विसरलेली तारीख………..

विसरलेली तारीख………..

तिच्या नवीन नोकरीचा पहिला दिवस म्हणून वडिलांनी दुसऱ्या दिवशी हॉस्पिटल मध्ये जाण्याचे ठरविले. ह्रदयाच्या आजाराने निवृत झाल्याबरोबर डोके वर काढले. कन्येची नोकरी हे त्यांचे स्वप्न पूर्ण होत होते.समजूतदार,मनमिळाऊ,कर्तबगार जावई मिळाला, नातू बागडायला लागला, लहानीची छकुली, ह्यांचात रमण्याची वेळ. मुलाचे करियर बहरताना पहायचे होते. आई शी निवांत गप्पा करायच्या होत्या. असे मनसुबे वडिलांनी निवृत्त होईन तेंव्हा रचले होते. फार मोठ्या हुद्द्यावर काम केले. निवांत आयुष्य रेखाटले होते. एक हि दिवस विष्णू सहस्त्र नाम शिवाय गेला नाही.

संसार व परमार्थ ह्यांची सांगड उत्तम घालून प्रपंच नेटका केला. पण नियतीचा डाव वेगळा होता. हॉस्पिटल मध्ये दुसऱ्या दिवशी आय. सी. यु. त्यांना ठेवले गेले. लेकीचे जाणे सुरु झाले. तिच्या नवीन नोकरी बद्धल हितगुज करीत होते. वडिलांचा वाढ दिवस आला. तिने त्यांना शुभेश्च्या पत्र दिले. आवर्जून नातवंड आली म्हणून केक आणवून घेतला.आबा, आबा करीत तीही रमली. उपचार करता करता दोन महिने झाले.

एक दिवस त्यांची तब्येत खालावली. शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय झाला. घरची व्यवस्था हादरली कोण कोणाची समजूत काढणार? धीर गोळा करून सगळे जमले. नातवंडाचा पापा घेतला. पण त्यांची कन्या मात्र शून्यात नजर लावून बसलेली पहिली. आय. सी. यु. त थांबता येत नाही. म्हणून सर्व खाली त्यांच्या खोलीत बसली. थोडा थोड्या वेळ आई,ती,भाऊ,बहिण, जाऊन येत होते. तपासण्या सुरु होत्या. लेक बाबां पाशी गेली. वडीलांनी तिचा हात घट्ट हातात धरला व म्हणाले,” माझी जाण्याची वेळ आली” लेक भरलेल्या डोळ्यांनी पाहत होती. हे अश्रू पण नको त्या वेळी डोळ्यात येतात व ते पुसण्यासाठी डोळे बंद होतात व आपले माणूस क्षणभर दिसत नाही.
मला जाऊदे बाळा. विष्णू नेण्यासाठी आले आहेत. वर बघ किती सुरेख रथ आणला आहे. तुझी कार कशी मी खिडकीतून पहिली होती तसाच सुंदर रथ आहे.नमस्कार कर. लेकीने वर पाहून नमस्कार केला तिला बाबांचे विष्णू वरचे अगाध प्रेम माहिती होतेच पण बाबांच्या वाक्यांवर प्राणापेक्षा जास्त विश्वास होता . बाबा ते नंतर येणार नाहीत का? वेडाबाई, ज्याचे मी आयुष्यभर नाम घेतले त्यांना माझ्या स्वार्था करता परत पाठवले तर यम येईल. जन्ममृत्यूच्या फेऱ्यात पुन्हा अडकेन. पण आम्हाला तुम्ही हवे आहात. त्यालाही मी हवा आहे. नारायण परत जातील हि, पण मला पुन्हा दिसणार नाहीत. बाबांचे ऐकतेस न बेटा.मला जाऊ दे. ती नाही नाही म्हणत होती, मी आईला बोलावते. नको जगत नियंत्र्याला आपण थांबवणे योग्य नाही. बाबा पुन्हा भेटाल का? हाक. मारली तर दिसाल का? स्वप्नात येऊन गप्पा कराल का? लेक प्रश्न विचारून भंडावत होती. मी विष्णू च्या चरणा पाशीच आहे. माझे देवाचे काम झाले कि तुझा हा हट्ट पूर्ण करीन.

कन्येला देवाची गोष्ट सांगत होते. तिला समाधान कसे मानावे ते शिकवत होते. वडिलांचा मृत्यू सकारात्मक घेण्यासाठी तिला तयार करीत होते. तिच्या जीवना करिता, संसारा करिता, माहेर करिता तिचाच आधार तिला देवून भक्कम करीत होते. निरोप घेत नव्हते तर जीवन शिकवत होते. हृदयाच्या वेदना काळजाच्या तुकड्याकरिता पण ठेऊन जात नव्हते. वडिलांना यमाच्या ताब्यात कसे द्यावे लेकीला प्रश्न पडला. विष्णू ला स्वीकारत ‘ह्नं’ असा उच्चार निघाला. लेकीच्या डोक्यावर हात ठेवून बाबांनी डोळे बंद केले. ती शांत पणे बाहेर पडली. आईचा आकांत तिला पाहवत नव्हता पण कितीही संकट आले तरी ती आता एकटी नव्हती. विष्णू स्थाना वरून तिचे बाबा तिला पाहत होते. तिला कधीही स्वप्न पडले नाही, कि तिला कधी बाबा दिसले नाहीत. एकच समाधान होते कि तिच्या मूळे बाबा देवापाशी पोहचले, यमा पासून तिने त्यांना वाचवले. बाबांची कन्या, त्यांची मृत्यू ची तारीख पण विसरली. दर वर्षी आईला विचारते आई बाबा २३ ऑगस्ट ला गेले का २४ तारखेला. कारण ह्या गोष्टीला १० वर्ष झाली. एक हि दिवस ती वडील नाहीत हे लक्षात ठेवत नाही. फक्त त्यांचा वाढदिवस ११ ऑगस्ट चा साजरा करते. योगायोगाने तिच्या सासऱ्यांचा म्हणजे तिच्या बाबां चा पण वाढदिवस त्याच तारखेला आहे.लेक आता सासरी बाबां करिता जाते.

देव आहेत का? यम आहे का? ह्या गोष्टीना महत्व नाही. लेकी साठी मात्र बाबा सकारत्मक दृष्टीकोन देवून गेले. अशी विसरलेली तारीख, असा निरोप, नव्हे तर अशी जीवनाची नव्याने करून दिलेली ओळख.

Advertisements

21 प्रतिक्रिया (+add yours?)

 1. sahajach
  Nov 01, 2009 @ 16:35:12

  kaay lihu g???? Mala mahitiye tujhya babancha aaNi sasaryancha vadhadiwas ek aahe….tujhi majbut vicharsarani tujhya babanchi he janavatey aata….

  प्रत्युत्तर

 2. अनिकेत
  Nov 02, 2009 @ 08:31:56

  खुप्पच छान लिहिलं आहे, लेख आवडला आणि भावला ही

  प्रत्युत्तर

 3. anukshre
  Nov 02, 2009 @ 08:54:43

  सहजच आणि अनिकेत, काही आधार कायमचे आपल्याला मिळालेले असतात. सुप्त पणे मनात ठसलेले असतात.जेंव्हा भावना प्रकट होतात, आधारही व्यक्त होतात. मी प्रतिक्रिया करता बहाद्धर, लिखाणाचा प्रयत्न करते. तुमच्या सारख्या ब्लॉग जेष्ठ,श्रेष्ठान कडून मिळालेली पसंती, आधारालाही उभारी देते.

  प्रत्युत्तर

 4. Aparna
  Nov 02, 2009 @ 20:20:42

  माझ्या डोळ्याच्या कडा ओलावल्या..खरंच खूपच कठिण प्रसंग आहे हा…आणि अशी धीराची लेकच तो इतक्या ताकदीने सांगु शकते इतकंच म्हणू शकते…

  प्रत्युत्तर

 5. HEENA
  Nov 02, 2009 @ 20:32:23

  खुपच छान हे फक्ता तूच लिहू शकतेस.

  प्रत्युत्तर

 6. देवेंद्र चुरी
  Nov 02, 2009 @ 20:33:59

  भावस्पर्शी आणी प्रेरणादायी आहे लेख, आवडला.

  प्रत्युत्तर

 7. anukshre
  Nov 03, 2009 @ 09:30:37

  अपर्णा, देवेंद्र,

  ब्लॉग सुरु केल्यापासून पाचव्या पोस्ट ला पाच प्रतिक्रिया आहेत. आपण वाचता मी खुश झाले, आपल्या प्रतिक्रिया लिहिण्यासाठी उत्तेजन देतात. मी आवर्जून सर्वाना निदान मी पोस्ट वाचली असे कळवते. प्रतिक्रिया स्वीकारताना, आपणही दुसऱ्या ब्लॉग्स ना, प्रतिक्रियांचा हा आनंद देऊ शकतो. इतक्या सोप्या पद्धतीने स्वताकरिता समाधान मिळवू शकतो. आपल्या प्रतिक्रिया मला सन्माननीय आहेत. मी आपल्या मार्गदर्शनासाठी सुद्धा उत्सुक आहे.

  प्रत्युत्तर

 8. anukshre
  Nov 03, 2009 @ 09:46:14

  हीना,

  ब्लॉग वाचणार व आवर्जून प्रतिक्रिया हि देणार ह्यालाच मैत्री म्हणतात. ह्या महिन्याच्या आपल्या मासिकात माझा लेख पहिला छापून आला आहे. काल मला आईने बातमी दिली. तुझ्या आईला कळव. तुझे मत म्हणजे प्रतिक्रिया नेहमी याव्यात. मी वाट पाहीन.

  प्रत्युत्तर

 9. Ashwini
  Nov 03, 2009 @ 11:15:02

  chan lihile aahe ……………..

  प्रत्युत्तर

 10. महेंद्र
  Nov 03, 2009 @ 11:28:02

  गेले दोन दिवस जरा घाई गर्दी मधेच गेले म्हणुन लेख वाचायचा राहुन गेला. पॉझीटीव्ह थिंकींग च चांगलं उदाहरण आहे . आवडला लेख.

  प्रत्युत्तर

 11. anukshre
  Nov 03, 2009 @ 12:20:31

  अश्विनी,

  आपले ब्लॉग वर स्वागत. मी लिहिण्याचा प्रयत्न करते. ब्लॉग विश्वात सगळ्यांनी आग्रह केला म्हणून पोस्ट करीत असते. आपणास वाचून कसे वाटते हे माझ्या लिहिण्याकरिता प्रोत्साहन असते. असाच लोभ असावा.

  प्रत्युत्तर

 12. anukshre
  Nov 03, 2009 @ 12:26:53

  महेंद्रजी,

  उशीर झाला तरी चालेल. मी आपली व्यस्तता समजू शकते. ज्यांनी लिहा अशी प्रेरणा दिली, त्यांनी पाठ थोपटली कि छानच वाटते. माझा ब्लॉग सगळ्यात लहान आहे, म्हणून हा छोटासा प्रयत्न केला लिहिण्याचा

  प्रत्युत्तर

 13. भाग्यश्री कुलकर्णी
  Nov 17, 2009 @ 12:43:39

  काय मस्त लिहतेस ग तु हे वाचताना तर डोळे वाहायलाच लागले.

  प्रत्युत्तर

 14. Ajay
  Jan 03, 2010 @ 08:01:11

  अनश्री,

  मुग्धा सारखीच भावस्पर्शी पोस्ट …

  -अजय

  प्रत्युत्तर

  • anukshre
   Jan 03, 2010 @ 14:48:27

   धन्यवाद!
   @मनमौजी, @आनंद, @अजय @मुग्धा
   . पोस्ट वाचण्यासाठी आवर्जून आलात अजून धीर वाढला.
   नवीन वर्ष सुख, समाधानाचे व आनंदाचे होऊ दे . शुभेश्च्या!!

   प्रत्युत्तर

 15. Manmaujee
  Jan 03, 2010 @ 12:00:38

  ही पोस्ट माझ्याकडून मिस झाली होती. आजच वाचली खूप भावस्पर्शी आहे. मनापासून आवडली.

  प्रत्युत्तर

 16. आनंद पत्रे
  Jan 03, 2010 @ 14:29:35

  लेख आवडला!
  धैर्य मिळालं.

  प्रत्युत्तर

 17. mugdhaaa
  Jan 03, 2010 @ 17:25:21

  Chhanach aahe ga post! Navin varshachya shubhechchaa!

  प्रत्युत्तर

 18. हेरंब ओक
  Jan 05, 2010 @ 11:05:29

  खूपच सुंदर आणि सकारात्मक लेख.. !!

  प्रत्युत्तर

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: