अभ्यासाच्या नावाने ………………

अभ्यासाच्या नावाने ………………

चार दिवस नेट नव्हते म्हणून कधी नव्हे ते बऱ्याच वेळ टीव्ही समोर होते. आज पोस्ट चे नाव पूर्ण लिहू शकले नाही. खूप दिवस मनात रेंगाळत होता विषय, तशी मी सुरवात दम दमा दम……पोस्ट (सहजच ब्लॉग वर आहे) ने केली होती. परंतु अस्वस्थता होतीच. त्याचवेळी मी टी. व्ही. वर पाहिले कि, महेश मांजरेकरचा ‘शिक्षणाचा आयचा घो’ नवीन सिनेमा येतोय.

मला अजूनही आठवते, अल्यूमिनीअम ची पत्र्याची पेटी, किंवा पिवळे दप्तर, कडीचा दोन कप्प्याचा खाऊचा डब्बा, कितीतरी सेंटी…….भावनिक गोष्टी जुडलेल्या आहेत. शाळेचा प्रत्येक कोपरा एक पोस्ट होऊ शकते. आठवणींचे ठीक आहे हो आपल्याकडे त्या आहेत, पण आता शाळेतील विद्यार्थी मला किंवा तुम्हाला बघणे सुद्धा कठीण होऊन बसले आहे. जड जड स्याक्स पाठीवर, पाठीचे धनुष्य झालेले, पाय ओढत, शाळेकडे जाताना दिसतात. काय आठवणी घेऊन ते बाहेर पडतील? शिक्षण, शाळा म्हटले की आमची लेखणी सरसावली म्हणून समजा. पूर्वी पण पुस्तके होतीच, अभ्यास ही असायचाच, पण दडपण कधी जाणवले नाही.

एकेदिवशी लेकाने मला प्रश्न विचारला, ”आई, तुला शाळेचे खूप कळते ना मग असा देश शोधून दे की, ज्या शाळेत इतिहास भूगोल चे प्रोजेक्ट असतील, पेपर नसेल. मी मोठा झालो की त्या देशात नोकरी शोधेन. माझ्या मुलांना मी हा त्रास होऊ देणार नाही” समाज शास्त्राची शिक्षिका मी हतबल झाले. मी कमी पडले का शिकवायला? इतिहास तर मी त्याला गोष्टी सारखा शिकवला, भूगोल तर माझाच विषय. छे! मी नाही कमी पडले. आज २० वर्ष होतील मी शिक्षिका होऊन, मग हा असे का बरे बोलला? गुणात मोजायचे तर २ ते ४ इतकेच गुण कमी असतात. पण ह्या विषयांची उदासीनता खूप आहे आणि शिक्षण क्षेत्रात तर खूप खोल रुजलेली आहे. त्याचाच परिणाम मुलांना भोगावा लागतो. मुलाची नावाजलेली सी. बी. एस. सी शाळा आहे. शाळेत मी पण काही काळ शिक्षिका म्हणून काम केले आहे.

१) सध्या फळ्यांच्या ऐवजी स्मार्ट इलेक्ट्रोनिक बोर्ड आहेत. शिक्षिका जागेवर इलेक्ट्रोनिक पेन्सिलीने लिहिते, बोर्ड वर आपोआपच उमटते. शिक्षकांचे खूप परिश्रम कमी होतात.
२) आठवड्याचा अभ्यासक्रम पालकांना त्यांच्या ई.मेल वर पाठवला जातो.
३) विषयां नुसार दृक श्रवण फिती दाखवल्या जातात.
४) सुसज्ज संगणक वर्ग आहे, जिम आहे, तरणतलाव आहे, शाळेचे डॉक्टर आहेत.
५) सध्या दहावीला मुलांना लॉकर उपलब्ध आहेत,ज्यांची एक चावी वर्ग शिक्षक कडे असते.

अशा अनेक सुसज्ज शाळा मॉल प्रमाणे, भरपूर फी घेऊन भारतात पण आहेत. मुले खुश ठेवण्याचा प्रयत्न. शाळेत शिक्षक पण उच्च विद्याभूषित अनुभवी असतात. ह्या मलम पट्या, मूळ दुखणे जात तर नाहीच, तर ते अधिक दुख:कारी, ठरतात. वरील पैकी काहीतरी बाबी महापालिकेच्या शाळेत करता येण्याजोग्या आहेत. बोर्ड आता नाही तरी परीक्षा आहेतच की, काही विषय प्रयोगशील ठेऊन त्याचे मूल्यमापन करावे. दुःख रहाते याचे कि, विद्यार्थ्यांना ते घोकून निरर्थक पणे पाठ करून जावे लागते. शिक्षण मंत्री सुशिक्षित हवेत निदान शिक्षक तरी द्वि पदवीधर हवा तर समाज शास्त्र हे प्रोजेक्ट द्वारे कसे शिकवता येते इतकी डेप्थ त्याच्या, ज्ञाना करता तयार होते. शाळा कितीही सुसज्ज असली तरी पुस्तकांचे ओझे, अकारण वह्या, ते तरी कमी करणे शक्य आहे.

समाज शास्त्र शिकवा पण ते प्रोजेक्ट चे माध्यम करून. बाबर ला किती मुले ह्याचा संगणक युगात कितीसा उपयोग? जगात भारतीय बुद्धिमान म्हणून, भारतीय शिक्षण स्तर उच्च प्रतीचे आहे. हि अभिमानास्पद बाब आहे मग हाच भारतीय कॉर्पोरेट जगात स्ट्रगल करताना दिसतो. कारण शिक्षणाच्या ह्या अकारण वाढवलेल्या ओझ्यामुळे, दडपणामुळे.
मला लेकाने असा प्रश्न का विचारला त्याचे उत्तर मिळाले. अकारण वाढवलेल्या पाठांमुळे मुले कंटाळतात व उदासीनता वाढू लागते. शिक्षण पद्धती शासन स्तरा पासून बदलली पाहिजे. नुसते अद्यावत शाळा निर्माण करून होणार नाही तर मूळ अभ्यासक्रम बदला. विषयांची डेप्थ ठेवा पण काही विषय प्रयोगशील करून मुलांचा, पालकांचा ताण कमी झाला तर सुसंकारीत शिक्षणाचा अभिमान पुढील पिढीत निर्माण होईल. माझी शाळा छान आहे पण इंडियातून बोर्ड कमी केले पण लिहिण्याच्या परीक्षे पेक्षा प्रोजेक्ट का ठेवले नाही निदान सोशल विषय तरी . आम्हालाही शिवाजी, झाशी ची राणी आवडतात पण सोशल बोअर होते. अशी पिढी बनणे घातक आहे. स्वातंत्र्याची जाणीव, बलिदाने, वैभव शाली इतिहास, वैविध्य पूर्ण भूगोल हि भारतीय परंपरा पुढे अविरत जाण्यासाठी शिक्षण, अभ्यास पद्धती, ह्यावर विचार व कृती करून काळाच्या गरजानुसार नवीन बदल गरजेचे आहे .

हुमायून ने काय केले हा इतिहास शाळेतच तासाला विद्यार्थांचा गट तयार करून प्रोजेक्ट सारखे लिहून घेतले तर, विषय गोडी वाढून सर्वांचा सहभाग असेल. गणित ला महत्व व्यावहारिक जगात आहे. शाळेत त्याचा सराव अधिक करून घेतला तर गणित बद्धल आत्मविश्वास दुणावेल. सगळे करणे शक्य आहे जर शासनाने शिक्षक शाळे करता ठेवले तर, मतदान, जनगणना, अकारण ठेवलेले उपक्रम अशा अनेक गोष्टीं करिता शिक्षक भरडला जातो. महिने महिने शाळेशी संपर्क नसतो. मुख्य म्हणजे शिक्षक व विद्यार्थी हे नाते ताणाशिवाय मुक्त होईल. कार्यानुभव सारखे विषय शाळेत असतात, त्यांना पूरक असे प्रशिक्षण ठेवले तर मुलांना त्यांच्या व्यवसायाकरिता उपयोगी ठरेल. महाराष्ट्र राज्यात ह्या बाबी कमी आढळतात. केंद्र सरकार त्यांच्या शाळा अद्यावत करते तर मग मराठी शाळा मागे का? कारण राज्य शिक्षण मंडळ! घरचा अभ्यास कधी द्यायचा ह्याचे पण नियोजन करून वेळापत्रक दिले तर वह्यांचे ओझे कमी होऊ शकते. वर्षभर मुलांना ताण कमी पडू शकतो. असे बरेच पर्याय आहेत.राज्य, शिक्षण मंडळ यांच्या नियोजनावर अवलंबून आहे.

‘शिक्षणाचा आयचा घो’ ……………..सिनेमा, बघू या कसा विचार मांडतो ते

बखूर

बखूर …
उद्………… झाडाचे अश्रू…….धूपाचे झाड! ……..ओमानी कल्पवृक्ष
dhupache zadउद् जे आपण संध्याकाळी मन वृति प्रसन्न व्हावी म्हणून जाळतो. तोच ओमान मध्ये बखूर म्हणुन प्रसिद्ध आहे. ओमान, भारत, इथिओपिया इत्यादी देश ह्याचे मुळ देश म्हणून प्रसिद्ध आहेत. भारतात मी तरी अजून धुपाचे झाड पहिले नाही. इथे ओमान मध्ये दोफार, सलाला भागात सहज बघायला मिळतात. झाड डोंगराळ खडकाळ जमिनीत येते. त्याची उंची साधारण चिक्कू च्या झाडा एव्हढी असते. बुंध्यावर चिरा पाडून उद गोळा केला जातो. त्याला ओमान मध्ये झाडाचे अश्रू म्हणतात.

dhupache zad1 Frankincense-Tree-Salalahdhupache zad2भारतात पण उद हा सर्व धर्मा मध्ये वापरला जातो. झाडापासून अत्तर, तेल, औषधे( गुढगेदुखी, दमा, विषारीदंश,स्कीन चे आजार) बुद्धी वर्धक , सौंदर्य प्रसाधने, केसांचे वर्धननिगा, अशा डोक्यापासून पायापर्यंत सर्व बाबींकरिता झाड, त्याची फुले, पाने..उपयोगी पडतात. ओमान चा प्रमुख व्यवसायांपैकी हा एक आहे. झाडाचा पर्ण फांद्यांचा घेर छत्री प्रमाणे असतो. वर्षभर उत्पन मिळत राहते. इथला बखुर प्रती बाबत उच्च असून जगभर निर्यात होते.

dhup5 इथले ओमानी सरकार, प्राणपणाने हि झाडे जपतात. त्यावर खूप प्रेम करतात. ओमानच्या डोंगराळ भागात आढळणारा हा धूप शहरात पण प्रतीकांच्या रुपात ‘राउंड अबाउट’ (म्हणजे भारतात रस्त्या वरचे नाके) येथे उभे केले आहेत. ओमानी माणूस जेथे तिथे बखुर लावलेला असतोच. झाडा ला फारशी निगा लागत नाही. थोडासा काटेरी झाडा सारखा अविर्भाव असतो. बखुर झाडे पाहण्यासाठी मुद्दामहून प्रवासी जातात. ओमानी बाहेर जाताना बखुर चे भांडे कपड्या भोवती फिरउन मगच बाहेर पडतो. त्याच्या घरात कायम बखुर पेटता असतो. प्रवेश द्वाराजवळ ठेऊन सुगंधित स्वागत केले जाते.

Wadi Kabir

Round About

frankincense-store
अशी ही धुपाची झाडे मी घेऊन आले फोटोंच्या रुपात सर्वांसाठी………………………..