खांद्यावरचे घर……………

अहाहा! अजबच! केव्हढे हे सामान. उगाच काढले बाई हे काम. बर झाल दुपारी पाहीले, हे ऑफिस ला आहेत म्हणून बर. वादाचा विषय झाला असता. तसा तो आहेच म्हणा, पण आज संध्याकाळी पार्टी ला जायचे आहे हा प्रकार आवरण्याचा पुन्हा पहिलाच पाहिजे. अडत तर माझ्या वाचून, स्वताचा खिसा तो केव्हाढसा काहीही मावत नाही, रुबाब तो करायचा. आता काहीतरी छोटेसे गिफ्ट घ्यावे तर लागणारच. ह्नं देतील मलाच सांभाळायला. डूकरीणी च्या पोटा सारखे वजन खांद्यावर कशी काय सांभाळतेस देव जाणे! ही आणि तक्रार वजा काळजी. माझा संसार मीच वाहते, पूर्वी कशी पाण्याची कावड असायची, तसेच परिवाराला लागण्याऱ्या सर्व गोष्टी हक्काने माझ्या खांद्या वरच्या घरात असतात.

खांद्यावरचे हे घर अजब परंतु बहुविध कारणांसाठी एकच पर्याय म्हणून कुटुंबाचा एक अविभाज्य घटक बनलेले असते. त्यावर सगळे अवलंबून असतात. घरातील खोडसाळ मंडळी कुत्सित पणे टोमणे ही देतात. मुले तर निवांत पणे खेळण्यासाठी किंवा त्यांचा वेळ जाण्यासाठी त्यांच्या माता, बाळ हातात हे घर खुशाल सोपवतात. हे युनिवर्सल आहे. हे घर गरजे प्रमाणे बदलते, घराचा आकार, त्यातील गोष्टी ह्या त्या व्यक्तींच्या विश्वा भोवतीच फिरत असतात. एकाच खांद्या वर चे हे घर प्रत्येक प्रसंगानुसार सरड्या सारखे आपला चेहरा मोहरा बदलत राहते.

परंतु युग कितीही पुढे गेले तरी ह्या खांद्या वरच्या घराची जवाबदारी काही कमी होत नाही. घरातील स्त्री ह्या सर्व समावेषक घराला नेहमी भरपेट ठेवते तिचा पती सुद्धा ह्या घरातील सामान चटकन शोधू शकत नाही. स्वताचा खिसा सुद्धा त्याला छोटा वाटतो. तिच्या घरासाठी त्याच्या पण वस्तू तिला सांभाळण्यासाठी देतो. हो! हे ‘वॉकिंग – टोकिंग’ घर म्हणजे खांद्यावरची पर्स होय. अनेकविध पर्स गोळा करण्याचा स्त्रियांचा जन्मतःच स्वभाव. त्यावरून त्यांच्या आवडी निवडी, व्यक्तिमत्व काय धाटणीचे आहे. हे हि निरीक्षण करण्याचा माझा स्वभाव आहे. बटवा……….ते पर्स असा भारतीय पोशाख लाभला आहे, तसाच वारसा पण भरजरी पैठणी सारखा आहे.

आजीच्या बटव्यात आणि चन्चीत हमखास आवडीच्या गोष्टी मिळायच्या. सुपारीचा तुकडा, फणी, पोटदूखीवर गोळ्या, लिमलेट गोळ्या, वाती व कापूस, झांझा आणि बरेच काही, सगळे खूप पहावयास मिळावे असे खूप वाटायचे पण आजी वस्ताद ढिम्म कशाला हात लावून द्यायची नाही. ती खूष झाली की हातावर नाणी मिळायची, गेलोच धूम ठोकत आवडीचे घ्यायला. भाऊ गोट्या, पतंग, रीळ, मांजा, भोवरा असले काहीतरी घेत असे. मी मात्र नाणी साठवून ठेवायची मग शाळे बाहेरचा खाऊ चिंचा, विदेशी गुलाबी तूरट चवीची चिंच, आवळे, बोर अहाहा! काय तो बटवा आणि अल्लाउद्दीन एकच वाटायचे.

मग आला जमाना आईचा, शाळेत शिक्षिका छोटासा डबा, पाण्याची बाटली, आणि हो अत्यंत महत्वाची म्हणजे फोल्डिंग ची भाजीची पिशवी, लाल, निळे पेन, पेन्सील आणि चष्मा, छत्री की निघाल्या शाळेत, येताना मात्र पर्स भरलेली उत्तर पत्रिकेचे गठ्ठे, हातात भाजी ची पिशवी हमखास असायची. मी कॉलेज ला जाऊ लागले रेल्वे च्या फिरत्या दुकानातील सर्व वस्तू माझ्या कडे असायच्या. म्हणून म्हटले की काळानुसार, गरजेनुसार बदल स्वाभाविक आहेत तेच स्त्री च्या अस्तित्वाचे निदर्शक आहेत. बटवा……….ते आय. टी. करिअर असा बदल झाला. हे घर कॉमप्याक्ट झाले. घरच काय सर्व जग चीप मध्ये सामावले, व पर्स मध्ये जाऊन बसले.

अचानक लागणाऱ्या वस्तू हाताशी असाव्या म्हणून बरेचसे पर्स मध्ये ठेवले जाते. तिचा सरंजाम पण वेगळा असतो. कन्या असेल तर सौंदर्य प्रसाधने, मुलगा असेल तर वयानुसार गोष्टी बदलतात. आई नीट सांभाळते म्हणून तिला दे, असा वडिलांचा आदेश असतो. दोन तासा करता जरी बाहेर पडले तरी ह्यातील एक तरी वस्तू आईच्या पर्स मध्ये येते. समजा काही अडचण आली तर खाण्या पासून सर्व गोष्टी धकाधकीच्या जीवनात जवळ ठेवाव्या लागतात. त्यात भर म्हणजे आता मास्क ठेवायचे. खर तर मी यादी देणार होते पण काही फोटो देते. वस्तूंचा अंदाज येईल.

पर्स चा आकार सतत काळानुसार, चित्रपट नुसार बदलता राहतो. आशा पारेख नटी च्या काळात उडत्या गाण्याच्या चालींवर बोटांवर फिरवता येणारी पर्स दिसली. आता पुन्हा मोठ्या पर्स ची सुरवात झाली. करीना चा नाजूक खांदा आणी, भली मोठी पर्स! काळजी वाटते, खांद्याच्या हाडाची दुखापत होईल का? कापडी झोळी राजेश खन्नाची, खांद्यावर लटकावली की जगाची काळजी झोळीत घेतली असा अभ्यासू चेहरा आपोआपच होतो. खांद्यापासून मस्तक फारसे लांब नाही. काही मुले, मुली ही शबनम कंबरेच्या इतकी खाली ठेवतात की पायांच्या तालाबरोबर ती पण आपल्या डोळ्यांना अस्वस्थ करते. ह्यांनी आईला पदर खोचून आटोपशीर काम करताना पहिले नाही का? अशी शंका येते. व्यक्तीची वृत्ती मी अशी न्याहळते.

पर्स ला अडकविण्या साठी नव्हे तर रूप अधिक खुलवण्यासाठी विविध गोष्टी मिळतात. तिला पण मेक ओव्हर ची गरज आहे. कुल लुक्स, …….लुक्स असे शब्द तरुणाईचे, एकूण काय काळ बदलतो आपण ही बदलूया. बटव्या चा इतिहास आठवूया आणी पर्स वरून लेख लिहूया ही उर्मी तयार झाली म्हणून पर्स आवरायचे निमित्त तयार करून हा प्रपंच खांद्या वरचा आपणा साठी सांभाळत आणला.

लहान बाळांच्या गुलाबी कॉटन च्या पिशव्या, त्या बाळाचे बाबा मी बाप आहे असा अभिमान बाळगत,सांभाळत राजाच्या तोऱ्यात बायको मागून चालतो ते पाहून पर्स ची कल्पना सुचली. आणी हो ही पोस्ट सर्वांची आहे कारण घरी आई, पत्नी, मुली,बहिण इत्यांदीच्या पर्स बाबत काही आडाखे प्रत्येकाच्या मनात असतातच. पुरुष वाचकानो तुमच्या वोलेट बाबत म्हणजे खिशातल्या पाकिटा बद्धल?

15 प्रतिक्रिया (+add yours?)

 1. Aparna
  नोव्हेंबर 10, 2009 @ 05:33:00

  थोडा बदल म्हणून मी आजकाल अगदी छोटी पर्स घेते आणि सगळं सामान आरुषच्या बेबी बॅगमध्ये असतं…अगदी आयत्यावेळी त्याच्या बाबाने काही दिलं हातात तर तेही आपसुक त्याच्याच बॅगेत जातो. आणि त्याचा मोठा स्ट्रोलर घेऊन असू तर स्ट्रोलरची हातगाडी झालेली असते सामानेने….:)

  उत्तर

 2. anukshre
  नोव्हेंबर 10, 2009 @ 08:02:28

  खरय अपर्णा, छोटी बाळे असली की त्याचं बरच समान होत, अपरिहार्य आहे. अग! ह्यात पण मी एक निरीक्षण केले मल्याळी जनता इथे खूप आहे त्यांची, बाळे बाबा, आई सगळे कुठलीही बाळाची पिशवी न घेतलेले असतात. कसे काय रिकामे फिरतात? अजिंक्य चा पण पी एस पी , आय पॉड , स्टोरी बुक , असले समान अजूनही सांभाळते. वेगळे समाधान
  वेगळी मजा आहे ग. खूप मोठा झ्याल्यावर मी हे सगळे मिस करेन. बर झाल निदान तू तरी वाचतेस माझ्या पोस्ट

  उत्तर

 3. bhaanasa
  नोव्हेंबर 10, 2009 @ 09:11:49

  अग हे पर्सचे रामायण म्हणजे… माझा नवरा म्हणतो एकवेळ ब्रम्हदेवही सापडेल पण तुझ्या पर्समधली गोष्ट सापडणे म्हणजे….:D. गंमत म्हणजे असे म्हणतो आणि गाडीत बसलो की, अग हे ठेव गं जरा तुझ्या पर्समध्ये.घरोघरी तेच गं. विमानप्रवास तोही मायदेशाला निघालो की मात्र माझी पर्स म्हणजे नुसती कोंबाकोंबी चालते. हे हाताशी असू दे असे म्हणत म्हणत मीच इतक्या अनंत वस्तू ठेवते की ती बिचारी मानच टाकते. मस्त विषय आहे हा.

  उत्तर

 4. anukshre
  नोव्हेंबर 10, 2009 @ 09:36:28

  भाग्यश्री,
  चालेल न! ए पण मजा येते न अशा ही गोंधळात. मी तर अजूनही ह्या पर्स च्या घोट्याळ्यात मस्त अडकते. चला बरे झाले मला माझ्या सारखीच अजून एक मैत्रीण मिळाली.

  उत्तर

 5. sahajach
  नोव्हेंबर 10, 2009 @ 11:52:03

  मस्त आहे लेख ताई….माझ्या त्या नव्या पांढऱ्या पर्सचे असेच वाटॊळे केले ग या बाकिच्यांनी….अमित तर त्याला अलिबाबाची गुहा म्हणतो….

  उत्तर

  • anukshre
   नोव्हेंबर 10, 2009 @ 12:15:17

   धारातीर्थी पडलेल्या पर्स छान विषय आहे. संसाराचा डोलारा सांभाळून त्या हि बिच्चाऱ्या आपल्याच सारख्या वाटतात. काय मस्त होती ग तुझी पांढरी पर्स अरेरे! तन्वी अशा पर्स मध्ये सगळ्या लोकांच्या मध्ये जर मोबाईल वाजत राहिला तर नवरा लांबच लांब चेहेरा करून अनोळखी सारखा पाहतो. पटतंय का तुला? आणि तो फोन जर आईचा असला तर? काय लिहू?……………..

   उत्तर

 6. Asha Joglekar
  नोव्हेंबर 10, 2009 @ 19:53:15

  ए मस्त आहे लेख. माझ्या पर्स ला तर हे धोपटी म्हणतात . ह्याची पर्स (वॉलेट) चश्मे सर्व माझ्या पर्स मधे । जरा मोठीच असू दे प्रवासात हा सल्ला । तोर काय पर्स म्हणजे अगदी भानूमती का पिटारा होते ।
  माझ्या हिंदी ब्लॉगला भेट देऊन कमेंट केल्या बद्दल आभार . माझा मराठी चा पण ब्लॉग आहे. झुळुक,
  asha-joglekar.blogspot.com वाटलं तर बघ प्रतिक्रिया आवडेल.

  उत्तर

  • anukshre
   नोव्हेंबर 11, 2009 @ 14:28:34

   आशा ताई, मनापासून धन्यवाद, आपण माझा ब्लॉग वाचलात. आपले अभिप्राय मला बहुमुल्य आहेत. मला वाचावयास नेहमी मिळावेत असा मानस आहे. आपले स्वागत!

   उत्तर

 7. महेंद्र
  नोव्हेंबर 11, 2009 @ 19:30:13

  बायकोच्या पर्स मधे काय असतं??
  बस ची जुनी तिकिटं
  जुने लोकलचे पास
  सुकलेलं गुलाबाचं फुल
  कधिही वापरत नाही अशी लिप्स्टीक
  पेनची रिफिल .. (रिकामी)
  क्लिप्स
  सेफ्टीपिन्स
  रबर बॅंड्स.. जरी केस मोकळे सोड्ते तरिही..
  बिस्किटचा पुडा. ज्या मधे केवळ एक-दोन बिस्किट्स बाकी आहेत असा.
  कोल्ड क्रिम, किंवा निव्हिया
  कॉंपॅक्ट
  कंगवा
  जुनी बिलं.. अगदी किराण्या पासुन तर दोन वर्षापुर्वीचं जेवणाचं बिल..
  अशा अनेक गोष्टी असतात. इथे लिस्ट करित बसलो तर एक पोस्ट होईल पुर्ण. म्हणुन थांबतो..

  उत्तर

  • anukshre
   नोव्हेंबर 11, 2009 @ 19:55:08

   महेंद्र्जी,
   ह्याच लिस्ट मी वाट पाहत होते. तुम्ही ती द्याल असे ही मनोमन खात्री होती. आता माझी पोस्ट लिस्ट सकट पूर्ण झाली.
   सगळ्या पर्स च्या कहाण्या….. साठा उत्तरी सफल संपूर्ण.

   उत्तर

 8. gouri
  नोव्हेंबर 11, 2009 @ 21:57:33

  malaa tar saadhi purse puratach naahi sagale thevaayalaa … shakya temvhaa mee chakk sack vaaparate. office chyaa sack madhye tar aathavadaabhar office baher padataa aale naahi tari purel evadhe saamaan asate … nehemee laaganaaryaa aushadhaanpaasoon te A/C madhye hamakhaas gaar hote mhanoon sweater paryant!!!

  उत्तर

 9. महेंद्र
  नोव्हेंबर 12, 2009 @ 06:08:44

  अहो अजुनही खुप गोष्टी आहेत पण खुप मोठी लिस्ट होत होती म्हणुन थांबलो . त्यामधे एक मुख्य राहुन गेलं.. ते म्हणजे खारे दाणे खाउन अर्धी झालेली पुडी.. आणि आवळा सुपारी… 🙂 ते दाणे इतके जुने असतात, की चुकुन जरी तोंडात घातला तर खऊट वास येतो त्याला. आता जर ते खायचे नाहीत तर सांभाळुन तरी कशाला ठेवायचे? पण नाही.. सवईचा परिणाम… 🙂
  दोन टेलिफोनच्या डायऱ्या. या पैकी एक जुनी, एक नविन. जुन्यातले नंबर्स नविन डायरित कधीच ट्रान्स्फर केले जात नाहीत. मग काय दोन्ही सांभाळायच्या.. 🙂

  उत्तर

  • anukshre
   नोव्हेंबर 12, 2009 @ 08:12:15

   एखादी गोळी पर्स मध्ये तळाशी मिळते की, तिचा कागद इतका चिकटलेला असतो, खाउच शकत नाही. आय्नासीन
   ची गोळी कधीही डेट व्ह्यालीडीती कळत नाही, तरीही ती सापडते. दाणे, आवळा सुपारी, हे मात्र एकदम पटल.

   उत्तर

 10. Rohini
  नोव्हेंबर 13, 2009 @ 22:28:57

  अगदी आवडिचा विषय… मस्त झाला आहे लेख. लहान बाळांच्या आयांच्या पर्स मधे वरील सर्व वस्तुंशिवाय डायपर आणि वाईप्स सुद्धा सापडण्याचे चान्सेस असतात :).

  उत्तर

  • anukshre
   नोव्हेंबर 14, 2009 @ 07:40:44

   आपले सर्व प्रथम स्वागत करते. आपण म्हणालात, अगदी बरोबर लहान बाळांच्या सामानात डायपर, पिन्स असतात. माझ्या ही पर्स चा प्रवास ह्या मार्गावरून अजूनही सुरूच आहे. आपले अभिप्राय मला वाचावयास आवडतील. आपणास शुभेश्च्या

   उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: