काल जेवण्यासाठी हॉटेल मध्ये गेलो होतो. पदार्थ सांगण्यासाठी मेनू कार्ड पाहत होतो. पदार्थ येई पर्यंत वेळ होता. साहजिकच शेजारी कोण आहे हे पाहीले. दोन छोटी मुले, मोठे साधारण चौथीत असावे, व छोटी शाळेत नुकतीच जाणारी असावी. छान गोंडस चेहऱ्याची बाळे होती. हॉटेल शांत वातावरणाचे होते, मंद सुरात संगीत होते. नेहमीच्या उडपी गलक्यापेक्षा कधीतरी ही शांतता पण आवडते. पदार्थ आले, माझे निरीक्षण आटोपते घेतले.
पहिला घास मुखी घेणार तोच……. ”पाप्प्पा” अशी आरोळी टारझन च्या थाटात आरपार कान भेदून पार गेली. आश्चर्य नाही वाटले कारण ही गर्जना मोठ्या गोंडस ने केली होती.आईने एक कटाक्ष टाकला आपल्या टारझनकडे. मला पाणी नको, पेप्सी पाहिजे. आवाज पाठोपाठ मागणी आली. आवाजाने वेटर ने तत्परतेने कॅन समोर आणून ठेवला.
छोटीने पाण्याचा ग्लास उपडा केला. मी घास घेत,ते मनोहारी दृश पाहात होते. तिच्या अंगावर पाणी सांडले, भोकाड पसरले. बाबा, तिला उचलून बाहेर गेला. मोठा, एकाग्रतेने आपला कॅन पीत होता. दहा मिनिटे शांतता झाली. मला वाटले चला, आता तरी फूड एन्जॉय करू. मग त्यांची ऑर्डर देणे सुरु झाले.
त्यांची आई माझ्या कडे तृप्तनेने पाहात होती. मी पण माझ्या स्मित रेषा हलवल्या. डीश ठेवल्या, छोटी लगेच उठली, चमचा घेऊन प्लेट वर संगीत निर्माण करू लागली. बाबांनी पहिले व आपल्या मोबाईल वरून टकटक करीत मान खाली घालून काम करू लागले. संगीत थांबले, जेंव्हा पदार्थ आले. मला हे नक्को! अरे तूच म्हणाला होतास न…. इति आई. पण आता नको. छोटी पुन्हा उठली, टेबल क्लोथ चा आधार घेत. क्षणार्धात मला कल्पना आली, की सगळी उलथापालथ झाली.
दुसरे टेबल त्यांनी निवडले, व चिकाटीने बसले. मुले टेबला मधून पकडा पकडी खेळू लागली. बाबा व आई त्यांच्या मोबाईल मध्ये गर्क. आपटा आपटी, दंगा यथेश्च केला. मला मात्र सांगावेसे वाटत होते, आईवडिलांना लक्ष द्या. हे घर नाही. बाहेर वागण्याचे संकेत त्यांना शिकवा. पण ह्यांनी मला दाटले, तू तुझे बघ. शाळा घेऊ नकोस. तेवढ्यात आई घास भरवित होती. माझ्या कडे बघून म्हणाली, आम्ही न इथे नेहमी येतो. मुल पण हॉटेल सवयीचे आहे म्हणून छान रमतात ( रमण्याची जागा ही!!?) बाहेर गेलो की अगदी लाज आणतात नाही. म्हणून आम्ही नेहमीच्या ठिकाणी आणतो……इति माता.
आता मात्र मला अगदी राहवेना विचारले, घरी असाच दंगा करत असतील .माता….. हो! ह्या पेक्षा ही खूप, हल्लीची कार्टी वाह्यात झालीत. धीट तर केव्हढी अगदी घरा सारखी वागतात. आपल्या वेळी अस नव्हत. जराही मोकळे पणा मिळत नसे. आजी, आजोबा. काका सगळ्यांचे धाक! फोरवर्ड आहे पिढी. तुम्हाला एकच का हा. मी……हो
माता…….. एकटा पडत असेल. कंटाळत असणार.
मी बोलायच्या ऐवजी, अजिंक्य म्हणाला……. ऑन्टी, मी माझ्या पेरेंट्स बरोबर खूप एन्जॉय करतो. ते माझे मित्र पण आहेत. मला कधीच एकटे वाटले नाही आणि हो मी छोटा असल्यापासून त्यांनी घरी हॉटेल मध्ये गेल्यावर बसायचे कसे? शांत पणे खाणे कसे खायचे शिकवले. आई तर इथल्या सारखे टेबल घरी तयार करायची रविवारी व आम्ही हॉटेल, हॉटेल म्हणून जेवायचो. प्लीज, आम्ही कार्टी नसतो. माझ्या आईने मला असे कधी ही हर्ट केले नाही.
दुसरा प्रसंग…….
घरी पाहुणे म्हणून एक कुटुंब आमंत्रित केले होते. दोन मुले, आईबाबा प्रवेशते झाले. पहिली पाच मिनिटे ओळख झाली. अजिंक्य त्या छोट्यांशी गप्पा करू लागला.पाहुण्यांचा अंदाज घेत मी स्टील का काच ग्लास, ते ठरवते. ह्या वेळी काहीही सांडले नाही. बाळे आई च्या बाजूला नम्रतेने बसली होती. मलाच अवघडले, घर पहा, या असे म्हणायचा अवकाश, माझ्या पायावर मीच धोंडा पडून घेतला. कसा ते पहा………
मुले, आई उठली पाहून, सोफ्यावर हाताच्या जागी वर चढली, व वडिलांच्या अंगावर कसे कोसळावे तशी सोफ्याच्या सीटवर दणादण कुदू लागली. अजिंक्य आता ट्रेंड झालाय, कंट्रोल करायला, ही उड्या मारायची जागा नाही, सोफ्यावर नीट बसा. दरवेळी मावशी रागवेल ह्नं! हा वाइट पणा मला मिळायचा. अजिंक्य सांभाळतो. पाच मिनिटे गप्प बसली, सोफ्या ला उशा आहेत हे त्यांच्या चाणाक्ष डोळ्यांनी पहिले, दादा कडे न पाहता एकमेकांना उशी ची मारामारी करायला लागले. अजिंक्य चटकन उठला व उशा काढून घेतल्या, व म्हणाला चला आपण माझ्या खोलीत खेळूया.
अजिंक्य, तुझ्या कडे यायला नको पुन्हा. रागावतोस का ? लहान आहेत ती. माझ्या लक्षात आले की आता हा उत्तर देणार, तसेच झाले……..
अजिंक्य……. मी रागवत नाही. ती छोटी आहेत हे मला समजत. सोफ्यावर नीट बसा सांगितले. माझ्या खोलीत खेळायला घेऊन जातो.
अरे तुझा सोफा खराब नाही होणार. त्यांचे पाय मळके नाहीत. उशांशी ते खेळतात. तुला माहिती नाही हा गेम, मज्जा येते.
ऑन्टी, मला खेळण्यासाठी आईने एक उशी वेगळी दिली आहे. मी आणि बाबा उशीची खूप फायटिंग खेळतो. सोफा मळका झाला तर पुसता येईल. पण फोम लूज झाला तर सोफा डयामेज होईल, स्प्रिंग खराब होतील म्हणून नीट बसा म्हंटले.
बघा, दादा किती हुशार आहे.
अजिंक्य ने हसून पहिले व मुलांना घेऊन आत गेला. ह्या म्याडम पण बघूया, अजिंक्य ची रूम म्हणत आत निघाल्या.
अरे, अजिंक्य, अजिबात पसारा नाही. गुड बॉय आहेस.
नाही ‘ऑन्टी’, पसारा असतो, फक्त कोणी येणार असले तर आई आठवण करून देते, ती व मी मिळून आवरतो.
मोठा फळा ठेवला आहेस खूप अभ्यास करतोस न.
ऑन्टी, हा फळा बाबांनी प्लायवूड वर काळा रंग लावून तयार केला.मला खूप मोठे चित्र, लहानपणी काढायचे असायचे. बाबा, नी भिंत डर्टी होते म्हणून हा तयार केला. माझ्या पेक्षा मोठा होता, त्यामुळे मज्जा यायची. आई बाबा पण मला जॉईन व्हायचे. ही पण बघा कशी एन्जॉय करतात.
अजिंक्य बरेचसे सांभाळतो. तरी पण पाहुण्यांच्या ह्या बाळांनी, माशांच्या पेटीत कोक ओतले, दिवाळीची रांगोळी पायांनी उधवस्त करतात, गणपती पुढे ठेवलेले कुंकू, प्रसाद स्वताकडे खेचून घेतात, फ्रीज घरी खेळायची सवय! असल्याने उघडून दाणकन आपटून बंद ही करतात.
अजिंक्य ने ही, लहानपणी त्याचे नवे कोरे विमान पाण्यात धवून काढले होते, ते तर बादच झाले पण त्याच्या बाबाने सर्व खोलून त्याचे पार्टस, त्याचे काम सोप्या भाषेत त्याला समजावून सांगितले.कूलर च्या फ्ल्याप मध्ये गवारीच्या शेंगा घातल्या, पुन्हा त्याचा वर्क शॉप घेण्यात आला. त्याचे आवडते काका, पोलीस, कंडक्टर, फायर ब्रिगेड अंकल, पोस्टमन जमेल तसे मी त्याला घेऊन गेले, त्यांचे काम त्याला दाखवले.
आता १३ पूर्ण झाली. ऐलायसी पोलिसी, नेट वर अजुकेशनल साईट्स आवडीने बघतो, आमच्या बरोबर चर्चा करतो. वेगवेगळ्या फ्याक्टरी दाखवतो, त्याच्या बरोबर संध्याकाळी खेळायला हेंल्थ क्लबला जातो. फेस बुक, पी. एस. टू. खेळण्यासाठी पार्टनर होतो. आठवीचा अभ्यास घेतो. त्याची स्वताची मत तयार होतात. आम्ही मतांना योग्य दिशा दाखवण्याचे काम करतो. त्याला प्राडो, पजेरो गाड्या आवडतात, बाबांची पण आवड आहे, म्हणून पगारात किती आलौंस मिळतो, त्यामध्ये ह्या गाड्यांचा ई एम आय कसा बसेल ह्याचा प्रोजेक्ट तो करतो. त्याला गाड्यांच्या शो रूम मध्ये घेऊन जातो, प्रश्न तो विचारतो. पैशांचा हिशोब करतो. चाललय जस जमेल तसं
आता मोठा होतोय…… बाबां पेक्षा उंच झालाय.
लहान बाळे आली की घर त्यांच्या गडबडीने आनंदीत होते. मुले निरागस असतात. ती काही सांगून मस्ती करीत नाहीत. मग सांगणार केंव्हा? कितीही वेळा सांगितले तरी लक्षात थोडेच राहते. संकेत, आणि शिष्टाचार हे मोठ्या माणसाकरता ठीक आहे. मग मुलांना मोकळीक नाही रहात. अगदी बरोबर, लहानच आहेत ती, पण आपण तर मोठे असतो.
मी शाळेत असताना विद्यार्थांच्या पालकांशी संवाद साधायची तेंव्हा हे प्रश्न विचारायचे. तुम्ही जेंव्हा वेळ मिळेल तसा मुलां बरोबर व्यतीत करा. त्यांच्या बरोबर कार्टून पहा, गेम खेळा, खास गप्पा करायला बसा. मग बघा मी काही सांगायची गरज नाही. त्यांच्या अपेक्षा, गरजा, आनंद, त्यांची काळजी तेच छान भाषेत आपल्याला सांगतात.
‘लहानपण देगा देवा, माझ्या जीवनातला अमुल्य ठेवा’.
मुले निरागस च असतात. द्वाड पणा पण छोट्यानीच करावा. अगदी १०८% मान्य. पण आईबाबा होणे हा निसर्गाने दिलेला सन्मान, सुजाण पालक म्हणून स्वीकारलात तर आपलीच ही पिढी सुसंस्कारित, योग्य म्यानर्स सहीत मोठीहोईल. निरागसता जपणे आवश्यक आहेच, अजिंक्य ला मोठे करताना, माझा अनुभव मी मांडला……कच्चा घडा, आपणच पक्का घडवायचा, आकार देणे आपल्या हातात आहे.
बालदिना च्या शुभेश्च्या. आपण ही बाल होऊ या व त्यांचे मन ओळखून, पुन्हा अनेकदा ,लहानपणाचा अनुभव घेउया.
नोव्हेंबर 13, 2009 @ 08:13:27
mule tyancha parents che anukaran karat astat mulagi aata kuthe varsha chi zali aahe khup motha palla mala gathay cha aahe lekh mast cha aahe 🙂
नोव्हेंबर 13, 2009 @ 18:18:08
अश्विनी, ह्या मोठ्या पल्ल्या करता छान छान शुभेश्च्या. तुझ्या छोट्याश्या परी ला माझे शुभाशीर्वाद. आवर्जून वाचलेस. अभिप्राय दिलास, पुन्हा तुझा पहिला नंबर लागला. मस्त एन्जोय कर चिल्ड्रन डे. मुलांचे भाव विश्व इतके निरागस,
असते कि लिहावेसे वाटले.
नोव्हेंबर 15, 2009 @ 10:29:16
अनुजा खूपच सुंदर विषय निवडला आहेस. प्रथम तुझे कौतुक! आजकालच्या अल्ट्रा फास्ट जीवनात कुटुंबाला एकमेकांकडे पाहायला वेळ कुठे? मुलांना न ओरडणे,त्यांना पहिज़े ते करून देणे हे सुसंस्कृतपणाचे प्रतिक समजले जाते.मग ह्यांची ती गोंडस मुले समाजात वावरतांना त्या सुसंस्कृतपणाचे व आधुनिकतेच्या फुलांचे उधळण करत फिरताना दिसतात. मग ते वाईट शिव्या देणे असो किंवा मारामारी करणे, दुपारच्या वेळेला त्या गोंडस मुलांच्या मातांना झोपायचे असले कि त्या सरळ मुलांना बाहेर खेळायला,दंग करायला पटवतात. शेजारच्या झोपेचे खोबरे झाले तरी बेहत्तर? शेजारी मग म्हातारे आजी-आजोबा असुदेत का कोणी रुग्ण……आपण मात्र ताकारारीचा सूर लावायचा नाही. कारण जे पालक आपल्या पाल्याच्या वागणुकी विषयी एवढे उदासीन असतात तेच पालक मात्र पाल्याचा ह्याच कृतीचे समर्थन करून आपल्याशी भांडायला तयार असतात. म्हणजे आधीच डोके दुखी ……वरती मनस्ताप आपल्याच नशिबी !!!मला मात्र एवढीच भीती वाटते कि हीच वृत्ती त्या मुलांना गुह्नेगार तर नाही बनवणार….जगात वाढत जाणाऱ्या बाल-गुन्हेगारीचे प्रमाण व स्वरूप पाहता हि भीती मनात दाटून येते. माझ्या लहानपणी आईने सागीतालेली छोटी गोष्ट येथे आठवते ……अशीच एक आपल्या मुलावर खूप प्रेम करण्या आईची…आयुष्यभर ती त्याला लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरवणारी ….त्याच्या सर्व चुकांवर पांघरून घालणारी ……लहान लहान चुका करत करत मुलगा मोट्टा गुन्हेगार बनतो मुलाला फाशीची शिक्षा होते …..जज्ज त्याला त्याची शेवटची इच्छा विचारतात. तो म्हणतो एकदाच आईला मिठी मारायची आहे. तो आईला मिठी मारतो व तिचा एक कान कडकडून चावतो …..आई किंचाळून विचारते हे काय केलेस ? तो तिला म्हणतो मी लहान असतांना जेव्हा पहिली चूक केली तेव्हाच जर मला शिक्षा किली असतीस तर आजचा दिवस पाहायला लागला नसता ……………………………………………
नोव्हेंबर 15, 2009 @ 22:20:56
हीना,
तुझी प्रतिक्रिया वाचून, वास्तवाचे भान, त्यामागची मुलांकरता असलेली काळजी, त्यांचे भविष्य उत्तम व संस्कार पूर्ण असावे. हे अत्यंत स्पष्टपणे लिहिलेस खूप बरे वाटले. आपल्या आजूबाजूला असलेलेच अनुभव असतात. आजच्या फास्ट
जगात पालक म्हणून ओढाताण होतेच. बाहेरचे जग आपल्या पिल्ला करता कसे असेल? त्याच बरोबर काय आदर्श त्याचे असतील, जर आईबाबा हेच असतील तर नुसते आईवडील म्हणून नव्हे तर सुजाण पालक होणे.मुलाच्या आयुष्या करता खूप जरुरीचे आहे.तेच भविष्य राष्ट्राचे असते.
अभिप्राय सविस्तर आवडला व खूप छान पद्धतीने विचार पटवून दिलास माझी पोस्ट पूर्ण झाली. ही समविचार धारा आपल्या मैत्री चे अनुबंध आहेत.
नोव्हेंबर 15, 2009 @ 13:35:09
खरच सुंदर झाला आहे लेख.
छान घडावल आहात तुम्ही अजिंक्यला.
प्रत्येक पालकान हा लेख वाचायला हवा.
अजिंक्यला भावी आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा …!!!
नोव्हेंबर 15, 2009 @ 22:38:39
देवेंद्र,
सगळी मुले निष्पाप, निरागस असतात. घरच्यांचे पहिले अनुकरण करतात. कोतूक हवेच, प्रोत्साहन पण नक्कीच द्या पण
आपण ही निरागस होवून मुलाबरोबर भाबडेपणा दाखवलात किंवा अति फ्रेंडी झालात तर ते त्या बाळाच्या निकोप वाढीस
अडथळा होईल. अजिंक्य एक निमित्त, ”लेकी बोले……………….”. मी आई, मी शिक्षिका, एक समुपदेशक, एक अनुभव ह्या
नात्यातून लिहिले. पालकांशी नाते दृढ होण्यासाठी त्यांची मैत्रीण मी झाले. आपल्यालाही आवडले, अभिप्राय आवर्जून दिलात हे ही नसे थोडके………
नोव्हेंबर 15, 2009 @ 16:34:40
ताई मस्तच लिहीलं आहेस…..आणि अजिंक्यचा तर प्रश्नच नाही, मुळात त्याला तुझ्यासारखी मैत्रीण आणि दादांसारखा मित्र आहे. बाकि तो मुलांना व्यवस्थित सांभाळतो आणि मुलांचा लाडका दादा आहे हे तर वादातित….
नोव्हेंबर 15, 2009 @ 22:58:49
तन्वी,
तुझ्या दादांना अजिंक्य व अमित ह्यात वेगळेपण दाखवता येत नाही. ऑफिस मध्ये सर्व त्यांची मुले आहेत. तो मोठा व घरी अजिंक्य छोटा. तुम्ही प्रेम दिलेत, आम्ही प्रेमाला विश्वास दिला. अजिंक्य ची तू पण मैत्रीण आहेस की कसा हक्काने तुझ्या घरी येतो. अजिंक्य चे एक निमित्त…… ईशु व गौरी ला पहिले की त्याचे लहानपण आम्हाला पुन्हा अनुभवता येते.
मग आता तूच सांग, गौराक्का ह्यांची छकुली, व ईशु माझाच झाला न. ह्या दोन गोड छोट्या करता मला उगाचच मोठे
करू नकोस.
नोव्हेंबर 16, 2009 @ 09:41:13
अगं सद्ध्या कामात बुडाले आहे … डोकं वर काढायला संधी मिळत नाहीये. त्यामुळे मौन.
नोव्हेंबर 17, 2009 @ 04:22:34
मुलांच्य भावविश्वात आपण त्यांच्या नकळत समाउन जाण हेच सगळ्यात जास्त महत्वाचं…तेवढं केलं की झालं. बाकी सगळं आपोआप होतं…….छान जमलाय लेख..
नोव्हेंबर 17, 2009 @ 07:39:45
महेंद्र्जी,
हाच उद्देश होता लेख लिहिण्याचा. बाकी अजिंक्य चे निमित्त करून अप्रत्यक्ष पद्धतीने संभाषण रुपी लिहिण्याचा सराव केला.