त्यांचा, आदेश…………….

कालच्या दिवसभरच्या धावपळीने थकवा वाटत होता. मनासारखे घडले नाही म्हणून नाराज होतो. रेल्वे च्या गर्दीतून बाहेर पडल्यावर, बंद पुकारलेला असल्याने रस्त्यावर जी शांतता जाणवते, तसे मनाचे झाले. प्रत्येक जण एकटा होऊन रस्ता चालत असतो, सर्वांचा लोभ मिळवणारा मी, आज तसाच एकटा पडलोय. शांततेचा भंग करणारी दारावरची थाप ऐकून बेल वाजवायचे पण कष्ट नको ह्यांना, कोण बर असेल विचार करीत दार उघडले.

दाराच्या उंबऱ्या वर चेहेरा पण दिसणार नाही अशा पद्धतीने, ‘त्या’ दोन्ही हातात बाळाला आडवे करावे तसे, एकावर एक पिशव्यांची चळत ठेऊन फक्त डोळ्यांनी मला पाहत होत्या. खुणेनेच मला सांगितले, पायाने दार वाजविले. मिलियन डॉलर चे नाही, पण मोनालिसा एवढे तरी हास्य चेहऱ्यावर आणत म्हणालो, ”या”

‘त्याही’ शांतपणे घरात आल्या. पिशव्यांची चळत खाली ठेवायला साहजिकच मदत केली. मध्यमवयीन गृहिणी असाव्या. ‘त्या’ पाणी पीत होत्या व मी विचार करीत होतो. कोण आहेत ह्या? हे काय आणले आहे. दोघां मध्ये शांतता होती, जी मला असह्य शांत करते. मी बैचन होऊन ‘त्या’ बोलणार कधी ह्याची वाट पाहत होतो.

”त्या”——– ‘नमस्कार’ आज मी मुदामहून आपणाला भेटण्यासाठी आले. सुखात सगळे येतात, दुखा:त जो येतो, तोच आपला म्हणायचा

(विचार आला माझे दुखः दिसते वाटत चेहेऱ्यावर) तरी भाबडेपणा चेहऱ्यावर आणला, छे! हो, असे काही नाही.

”त्या”——— असो! वाईट गोष्टी कशाला आठवा. हे सर्व तुम्हाला द्यायला आले.

(दुखा:त पण भेटी येतात, हे ‘दादुनी’ सांगितले नव्हते) कोणी पाठविले तुम्हाला?

”त्या”———– कोणी कशाला पाठवेल. तुमच्या मुळे मी हुशार झाले, म्हणून स्वतः निर्णय घेतला व आले.

(मी शिक्षकाचे काम कधीही केले नाही)

———————तुमची ओढ इतकी आहे कि मी ठरवलेच काही नाही आपण साथ द्यायची. त्या साठी ह्यांच्याशी पण भांडून इकडे आले.

(मी ओढ लावण्यासारखे कधीच बाहेर काही केले नाही. मला राणी मुखर्जी सारखी दिसणारी, माझी बायको मोठ्ठी असली तरी, आजही प्रिय आहे)————तुम्ही भांडून का आलात?

”त्या”—————-फारच कोरडे पणाने बोलता आपण. पूर्वी कसे मधाळ हसू चेहऱ्यावर असायचे, शब्दात गोडवा जाणवायचा. तरी मी ह्यांना म्हणाले कि, ”राजकारणात भल्या भल्यांचे माकड होते”.

मी समाजकार्याची आवड म्हणून राजकारणात आलो. घरा, घरातून फिरताना अडचणी जाणवत होत्या. माझी मदत करण्याची ईच्छा होती. जाऊ दे भूतकाळ आहे माझा.

(तरीही ‘त्या’ आपला हेका सोडत नव्हत्या)

”त्या”————– किती! दुखी: केलेत आम्हाला तुम्ही. सासरी आल्यावर पण मी एव्हढी रडले नव्हते. आता नवीन लोकां बरोबर जमून घेते पण नाईलाजानेच. माझ्या सारख्या दुखी: झालेल्या आपल्या माहीम मधल्या १०० जणी कडे मी गेले.

कशाला एवढा त्रास घेतलात. आधीच संसारातुनी वेळ काढुनी……….व्याप सांभाळणे कठीण असते. आभारी आहे. आता जरी घरी बसलो तरी ‘दादुना’ सांगेन जमेल तशी मदत करायला.

“त्या”———– तीन नि तीन अपेक्षा पण नव्ह्ती, साईबाबा न कडून डोके मिळवून आले. ‘ सर दे साई’ असे मागत होते म्हणे! म्हणून तेरा झाले.

एकाच घराच्या दोन भिंती, कशाला इकडचे, तिकडचे असा फरक करा. दरवाजा तर भक्कम आहे. शून्य तरी नाही, शंभर व्हायला वेळ कितीसा लागेल. ‘जय भवानी, जय शिवाजी’

”त्या”———— जाऊदे ते समाजकारण आणि राजकारण. मी आले कशाला ते सांगते व जाते कारण पुढच्या दीपावलीत ह्यांना खर्च नको, हेच ९८ जणींना समजावून भेट द्यायला आले.

कोण ९८? कळले नाही. उखाणे ऐकण्याची सवय होती मला एककेकाळी, पण हे सांगितल्या पेक्षा १० वस्तू वेगळ्या आणल्या सारखे झाले.

”त्या”————९८ माझ्या मैत्रिणी अधिक मी १ म्हणजे ९९ झाल्या. एकाचीच तर गंमत आहे.

(ह्या तर आकडे सांगायला लागल्या, ‘मातोश्रींना’ बोलावू का मदतीला) ——एक आकडा सविस्तर सांगता का?

”त्या”——— मी हावभाव करते. ओळखा.

त्यांनी बोटांनी १ आकडा दाखवला, व नंतर २ अक्षरी शब्द आहे असा दमशेरा खेळ खेळला. मला काहीही बोध झाला नाही. गोड बोलून कोडी घालणारा मी, सोन्याचे नाणे हरविल्या सारखा माझा चेहेरा झाला.———कळले नाही हो मला.

”त्या”———–९९ चा हिशोब कळला असेल. आता हा १ आकडा म्हणजे, “ ……………..योग तुझा घडावा” ह्या श्लोकाची सुरवात जिथून होते तो शब्द म्हणा.

ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे, सदा……………असेच न! पण ह्या पिशव्यातून आहे तरी काय?

”त्या”———-आमच्या ९९ जणींच्या व सदा ची सर्वदा असणारीने पण, आमच्या नवऱ्यानी तुम्हाला लक्षात ठेवले नाही. ह्याचा फार राग आला आहे म्हणून तुम्ही दिलेल्या ‘पैठण्या’ परत द्यायला आणल्या आहेत.

मी घेऊन काय करू?

”वाहिनी”———-आम्ही प्रेमाने देतोय. सदा च्या घरातून निरोप आहे, ”तुम्ही दिलेली पैठणी नेसून ह्यांना ओवाळणार होते पण आता शक्य नाही. राग मानू नका. पण ह्यांना कदर नाही हो! म्हणून मागच्या दारातून परत करते” आता या न तुम्ही पहिल्या सारखे, दारात छान रांगोळी घालते. पाच वर्ष तरी पुन्हा सवड आहे आहे तुम्हाला. तुमची पैठणी नेसून तुम्हालाच ओवाळायचे आहे आम्हाला, हे ही खूष पैठणीचा खर्च नको ………”भाऊजी”

मी नेहमी सारखा हसलो. वाहिनी नी मोबाईल केला, ”अहो!” पलीकडून आवाज ऎकू आला ”आला आला बांदेकर पैठणी घेऊन परत आला”

असा त्यांचा आदेश मी स्वीकारला

3 प्रतिक्रिया (+add yours?)

  1. Aparna
    ऑक्टोबर 25, 2009 @ 05:01:12

    वैनी, हा लेख वाचुन आदेशभौजी तुमच्याचकडे येतील आणि राणी मुखर्जीसाठी पैठणी घेऊन जातील (पाडव्याची ओवाळणी गडबडीत राहिली असेल) एकदम अव्वल लेख लिहिलाय…आईला वाचायला देईन नंतर. ती विचारत होती आदेशचं काय झालं गं म्हणून म.टा. मध्ये शोधुन दाखवलं एकदाचं…असंच मागच्यावेळी गोविंदाचं केलं असतं तर बरं झालं असतं असं वाटतं…पण त्याच्यावरुन धडा घेतला वाटतं लोकांनी…

    उत्तर

    • anukshre
      ऑक्टोबर 25, 2009 @ 07:56:13

      कलाकार राजकारणात अडकला कि कलेला वाव मिळत नाही.आपली कला जोपासत समाजसेवा करता येते.गोविंदा ची आठवण काढलीस ते बरे केलेस.निदान बहरत असलेले कलाकार अडकू नयेत, हाच उद्देश……..

      उत्तर

  2. sahajach
    ऑक्टोबर 26, 2009 @ 09:26:37

    मी कशी बघितली नाही ही पोस्ट…..मस्त जमलीये भट्टी……आता जितेंद्र जोशीला टेंशन आले असेल….मिळालेला जॉब जाणार….

    उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: