‘शावरमा’..मस्कतीय वडापाव

मरहबा! सुस्वागतम् !

‘शावरमा’ म्हणजे मस्कतीय वडापाव, हो! मी खरच सांगतीय. स्वस्त मिळणारा, पूर्णान्न असणारा हा मांसाहारी पदार्थ. आईने दिलेली ‘पोळीची सुरळी’, ह्या शाळेतल्या डब्याच्या खाऊ ची आठवण करून देणारा. शाकाहारी न पण इथे पर्याय आहे हं. नाहीतर माझ्या सारखीची पंचाईत झाली असती. पोळी च्या ऐवजी खास आट्याचा गोलच, पण बिन तेलातुपाचा, दोन पदरी असा ‘खुबुस’ असतो. त्यालाच पिट्टा ब्रेड असे हि म्हणतात.

खुबुस चा स्तर वेगळा करून त्यामध्ये तूपा ऐवजी मायोनीज, ताहिनी (तिळाची) पेस्ट लावतात, कच्च्या उभ्या चिरलेल्या भाज्या म्हणजे कोबी. भोपळी मिरची, काकडी, सलाड, सेलरी, व बटाट्याच्या तळलेल्या सळ्या. हे सर्व ठेऊन त्यावर शावरमा मशीन मधून काढलेले चिकन किंव्ह्वा लाल मासं (मसाला लावलेले, तिखट नसते.) आगीवर खरपूस भाजलेले चपट्या चकत्यांचा रुपात त्यावर ठेवतात. गुंडाळी करून, कागदी रुमालात मध्ये देतात.

शाकाहारी जणां करिता त्यात ‘फलाफील’ असते. कबुली चणे भिजून, वाटून त्यात मसाला घालून च्या वड्या तळून, चिकन ऐवजी ठेवतात.

भारतात पण बऱ्याच ठिकाणी मिळतो. पण इथे गल्लोगल्ली वडापाव सारखा आहे. मस्कत मध्ये फिरण्या आधी पोटोबा तर पहिला, कारण तिथूनच भटकंतीचा मार्ग विठोबाचे नाव घेऊन सुरु होतो. असा मस्कतीय वडापाव …… शावरमा.
भारतीय रुपयात साधारणपणे ३६ तर इथे ३०० बैसे. कमी किमतीत मिळणारा परंतु पौष्टिक असा एकच शावरमा खाल्ला तरी पूर्ण जेवण होते. तसा हा प्रकार मिडल इस्ट देशात लोकप्रिय, गरीबांचे खाणे म्हणून ओळखला जातो. मस्कत मध्ये जसा रस्तोरस्ती, प्रत्येक राउंड अबाउट म्हणजे नाक्यावर मिळतो तसा बाकी ठिकाणी कमी आढळतो.

शावरमा ची टपरी आपले मल्याळी, लेबेनॉन देशाचे लेबनीज, टर्की देशाचे असे वेगवेगळे लोक चालवतात पण मूळ मालक ओमानी माणूस असतो. एका दिवशी शावरमा चा खप साधारण पणे ६०० पर्यंत असतो. ५० किलो चिकन लागते. हा खप एका दुकानातील असे अनेक ठिकाणी मिळतातआधी हा मस्कतीय शावरमा खाऊन, मग मस्त मस्कत बघायला जाऊ.

6 प्रतिक्रिया (+add yours?)

  1. Aparna
    नोव्हेंबर 10, 2009 @ 05:29:04

    इथेही पिट्टा ब्रेड मिळतो त्यात असंच काही-बाही घालुन घरी कधीतरी सुप आणि पिट्टा सॅंडविच असा बेत करतो त्याची आठवण झाली…

    उत्तर

  2. anukshre
    नोव्हेंबर 10, 2009 @ 08:11:16

    अपर्णा,
    पोस्ट वाचलीस. आवर्जून प्रतिक्रिया देतेस. खरच खूप छान वाटते. शावर्मा हा प्रकार नवीन नाही त्यामुळे हि छोटीशी पोस्ट फारशी लक्षात येत नाही.

    उत्तर

  3. gouri
    नोव्हेंबर 11, 2009 @ 21:32:01

    ha prakaar Germany madhye pan agadi vada-paav saarakhaa jagojaag milato bare ka … Doner Kebab mhanatat tyaala tithe – aani tyaat chakk aapali chinchechi chatani aani dahi suddhaa ghaalataat!

    उत्तर

    • anukshre
      नोव्हेंबर 12, 2009 @ 08:34:10

      गौरी,
      जर्मनी मध्ये पण मिळतो माहितीच नव्हते, चिंच आणि दही म्हणजे आपला चाट! मस्त न तिथेही एन्जोय करता येत असेल. गेल्या वर्षी मी ऑस्ट्रिया, इटली बघून आले. तिथे काही दिसले नाहीत. जर्मनी, सुट्टी फार नव्हती म्हणून पुढील ट्रीप करता ठेवले. अजिंक्य ला बरे झाले, ज्या देशात शावर्मा असेल तिथे नोकरी बघेन अस म्हणतो. माहिती छान पाठवलीस. मस्कत ला भेट देत रहा. टेक केअर

      उत्तर

  4. Ashwini
    नोव्हेंबर 12, 2009 @ 08:57:07

    mala nakki aawadel ha padarth taste karay pan Veg. 🙂

    उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: