गाव आठवते. मी मुंबई मोठी झाली म्हणून खुश होते.

शाळेत फ्रेंच घेतो, संस्कृत च्या जवळची भाषा शिवाय परदेशी पण, भरपूर गुण देते. दहावी नंतर कशाला हवी? ‘गरज सरो……. असे आहे. पंजाबी, मल्याळी, तमिळ हा पर्याय नाहीच. आपापल्या राज्य भाषा शिका. दुसरी राज्य असे काही करीत नाहीत तर मराठी राज्यात का? प्रश्न बरोबर. पण अनेक भारतीय भाषा शिकले तर बिघडेल का? शिका तुम्ही कुठे ही, भारतात इतर भारतीय भाषा शिकवल्या जातात पण प्रमाण फारच कमी आहे. माझी तर शाळा संपली, जाऊ दे मला काय करायचे.

एक न धड…….असा माझा भाषा विकास खुंटला. मुंबई ला वित्त, व्यवसाय, उद्योग,ह्या करिता महानगर म्हणून जगात मानाचे स्थान आहे. अनेक अमराठी लोक इथे येऊन स्थिरावले, इथली संस्कृती शिकले. मराठी भाषा शिकून पिढ्यान पिढ्या राहतात. मराठी माणूस इतर भाषा शिकण्यास कमी पडतो का? इतर राज्यांमधून मुंबईच्या तुलनेत कमी मराठी लोक आहेत. की इतर राज्यांशी कमी संपर्क व्यवसाया निमित्त आहे.अंतर्मुख होवून विचार करते, मला गरज किती आहे? फारच कमी. जो येतो तो मराठी शिकतो.छान आहे मराठी विस्तृत होतीय. पण एक दिवस ह्यांच्या कडून मराठी शिकायला लागेल असे वाटते. जर कोणाला इतर भारतीय भाषा येत असल्या तर विकासाची प्रथम पायरी समजली जाते.राष्ट्र विकास होण्यासाठी भाषा संगम ला अनन्य साधारण महत्व आहे. नवीन भाषा म्हणजे एका संस्कृतीची ओळख, मैत्रीचे संबध विकसित होण्यासाठी हृदयाची भाषा शिकणे म्हणजेच अजून एका मातेची भाषा होय.

आता मी मस्कत ला अरेबिक सगळीकडे. माझ्या ओमानी शेजारणीला मी बटाटा, तवा, आंबा हे मराठीतून आम्ही असेच म्हणतो, कारण ही नावे इथे पण अशीच आहेत. हे हिंदीतून सांगते, तिला भारत माहिती आहे. तिला मुंबईत पाऊस एन्जोय करायला जायचे आहे. मला मराठी शिकव म्हणून मागे लागली आहे. शोप्स मराठीतून वाचायला यायला हवेत इतकी माहिती तिला आहे. इथे पण अरेबिक मध्ये आहेत म्हणून दुबई पेक्षा ग्रोथ कमी आहे. जाऊ दे मला काय? मला ओमानीना मराठी शिकवायला हवे.

‘म’………… माझ्या मराठी चा हे पक्के पाठ झाले आहे.

13 प्रतिक्रिया (+add yours?)

 1. Ashwini
  नोव्हेंबर 18, 2009 @ 06:37:30

  hahaha good one raj thakare la de he vachay la 🙂 pan lekh mast aahe marathi shudhlekh na sathi kahi tari karay la hawe he nakki

  उत्तर

 2. anukshre
  नोव्हेंबर 18, 2009 @ 07:59:18

  masat mast punha pahila no lavlas.hahaha ne survat zali ki saglech aanadi, hasre
  vatate.thodese hasun bhetuya,ashich hasat yet raha v saglyana khush karat ja.
  bye……t.c.

  उत्तर

 3. HEENA
  नोव्हेंबर 18, 2009 @ 09:59:13

  विषय अतिशय छान निवडल्यास ! आपण एका समृद्ध देशात जन्मलो ह्याचा आपणास अभिमान असला पाहिजे. दुसऱ्या प्रांताची एक तरी भाषा आपणास बोलता यावी कळावी ह्यात काहीच गैर नाही. मराठी माणसाची सर्वाना सामावून घेण्याची भावना असते म्हणूनच मुंबईत आठडा पघाड भाषेची लोक गुण्यागोदिन्दाने राहताना दिसतात.पण काय इतरही भाषेची लोक तुम्हाला त्यांचात सामावून घेण्याचा मोठेपणा दाखवितात का? तुझाच म्हण्या प्रमाणे ती लोक तुला सांगतात कि आम्हाला मराठी येते तर काय गरज आहें तुम्हाला मलयालम शिकण्याची? ते मराठी शिकून मुंबईत हातपाय पसरणार, मग एक मिनी केरळ तयार करणार त्याच्या भाईबंधू न बोलावणार नोकऱ्या, व्यवसाय करणार. मराठी माणूस मुर्खासारखा त्याच्या प्रगतीकडे पाहत राहणार. अशाच प्रकारचे मिनी गुजरात, मिनी पंजाब, मिनी बिहार तयार होत आहेत, हि लोक नुसत्या जागा ,नोकऱ्या बळकावत नाहीत तर भाषेवर व संस्कृतीवर हि अतिक्रमण करत आहेत. त्याचेच एक उदहारण म्हणजे छाठ्पुजेच्या नावा खाली दाखविलाले शक्ती प्रदर्शन! मुंबईच्या लोकल मध्ये लेडीज डब्यात बिगर-मराठी लोकां कडून बऱ्याचदा ऐकलेला टोमणा “मुंबई तुमची आणि भांडी घसा आमची”. पाहुणचाराला सदा तयार असणारी माझी मराठी माय स्वतःच्या घरात किती हाल अपेष्टा सोसते आहे. माझ्या आईला आधी सन्मानाने वागवा मगच दुसऱ्याच्या आईचा सन्मान आम्ही करू. सुरेश भट ह्याची एक कवितेची ओळ आठवते – पाहुणे जरी असंख्य सोसते मराठी, अपुल्या घरीच हाल सोसते मराठी ,हे असे कितीक खेळ पाहते मराठी !!!!!!!

  उत्तर

  • anukshre
   नोव्हेंबर 18, 2009 @ 10:59:40

   खरय हीना,मराठी शिकतात कारण त्यांचे पोट मुंबई वर अवलंबून आहे.मुंबईत व्यवसाय हे एक केंद्र स्थान आहे.
   जिथे आपण जातो तिथे हातपाय पसरतो…… मी मात्र दारातल्या वाण्या बरोबर मराठी बोलते, घडाघड गुजराथी
   बोलू शकत नाही कारण माझे पोट मुंबईतच होते. मस्कत मध्ये अरेबिक शिकायला लागते नाहीतर साधा प्रवास
   करणे अवघड होते.एकाच भाषा अरेबिक दुबईत व मस्कत मध्ये पण दुबई ने स्वताचा चेहरा मोहरा हरवला पण विकास
   करून घेतला, मस्कत फक्त अरेबिक जपत राहिले, भाषेला मानाचे स्थान मिळाले, पण पूर्ण विकसित होऊ शकले नाही.
   धरल तर चावते……. अस आहे.

   उत्तर

 4. Dhananjay
  नोव्हेंबर 18, 2009 @ 12:21:50

  म ..मराठीचा.. मुंबईचा…अहो मराठी मान्सानो जागे व्हा. किती दिवस तेच तेच उगाळत बसणार आहात? अहो जग कुठल्या कुठे चालले आहे आणि तुम्ही तिथेच बसणार? जगा बरोबर चालायला शिका. अहो तुम्हीच निवडून दिलेल्या नेत्यांनी मुंबई ही आर्थिक राजधानी आणि ओउद्योगिक केंद्र बनविले ना? आणि त्यावेळी ते उभे करण्याकरिता जी talant आणि capacity पाहिजे तेव्हढी आपल्या मराठी लोकांमध्य नव्हती म्हणून बाकी राज्यातले सुद्धा लोक आले नोकरी आणि धंद्या निमित्त इथेच settal झाले. सर्व लोकांच्या हातभार मुळे (त्यात मराठी माणसे पण आहेत) मुंबईचे नाव जगामध्ये झळकू लागले. आणि आता तुम्हा त्यांना का जायला सांगता? ते का जातील? कुठल्याही भारतीय माणसाचा अधिकार आहे की तो कोठेही जाऊ शकतो. ते लोक इथे आले आणि तुमच्याशी बोलायला मराठी पण शिकले. आता इथे एक गोष्ट लक्ष्यात घ्या. आम्ही मराठी लोक का हे करू शकत नाही? आपण असे दुसऱ्या राज्यात का नाही जात आणि धंदे उभे करत? का नाही त्यांची भाषा शिकत? आपल्याला मराठी, हिंदी आणि इंग्लिश सोडून किती भाषा येतात? शिकण्याचा प्रयत्न केलात? आहो नाही जमत ते आपल्याला. कारण आपण आपला स्वभाव, इगो बाजूला ठेवत नाही आणि पुढे जात नाही, शिकत नाही. आपण आपले प्रोब्लेम्स कवटाळून बसतो.
  तेंव्हा मराठी लोकहो जागे व्हा.. आपले आयष्य आपल्या हातात घ्या. सर्व इगो, स्वभाव बाजूला ठेवून शिका, उद्योग धंदे उभे करा. आपण आपल्या नशिबाला दोष देत बसू नका. आपण हे करू शकत नाही? अहो आपण खूप चांगले करू शकू. करून तर बघा…

  उत्तर

 5. Aparna
  नोव्हेंबर 19, 2009 @ 04:59:58

  एक गंमत सांगु का मी नेहमी मुंबईत असतानाही अशा दुसर्या भाषा शिकण्याचा प्रयत्न केला आहे आणि अगदी अस्खलित नाही पण तोडकं-मोडकं गुज्जु आणि मारवाडी येतं (कॉलेज आणि शेजारी यांच्या सहकार्याने) पण तुमचं म्हणणं खरंय…किती मराठी लोक ते करतात ठाऊक नाही…मला मराठीचा अभिमान आहे पण त्याचवेळी भाषेच्या बाबतीत जे इतर लोकांना जमतं ते आपणही का करु नये असं वाटणं चुकीचे नाही…
  आता इथेही एखादी परकीय भाषा शिकायचं डोक्यात आहे पण सध्या सवड झाली नाही…

  उत्तर

  • anukshre
   नोव्हेंबर 19, 2009 @ 09:11:25

   अपर्णा,
   खुप छान प्रतिक्रया दिलीस. माझा हेतूच हा होता की, भाषा शिकणे ह्यात मराठी माणूस कमी का पडतो. मी खूप मराठी लोकांना विचारले, असेच तुझ्या,माझ्या सारखे तोडके मोडके येते. मराठी चा अभिमान आहेच. पण एक भाषा आत्मसात करणे म्हणजे, आपण अजून प्रगल्भ होणे होय. अतिशय परिपक्व, व समंजस अभिप्राय आहे. मनापासून आवडला.

   उत्तर

 6. bhaanasa
  नोव्हेंबर 19, 2009 @ 19:59:46

  अपर्णाशी सहमत. मराठी भाषेचा अभिमान आहेच व कायम असेलच परंतु इतर भाषाही शिकायला हव्यात.त्यांचा उपयोग होतोच होतो.मराठी, हिंदी, गुजराती या आजकाल माझ्याच भाषा असल्यासारख्या. परंतु कोंकणी, थोडेफार पंजाबी…आणि अगदीच तोडके मोडके स्पॆनिश( पण प्रयत्न करीत राहायचे-निदान समजते तरी बोललेले ):).प्रगति ही उगाचच इगो-बाऊ करून थांबवू नये.मुळात आपल्याला मराठी तरी नीट येते का हेही तू म्हणतेस तसे तपासायला हवे:)

  उत्तर

 7. Kanchan Karai
  नोव्हेंबर 19, 2009 @ 21:48:41

  विचारांचं सुरेख मंथन केलं आहेस. अश्विनीच्या मताशी मी सहमत आहे.

  उत्तर

 8. आनंद पत्रे
  डिसेंबर 19, 2009 @ 11:12:51

  कांचनजींना अनुमोदन!
  बाकी तुम्ही आणि सर्वांनी आशय व्यक्त केला आहेच.

  उत्तर

 9. शांतीसुधा
  ऑगस्ट 08, 2010 @ 15:15:18

  अनुजा, मी मराठी…………वाचत होते. कॅनडा ट्रीप – भाग ३ मध्ये शेवटी शेवटी मी या मुद्यावर चर्चा केली आहे. म्हणजे प्रतिसादां मध्ये. तुमचा लेख छानच आहे.

  http://shatapavali.blogspot.com/2010/07/blog-post_1122.html

  उत्तर

  • anukshre
   ऑगस्ट 08, 2010 @ 16:12:42

   अपर्णा,
   लिंक दिल्यावर लगेच लेख वाचलास. भाषा आणि त्याचे महत्व हा विषय व्यक्ती प्रमाणे बदलत जातो. मी पण प्रतिसादात हा विषय वाचला म्हणून लगेच लिंक दिली.

   उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: