बखूर …
उद्………… झाडाचे अश्रू…….धूपाचे झाड! ……..ओमानी कल्पवृक्ष
उद् जे आपण संध्याकाळी मन वृति प्रसन्न व्हावी म्हणून जाळतो. तोच ओमान मध्ये बखूर म्हणुन प्रसिद्ध आहे. ओमान, भारत, इथिओपिया इत्यादी देश ह्याचे मुळ देश म्हणून प्रसिद्ध आहेत. भारतात मी तरी अजून धुपाचे झाड पहिले नाही. इथे ओमान मध्ये दोफार, सलाला भागात सहज बघायला मिळतात. झाड डोंगराळ खडकाळ जमिनीत येते. त्याची उंची साधारण चिक्कू च्या झाडा एव्हढी असते. बुंध्यावर चिरा पाडून उद गोळा केला जातो. त्याला ओमान मध्ये झाडाचे अश्रू म्हणतात.
भारतात पण उद हा सर्व धर्मा मध्ये वापरला जातो. झाडापासून अत्तर, तेल, औषधे( गुढगेदुखी, दमा, विषारीदंश,स्कीन चे आजार) बुद्धी वर्धक , सौंदर्य प्रसाधने, केसांचे वर्धननिगा, अशा डोक्यापासून पायापर्यंत सर्व बाबींकरिता झाड, त्याची फुले, पाने..उपयोगी पडतात. ओमान चा प्रमुख व्यवसायांपैकी हा एक आहे. झाडाचा पर्ण फांद्यांचा घेर छत्री प्रमाणे असतो. वर्षभर उत्पन मिळत राहते. इथला बखुर प्रती बाबत उच्च असून जगभर निर्यात होते.
इथले ओमानी सरकार, प्राणपणाने हि झाडे जपतात. त्यावर खूप प्रेम करतात. ओमानच्या डोंगराळ भागात आढळणारा हा धूप शहरात पण प्रतीकांच्या रुपात ‘राउंड अबाउट’ (म्हणजे भारतात रस्त्या वरचे नाके) येथे उभे केले आहेत. ओमानी माणूस जेथे तिथे बखुर लावलेला असतोच. झाडा ला फारशी निगा लागत नाही. थोडासा काटेरी झाडा सारखा अविर्भाव असतो. बखुर झाडे पाहण्यासाठी मुद्दामहून प्रवासी जातात. ओमानी बाहेर जाताना बखुर चे भांडे कपड्या भोवती फिरउन मगच बाहेर पडतो. त्याच्या घरात कायम बखुर पेटता असतो. प्रवेश द्वाराजवळ ठेऊन सुगंधित स्वागत केले जाते.

Round About
अशी ही धुपाची झाडे मी घेऊन आले फोटोंच्या रुपात सर्वांसाठी………………………..
ऑक्टोबर 30, 2009 @ 13:37:06
ताई पोस्ट छान आहे….फोटो पण मस्त…. आपल्या ओमानची माहिती नाहीये फारशी त्यामूळे असे पोस्ट हवेच!!! पण पोस्टला नाव का नाही दिलेस?????त्यामूळे ते काहितरी ’३९’ दाखवत आहे…ते एडिट कर आणि नाव टाक….
ऑक्टोबर 30, 2009 @ 14:19:47
तन्वी, अग् पोस्ट नंतर पब्लिश करणार होते. पण बहुतेक घाईत नाव द्यायचे राहून गेले. आठवण केलीस आणि नाव दिले. ओमान च्या पोस्ट तयार आहेत. एक एक करून पाठवते.
ऑक्टोबर 30, 2009 @ 15:34:56
धुपासाठी राळ आणि गुगुळ वापरतात. हे झाड कसलं आहे? राळ की गुगुळ?? गुगुळ हा आयुर्वेदामधे तर सांधेदुखीकरता पण वापरला जातो..
ऑक्टोबर 31, 2009 @ 01:00:20
उपयोगी माहिती आहे..सर्व पोस्ट हळुहळु टाकुन द्या..आणि चार दिवस नेटशिवाय म्हणजे मला तर कंटाळाच येईल. तुमच्याकडे अशावेळी एखादं कॉफ़ीचं दुकान नाहीतर वाचनालयात नेट मिळतं का??
ऑक्टोबर 31, 2009 @ 07:47:29
गुगुळ सांधे दुखी करता उपयोगी असतो पण मला जर पुढे कधी माहिती मिळाली.तर नक्की पाठवीन. सुट्टीत तिकडे मुद्दामहून जावे लागते, बघू कधी जाणे होईल.
ऑक्टोबर 31, 2009 @ 07:58:52
अपर्णा,
इकडे वाचनालये नाहीत. खूप कमी ठिकाणी इंटरनेट शॉप बाहेर आहेत. ओमानी सरकार खूप नियंत्रण ठेवते. अचानक आर. ओ. पी. म्हणजे रॉयल ओमानी पोलीस चेकिंग करतात. घरी नाही बाहेर दुकानात. खूपशा बाबी ब्यान आहेत.मी आता ओमान बद्धल पोस्ट टाकीन तेंव्हा वाच. दुबई एव्हढे फ्री नाही. मुंबई व पुणे जो फरक आहे तसाच. पुण्या सारखे शांत, निसर्ग सौंदर्य इकडे आहे. दुबई म्हणजे नुसत्या उंच इमारती.
नोव्हेंबर 07, 2009 @ 11:06:20
VERY GOOD INFORMATION!!!SINCE 8YRS I AM STAYING IN OMAN(MUSCAT) BUT NEVER SEEN THOSE “BAKHOOR” TREES. THANKS FOR THE DETAILED INFORMATION WITH THOSE WONDERFUL PICTURES. I KNOW THAT IT IS ONE OF THE MOST POPULAR OMANI PRODUCT BUT I WAS NOT AWARE OF ALL THESE DETAILS. CONGRATS!! AND DO WRITE IN FUTURE MORE ABOUT “OUR” OMAN.AND PL.SEND THE LINK OF THIS SO THAT I’LL ASK ULKA TO READ WHICH IS HELPFUL FOR THEIR SCHOOL PROJECT.
नोव्हेंबर 07, 2009 @ 11:51:13
Thanks,heena for reading my post……i will forward the link to you very soon.