माझ्याबद्दल थोडेसे…
नमस्कार,
मला लेखनाची आवड आहे. घरी डायरी मध्ये लिहित होते. परंतु जेंव्हा ब्लॉग वर लिहिणे सुरु केले तेंव्हा लिखाणाला एक मापदंड मिळाला. लिखाणाने व्यक्तिमत्व बदलते. लिखाण जेंव्हा वाचकांकडून वाचले जाते तेंव्हा स्वत:चे परिमाण मिळते. लिखाणामुळे प्रत्येकाशी समोरासमोर न बघता सुद्धा नाते जुळते. फेस बुक व आर्कुट येथील अनुभव नाही. पण ब्लॉग वर केलेले संभाषण हे अधिक जवळचे वाटते. ब्लॉग छंद म्हणून लिहित आहे .
ब्लॉग हा विचाराची देवघेव करण्यासाठी असावा. लिखाण हे नेहमी स्वतः करिता करावे तरच त्याचे दडपण येत नाही. अशा विचारांतून ‘अनुक्षरे’ ब्लॉग सुरु केला आहे. ब्लॉग मुळे एकटेपणा जाणवत नाही. आपण विचारांद्वारा एकमेकांशी सलग्न असतो. आयुष्यातले बरे वाईट अनुभव, एखादी गमतशीर घटना सगळ्यां बरोबर पुन्हा अनुभवू शकतो. आपल्याशी संवाद साधण्याचा, विचार उद्युक्त करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न……..
आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया द्वारा नेहमीच अधिक उत्तम लिहिण्यास प्रोत्साहन मिळते. असाच पाठींबा आणि लोभ असावा, तो वाढवा हीच सदिच्छा.
धन्यवाद,
आपले ‘ अनुक्षरे ‘ मध्ये स्वागत!