अभ्यासाच्या नावाने ………………

अभ्यासाच्या नावाने ………………

चार दिवस नेट नव्हते म्हणून कधी नव्हे ते बऱ्याच वेळ टीव्ही समोर होते. आज पोस्ट चे नाव पूर्ण लिहू शकले नाही. खूप दिवस मनात रेंगाळत होता विषय, तशी मी सुरवात दम दमा दम……पोस्ट (सहजच ब्लॉग वर आहे) ने केली होती. परंतु अस्वस्थता होतीच. त्याचवेळी मी टी. व्ही. वर पाहिले कि, महेश मांजरेकरचा ‘शिक्षणाचा आयचा घो’ नवीन सिनेमा येतोय.

मला अजूनही आठवते, अल्यूमिनीअम ची पत्र्याची पेटी, किंवा पिवळे दप्तर, कडीचा दोन कप्प्याचा खाऊचा डब्बा, कितीतरी सेंटी…….भावनिक गोष्टी जुडलेल्या आहेत. शाळेचा प्रत्येक कोपरा एक पोस्ट होऊ शकते. आठवणींचे ठीक आहे हो आपल्याकडे त्या आहेत, पण आता शाळेतील विद्यार्थी मला किंवा तुम्हाला बघणे सुद्धा कठीण होऊन बसले आहे. जड जड स्याक्स पाठीवर, पाठीचे धनुष्य झालेले, पाय ओढत, शाळेकडे जाताना दिसतात. काय आठवणी घेऊन ते बाहेर पडतील? शिक्षण, शाळा म्हटले की आमची लेखणी सरसावली म्हणून समजा. पूर्वी पण पुस्तके होतीच, अभ्यास ही असायचाच, पण दडपण कधी जाणवले नाही.

एकेदिवशी लेकाने मला प्रश्न विचारला, ”आई, तुला शाळेचे खूप कळते ना मग असा देश शोधून दे की, ज्या शाळेत इतिहास भूगोल चे प्रोजेक्ट असतील, पेपर नसेल. मी मोठा झालो की त्या देशात नोकरी शोधेन. माझ्या मुलांना मी हा त्रास होऊ देणार नाही” समाज शास्त्राची शिक्षिका मी हतबल झाले. मी कमी पडले का शिकवायला? इतिहास तर मी त्याला गोष्टी सारखा शिकवला, भूगोल तर माझाच विषय. छे! मी नाही कमी पडले. आज २० वर्ष होतील मी शिक्षिका होऊन, मग हा असे का बरे बोलला? गुणात मोजायचे तर २ ते ४ इतकेच गुण कमी असतात. पण ह्या विषयांची उदासीनता खूप आहे आणि शिक्षण क्षेत्रात तर खूप खोल रुजलेली आहे. त्याचाच परिणाम मुलांना भोगावा लागतो. मुलाची नावाजलेली सी. बी. एस. सी शाळा आहे. शाळेत मी पण काही काळ शिक्षिका म्हणून काम केले आहे.

१) सध्या फळ्यांच्या ऐवजी स्मार्ट इलेक्ट्रोनिक बोर्ड आहेत. शिक्षिका जागेवर इलेक्ट्रोनिक पेन्सिलीने लिहिते, बोर्ड वर आपोआपच उमटते. शिक्षकांचे खूप परिश्रम कमी होतात.
२) आठवड्याचा अभ्यासक्रम पालकांना त्यांच्या ई.मेल वर पाठवला जातो.
३) विषयां नुसार दृक श्रवण फिती दाखवल्या जातात.
४) सुसज्ज संगणक वर्ग आहे, जिम आहे, तरणतलाव आहे, शाळेचे डॉक्टर आहेत.
५) सध्या दहावीला मुलांना लॉकर उपलब्ध आहेत,ज्यांची एक चावी वर्ग शिक्षक कडे असते.

अशा अनेक सुसज्ज शाळा मॉल प्रमाणे, भरपूर फी घेऊन भारतात पण आहेत. मुले खुश ठेवण्याचा प्रयत्न. शाळेत शिक्षक पण उच्च विद्याभूषित अनुभवी असतात. ह्या मलम पट्या, मूळ दुखणे जात तर नाहीच, तर ते अधिक दुख:कारी, ठरतात. वरील पैकी काहीतरी बाबी महापालिकेच्या शाळेत करता येण्याजोग्या आहेत. बोर्ड आता नाही तरी परीक्षा आहेतच की, काही विषय प्रयोगशील ठेऊन त्याचे मूल्यमापन करावे. दुःख रहाते याचे कि, विद्यार्थ्यांना ते घोकून निरर्थक पणे पाठ करून जावे लागते. शिक्षण मंत्री सुशिक्षित हवेत निदान शिक्षक तरी द्वि पदवीधर हवा तर समाज शास्त्र हे प्रोजेक्ट द्वारे कसे शिकवता येते इतकी डेप्थ त्याच्या, ज्ञाना करता तयार होते. शाळा कितीही सुसज्ज असली तरी पुस्तकांचे ओझे, अकारण वह्या, ते तरी कमी करणे शक्य आहे.

समाज शास्त्र शिकवा पण ते प्रोजेक्ट चे माध्यम करून. बाबर ला किती मुले ह्याचा संगणक युगात कितीसा उपयोग? जगात भारतीय बुद्धिमान म्हणून, भारतीय शिक्षण स्तर उच्च प्रतीचे आहे. हि अभिमानास्पद बाब आहे मग हाच भारतीय कॉर्पोरेट जगात स्ट्रगल करताना दिसतो. कारण शिक्षणाच्या ह्या अकारण वाढवलेल्या ओझ्यामुळे, दडपणामुळे.
मला लेकाने असा प्रश्न का विचारला त्याचे उत्तर मिळाले. अकारण वाढवलेल्या पाठांमुळे मुले कंटाळतात व उदासीनता वाढू लागते. शिक्षण पद्धती शासन स्तरा पासून बदलली पाहिजे. नुसते अद्यावत शाळा निर्माण करून होणार नाही तर मूळ अभ्यासक्रम बदला. विषयांची डेप्थ ठेवा पण काही विषय प्रयोगशील करून मुलांचा, पालकांचा ताण कमी झाला तर सुसंकारीत शिक्षणाचा अभिमान पुढील पिढीत निर्माण होईल. माझी शाळा छान आहे पण इंडियातून बोर्ड कमी केले पण लिहिण्याच्या परीक्षे पेक्षा प्रोजेक्ट का ठेवले नाही निदान सोशल विषय तरी . आम्हालाही शिवाजी, झाशी ची राणी आवडतात पण सोशल बोअर होते. अशी पिढी बनणे घातक आहे. स्वातंत्र्याची जाणीव, बलिदाने, वैभव शाली इतिहास, वैविध्य पूर्ण भूगोल हि भारतीय परंपरा पुढे अविरत जाण्यासाठी शिक्षण, अभ्यास पद्धती, ह्यावर विचार व कृती करून काळाच्या गरजानुसार नवीन बदल गरजेचे आहे .

हुमायून ने काय केले हा इतिहास शाळेतच तासाला विद्यार्थांचा गट तयार करून प्रोजेक्ट सारखे लिहून घेतले तर, विषय गोडी वाढून सर्वांचा सहभाग असेल. गणित ला महत्व व्यावहारिक जगात आहे. शाळेत त्याचा सराव अधिक करून घेतला तर गणित बद्धल आत्मविश्वास दुणावेल. सगळे करणे शक्य आहे जर शासनाने शिक्षक शाळे करता ठेवले तर, मतदान, जनगणना, अकारण ठेवलेले उपक्रम अशा अनेक गोष्टीं करिता शिक्षक भरडला जातो. महिने महिने शाळेशी संपर्क नसतो. मुख्य म्हणजे शिक्षक व विद्यार्थी हे नाते ताणाशिवाय मुक्त होईल. कार्यानुभव सारखे विषय शाळेत असतात, त्यांना पूरक असे प्रशिक्षण ठेवले तर मुलांना त्यांच्या व्यवसायाकरिता उपयोगी ठरेल. महाराष्ट्र राज्यात ह्या बाबी कमी आढळतात. केंद्र सरकार त्यांच्या शाळा अद्यावत करते तर मग मराठी शाळा मागे का? कारण राज्य शिक्षण मंडळ! घरचा अभ्यास कधी द्यायचा ह्याचे पण नियोजन करून वेळापत्रक दिले तर वह्यांचे ओझे कमी होऊ शकते. वर्षभर मुलांना ताण कमी पडू शकतो. असे बरेच पर्याय आहेत.राज्य, शिक्षण मंडळ यांच्या नियोजनावर अवलंबून आहे.

‘शिक्षणाचा आयचा घो’ ……………..सिनेमा, बघू या कसा विचार मांडतो ते

13 प्रतिक्रिया (+add yours?)

 1. महेंद्र
  ऑक्टोबर 30, 2009 @ 15:31:37

  समाज शास्त्र शिकवा पण ते प्रोजेक्ट चे माध्यम करून. बाबर ला किती मुले ह्याचा संगणक युगात कितीसा उपयोग?

  hyaa prashanache uttar milalae tar ha prashan sutala..

  उत्तर

 2. Aparna
  ऑक्टोबर 31, 2009 @ 00:58:33

  भूगोलाची एक कायम लक्षात राहिलेली आठवण म्हणजे मला वाटतं आम्हाला साधारण पाचवी सहावी पासुन दहावीपर्यंत नेहमी टुंड्रा प्रदेश, इग्लु इ. बद्द्ल धडा असायचा आणि आता इथे उत्तर अमेरिकेत आल्यावर लक्षात आले की इग्लु वगैरे कधीच अदृष्य झालेत…(मला तेव्हा नेहमी इच्छा होती एखाद्या इग्लुमध्ये जाऊन राहायची आता एकदा अलास्काला जाऊन पाहुन येईन..एखादा शिल्लक आहे का??)
  मागच्यावेळी भारतात गेल्यावर भाचीचा भूगोलाचा अभ्यास घेताना तिच्यापेक्षा मलाच जड जात होतं…:)
  वेगळा विषय मला वाटतं आपल्या शिक्षणपद्धतीची एक त-हा आणि अति प्रोजेक्ट्स वाल्या इथल्या शिक्षणपद्धतीची दुसरी..मुलांना जवळजवळ अभ्यासच नसतो…आता खरंच प्रश्न पडलाय नक्की कुठे शिकवायचं मुलाला??? अजुन चारेक वर्षाततरी निर्णय घ्यावा लागेल ना??

  उत्तर

 3. anukshre
  ऑक्टोबर 31, 2009 @ 07:41:49

  अपर्णा, महेंद्रजी,
  खरय तुमच म्हणण. सध्याच्या शैक्षणिक बाबत अशी परिस्थिती आहे. कदाचित लेकाची दहावी जवळ येतेय त्यामुळे हल्ली जरा जास्त काळजी वाटते.

  उत्तर

 4. bhaanasa
  ऑक्टोबर 31, 2009 @ 08:34:11

  बाबर हुमायून,आपल्यावर झालेली निरनिराळी आक्रमणे,आपले शिवाजीमहाराज,पेशवे- पानीपतची लढाई, इत्यादी इतिहासा बरोबरच आता सगळा स्वातंत्र्यसंग्राम, महात्मा गांधी पासून ते अगदी कालपर्यंतचे थोर[?] लोक,Scientists….. मुले तरी किती काय रट्टा मारणार. भूगोलाचा अभ्यास मात्र खूप आवश्यक…अपर्णा म्हणते तसे काही गोष्टी कालबाह्य झाल्यात.आपली शिक्षणपध्दती व इथली शिक्षणपध्दती यात इतका फरक आहे की खरेच फार गोंधळ उडतो मनाचा.

  उत्तर

 5. भुंगा
  डिसेंबर 16, 2009 @ 09:16:55

  असा लेख एक शिक्षिकाच लिहु शकते यात वाद नसावा. शिक्षण पद्धतीबरोबरच शिकण्याच्या पद्धतीही बदलल्यात. कदाचित शिक्षण मंडळ आपणासारख्या सुज्ञ – विचारी लोकांचा विचार घेऊन नविन शिक्षण प्रणाली तयार करेल/ करावी असं मला वाटतं.

  उत्तर

  • anukshre
   डिसेंबर 16, 2009 @ 09:34:16

   भुंगा आपण लगेच पोस्ट वाचलीत व अभिप्राय पण दिलात मनापासून धन्यवाद. आपली आजची पोस्ट वाचून माझ्या सारखीचा म्हणजे शिक्षिकेचा विचार कसा आहे हे समजून घ्यावा
   ह्या साठी मी आपल्या पोस्ट वर माझी लिंक दिली. आपण विझिट देवून माझा विचार समग्र पणे समजून घेतलात खूप छान वाटले.

   उत्तर

 6. Kanchan Karai
  डिसेंबर 16, 2009 @ 12:05:04

  काळानुसारा शिक्षण देण्याची माध्यमं बदलत आहेत पण शिक्षणपद्धती अजूनही तशीच आहे. तीदेखील बदलायला हवी असं वाटतं. ब-याचदा हुमायुन आणि बाबरचा इतिहास विद्यार्ध्याला त्याच्या पुढील आयुष्यात कुचकामी ठरतो. इटली देशातील रेगिओ एमिलिया या शहरात अशी शिक्षणपद्धती उपलब्ध आहे, जिथे मुलांना त्यांच्या वास्तविक आयुष्यात आवश्यक असणा-या गोष्टींबद्दल शिकवले जाते. थोडंसं आनंदवन सारखंच. ह्या विषयावर मी एक लेख लिहिला आहे. इथे त्याचा दुवा देत आहे. वेळ मिळाल्यास अवश्य वाचा.

  उत्तर

  • anukshre
   डिसेंबर 16, 2009 @ 12:35:17

   लेख वाचला, रवींद्रनाथ टागोर ह्यांच्या विचारांशी बरीचशी मिळती जुळती शिक्षण पद्धती आहे. पालकांचा सहभाग ही पद्धती अनुसरणीय आहे. असे स्वप्नाच्या गावाची शाळा पुढच्या पिढी साठी असली तर बरेचसे प्रश्न प्रश्नच राहणार नाहीत. परंतु भारतीय शैक्षणिक वास्तव तरी काहीसे बदलले तरी खूप म्हणायचे.
   लेख माहिती पूर्ण वाटला, आवडला, लिंक दिलीत व आवर्जून मला भेट दिलीत आभारी आहे.

   उत्तर

 7. आनंद पत्रे
  डिसेंबर 18, 2009 @ 22:50:09

  अनुश्रीजी, तुमचे, भुंगाचे विवेचन बर्याच प्रमाणात योग्य आहे, कदाचीत संपुर्ण देखिल.
  याचा अर्थ असा नाही की शिक्षण हे संपुर्ण चुकीचे आहे, बाबर, हुमायुनचा इतिहास जर संगणक युगात कामाचा नाही, तर शिवाजीराजांचा इतिहास सुद्धा कामाचा ठरणार नाही. त्यासाठी खर्या, इतिहासकाराची गरज आहे, जो त्या अभ्यासक्रमाचा आपल्या आयुष्यात योग्य उपयोग करील.
  कुणीही २-३री पासुन करिअर ठरवु शकत नाही, त्याने सर्व विषय शिकले तर तो ठरवु शकतो की त्याला कशात करिअर करायचे आहे…
  अर्थात, शिक्षण पध्दती पेक्षा परिक्षा पध्दती बदलली पाहिजे असे माझे मत आहे…
  तुमच्या, भुंगाच्या आणि कांचनजीच्या भावना मात्र योग्य आहेत.

  धन्यवाद!

  उत्तर

  • anukshre
   डिसेंबर 19, 2009 @ 07:16:07

   धन्यवाद आनंद,
   आपण सुवर्ण मध्य करायचा. हे वाईट, ते वाईट असे दोष शोधून त्या करिता आकडतांडव करण्या पेक्षा पर्याय शोधा. असा माझा विचार माझा नेहमी असतो. मराठी माणसाने कसा विचार करावा या बाबत एक छान पोस्ट माझ्या वाचण्यात आली आहे. लिंक देते वाचून पहा व निश्चित कळवा. मला
   व त्या लेखकांना पण.

   उत्तर

 8. आनंद पत्रे
  डिसेंबर 19, 2009 @ 11:02:29

  नरेंद्रप्रभू आणि तुमचा, दोन्ही लेख उत्तम आहेत. मराठी माणसाला विचाराची कक्षा वाढवणे आवश्यक आहे. एकदम सहमत.

  उत्तर

 9. SHUBHAMDADA SHINDE
  जुलै 06, 2010 @ 19:50:30

  I AM MARATHA THE GREAT

  उत्तर

  • anukshre
   जुलै 23, 2010 @ 11:40:13

   श्री. शुभमदादा नमस्कार,
   अनुक्षरे तर्फे आपले स्वागत!
   आपली प्रतिक्रिया मिळाली मी दोन महिने पुण्यास सुट्टी करता असल्याने आपणास कळवण्यास विलंब झाला. क्षमस्व. काल मी मस्कत ला परत आले आले लवकरच पुढील पोस्ट असेल. आवर्जून वाचण्यास या व आपला अभिप्राय कळवा.

   उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: