गृहकर्तव्यदक्ष हा एक मान, सन्मान स्त्रियांना आपसूकच मिळतो. ती अभियंता, डॉक्टर. वैमानिक इत्यादी बाबत कार्यरत असली तरी हा सन्मान पाठपुरावा करतच असतो. मानसिक दृष्ट्या मात्र ती आधुनिक होत नाही कारण परंपरेचा पगडा.
घर त्याची निगा, मुलांचे संगोपन ह्यात नवऱ्याचा पण सहभाग असतो. पण सर्व साधारण पणे ह्या फ्रंट वर स्त्रिया जास्त कार्यरत असतात. सर्व आघाड्या सराईत पणे सांभाळण्या करता नियोजन खूप महत्वाचे ठरते. त्या करिता आधुनिक उपकरणे हि कोणावरही अवलंबून न राहता मदत खूप करतात. हो! माझा रोख मानसिकते वर आहे. घरचे पोटमाळे अनेक उपकरणांनी भरलेले असतात. कधीतरी वापरू म्हणून अनेक गोष्टी घेऊन ठेवलेल्या असतात. कणिक आम्ही हातानेच मळतो. कारण खूप आहेत. एक तर समाधान, पोळ्या छान होतात आणि मुख्य म्हणजे फूड प्रोसेसरचे भांडे कोण घासत बसेल. मोलकरीण ला असले आम्ही देत नाही. आधीच घरची कामे खूप त्यात हा उपद्व्याप कोणी वाढवावा?
बरोबर जितके कराल तितके काम वाढते.
घरची मोलकरीण सांभाळणे. तिला कामात तज्ञ करणे, तिला तू माझ्या घरची म्हणून वेळोवेळी पैसे, मदत करणे. एव्हढे करूनही ती टिकेल म्हणून खात्री नाही. मोलकरीण सांभाळता येतीय का म्हणून आपले मोजमाप सहज करून देणे होय. घरात मेड असली तरी गृहिणीचा कामात पिट्ट्या पडतो. माझ्या घरीही काही काळ अशी परिस्थिती होती. पण बरेचसे काम हलके निश्चित करता येते. काही उपकरणाचा उपयोग करून फक्त मानसिकता हवी आणि आर्थिक नियोजन हवे.
भांड्याचा ढीग हि डोकेदुखी सर्व घरची ठरते. सोय करता येत असेल तर जरूर करा. घरच्या स्त्री ला आराम मिळवून द्या. आणि स्त्रियांनी मोलकरीण सांभाळता येतीय का ऐकण्याचे टाळू शकता.
होय मी माझ्या यक्ष संबधी म्हणजे माझ्या मदतगार विषयी माझ्या Dishwasher बद्धल लिहितेय…….. नोकरी करणारी असो नाहीतर घर स्वीकारणारी यक्ष प्रश्न आहेत. लहान मुले असली तर वारंवार खाणे करावे लागते, मोठी असली तर अजून काहीतरी वेगळे कर, पाहुणे येणार तर खास बेत, घरची मंडळी असली तर…. एकंदरीतच घरातील स्वयंपाक घर दिवसभर कार्यरत असते. कामवाली बाई एकदाच येते. हा भांड्याचा ढीग तयार होतो. थकवा जाणवतो, कामाचा डोंगर पाहून नवऱ्याची काळजी वाढते. मग आधुनिक अद्यावत यंत्रा चा उपयोग केला तर…… पाहिजे तेंव्हा, हवा त्या वेळी उपयोग करता येतो. घरोघरी कपड्याचे मशीन असते, तसेच हे भांड्याचे मशीन आहे. मी खूप वर्ष वापरते. अजून भारतात कामवाली सहज उपलब्ध असल्याने भांड्या करता मशीन घेण्याची मानसिकता घरोघरी दिसत नाही. किमंत हि साधारण पणे कपड्याच्या मशीन च्या जवळपास आहे. तसेच आता भारतात हि खूप ठिकाणी दुकानात दिसते.
घरचे काम करून हात दुखतात, थकायला होते मग हे पर्याय कामवाली बाई चे प्राबल्य कमी करतात. मला उपयोग होतो. तसाच सर्वाना व्हावा म्हणून हि पोस्ट. निदान एक काम तरी हलके होते. घर आनंदी राहते. मला आपल्या शंका, प्रश्न जरूर विचारा, माझे म्हणणे नक्की पटेल. तुम्ही आनंदी तणावमुक्त तर घर आनंदी राहते. गृहलक्ष्मी ला यक्ष प्रश्नात मदत करणारा यक्ष ठरेल.
नोव्हेंबर 05, 2009 @ 14:53:05
ताई, दादांना माहितीये का ही पोस्ट…मला वाचताना सारखी त्यांची आठवण येत होती…तू डिशवॉशरचा डेमो देतीये आणि ते मागे उभे आहेत, “अनू ते काही तुला कमिशन देणार नाहीयेत त्यांचा सेल वाढल्यावर म्हणणारे…” असो हा झाला गमतीचा भाग…पण मलाही तुझ्या या ’यक्षाची’ उपयुक्तता पटलीये..अर्थात तू त्याचा डेमो दाखवल्यानंतरच….
नोव्हेंबर 06, 2009 @ 11:09:07
तन्वी,
‘हे’ न कंपनीचे करोडोंचे व्यवहार करून, त्यात कंपनीचे किती पैसे वाचवले, प्रोजेक्ट्स कसे फायद्याचे कंपनी करता करायचे हाच विचार सतत करत असतात. अमित लाही तयार करत आहेतच कि, मी पण सौ. म्यानेजर म्हणून हाच गुण घेतला. माझ्या मैत्रिणींच्या सुखा करिता हा प्रोजेक्ट मांडला. तुला पटला तसा इतरानाही पटो. महेंद्र जी च्या सौ. शी बोलणे झाले तर हि पोस्ट वाचा म्हणून तू हि उपयोग सांग कारण हि पोस्ट मुलींची म्हणून त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. २५० रुपयात मेड मिळते पण ती दिवसात एकदा च येते. भांड्या करता मेड ची गरज कमी होऊन पैशांची बचत, व स्त्रियांचा मानसिक, अकारण शारीरिक ताण कमी होतो. हे सर्वाना समजावून सांग. एक मेका सहाय करू………
नोव्हेंबर 06, 2009 @ 06:05:40
अनुजाताई या विषयावरचं एकच विरोधी मत आहे तेही लिहिते. सध्याच्या काळात जिथं पाणी वाचवणं खूप गरजेचं झालं आहे तेव्हा अशा प्रकारच्या मशिनला लागणारं पाणी हा एक चर्चेचा विषय आहे. भारतात तर कामवाल्याही कशा नळ सतत चालु ठेवुन काम करतात तेही बंद करायला हवं…जाऊदे जास्त भरकटतेय…खरं तर अमेरिकेत प्रत्येक घरात डिशवॉशर असतोच पण मी स्वतः इथे कामवाल्या नसतात तरी पुर्वी अगदी रोज वापरणं टाळते. फ़क्त पाण्याची बचत करावी म्हणून..आता मुल झाल्यावर पर्याय नाही कारण कामंही वाढलीत..पण …असो….
नोव्हेंबर 06, 2009 @ 11:20:50
अपर्णा,
मशीन मध्ये पाणी स्पिर्न्कल ने पडते. त्यामुळे पाणी धो धो वाहणाऱ्या पाण्यापेक्षा निश्चित कमी लागते. तुला तर माहिती आहेच.आत्ता आत्ता आपण कपड्याचे मशीन सहज वापरतो. भारतीय मनोवृतीत नवीन शोध व त्याचा दैनिक जीवना करता उपयोग करून घेण्यासाठी वेळ जावा लागतो. उदा. मायक्रो, व्ह्याक्युम क्लीनर इत्यादी. काही प्रमाणात जर उपयोग करून घेतला तर खरच ह्या दमणूक करणाऱ्या कामातून काही अंशी तरी आराम मिळतो.